गोर्‍यांच्या देशात

Submitted by केअशु on 29 December, 2022 - 10:40

मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?

मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरेच भारत खूप मागास आहे.
भारतील जिल्हा नुसार आर्थिक स्थिती बघितली तर .
भारत जगातील सर्वात गरीब देशात गणला जाईल.
..पाश्चिमात्य देश,आखाती देश ह्यांनी भारतीय लोकांस प्रवेश च नाही दिला तर .
त्यांच्या पेक्षा भारताचे जास्त नुकसान होईल.
पाश्चिमात्य देश किंवा आखाती देश येथील भारतात कोणी येऊन राहण्याची कल्पना पण करत नाहीत.
उगाच स्वतःची लाल करण्यात काही अर्थ नाही.
भारतात बिगारी काम करणारा साधा रेडिओ खरेदी करू शकत नाही
पण आखाती देशात जो भारतीय मजुरी ,बिगारी काम करतो तो सर्वात उत्तम ब्रँड sony च tv आरामात विकत घेवु शकतो.
.फालतू अभिमान काही कामाचा नाही.
आयटी इंजिनियर्स भारतात दहा ते तीस हजार च पगार घेवू शकतात..तेच ते अमेरिकेत लाखो रुपये पगार घेतात

भारतात हुषार लोक खूप आहेत. हॉटमेल भारतीयाने शोधून काढली म्हणे. तसे इतरहि काही चांगले केले असेल.[पण त्याचा व्यावसायिक दृष्ट्या फायदा कसा घ्यावा हे जमले नाही. या उलट फेसबूक नि इतर बरेच काही इथे केले नि लगेच त्याचे ओद्योगिकरण करून टाकले. आता ते लोक भारतातल्या लोकांना लाखोने पगार देतात का माहित नाही.
पण Hemant 33, जरा जयशंकर चे ऐका. तुलना नकोच. आपण आपले आपल्याला काय करायचे ते करून सुखी व्हावे. क्रिकेट नि बॉलिवूडपेक्षा जरा इतर ठिकाणी लक्ष द्यायला हवे.

एक एक करके तारे भये अनेक असं होतं ते मला वाटतं. म्हणजे तारे उगवले असा अर्थ असणार. >>> हो Happy मी चेक केले नंतर. तसेच आहे. पण ढोबळ अर्थाने इथेही लागू होईल म्हणून खुलासा करत बसलो नाही Happy

भारत प्रगत च आहे .
बिमारू राज्य.
यूपी,बिहार इत्यादी भारतात असल्या मुळे भारत जगातील सर्वात गरीब देशात गणला जाईल.
राज्य wise सर्व्ह केला तर

फक्त
महाराष्ट्र.
गुजरात
तामिळनाडू, केरळ
कर्नाटक
पंजाब.हिमाचल ., हरयाणा
तेलंगणा.
आंध्र.
दिल्ली., जममु आणि काश्मीर.
गोवा
ह्या
राज्यांचा विचार केला आणि हाच भारत आहे असे समजले तर
तो जगातील अनेक प्रगत देशांशी टक्कर देईल इतका .
प्रगत आहे

अमेरिका पण तेथील काहीच राज्य मुळे प्रगत समजला जातो.
मला नाही वाटत पूर्ण अमेरिका हा प्रगत आहे.
तेथील पण अनेक राज्य खूप मागास असतील

10 January, 2023 - 13:09: खरेच भारत खूप मागास आहे.
11 January, 2023 - 13:48: भारत प्रगत च आहे
२४ तासात एवढी प्रगती करणारा एकमेव देश.

आता
असं

लिहित

ला >> Lol
सरांना वाटेल तसं लिहितील. त्यांना सगळं माफ आहे.

US airspace is closed due to system failure. Please be careful maayboli members. Hope no family members are stranded.

<<मला नाही वाटत पूर्ण अमेरिका हा प्रगत आहे.
तेथील पण अनेक राज्य खूप मागास असतील>>

आहेतच, असे म्हणतात. म्हणजे तिथे तंत्रज्ञान सर्व आहे, पण अक्कल कमी नि वाईट प्रवृत्ति जास्त. अश्या ठिकाणी जाणे नको.

