मायबोलीकरांचे काळा घोडा फेस्टिव्हल मध्ये गटग :

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:53
ठिकाण/पत्ता: 
काळा घोडा फेस्टिव्हल रॅम्पर्ट रो. दिनांक : ११ फेब्रुवारी २०२३. भेटायची वेळः दुपारी साडेबारा भेटायची जागा: जहांगीर आर्ट ग्यालरीच्या पायर्‍या.

पिश वीत आणा यचे सामानः मास्क. एकदम विचारल्यास हाताशी हवा. एक पाण्याची बाटली. एक दोन रिकामे डबे व जास्तीच्या कापडी पिशव्या शोपिन्ग ठेवायला.

पुण्याहुन येणा र्‍या मंडळींनी ट्रेन ने आले तर सोपे जाईल. सी एस टीला उतरून यायला जवळ पडेल.

माहितीचा स्रोत: 
जाल
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 10, 2023 - 23:49 to शनिवार, February 11, 2023 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय अहो तिकडे दुसृया धाग्यावर डेट फिक्स करायची चर्चा चालू आहे. तिथे डेट फिक्स झाली की इथे लिस्ट पक्की लिहू.

पूर्वीच्या सिनेमात स्मगलर्सचा कोडवर्ड असायचा तसं वाटतंय काळा घोडा. मायबोलीकरांनी एका डोळ्यावर काळी पट्टी बांधून आल्यास ओळखणे सोप्पे जाईल. एकमेकांना काळा घोडा हा कोडवर्ड सांगताना उजव्या पायाच्या पिंडरीवर डाव्या पायाचा अंगठा घासणे ही परवलीची कृती असावी. गटग मधे लाल पिवळे उघडझाप करणारे दिवे, चढती जवानी मेरी चाल मस्तानी सारखे फडकते गाणे असा जामानिमा असेलच. बाकी सगळे सूज्ञ आहेतच. त्यामुळे जामानिमा मधे जाम आलाच हे सांगणे न लगे.

येणा रे माबोकर

भरत
टी आय
राहुल बावनकुळे
अश्विनी मामी
अश्विनी-९९९
एस आर्डी
मंदार डी.

अजून अपडेट करा आता इथेच.

मी पण येणारे.

हे मायबोली गटग पेक्षा अश्विनी गटग जास्त वाटतेय Happy

भरत
टी आय
राहुल बावनकुळे
अश्विनी मामी
अश्विनी-९९९
एस आर्डी
मंदार डी.
इन्द्रा (माझे नाव पन अश्विनि आहे)

आता बंगलोरकरांना (बेंगळुरु हां) वाटेल की आपण लालबाग कट्टा करायला हवा होता.

जयपूर लिटररी फेस्टिवल Willium Darlymple ( माझा आवडता लेखक )याने चालू केला. ते पाहून मुंबई,कोलकाता,कोची इथेही तसले सुरू झाले.

तसं काळाघोडाफेस्टिवल( kgf )म्हणजे ओपन सोर्स जत्रा आहे त्यामुळे हवे,नवशे,गवशे आणि ज्येष्ठ नागरिकही चालतील बहुतेक.

जी मायबोलीकर मंडळी कालाघोडा येथिल मायबोली गटगला नक्की येणार आहेत किंवा जी येण्यासाठी उत्सूक आहेत, त्यांनी खालील दुव्यावर टिचकी मारून वॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा ही विनंती. सदर ग्रुप अश्विनीमामीच्या पुढाकाराने उघडला असून जॉईन करतांना तुमचे अधिकृत नाव व मायबोलीवरील युझरनेम लिहावे. अन्यथा सार्वजनिक स्थळावर दुवा शेअर केल्याने, अनावश्यक घटक गैरफायदा घेऊन वॉट्सॲप ग्रुपमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://chat.whatsapp.com/BCxz51hj2mRKeulcK707Bb

ह्या ग्रुपद्वारे एकामेकांशी संपर्कात राहणे अधिक सोपे होईल, कारण प्रत्येक वेळी गटगसंबंधीत इथले दोन्ही धागे बघणे शक्य नसते.

अन्यथा सार्वजनिक स्थळावर दुवा शेअर केल्याने, अनावश्यक घटक गैरफायदा घेऊन वॉट्सॲप ग्रुपमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी टेलिग्राम app आहे ना! मायबोली यूजरनेम हेच टेलिग्रामवर यूजरनेम टाकायचे. मोबाईल नंबर गुप्त राहतो.

'कालघोडा २०२३ मायबोली' नावाचा किंवा अन्य सुटसुटीत नावाने ग्रूप सुरू करावा.

यासाठी टेलिग्राम app आहे ना! मायबोली यूजरनेम हेच टेलिग्रामवर यूजरनेम टाकायचे. मोबाईल नंबर गुप्त राहतो >>> धन्यवाद. मी कधीही टेलिग्राम वापरले नाही, त्यामुळे हे माहीत नव्हते.

जी मंडळी कालाघोडा मायबोली गटगसाठी इच्छुक आहेत त्यांनी लगेचच खालील व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती. ह्या किंवा दुसऱ्या धाग्यावर जरी अनेक मायबोलीकरांनी गटगसाठी उत्सुकता दाखवली असली तरी, सध्या व्हाट्सऍप ग्रुपवर ११ मंडळीच जॉईन झाली आहेत.

https://chat.whatsapp.com/BCxz51hj2mRKeulcK707Bb

व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून सगळी इच्छुक मंडळी एकमेकांच्या संपर्कात राहतील आणि गटगचे पुढील नियोजन करणे सोपे होईल. तथापि आम्ही ग्रुपवर अजून नियोजनास सुरुवात केलेली नाही कारण जशी जशी नवीन मंडळी जॉईन होतील त्यांची मते व सोईंकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे लौकरात लौकर ग्रुप जॉईन करावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

सध्या व्हाट्सऍप ग्रुपवर खालील मंडळी जॉईन झाली आहेत:
राहुल बावणकुळे (अस्मादिक)
अश्विनीमामी (ज्यांनी गटगची संकल्पना मांडली आणि अन्य काही कामानिमित्त त्या भागाची नुकतीच पाहणीही करून आल्या)
भरत
अश्विनी९९९
चंपा
TI (ज्यांच्या धाग्यामुळे गटगची संकल्पना आली)
अश्विनी ११
इंद्रा
rockstar1981
svalekar
आणखी एक जण आहेत, त्यांनी आपली ओळख सांगितली नाही

हो

Pages