भारत का दिल देखो : हिवाळ्यातील वाळवणे: शिरण्या/शन्या

Submitted by मनिम्याऊ on 11 December, 2022 - 04:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

शिरण्या
आंबट दही
लाल तिखट
धणे पूड
जीरे पूड
मीठ (सगळे चवीनुसार)

क्रमवार पाककृती: 

भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत घेऊन आले आहे एक अनवट प्रकार.
शिरण्या उर्फ शन्या ही एक पावसाळ्यात शेतात आपोआप उगवणारी वनस्पती आहे. ही अगदी जमिनीलगत वाढते व अगदी छोटी छोटी नखाएवढी पिवळी फुले येतात.
IMG_20221211_140149.jpg
आणि मग लहान लहान फळे धरतात. फळे अगदी miniature कलिंगडाची रूपे जणू.
IMG_20221211_141101.jpg
कच्ची असताना कडवट तर पिकल्यावर आंबट - तिखट अशी जराशी उग्र चव असते .
याला अतिशय कोरडे व शुष्क हवामान लागते त्यामुळे महाराष्ट्रातल्या उष्ण जमिनीत प्रामुख्याने चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ तसेच तेलंगणाला लागून असलेल्या प्रदेशात ही वनस्पती उगवते. महाराष्ट्राबरोबरच गुजरात व राजस्थानातल्या वाळवंटात देखील शिरण्या उगवतात. तिकडे याला उगार कचरी, फुटी ककडी अशी नावे आहेत. तिकडे याची भाजी करतात पण महाराष्ट्रात मात्र याचे वाळवण घालायची पद्धत आहे. मात्र हे उन्हाळी नसून हिवाळ्यातील आहे कारण शिरण्या खरीप पिकांसोबत उगवते व रबी हंगामासाठी शेत तयार करताना शिरण्याची झाडे काढून टाकावी लागतात.

तर टोपलीभर शिरण्या घ्याव्या. त्यांचे उभे तुकडे किंवा चकत्या करावा.
त्यात काकडी सारख्या बिया असतात त्या तशाच ठेवायच्या
IMG_20221211_140114_0.jpg

एका भांड्यात आंबट दही घेऊन त्यात लाल तिखट, मीठ, धणेपूड व जीरेपूड कालवून घ्यावी व त्यात शिरण्याचे काप अर्धा तास भिजवून मग एखाद्या ताटात घालून उन्हात वाळायला ठेवावे. ताटात यासाठी की उन्हाने ताटपण तापते आणि पदार्थाला तीसुद्धा उष्णता मिळते. रात्री हे ताट घरात कोरड्या जागी ठेवावे.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पुन्हा दह्यात भिजवायची प्रोसेस करून शिरण्या खडखडीत वाळल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.
IMG_20221211_141131.jpg
वेळेवर कडकडीत तापलेल्या तेलात तळून जेवणात तोंडीलावणं म्हणून खाता येतात.
IMG_20221211_150514.jpg
.
IMG_20221211_150540.jpg

वाढणी/प्रमाण: 
--
अधिक टिपा: 

-नुसत्याच वाळवलेल्या शिरण्याची पूड करून मसाल्यात वापरतात कारण जरा वेगळाच तिखटसर स्वाद असतो.
-तसेच ही पूड दह्यात कालवून meat tender करण्यासाठी पण वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
आमच्या शेतावर कामाला येणाऱ्या स्त्रिया
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दह्यातली गवार, भेंडीचे सांडगे खाल्लेले आहेत. हैद्राबाद कडे असेच थोडे मोठ्या साइजचे गुडमकाइलू मिळतात त्याचे पोहे मिसळून सांडगे बनवते मी. मस्त लागतात दही भाता बरोबर. हा ही अनवट प्रकार आहे.

हे रानात उगवलेलं बघितलंय. नाव आणि खातात हे माहीत नव्हतं. या सिरीज मुळे छान माहिती आणि हटके रेसिपी माहीत होते. आता तोडून करून बघेन. मी मागे दोन वेळा बहाव्याच्या फुलांचं पिठलं केलं होतं. आवडलेलं.

Thanks all.

. पण वाळवाय ची कशी? तो ईश्यु आहे.>>> Oven मध्ये करून बघा.
>>>मी मागे दोन वेळा बहाव्याच्या फुलांचं पिठलं केलं होतं. आवडलेलं.>>> धन्यवाद _/\_ Happy

हैद्राबाद कडे असेच थोडे मोठ्या साइजचे गुडमकाइलू मिळतात त्याचे पोहे मिसळून सांडगे बनवते मी>>>
हो. चविष्ट असतात

थोडेसे अवांतर: यावर्षी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कोअर छत्तीसगढला (दंडकारण्य भाग) जाते आहे. तेव्हा कदाचित भारत का दिल देखो या सीरिजमध्ये पुढचा लेख म्हणून प्रवासवर्णन लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू जमतंय का..

दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुराचे प्रतीक म्हणून काही भागात, विशेषत: कोंकणात कारीट म्हणून एक रानवेलीचे फळ टाचेने फोडतात. तेही कडू असते आणि वरच्या फोटोतल्यासारखे दिसते.

सुंदर फोटो आहेत..!

कारीट असेच दिसते पण भयंकर कडू असते...नरक चतुर्दशीला कारीट फोडल्यानंतर ते थेंबभर चाखावे लागते तेव्हाही ब्रह्मांड आठवेल एवढे कडू लागते.

<>>>>>कारीट असेच दिसते पण भयंकर कडू असते>>>>
मग हे आणि कारिट वेगवेगळे असणार. शिराण्या हे काकडीच्या जातीतले आहे

तळलेल्या शिरण्या मी खाल्ल्या आहेत. Happy याची पूड मसाला म्हणून वापरतात, खासकरून आदिवासी वस्त्यांवर.

काचरी म्हणतात राजस्थानात. भाजी, चटणी आणि असे वाळवण करतात. एक रानभाजी 'कुमटा' असते त्यासोबत 'काचरी-कुमटा रो साग' हिवाळ्यात हमखास, बाजरीच्या भाकरीशी. 'पचकूटा'च्या भाजीतही शिरण्या उर्फ काचरी असते, जास्त आंबट असते तिकडे.

तेलंगणात गुडमकाइलूचे सांडगे +१

मनिम्याऊ, तुमचा 'भारत का दिल' प्रकल्प फार आवडला आहे. मध्य भारताच्या संस्कृतीचा, अनेक अनवट पदार्थांचा सुरेख सचित्र दस्तावेज तयार होत आहे. ब्राव्हो.

दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुराचे प्रतीक म्हणून काही भागात, विशेषत: कोंकणात कारीट म्हणून एक रानवेलीचे फळ टाचेने फोडतात. तेही कडू असते आणि वरच्या फोटोतल्यासारखे दिसते.>>> होय हे तेच आहे. शेरण्या म्हणुनच ओळखले जाते. कच्चे असताना कडू असते एवढंच माहित होतं Happy

शिरण्या पण कच्च्या असताना कडू असतात. नंतर पिकल्यावर मात्र चव बदलते. कदाचित हे व कारीट एकच असतील. (मला कारीट बद्दल काहीही माहिती नाही. )

छान लेख. आमच्या गावात यांना शेरन्या म्हणत.
गुडमकाई म्हणजे मोठ्या शेरन्याच. यांचे लोणचे, चटणी सुद्धा छान लागते.
यांचे वाळवण करतात हे मात्र माहीत नव्हते.

Pages