अख्खी अमेरिका मागास आहे.
त्यांना द्रव आणि वायुतला फरक सुद्धा कळत नाही.
पेट्रोल किंवा डिझेल हे द्रवरुपात कारच्या टाकीत भरतात आणि टाकीत गॅस भरला असे सांगतात.

हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत?
प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. पण करीअरच्या संधी हे एक मोठं कारण आहे.

या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय?
असं का वाटतं तुम्हाला. हे चूक आहे.

भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
नाही, आपलं जग मोठं करायला जातात. आपलं जग आपल्याला कृतीने मोठे करावे लागते, नकाशा बघून होत नाही.

हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का?
नाही. बिघडवणाऱ्यांची संख्या यामानाने अफाट आहे आणि ते भारतातच रहातात.

गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
स्वच्छता व शांतता आहे. जे मला अनमोल वाटते. भ्रष्टाचाराबाबत सामान्य माणसाचा रोजचा संबंध नाही. वेगळ्या समस्या इथेही आहेत.

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
मी तरी कोणी बघितलं नाही. उलट तरूणपणी आईवडिलांपासून दूर रहावं लागलं , निदान म्हातारपणी तरी मुलांपासून नको या विचारांचेच लोक बघितलेत. पण जावे वाटले तर काय चूक आहे !

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे.
भारतातून अमेरिकत येऊन काम करणारे प्रत्येकजण बुद्धिमान नाही.

पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे.

मला तर पहिला उद्देशही कळला नाही. अनेकवर्षं इथे राहिल्यावर चर्चा करणे बंद होते, जसे आहे तसे स्विकारून माणूस पुढे जातो. भारतात गेल्यावर मात्र नातेवाईक हा विषय आवर्जून काढतात. आमच्याकडे / तुमच्याकडे खेळणे अपरिहार्य करतात. ( लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. आमची म्हैस- तुमची म्हैस गाजराचा पाला खाते, शेर शेर दूध देते , बोला तुमची दगड का माती. अगदी तसे Proud ) आम्ही तुमचेच आहोत हो !!!

अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
इथे वर्णद्वेष आहे, तिथे जाती व धर्मद्वेष आहे. द्वेषाशिवायचा देश पृथ्वीवरच नाही. चांगल्या आयुष्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही.

ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून?
छंदाने आनंद मिळतो. त्यासाठी सोमवार ते शुक्रवार हे लोक कष्टं उपसतात. छंदीफंदी असले तरी उथळच असतील असं नाही. उलट आपल्याकडे छंदांना का कमी लेखतात हे मला कळत नाही.

--------
'गोऱ्यांच्या देशात' असं का शीर्षक आहे, सरळ 'परदेशात'/ 'विकसित देशांत' का नाही लिहिले? अमेरिका, युएस , कॅनडा , ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये सर्व रंगाचे, वंशाचे लोक आहेत. मुख्य म्हणजे अमेरिका हा देशचं ईमिग्रंट्सने वसवलेला आहे असं म्हणतात. विशेष म्हणजे आता हा देश आमच्यासारख्या परदेशस्थांच्या मुलांचाही आहे आणि ते 'गोरे' नाहीत. पैशासाठी जाण्यात काय चूक आहे आणि सगळेजणं पैशासाठीच काम करतात नं. भारतात राहून नोकरी करणारे सतत देशसेवा व समाजकार्य करत असतात का ?!!!  मला फार वैताग येतो हे सतत वाचून. दुसऱ्यांचे देशप्रेम परस्पर ठरवून मोकळे होणे अतिशय अयोग्य तर आहेच व हे पर्सनल स्पेसमधे अतिक्रमणही आहे. माबोवर अनेकवेळा वाचलंयं.

सगळीकडेच सामान्य जनता साधारण सारखंच आयुष्य जगते.परदेशातून आता दूध, दही, ऑनलाईन किराणा एकुणएक बीलं भरता येतात. भारतात आर्थिक पाठबळ नसलेल्या कुटूंबातील लोकांनी जरूर यावे व आर्थिक संघर्षातून स्वतः शापमुक्त व्हावे. पैसा ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. अव्यवहारी असणं हा मूर्खपणा आहे, चांगुलपणा नाही. त्यासाठी लागेल ते कष्ट करायची व बदल स्विकारायची तयारी ठेवावी. चॅरिटी सुद्धा बिनपैशाची करता येत नाही. 

