गोर्‍यांच्या देशात

Submitted by केअशु on 29 December, 2022 - 10:40

मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?

मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला कामात जाणवलेला मुख्य फरक म्हणजे भारतात असताना मी मुख्यतः (IT) सेवा क्षेत्रात काम केलं.
म्हणजे अमेरिका किंवा युरोप मधील कंपनीला सेवा पुरवण्याचं काम भारतीय कंपन्या घेतात. आणि त्यासाठी कामगार ठेवून काम करून घेतात.
यात मुख्य असत ते तुम्ही ग्राहकाच्या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असणं.
म्हणून रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबणं, किंवा रात्री घरून मिटींग्स घेणं महत्वाचं असतं. याशिवाय भारतातील सहकर्मचाऱ्यासाठी भारतीय वेळेत उपलब्ध राहावंच लागत. परिणामतः छंद जोपासण्यासाठी वेळच उरत नाही.

अमेरिकेत संशोधनाच (RnD) मी काम करत असल्यामुळे ५ वाजता दुकान बंद करण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत मिळत. म्हणून छंद जोपासायला वेळ मिळतो.

बाकी पैश्यांविषयी म्हणाल तर भारत आणि अमेरिकेत (IT) क्षेत्रात साधारण सारखेच पैसे मिळतात. (भारतात आकडे कमी दिसत असले तरी खर्चसुद्धा कमीच आहेत.).
पण भारताच्या तुलनेत अमेरिकेत स्वस्ताई आहे हे ही खरं. (उदाहरण: मी भारतात घर घेतलं तेव्हा घराची किंमत माझ्या वार्षिक मिळकतीच्या १० पट होती. आणि अमेरिकेत ती ३ पट होती.) त्यामुळे अमेरिकेत छंद जोपासण्यासाठी आवश्यक पैसे आणि वेळ दोन्ही साठवणं शक्य होत.

सामाजिक जीवनाच्या बाबतीत ते तुमच्या मित्र आणि परिवारावर अवलंबून आहे. भारतात लहानपणापासून वाढल्यामुळे आपला मित्रपरिवार मोठा असतो. आणि अमेरिकेत फार कमी मित्र असतात. फारच कमी लोकांचे नातेवाईक अमेरिकेत आणि त्यातही एकमेकांपासून जवळ राहतात. त्यामुळे चांगला मित्रपरिवार मिळाला तर अमेरिकेतल सामाजिक जीवन भारताइतकं नसेल तरी त्याच्या जवळपास ७०-७५% च्या जवळपास पोहोचू शकतं.

अर्थात माझं ज्ञान IT क्षेत्र आणि फक्त माझे वैयक्तिक अनुभव इतकं मर्यादित आहे. इतरांचे अनुभव या पेक्षा वेगळे असतीलच.

स्थलांतर २००% अयोग्य आहे.स्टेप wise
अन्न शोधणे, पाणी शोधणे ह्या साठी अती प्राचीन काळात मानव स्थलांतर करत होता.
आणि ते नैसर्गिक होते.
कोणत्याच मानवीय बाह्य शक्ती शी त्याचा संबंध नव्हता
त्या नंतर अस्थिर राजकीय व्यवस्था,लढाया, ह्या मुळे स्थलांतर होत होते..ते पण मान्य.
पण आज जगात स्थिर सरकार आहेत,लोकशाही पण आहे.
अनेक विचारवंत आहेत,हुशार लोक आहेत,यंत्रणा आहे.
तरी लोक स्थलांतर करतात हे चुकीचे आहे.
स्थानिक सरकार नालायक आहेत त्या साठी जग दोषी नाही
कोणत्याच प्रदेशात स्थलांतर करून त्या उत्तम
राजकीय व्यवस्था असणाऱ्या प्रदेशावर बोजा टकने हा गुन्हा च आहे.
प्रगत प्रदेशातील लोक स्थलांतरित लोकांचा विरोध करतात.
हा त्यांचा हक्क च आहे..
तुम्ही वाईट स्थिती मध्ये असाल तर त्याला जबाबदार तुमचे स्थानिक सरकार आहे.
त्या विरुद्ध बंड करा

