![korean pancake](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2023/03/22/IMG_5671.jpg)
भाज्या- कांद्याची पात, मश्रूम्स, गाजर, सिमला मिरच्या, रंगीत मिरच्या , पत्ता कोबी वगैरे, आवडीच्या कोणत्याही भाज्या. चिरुन १ लहान बोल भर
बाइंडिंग साठी - ऑल पर्पज फ्लार, मैदा, किंवा गव्हाचे, किंवा तांदळाचे पीठ. - ३-४ चमचे
सॉस साठी - सोया सॉस ३ चमचे, राइस व्हिनिगर २ चमचे, तिळाचे तेल किंवा भाजलेल्रे तिळ
ही रेसिपी मला इन्स्टा रील्स मधे एकदा दिसली होती तेव्हापासून करायचे डोक्यात होते. काल करायला मुहूर्त लागला. लो कार्ब, फायबर रीच, झटपट आणि तरी पण चटपटीत रेसिपी हवी असल्यास हा एक मस्त ऑप्शन आहे. यात मुख्य चव आणि टेक्स्चर त्यातल्या भाज्यांचे असते. सोबतच्या सॉस ने चटपटीत खाल्ल्याचे समाधान मिळते. पॅनकेक म्हणा किंवा धिरडे प्रकार तोच.
कृती अगदी सोपी आणि खूप वर्सटाइल आहे. हा नसेल तर तो इन्ग्रेडियन्ट वापरा असे.
सॉस - सोयासॉस, व्हिनेगर एकत्र मिक्स करा , त्यात काही थेंब तिळाचे तेल - सेसमी ऑइल घाला, हवा तर हॉट सॉस घाला. झाला सॉस तयार! तिळाचे तेल नसेल तर भाजलेले तीळ वरून घाला. मस्त चटपटीत चवीचा सॉस तयार.
पॅनकेक - वर दिलेल्या पैकी असतील त्या भाज्या बारीकचिरून घ्या. मी एक लहान बोल भरून भाज्या घेतल्या . त्यात आवडीचे सीझनिंग घाला जसे हिरव्या मिर्च्या, आले लसणाचे बारीक तुकडे , किंवा नुसते मीठ मिरी पण चालेल. आता बॅटर तयार करण्यासाठी १ बोल भाज्यांना अगदी २-३ चमचे पीठ आणि थोडे पाणी असे कालवा.
गरज वाटली तर अजून एखादा चमचा . पिठ जास्त नाही झाले पाहिजे. बाइंडिंग साठी जस्ट इनफ किंवा थोडे कमीच पीठ वापरायचे आहे.
हे पहा असा दिसतो कच्चा पॅनकेक . मला शंकाच आली होती हे धिरडे उलटायचे कसे! पण झाले बरोबर.
मिडियम हाय वर पॅनकेक नीट खरपूस भा़जून घ्या. भाज्या मस्त क्रिस्पी होऊ देत. झाला पॅनकेक तयार!! सॉस बरोबर गरम गरम खा!
पॅनकेक बोल के थालीपीठ
पॅनकेक बोल के थालीपीठ
रेसिपी मी कधी वाचत नाही. पण दिसतेय चटपटीत.
सगळ्यांचे फोटो भारी आहेत.
सगळ्यांचे फोटो भारी आहेत. प्राजक्ता छान आलाय की फोटो, असं का म्हणतेस. सगळ्यांच्या डीशेस वगैरेही भारी. डीजेच्या सॉसमधले तीळ लक्ष वेधून घेतायेत.
मस्तच दिसतंय . कॉस्टकोमध्ये
मस्तच दिसतंय . कॉस्टकोमध्ये जे स्प्रिंग मिक्स मिळते , त्याचा मी असा प्रकार करून पाहिलाय . नुसते सॅलड म्हणून खायचा कंटाळा आला की ,त्याच्यावर मी बरेच प्रयोग करत असते.
प्राजक्ता, पॅन केक च्या पीठात
प्राजक्ता, पॅन केक च्या पीठात जराशी साखर असते ना पण? मग गोडसर होतिल..
प्राजक्ता, पॅन केक च्या पीठात
प्राजक्ता, पॅन केक च्या पीठात जराशी साखर असते ना पण? मग गोडसर होतिल..>> अगदी कोट होण्यापुरतच पिठ वापरल होत मी ,त्यामुळे गोड वैगरे जाणवल नाही, तसही मी थोड तिखट, मिठ, ब्लॅक पेपर पावडर वैगरे टाकल होत.
Finding You
..
आज दुसर्यांदा बनवले वेज
आज दुसर्यांदा बनवले वेज पॅनकेक. छान होतात कुरकुरे. कोबी, सिमला, बटाटा घालून.
आज हे पॅनकेक्स केले. खूपच
आज हे पॅनकेक्स केले. खूपच आवडले आणि खूपच झटपट झाले, त्यामुळे मी एकदम खुश. उरलेल्या भाज्या स्पेशली कांदा पात जी नेहमीच खराब होऊन वाया जाते, थोडीशी उरलेली कोबी, रेड पेपर्स यात ढकलून दिले. तिळाचे तेल नव्हते पण तीळ टाकले. फोटो नाहीयेत पण. एक gochujang चिली पेस्ट होती ती सॉसमध्ये टाकली. मस्तच. रेसिपीबद्दल धन्यवाद .
* भारती आचरेकर मोड ऑन-
* भारती आचरेकर मोड ऑन-
function at() { [native code] } आता एकदाचा पेशावरी नान कर आणि त्याला प्रादेशिक खूण "भारतीय" दे. म्हणजे तू ही मोकळी नि मी ही मोकळी. ते गांधी-नेहरू, भुट्टो-खान सगळे सगळे मोकळे... आमच्या वंदूच्या सिनेमात मंगळागौरीच्या पूजेला चौरंगावर कलश! काजळी लावलेलं उपड फूलपात्र नाही. बये, महादेव नि गौर कुठे तुमची? विचारावं लागतं. तसं इथे अॅडमिन टीम कुठे विचारावं लागतं. अॅडमिन टीम, प्लीज, १९५ देशांचा एक ड्रॉप-डाऊन मेन्यू द्या की तुम्ही ही मोकळे नि आम्हीही...
*भारती आचरेकर मोड ऑफ.
अरे पॅनकेक वाचुन उघडला नव्हता
अरे पॅनकेक वाचुन उघडला नव्हता हा धागा, आवडत नाही विशेष म्हणुन. याला पॅन्थाली म्हणता येईल, पीठ नावाला आहे म्हणुन. नक्कीच करणार.
आता करून बघायलाच पाहिजे.
आता करून बघायलाच पाहिजे.
Pages