 आपल्या संस्कृतीत आर्थिक महत्त्वाकांक्षेचे दमन करायची पद्धत व एक चोरटेपणा आहे. त्यापेक्षा स्विकार करावा , आपापल्या प्रेरणा व आनंद शोधून जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन छान कंफर्टेबल आयुष्य जगावे. बहुतेकवेळा आपल्या देशासाठी/समाजासाठी/कुटुंबासाठी आंतरजालाच्या मदतीने आता आपण कुठूनही लागेल ती मदत करू शकतो. Just one click away.!!! Intentions नसतील तर कुठेही राहिले तरी काय फरक पडतो.

साधे सोपे आहे बिहार मध्ये मजुरी करून जितकी मजुरी मिळते त्या पेक्षा जास्त मजुरी तेच काम करून मुंबई मध्ये मिळते.
बिहार मध्ये ड्रायव्हर ची नोकरी करून जितका पगार मिळतो त्या पेक्षा किती तेरी जास्त पगार तीच नोकरी करून मुंबई मध्ये मिळतो.
मुंबईत वीज,पाणी,वाहतूक,कायदा सुव्यवस्था,आरोग्य सुविधा,
ह्यांची अवस्था अतिशय उत्तम आहे बिहार पेक्षा.
कारण मुंबईचे प्रशासन उत्तम आहे.
उत्तम प्रशासन असेल तर च आर्थिक प्रगती होते.

जगातील अती उत्तम उद्योगपती अफगाणिस्तान मध्ये मोठा उद्योग उभारू शकत नाही
त्या साठी पाश्चिमात्य देशात च त्याला जावे लागेल.
हा फरक अमेरिका आणि भारत ह्या मध्ये आहे.

जो फरक बिहार आणि मुंबई मध्ये आहे तोच फरक भारत आणि अमेरिका मध्ये आहे.
आपण जसे बिहारी लोकांकडे बघतो तसेच अमेरिकन भारतीय भारतीय लोकांकडे बघतात
वर्णद्वेषी पानाचा तो एक प्रकार आहे.
त्यांना जेव्हा हे परदेशी लोक डोईजड वाटतील तेव्हा तिकडे पण राज ठाकरे तयार होईल.
त्या मुळे .
भारत कसा सुधारेल हे ध्येय असणारी लोक भारतीय भूमीत जन्माला येणे गरजेचे आहे.
खरे तर दुहेरी नागरिकत्व भारताने बंद केले पाहिजे.
हा जालीम उपाय योग्य तो बदल घडवून आणेल

अस्मिता, अतिशय उत्तम आणि मुद्देसूद प्रतिसाद. पोस्ट पूर्ण पटली.

पैशासाठी जाण्यात काय चूक आहे आणि सगळेजणं पैशासाठीच काम करतात नं. भारतात राहून नोकरी करणारे सतत देशसेवा व समाजकार्य करत असतात का ?!!! मला फार वैताग येतो हे सतत वाचून. दुसऱ्यांचे देशप्रेम परस्पर ठरवून मोकळे होणे अतिशय अयोग्य तर आहेच व हे पर्सनल स्पेसमधे अतिक्रमणही आहे. माबोवर अनेकवेळा वाचलंयं. >>> याला विशेष अनुमोदन.

“ खरे तर दुहेरी नागरिकत्व भारताने बंद केले पाहिजे.” - भारत ऑफरच करत नाही, मग बंद कसं करणार?

अस्मिता, फार छान आणि मुद्देसूद लिहिलंय तुम्ही.

आपण जसे बिहारी लोकांकडे बघतो तसेच अमेरिकन भारतीय भारतीय लोकांकडे बघतात
वर्णद्वेषी पानाचा तो एक प्रकार आहे. >> प्रचंड अनुमोदन.
अमेरिकेत तर हा वर्णद्वेष एवढ्या टोकाचा आहे की गोरे लोक, भारतीय लोकांना मोठ्या कंपन्यांत क्षुल्लक सीईओ वगैरे सारख्या खालच्या पदांवर नेमणूक करून हीन प्रतीची कामे करायला लावतात.
सामान्य अमेरिकन माणसाचा वार्षिक पगार चाळीस पन्नास हजार असतांना भारतीयांना लाखाच्यावर पगार देऊन त्यांच्याकडून भरमसाठ टॅक्स वसूल करतात. तरीही कणखर (तुम्ही कणा नसलेले म्हणा) भारतीय लोक निर्लज्जपणे हसत हसत हा अत्याचार सहन करत राहतात.