>>पण भारताच्या तुलनेत अमेरिकेत स्वस्ताई आहे हे ही खरं.<<
डॉलर रुपयात क्न्वर्ट केले नाहि तर हे वाक्य बरोबर आहे, अथवा नाहि. उदा: चार अडल्ट्सचं एखाद्या चांगल्या रेस्टराँचं बिल साधारण $१५०-२०० होतं. त्याचं रुपयात क्न्वर्जन १२,०००-१६,०००. भारतात याच पैशात ७-८ अडल्ट्सचं बिल होतं (जियो वर्ल्ड ड्राइवचा अनुभव).

साधारण २५ वर्षांपुर्वि माझं एक निरिक्षण होतं, कॉस्ट ऑफ लिविंगच्या संदर्भात. भारतातली कॉस्ट ऑफ लिविंग अमेरिकेच्या १०पट आहे; कन्वर्ट न करता. उदा: अमेरिकेत मॉर्गेज/घरभाडं $२,००० असेल तर भारतात साधारण रु२०,००० असते; इथे लंच $१० तर तिथे रु१००; सिनेमाची तिकिट इथे $८ तर तिथे रु८०; इथे ग्रोसरी $३०० तर तिथे रु३,०००. अर्थात हे निरिक्षण सरसकट सगळ्या बाबींना लागू नव्हतं, पण एक अंदाज...

माझे विश्लेषण जरा वेगळे आहे. कामानिमित्त आणि तदनंतर माझ्या दोन्ही मुली तिथे असल्याने मला अमेरिकेतील वास्तव्याच्या अनुभवात जे वाटले ते वेगळे आहे.
भारतातील जाचक गोष्टी
-प्रचंड बेशिस्त, रहदारी, साध्या जीवनोपयोगी वस्तू विकत घेताना करावी लागणारी मारामारी, स्टेट बॅकेसारख्या नामवंत बॅंकेतील लाल फित, वरिष्ठ, किंबहुना सर्वच नागरिकांसाठी धादांत अनादर
-सरकारच्या वल्गना, श्रीमंतीचे बेफाम प्रदर्शन
-घाण आणि त्या बद्दल काहीही न वाटणे
-ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक वाहनांत जोरजोराने बोलणे, कोणाची तमा न करता स्लीपर कोच मध्ये सुध्दा गाणी वाजवणे
-बुध्दिमत्तेचे मोल नसणे, वैयक्तिक वेळेची किंमत न देणे
- सवंगपणा
आपल्या येथील चांगल्या गोष्टी
-वैद्यकिय सुविधा सहजपणे मिळणे
-मित्रपरिवाराचा आधार
अमेरिकेतील चांगल्या गोष्टी
-दाक्षिण्य व व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर (यात वर्णद्वेष समाविष्ट नाही)
-स्वच्छता
-शिक्षण संस्थेतील बुध्दिमान व्यक्तींच्या प्रचंड पात्रता
-राहण्यातील सोय
-साध्यासाध्या गोष्टींसाठी झगडावे लागत नाही
आजमितीस भारतात राहणे अधिकाधिक कठीण होत आहे असे मला वाटते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे हा भारतीय लोकांचा खास गुण आहे आणि त्याचे त्यांस काही ही वाटत नाही.

बेशिस्त पना,, गोंधलेली,vendhli,लाचखोर सरकारी यंत्रणा.
सर्व च क्षेत्रात फसवणूक करण्याची प्रवृत्ती असणारी लोक भारतात खूप आहेत.
शिक्षित किंवा लायक व्यक्ती ना संधी न मिळणे.
त्यांचा आदर न करणे.
हे सर्व भारतात आहे.
फसवणूक करण्याची तर मास्टर डिग्री भारतीय लोकांना जन्मजात मिळते.

