अभियांत्रिकी शिक्षण आता मातृभाषेत..
देर आये, दुरुस्त आये!
गृहमंत्री अमित शहा यांनी एमबीबीएससाठी वैद्यकीय पाठ्यपुस्तके हिंदीमध्ये लाँच केल्याने आता सर्वच राज्यांनी एकामागून एक, त्यांच्या प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षण देण्याच्या योजना सुरु केल्या आहेत.
आपला महाराष्ट्रही यात मागे नाही. नुकतेच १४ नोव्हेंबरला अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तकांचा पहिला संच प्रकाशित झाला आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मराठी भाषेत भाषांतरित केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या नऊ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ११ पाठ्यपुस्तकांचे वितरण मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आले.
बातमी ऐकून माझी पहिली प्रतिक्रिया होती, अरे वाह मस्तच!
कारण, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे.
तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. तर ऊच्चशिक्षण तरी का त्यापासून वंचित राहावे.
फक्त आता आधीपासूनच सुरू असलेल्या ईंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात हा मराठी अभ्यासक्रम कसा सामावून घेतला जाईल हा प्रश्न पडला आहे.
तसेच मराठीत शिकलेल्या मुलांना पुढे करीअरबाबत तितक्याच संधी उपलब्ध असतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
याबाबतच्या घडामोडी शेअर करायला, आणि नेमके आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? यावर चर्चा करायला हा धागा.
इंिनीअर, डॉक्टर,वायर मन ,
इंिनीअर, डॉक्टर,वायर मन , accountant,प्रशासकीय अधिकारी.ड्रायव्हर,लिफ्ट मन, ईटीसी
..हे गरजेचे मनुष्य बळ आहे
पालक स्वतःचा पैसा खर्च करून अगदी उत्तम मनुष्य बळ उद्योगांना ,सरकार चालविण्यासाठी उपलब्ध करून देते.
एक रुपया खर्च न करता आयता डॉक्टर ,इंजिनिअर,बाकी स्किल worker,प्रशासकीय अधिकारी, सैन्य ,समाज ,उद्योग पती,विविध सरकार ह्यांना फुकट उपलब्ध होते.
मग त्याचे योग्य नियोजन कोण करणार.
यंत्रणा म्हणून सरकार चेच ते काम आहे.
डॉक्टर,कसे मर्यादित च निर्माण केले जातात ते पण नियोजन करून नेहमीच तूट असावी हा हेतू मनात ठेवून.
लोक आरोग्यावर खूप खर्च करतात .आणि भाव करत नाहीत .हे ह्यांना माहीत आहे.
तसे सर्व च स्किल worker देशात किती असावेत ह्याचे नियोजन सरकार नी करावे
शिक्षण कोणत्या भाषेत आहे हा दुय्यम पॉइंट झाला रोजगार हा महत्वाचा मुद्दा आहे
Hemant 33
Hemant 33
थंक्स ,मी अगदी हेच म्हणत होतो .
जगाची यंत्रणा इंजिनियर शिवाय
जगाची यंत्रणा इंजिनियर शिवाय एक मिनिट पण चालणार नाही.
डॉक्टर नसतील तर जग पांगळे होईल
बाकी स्किल worker आहेत म्हणूनच जग चालले आहे..
आयआयटी मधील कोण तरी एक ह्याला करोड चे pkg ह्याची ठरवून जाहिरात केली जाते ..जेणेकरून अभियांत्रिकी मध्ये खूप मनुष्य बळ उपलब्ध असावे आणि जवळ जवळ फुकट ही लोक आपल्या अब्जो रुपयाचं उद्योगासाठी गुलाम म्हणून वापरता यावीत.
मुलांना शाळेत शिकवणार च स्वतःच्या पैशाने अशी चळवळ खरे सुरू झालीच पाहिजे.
जगात डॉक्टर,इंजिनिअर,स्किल worker उपलब्ध च झाले नाही पाहिजेत.
सर्व उद्योग बंद पडतील.
Ai,robot,satelite , यांत्रिक मानव सर्व गायब होतील .
फक्त काहीच वर्ष सामान्य लोकांनी हिम्मत दाखवली पाहिजे
हेमंत,
हेमंत,
संवाद साधणे , जगात नवीन काय घडत आहे त्याची माहिती मिळवणे, ह्या साठी एक कॉमन भाषा म्हणून इंग्लिश चे ज्ञान हवं.
कबूल !
पण माहिती मिळवणे आणि ज्ञान मिळवणे यात फरक आहे.
ईंजिनीअर्सनी निव्वळ माहिती नाही तर ज्ञान मिळवणे अभिप्रेत असते. निव्वळ माहिती मिळवणे हे कारकूनी काम झाले. ईथे कारकून व्यवसायाचा उपमर्द करावयाचा हेतू नाही. पण एक चांगला अभियंता होण्यास कौशल्य सर्वप्रथम गरजेचे आहे, जे एखाद्याकडे असूनही केवळ ईंग्रजी भाषा कच्ची असल्याने कोणाचे अडले नाही पाहिजे असे वाटते.
सहमत
सहमत
माझे १९९६ साली लिहिलेले पत्र:
मी १९९६ साली लिहिलेले पत्र:
Pages