दुहेरी नागरिकत्व बंद करण्यासाठी तर मोर्चाच काढला पाहिजे. फक्त ते बंद करण्यासाठी, घटनादुरुस्ती करत कायदा पारित करून ते पहिले चालू करावे लागेल ही टेक्निकल पुर्तता झाली की ते लगेच बंदच केलेच पाहिजे.

नोकरी देतात,पगार देतात म्हणजे इज्जत देतात हा अर्थ नसतो.
सर्वात मोठी शंका.
आता अमेरिकन लोक तिथे जास्त आहेत आणि भारतीय कमी आहेत..हे असेच चालू राहिले तर भारतीय लोकांची संख्या जास्त होईल आणि अमेरिकन लोकांची संख्या होईल ..तेव्हा अमेरिकेचा पण भारत भारतीय लोक नक्की करतील.
बेशिस्त पना,भ्रष्ट कारभार, cheating , रस्त्यावर, मैदानात झोपड्या सर्व भारतासारख्या च तिथे होईल
कचऱ्याचे ढीग, सर्व सर्व काही भारतासारख् च च.
विदेशात गेल्या सारखे वाटणार च नाही.
जसे भारतात मुस्लिम लोक वाढली की भारत चा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान होईल असे तर्क असतात ना त्या प्रमाणे

आता अमेरिकन लोक तिथे जास्त आहेत आणि भारतीय कमी आहेत..हे असेच चालू राहिले तर भारतीय लोकांची संख्या जास्त होईल आणि अमेरिकन लोकांची संख्या होईल ..तेव्हा अमेरिकेचा पण भारत भारतीय लोक नक्की करतील.>> गंभीर प्रश्न आहे सर हा. याच्यावर उपाय एकच .. माबो वर उपदेश करण्यापेक्षा आपणच अमेरिकेकडे प्रस्थान करावे.

ईज्जत तर भारतीयांना मांजरवाडी बुद्रुकमधल्या म्युन्सिपाल्टीतल्या ऊंदीर मारण्याच्या विभागात कारकुनी करणारा साधा पिऊनही देत नाही हो. मग अमेरिकन का म्हणून देतील? आणि नाही दिली तर त्याचे काय मनावर एवढे मनावर घ्यायचे.

“ इज्जत देतात हा अर्थ नसतो.” - हा मुद्दा जरा विस्कटून सांगता का, म्हणजे प्रतिसाद देता येईल. इज्जत देणं म्हणजे काय अपेक्षित आहे? इज्जत देत नाहीत म्हणजे नेमकं काय करतात?

<<बिघडवणाऱ्यांची संख्या यामानाने अफाट आहे आणि ते भारतातच रहातात.>>
त्याचप्रमाणे भारत सुधारणारे लोकहि भारतातच बहुसंख्येने आहेत. भारत सुधारतो आहे, नि अत्यंत वेगाने हे पहा.
अमेरिकेशी तुलना करू नका. त्यांना दोन महायुद्धात जगाला लुटायची संधि मिळाली. भारत दीडशे वर्षे पारतंत्र्य्यत होता, इंग्लंडने भारताला लुटले. तोपर्यंत अमेरिकेने मध्यपूर्वेतील लोकांना फसवून खूप पैसा केला. अशी फार वेगळी वेगळी परिस्थिती आहे. तेंव्हा दम धरा. भारतच महान!

<<<भारतातून अमेरिकत येऊन काम करणारे प्रत्येकजण बुद्धिमान नाही.>>> त्यामानाने इथे तश्या कमी बद्धिमान लोकांना भरपूर संधि मिळते. आयुष्य सुखात जाते, लाचलुचपत दिरंगाइ, फसवेगिरी हे रोजच्या जीवनात नाही. मी तर गेली ५२ वर्षे इथे रहातो आहे. १९९० पर्यंत भारतातल्या पेक्षा इथे चांगले होते, आता भारतात बक्कळ पैसा झाला तरी हेमंत३३ सारख्या लोकांचे समाधान नाही. माझे अजूनहि उत्तम चालू आहे, पण भारतातल्या लोकांइतकी चैन नाही.

Pages