या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? >>> असलं काहीही नाही. परदेशात जाणारे लोक आपापल्या क्षेत्रातील नवीन संधी, नवे तंत्रज्ञान ई वर काम करायला मिळावे, जास्त पैसे मिळावेत व जगातील प्रगत देशही बघावेत या अगदी स्वाभाविक कारणांनी जातात. पूर्वी लोक खेड्यापाड्यातून मुंबईत येत त्याचाच मोठा प्रकार. कोणाला भारत नकोसा वगैरे नसतो. काही अपवाद असतीलही. पण बहुसंख्य लोक "करीयर मधे प्रगती" या एकाच कारणाने जातात.

नंतर भारतात परतायचे नसेल तर लोक असली काहीतरी कारणे देतात. प्रत्यक्षात हा निर्णय घेउन तो अमलात आणायची पूर्ण तयारी नसते हेच खरे कारण असते.

हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? >>> काहीही फरक पडणार नाही. न जाणारे टॅलेण्टही भरपूर आहे. ब्रेनड्रेन हा शब्दही सॉफ्टवेअर मुळे लोक परदेशात जाण्याच्या बराच आधीपासून चर्चेत आहे.

म्हातारपणी भारतात लोक राहायला येत आहेत अशी खूप उदाहरणे बघितली नाहीत. पण असले तरी काय चुकीचे आहे? पूर्वी लोक नोकरी मुंबईत करत व निवृत्त झाल्यावर पुण्यात राहायला येत. तसेच आहे हे.

आणि मुळात लोकांना पूर्वीइतका अमेरिकेत वगैरे जाण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही असेही वाचले. एकतर भारतात प्रचंड संधी आहेत आता - जर तुम्ही त्याच्याशी संबंधित क्षेत्रात असाल तर. त्यात पैसाही भरपूर आहे. अमेरिकेत सगळी कामे स्वतः करावी लागतात. व्हिसावर "डिपेण्डंट" म्हणून येणार्‍यांना नोकरी करता येत नाही (एच-४ व्हिसा. इतरांना येते हे माहीत आहे). अनेकांना त्यापेक्षा भारतातील सुखसोयी वापरत तेथेच राहिलेले आवडते. सॉफ्टवेअर व काही मल्टिनॅशनल क्षेत्रात अधूनमधून परदेशी प्रवासाची संधी असते. तेवढ्यावरही चालते. आजकाल तर प्रचंड संख्येने लोक २ लाख/४ लाख खर्च करून "केसरी" वगैरेतर्फे परदेशी प्रवास करतात.

भारतातील सर्वोच्च दर्जाच्या संस्थांमधून शिकलेले लोक परदेशात का जातात हे विचार करण्यासारखे असेल. पण सध्याच्या एकूण परदेशात जाणार्‍या लोकांपैकी फक्त काही टक्के लोक यात येतात. बाकी सगळे इतरच असतात. माझ्यासारखे. इतरांपेक्षा काही ब्रिलियंट वगैरे नाही. काकणभर सुद्धा जास्त किंवा कमी स्वार्थी नाही. तसेच देशविरोधी वगैरेही नाही. Just at the right place at the right time.

फा +१
इकडे आल्यावर पाश्चिमात्य विचारांच्या आणि मूल्यांच्या प्रेमात पडून भारतात अनेक गोष्टी कशा चुकीच्या आहेत हा आरसा मात्र दिसला. भारतात राहिल्याने इथे फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स दिसले तरी त्याला कितपत महत्त्व द्यायचं हा विचारही डोक्यात आला. जोवर भारतात होतो तोवर प्रिव्हलेज इ. कारणांनी अनेक गोष्टी अध्याहृत धरल्या होत्या त्या वेगळ्या परिप्रेक्षातून बघितल्यावर त्यातील फोलपणा दिसू लागला.

