अभियांत्रिकी शिक्षण आता मातृभाषेत..

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2022 - 13:27

अभियांत्रिकी शिक्षण आता मातृभाषेत..
देर आये, दुरुस्त आये!

गृहमंत्री अमित शहा यांनी एमबीबीएससाठी वैद्यकीय पाठ्यपुस्तके हिंदीमध्ये लाँच केल्याने आता सर्वच राज्यांनी एकामागून एक, त्यांच्या प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षण देण्याच्या योजना सुरु केल्या आहेत.

आपला महाराष्ट्रही यात मागे नाही. नुकतेच १४ नोव्हेंबरला अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तकांचा पहिला संच प्रकाशित झाला आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मराठी भाषेत भाषांतरित केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या नऊ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ११ पाठ्यपुस्तकांचे वितरण मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आले.

बातमी ऐकून माझी पहिली प्रतिक्रिया होती, अरे वाह मस्तच!

कारण, ‘जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिकतात, तेव्हा ते संकल्पना अधिक वेगाने समजून घेतात." - याबाबत कोणाचेच दुमत नसावे.
तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. तर ऊच्चशिक्षण तरी का त्यापासून वंचित राहावे.

फक्त आता आधीपासूनच सुरू असलेल्या ईंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमात हा मराठी अभ्यासक्रम कसा सामावून घेतला जाईल हा प्रश्न पडला आहे.
तसेच मराठीत शिकलेल्या मुलांना पुढे करीअरबाबत तितक्याच संधी उपलब्ध असतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

याबाबतच्या घडामोडी शेअर करायला, आणि नेमके आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? यावर चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशवकुल +१
मराठीत नवीन शब्दांची भर टाकायचं अव्यहत काम होतं का? फक्त टेक्निकल नाही, सध्याच्या परिस्थिती प्रमाणे प्रवाही रहायला सतत भर पडते का? मराठी शब्दकोशांत यावर्षी अशा शब्दांची भर पडली अशी बातमी मी वाचली नाही. जे इंग्रजी/ फ्रेंच (कारण या दोन भाषांच्या बातम्या मी फॉलो करतो. इतर ही असतीलच) भाषांत चर्चा/ वादविवाद होत सतत होत असते. फ्रेंच मध्ये तर फ्रांसपेक्षा कॅनडात सिमँटिक्स इ. मध्ये जास्त लवकर भर पडते आणि अनेकदा फ्रांसची संस्था ते नंतर उचलते असं ऐकलं आहे.

अभ्यासक्रम तयार करणार्‍या लोकांनी ही भर घालणे अपेक्षित आहे का? ते टेक्निकल रायटर्स असतील, भाषेत भर घालायला स - त - त काम करणारी काय संस्था आपल्याकडे आहे? असेल तर त्यांनी भर घातलेल्या शब्दांची सूची कोठे मिळेल? त्या नव्या शब्दांवर सांगोपांग चर्चा झाली नाही तर ते वापरात कोण आणि कसे आणणार?
केवळ अभ्यासक्रम चालू केला या घोषणेत काही अर्थ आहे का? आधी कळस मग पाया ... तुम्हाला कळायला टॉप-डाऊन कधी यशस्वी होऊ शकेल असं वाटतं का? म्हणुनच सुरुवातीला म्हटलेलं या अभ्यासक्रमात एकही विद्यार्थी जाणार नाही. जाऊ ही नये.
मराठी प्रवाही भाषा राहिलेली नाही. डबके झाले आहे. ती ज्ञानभाषा नाही हे सांगुनही दीड- एकशे वर्षे झाली असतील ना? त्यात काही बदल घडला का?

