भारत का दिल देखो : हिवाळ्यातील वाळवणे: शिरण्या/शन्या

Submitted by मनिम्याऊ on 11 December, 2022 - 04:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

शिरण्या
आंबट दही
लाल तिखट
धणे पूड
जीरे पूड
मीठ (सगळे चवीनुसार)

क्रमवार पाककृती: 

भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतातील लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत घेऊन आले आहे एक अनवट प्रकार.
शिरण्या उर्फ शन्या ही एक पावसाळ्यात शेतात आपोआप उगवणारी वनस्पती आहे. ही अगदी जमिनीलगत वाढते व अगदी छोटी छोटी नखाएवढी पिवळी फुले येतात.
IMG_20221211_140149.jpg
आणि मग लहान लहान फळे धरतात. फळे अगदी miniature कलिंगडाची रूपे जणू.
IMG_20221211_141101.jpg
कच्ची असताना कडवट तर पिकल्यावर आंबट - तिखट अशी जराशी उग्र चव असते .
याला अतिशय कोरडे व शुष्क हवामान लागते त्यामुळे महाराष्ट्रातल्या उष्ण जमिनीत प्रामुख्याने चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ तसेच तेलंगणाला लागून असलेल्या प्रदेशात ही वनस्पती उगवते. महाराष्ट्राबरोबरच गुजरात व राजस्थानातल्या वाळवंटात देखील शिरण्या उगवतात. तिकडे याला उगार कचरी, फुटी ककडी अशी नावे आहेत. तिकडे याची भाजी करतात पण महाराष्ट्रात मात्र याचे वाळवण घालायची पद्धत आहे. मात्र हे उन्हाळी नसून हिवाळ्यातील आहे कारण शिरण्या खरीप पिकांसोबत उगवते व रबी हंगामासाठी शेत तयार करताना शिरण्याची झाडे काढून टाकावी लागतात.

तर टोपलीभर शिरण्या घ्याव्या. त्यांचे उभे तुकडे किंवा चकत्या करावा.
त्यात काकडी सारख्या बिया असतात त्या तशाच ठेवायच्या
IMG_20221211_140114_0.jpg

एका भांड्यात आंबट दही घेऊन त्यात लाल तिखट, मीठ, धणेपूड व जीरेपूड कालवून घ्यावी व त्यात शिरण्याचे काप अर्धा तास भिजवून मग एखाद्या ताटात घालून उन्हात वाळायला ठेवावे. ताटात यासाठी की उन्हाने ताटपण तापते आणि पदार्थाला तीसुद्धा उष्णता मिळते. रात्री हे ताट घरात कोरड्या जागी ठेवावे.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पुन्हा दह्यात भिजवायची प्रोसेस करून शिरण्या खडखडीत वाळल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.
IMG_20221211_141131.jpg
वेळेवर कडकडीत तापलेल्या तेलात तळून जेवणात तोंडीलावणं म्हणून खाता येतात.
IMG_20221211_150514.jpg
.
IMG_20221211_150540.jpg

वाढणी/प्रमाण: 
--
अधिक टिपा: 

-नुसत्याच वाळवलेल्या शिरण्याची पूड करून मसाल्यात वापरतात कारण जरा वेगळाच तिखटसर स्वाद असतो.
-तसेच ही पूड दह्यात कालवून meat tender करण्यासाठी पण वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
आमच्या शेतावर कामाला येणाऱ्या स्त्रिया
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कारंटे नाही वाटलं, ते जरा गोलसर म्हणजे यापेक्षा जाडसर असतं ना, हे जरा त्यापेक्षा सडपातळ वाटतंय आणि बिया बारीक असतात यापेक्षा. मे बी माझं चुकतही असेल.

शिरण्या v परवर मधील मुख्य फरक म्हणजे परवराची साल व बिया जरा जाडसर असतात आणि ते तयार झाल्यावर एकदम कडक असतात तर शिरण्या जरा मऊ असतात. बोटाने दाबून बघायचे

अंजू,बरोबर बोललीस.तसेच कारीटावरच्या रेषा फिक्या रंगाच्या असतात.अर्धे क्रिमिश असते.वरच्या छायाचित्रातील रेषा ठळक आहेत.

Pages