वंश द्वेष,भाषा द्वेष,वर्ण द्वेष,संस्कृती द्वेष .
ह्याची निर्मिती अनियंत्रित स्थलांतर मुळे होती.
आणि ह्याचे दमण करता येत नाही..
उगाच फोगदरी करण्या पेक्षा.
गाव ते आंतर राष्ट्रीय पातळीवर लोकांस स्थलांतर करण्याची बिलकुल गरज लागू नये अशी धोरणे असावी
नाही तर गृह युद्ध अटळ आहेत.
.विश्वची माझे घर हे फक्त कागदावर च शोभते.

भारतात privilege आणि entitledness हे कळीचे शब्द आहेत. आणि भावनाही. कुठलीही सार्वजनिक वस्तू, सोय, सुविधा मी कशीही वापरेन, ती माझी हक्काची मालमत्ता आहे, मला कोण विचारणार, आणि विचारलंच कोणी तर ' तुझ्या बापाची आहे का?' असे उलट विचारण्याची मला मुभा आहे इ. इ.

नवीन Submitted by फारएण्ड on 31 December, 2022 - 17:57 >>>तुमच्याशी सहमत। मलाही फिरायला इतर देशांत जायला आवडेल पण राहण्यासाठी व पैसे कमवण्यासाठी मेरा भारत महान .

-ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक वाहनांत जोरजोराने बोलणे, कोणाची तमा न करता स्लीपर कोच मध्ये सुध्दा गाणी वाजवणे
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे हा भारतीय लोकांचा खास गुण आहे आणि त्याचे त्यांस काही ही वाटत नाही.

>>>>>बाहेरगावी गेल्यावर सगळ्यांना हे सर्व न सांगता करावस वाटते। मग भारतात कोणी सांगितले कि 'एक कदम स्वछता के ओर' तर ते जाचक का वाटते। इथे तुम्ही जर स्वतःहून स्वछता पाळलित आणि इतरांनाही उद्युक्त केलेत तर काय प्रॉब्लेम आहे. इतर देशात जर त्यांना लहानपणापासून स्वछतेची व सामाजिक वागणुकीची जाणीव करून दिली जाते तशी आपणही भारतात आपल्या मुलांना करून देऊया का फक्त उच्च शिक्षण देऊन बाहेरगावी जाऊन त्यांचे नियम पाळावे तिकडचे गुणगान गायला लावावे .

<<विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते >>
दुर्दैवाने हे खरे आहे. माझा एक मित्र आहे, भारतात त्याचे बरेचसे पैसे स्टॉक्समधे, मोठ्ठे घर असे सगळे काही आहे. तो दरवर्षी चार पाच महिने भारतात घालवतो. आणि इथे आला की भारतात त्याला कसा किती त्रास झाला, ते सांगतो. आता हे खरे आहे की रोजच्या व्यवहारातल्या अनेक गोष्टी अमेरिकेत फारच सुलभपणे होतात, पण मी म्हणतो. जसा देश तश्या त्यांच्या पद्धती. त्या पद्धती तुम्हाला माहित नसतील तर करून घ्या ना.
आता लोकसंख्याच खूप तर जिकडे तिकडे गर्दी होणारच. अमेरिकेत १० टक्के लोक वाइट नि भारतात जरी ५ टक्केच वाइट असले तरी संख्येने भारतातले वाइट लोक जास्त भरणारच.
पण भारतात गेल्या केवळ ३० वर्षात केव्हढी आमूलाग्र प्रगति झाली आहे, त्याचे कौतुक का करत नाही? फक्त वाइट का बघता? खरे तर भारतातले वाईट तेव्हढे शोढून काढून त्याला प्रसिद्धि देण्याचे काम इंग्लंड अमेरिकेतली मिडिया सतत करत असते, आपण कशाला त्यात भर घाला?

