कोपरा,कॉर्नर
" हरे कृष्णा, हरे रामा,कृष्णा, कृष्णा,हरे हरे". मंदिरात आलेले स्वामीजी जप करत होते. "माला करते है",म्हणाले. हे मंदिर तसे साधं पण इथे खूप शांती, प्रसन्नता होती. नावच प्रसन्न दत्त मंदिर. आजूबाजूच्या आज्या रोज एकत्र जमून काही ना काही ग्रंथ पठण करत, आरती करत. दासबोध, तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्त्रनाम किंवा देवी स्तोत्र असे वाचन व्हायचे. मंदिर बऱ्याच जणांचे श्रद्धा स्थान होते आणि "peace of mind" मिळविण्याचे ठिकाण होते. आजूबाजूच्या सिमेंटच्या जंगलात श्रद्धा, सबुरी आणि ज्या काही थोड्या बहुत परमेश्वराच्या बद्दल असणाऱ्या भावना अनुभवण्याची जागा होती. हा तो कोपरा,कॉर्नर, मनात डोकविण्याचा. रोजच्या धकाधकीत कुठे तरी विश्वास वाटण्याचा, धीर देण्याचा किंवा आधार देण्याचाही. दर दत्त पौर्णिमेला बरेच भक्त विविध रूपाने सेवा अर्पण करतात,ते का उगाच? एक कोपरा उजळण्याचा.
छोटी रिया रोज भातुकली खेळायची, एका कोपऱ्यात. एव्हढे घर होते, तिची स्वतंत्र खोली पण होती. तरीही घर घर खेळायची जागा कोपराच. तिथे कसं गुजगुजीत मांडता येतं. का कुणास ठाऊक तिथेच तिला बसायला,झोपायला,खेळायला, अगदी सगळे काही करायला आवडे.एक कोपरा आनंदाचा!
आई, किंवा मावशी किंवा अगदी एखादी जीवाभावाची मैत्रीण हा एक व्यक्त होण्याचा कोपरा. इथे काहीही बोला, सांगा अगदी भांडा सुध्दा तरी चालतं. ह्या मायेच्या कोपऱ्यात फक्त आणि फक्त माया असते. कुठे कमी झाली की यावं आणि रिफिल करावी. हाच कोपरा मऊ असूनही जगायला भक्कम आधार देतो.
आकाश अगदी भरून येतं. सगळीकडे ढगच ढग. काळवंडून येतं तरी आकाशात एक छोटासा कोपरा आकाशाच्या निळ्या रंगाचं दर्शन देतो. थोडसं का होईना पण इथे आहे वाट असे सांगतो. आणि तसेच असते नाही? कधीही कितीही अवघड प्रश्न आला तरी एक असा कोपरा सापडतोच जो बाहेर पडण्याची दिशा दाखवतो. पण आपण वेडे हा कोपरा बघून न बघतो आणि तिथेच अडकून पडतो.
ज्यांनी ज्यांनी ह्या कोपर्याचे महत्व जाणले त्यांना वाट सापडली. खुद्द इतिहास साक्षी आहे. अशी लाखो उदाहरणे सापडतील. शिवाजी महाराजांसारखे वीर घ्या नाही तर स्वा.सावरकरांसारखे देशभक्त घ्या किंवा मीराबाई,जनाबाई ह्यांसारख्या भक्त घ्या. ईश्वराचे अस्तित्व जाणवणे हा ही एक कोपराच. ह्या मनुष्य जीवनात सापडलेला आनंद वृक्ष. ह्याच्या छायेत आनंदच आनंद. मग बाकी आयुष्य जिथे जाईल जसे जाईल ते सर्व त्या परमेश्र्वराकडे सोपवून देण्याचा कोपरा.
आमचे एक डॉक्टर होते. सदैव चिक्कार पेशंट तरी सदैव हसतमुख, गाणे गुणगुणत. डॉक्टर तुम्ही कधी थकत कसे नाही विचारले की म्हणायचे ही माझी मठी आहे. इथे मी कार्यरत असतो आणि आनंदीही असतो.
असे हे कोपरे. काही चांगले तर काही बदनाम. समाजात काही असे कोपरे आहेत ज्यांची समाजाला गरज आहे पण त्यांना बदनाम केलं गेलय. असेही कोपरे. जे स्वतःच्या रोज रोजच्या मरणातून रोज रोज जन्म घेतात, दुसऱ्याला स्वतः मरून जगवतात. त्यांच्या वाट्याला शिव्या शापच. पण काय करणार? ज्याचे त्याचे भाग्य..
ह्या जन्म आणि मृत्यू ह्यातील आजचा दिवस हा एक कोपराच. पाहिजे तर सोन्याचा नाहीतर वाया गेलेला. ह्या कथिलाचे सोनं तेंव्हा होईल जेंव्हा ह्या कॉर्नरचे महत्व वाटेल. आपणच ते अल्केमिस्ट!
©झारा तांबे
१७/१२/२०२२
कोपरा,कॉर्नर
Submitted by Zara Tambe on 17 December, 2022 - 06:49
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
Thank you
Thank you
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
आवडले.
आवडले.
>>>>>>>'आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे मर्यादित सामर्थ्य ध्यानात घेता आपण फारशी तक्रार करू नये. पण या तडजोडी जेथे आंतडे गुंतलेले नाही अशा बाबतीत घडल्यास त्याचे सोयरसुतकही फारसे नसते. पण प्रत्येक इमानदार व्यक्तीच्या जीवनात एक लहानमोठा कोपरा असा असतो की त्याठिकाणी तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छीत नाही - निदान त्यानी येऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जी व्यक्ती हे इमान शेवटपर्यंत अनाघ्रात ठेवू शकते, तिला ( मग तिचे लौकिक यश काहीही असो ) मी अत्यंत भाग्यवान समजतो. याचे एक कारण म्हणजे अशा या जिव्हाळ्याच्या जागी तडजोड असहायपणे करावी लागली की सारे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. (नंतर ही शरमदेखील हळूहळू नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका)' - जी ए
साभार - https://www.manogat.com/index.php/node/5984
Thank you
Thank you