अमेरिका ग्रेट नेशन का झाली आहे. ते समजून घ्यायला द्वितीय महायुद्ध किंवा त्या ही मागे जावे लागेल. सध्या वॉर फॅक्ट रीज नावाच्या डॉक्युमेंटरी बघत अस्ते त्यात जनरल मोट र्स वरील भाग नक्की बघा. अमेरिका व जर्मनी यांच्या अप्रोच मधील फरक व शीअर मनी व मॅन्युफॅक्चरैन्ग स्ट्रेंग्थ बघाय ला हवे. ते बघताना ह्या बाफ ची आठवण आली.

भारतात गेल्या केवळ ३० वर्षात केव्हढी आमूलाग्र प्रगति झाली आहे, त्याचे कौतुक का करत नाही? फक्त वाइट का बघता?>>> अगदी खरं. कितीतरी स्तुत्य अश गोष्टी अनुभवास मिळतात जेंव्हा ही भारतात येतो.
ट्रेन्स ची दुरावस्था होती..ती खूप कमी झाली, शिवाय मेट्रो आल्यात Happy
स्वच्छता नाही म्हटले तरी खूप च जास्त दिसली..हरीतक्रांती अजून व्हायला हवी तितकीशी नाही तरी.
ब्रिजेस आणि मॉल्स मसुटसुटित्पणा आलाय.
(हे मत मुंबई बाबत आहे)

काही ही सुधर नाही
भ्रष्ट प्रशासन पूर्वी पण होते आज पण त्याच दर्जा चे आहे
शिक्षणाचा दर्जा उलटा पूर्वी चांगला होता आता पैसे असतील तर डॉक्टर पासून , आयपीएस, आयएएस बनणे पण अवघड नाही
सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे,सार्वजनिक मालमत्ता आणि निधी गिळंकृत करणे.
काही फरक नाही
उलट हे प्रमाण वाढले आहे.
ताज मधील स्वच्छता बगून भारत सुधारला असे कोणी समजू नयेत
गर्दी,भ्रष्ट कारभार, सार्वजनिक अस्वच्छता.
ह्या मुळे उद्योगपती देश सोडून जात आहेत
.. भारतात राहण्यास उत्तम असे एक पण शहर नाही.
मुंबई त्या मध्ये थोडी बरी आहे

उच्च शिक्षित तर येथे राहण्यास तयार च नाहीत.
पाश्चिमात्य देशात जाण्यासाठी खूप प्रयत्न करता जे यशस्वी होतात ते जातात.
जे होत नाहीत ते इथे राहतात
भारतातील प्रत्येक अब्जो पती चे घर दुबई,लंडन अमेरिकेत आहे.
खूप काळ ते तिकडेच असतात.
श्रीमंत लोकांची मुल शिक्षण देशा बाहेर च घेतात.

पैसे इथे कमवायचे पण इथे राहायचे नाही .
त्याला ती लोक दोषी नाहीत.
कारण राहण्यास योग्य असे वातावरण इथे नाही.
नगरसेवक का पासून आमदार खासदार, बघा त्यांची कुवत बघा,त्यांची पार्श्व भूमी बघा,त्यांचे विचार बघा.
त्यांची क्षमता बघा.
सर्व उत्तर मिळतील.
ही लोक भारताचे प्रशासन चालवतात.
मग त्या प्रशासनाचा दर्जा काय असेल
फुलन देवी निवडून येते..
गुंड, अनाडी ,लोक निवडून येतात.
म्हणजे जनता पण अजून हवी तितकी प्रगल्भ नाही.

अपात्र लोक निवडून येणे, भ्रष्ट प्रशासन, अडाणी जनता, खोट्या बातम्या पसरवणे, सरकारच्या वल्गना, श्रीमंतीचे बेफाम प्रदर्शन याच्या जोडीला बंदुका घेऊन मन मानेल तसा गोळीबार करणे हे सर्व अमेरिकेचे चित्रण आहे. नि माझ्या मते बहुतेक अनेक देशात हीच परिस्थिती आहे, फक्त अमेरिका नि भारत याखेरीज आपले लक्ष नसते. अपवाद गोळीबाराचा. ते अमेरिकेचे वैशिष्ठ्य!

पूर्वी एक गोष्ट वाचली. त्याचा भावार्थ -
काही लोक सुंदर कमळाकडे पहातात, तर काही फक्त चिखल नि किडे याकडे पहातात.
कुणि भुंग्याला स्वच्छंद धुंद समजतात तर काही त्याला वेडे म्हणतात.
सकाळी उठल्यावर त्या दिवशी माझ्या मनात जसे विचार येतात त्यावरून भारत अमेरिका सर्व वाईट किंवा दोन्ही चांगले असे मला वाटते.
काही लोकांना कुठल्याहि गोष्टीचे इतके टेन्शन असते की सर्व काही सुरळित चालू असेल तरी हे असे कसे सगळे सुरळित, यात काही धोका तर नाही, असे पण टेन्शन येते.

फालतू देश प्रेम हा सर्वात मोठा देश द्रोह च असतो.
गोऱ्यांच्या देशांची तुलना भारताशी होवू च शकत नाही.
दोनशे वर्ष तरी भारत मागे आहे.
सर्वात महत्वाचे भारत हा सर्वात जास्त गरीब लोक असलेला ,सर्वात जास्त अडाणी लोक असणारा देश आहे(अडाणी बोललो मी निरक्षर नाही)

एकच प्लस पॉइंट आहे .
सर्वात जास्त भ्रष्ट,बेशिस्त जनता, अडाणी जनता ,गरीब जनता असणारा भारत देश असला तरी.
बाजारात सर्व वस्तू उपलब्ध असतात..कोणत्याच वस्तू चा तुडवडा भारतात नाही.
. आणि त्याचे श्रेय काही मोजकेच प्रामाणिक,कष्टाळू , लोक भारतात आहेत त्यांस आहे

मी जर्मन नागरिक असून सध्या मुक्काम पोस्ट लंडन . मला दोन दशकातील युरोपियन वास्तव्यात आलेल्या अनुभवावर माझे मत व्यक्त करतो . 1 श्रमाला प्रतिष्ठा , नियमित वेळात काम संपवून प्रवासात जास्त वेळ वाया जात नसल्याने घरी वेळेत पोहचता येते व फिटनेस व छंद जोपासता येतात .2 प्रदूषणावर नियंत्रण व लोकसंख्या विरळ असल्याने शुद्ध हवा मिळते . 3 भांडवशाहीवर आधारित अर्थव्यस्थेला सोशालिस्ट वैद्यकीय सेवेचा आधार आहे त्यास सोशल बेनिफिट्स ची रेलचेल आहे . आपल्या पगारातून काही टक्के कर व वैदयकीय विमा युकेत सरकार घेते जर्मनीत वैद्यकीय विमा खाजगी आहे व त्या बदल्यास सर्दी घोकल्यापासून ब्रेन सर्जरी पंचतारांकित इस्पितलात विनामूल्य होते , एखादा बेरोजगार व्यक्ती व नोकदार अभियंता ह्यांना ब्रेन सर्जरी करावी लागणार असेल तर फस्ट कम , फस्ट सर्व असा नियम आहे सध्या संप वॆगिरे चालू आहेत ऑपरेशन साठी वेटिंग लिस्ट असते पण पण एरवी उत्तम सोय . 4 तुमची नोकरी गेल्यास बेकार भत्ता मिळतो 5, मुलांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे , 6 दारिद्र रेषेवर असणाऱ्या लोकांना जर्मनीत सरकार राहायला घर दरमहिन्याला खर्चाला पैसे , मोफत औषध व प्रवासी पास आणि बऱ्याच सुविधा देते , 7 जर्मनीत एका दिवसाची वैदयकीय कारणासाठी रजा घेतली तरीही ती पेड असते . माझ्या मित्र वर्षभर दुर्धर आजाराने घरी बेड वर होता तरी त्याचा पगार त्याच्या खात्यात जमा होत होता . 8दरवर्षी प्रत्येकाला महिनाभर पगारी सुट्टी असते . आयुष्य शांत सुखी असत , 9भारतीय वाहिन्या व सोशल मीडिया च्या कृपेने सुरवातीला वाटायचे तेवढे होम सिक वाटत नाही , 10संशोधनाला व्यवसायाला लालफितीचा अडसर नसतो . 11आंतराष्ट्रीय दर्जाचे. शालेय शिक्षण विनामूल्य आहे , सार्वजिनक वाहतूक सेवा जर्मनीत लोकल , मेट्रो , बस व ट्राम अश्या चार पर्याय मोठ्या शहरात आहेत . सध्या युद्धामुळे महागाई वाढली आहे अशी कुजबुज युरोपियन करतात त्यामुळे भारतात असल्याचा फील येतो . थोडक्यात आयुष्य सुशेगात जगता येते . १२ रस्ता ओलांडताना वाहन चालविताना व अन्य ठिकाणी नियम पाळणारा समाजात रुळयला सुरवातीला कठीण जायचे पण ते अंगवळणी पडले कि भारतात आल्यावर नियम हे मोडण्यासाठी असतात हा खाक्या मस्तकी तिडीक आणतो , येथे सिग्नल नसलेल्या रस्त्यावर क्रॉस करताना गाडीवाला स्वतःहून गाडी थांबवून पादचाऱ्याला प्रथम रस्ता ओलांडू देतात . इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक बाबतीक योग्य असते , सरकारी काम , काही वर्ष थांब असे प्रकार नसतात . भारतात आर्थिक सुधारणा होत आहेत .सर्वसाधारणपणे अब्जावधी लोकसंख्येतील भारतात भारतीय साक्षर होत आहेत पण सुसंकृत होण्यास अजून बराच पल्ला गाठायचा आहे .

प्रशासिक सेवे त युद्ध पातळीवर सुधारणा केल्या पाहिजेत.

जलद आणि कार्यक्षम प्रशासन हवं.
बाबुगिरी ला लगाम घातला पाहिजे.
भ्रष्टाचार विरहित प्रशासन शक्य नाही पण कमीत कमी भ्रष्ट प्रशासन हवं.
न्याय व्यवस्था जलद केली पाहिजे.
बाकी भारताकडे अनेक प्लस पॉइंट आहेत.
भारत वेगाने प्रगती करेल.

एकच प्लस पॉइंट आहे . Submitted by Hemant 33 on 6 January, 2023 - 04:57
बाकी भारताकडे अनेक प्लस पॉइंट आहेत. Submitted by Hemant 33 on 6 January, 2023 - 09:54

भ्रष्टाचार विरहित प्रशासन शक्य नाही पण कमीत कमी भ्रष्ट प्रशासन हवं. >>
कृपया हे असे लिहा.
भ्रष्टाचार विरहित प्रशासन शक्य नाही पण 'कमीतकमी भ्रष्ट' प्रशासन हवं.

अमित Lol

एक एक करके सारे भये अनेक असे त्या दूरदर्शनच्या एका गाण्यात होते.

<< पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत >>

------- छान धागा काढला आहे, कॅनडाला का वगळले? Happy
२०२१ च्या आकडेवारी नूसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया नंतर कॅनडाला तिसरी पसंती आहे.

देशा बाहेर पडणार्‍यांपैकी भारता बद्दल कुणालाही राग नसावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी बाहेर पडावे, असे केल्याने सुविधांवरचा संसाधनांवरचा ( पाणी, विज... ) ताण कमी होईल आणि इतरांना संधी मिळेल.

Pages