जगातील/ युरोपातील अनेक भाषांत स-त-त शब्दांची, ते वापरण्याच्या प्रकारांची भर टाकत असतात. आपल्याकडे 'पेन्सिल भेटली' हे बहुसंख्य लोक वापरत असले तरी शब्दकोशांत ते चूकच असेल. व्यक्ती भेटते, वस्तू मिळते ठीक आहे, पण हा नवा वापर इतके लोक करत आहेत तर त्याची नोंद करणे आणि तसा बदल करणे गरजेचे आहे. प्युरिस्ट भाषा डबके बनुन मरतात.
कोणाला वेळ असेल तर वॉच योर माऊथ हा पॉडकास्ट ऐका. हिडन ब्रेन - शंकर वेदांतमचा आहे. मला फार्फार आवडला. आपल्याला सिंहावलोकन करुन बघायची function at() { [native code] }यंत गरज आहे.

अमितव
आपल्याकडे "वैज्ञानिक दृष्टीकोन" इंग्रजीत शिकल्या सवरलेल्या लोकांकडे सुद्धा नाही. नुसते माध्यम बदलून काय होणार आहे? माझ्या मते विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी सोडून दुसरे मार्ग शोधायला पाहिजेत..माझ्या मते जो अभियांत्रिकी शिकायला लायक आहे त्याला इंग्रजी भाषा अडचणीची कशी वाटेल?

इंजिनिअर बनायला वैज्ञानिक दृष्टीकोन कशाला हवाय? साधं लॉजिक/ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स सुद्धा न शिकलेले इंजिनिअर बनतात. कार्यकारण भाव जाणून घेण्याची इच्छा, जनरल कुतुहल सुद्धा नसते अनेकांना. त्यामुळे माध्यम ही डायमेंशन वाढल्याने मूळ प्रश्न बदलणार नाही.
बाकी भल्याभल्या वैज्ञानिक संस्थांचे उच्चपदस्थ पदाधिकारी झापडबंद विचार करतात, ते ही विज्ञान शिकलेत की नाही असा प्रश्न पडेल अशा कृती करतात. हा प्रश्न भाषेपार आहे.
बाकी मला विचाराल तर बेसिक वैज्ञानिक दृष्टीकोन (आणि बेसिक कोडिंग करता येणे Wink ) यच्चयावत माणसांचे जीवन सुखकर करतो.
१२ वर्षे इंग्रजी शिकुन भाषेची अडचण... म्हणजे जुजबी वाचन लेखन सुद्धा येत नसेल... तर गणित, विज्ञान, लॉजिक हे तरी कितपत समजले असेल ही शंका मात्र रास्त आहे. 'अवघे करू इंजिनिअर' म्हणून मते मिळत असतील बहुदा हल्ली!

इकडे अशी स्थिती आहे कि गावोगावी इन्जिनिअरिन्ग कॉलेज खोलालेली आहेत. ५-५ लाख देऊन इंजिनिअर बनतात. भारतात दरवर्षी १५ लाख इंजिनिअर बनतात. काही लकी मुलांना बऱ्या नोकर्या मिळतात. काकी इतर टेले मार्केटिंग करत किवा दर दर भटकतेराहते है. त्यांना पगार? मला वाटत कि स्विगीची मुल जास्त कमावत असतील. भारतात factory लेस प्रोग्रेस आहे. नुसते सॉफ्टवेअर हमाल.
गंमत म्हणजे कुणालाही परिस्थिती बदलायची इच्छा नाही.

माझ्या मते विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी सोडून दुसरे मार्ग शोधायला पाहिजेत..>> हा मुद्दा मान्य आहे.

माझ्या मते जो अभियांत्रिकी शिकायला लायक आहे त्याला इंग्रजी भाषा अडचणीची कशी वाटेल? >> वाटू शकते. अनेकांना शाळेपासून इंग्रजीची धास्ती असते. त्यामुळे भाषाच नाही आली तर त्या माध्यमातून शिकवलेलं कसं कळणार, जरी इंजिनियरिंग विषयाची आवड असेल तरी, हा प्रश्न उरतोच.

अमित, माझ्या मते हा विषय मराठीत आणून मराठी अभियंते तयार करावे हा उद्देश नसला पाहिजे. तसा तो असेल तर तुझा प्रवाही भाषेचा मुद्दा योग्य ठरेल. पण इथे विषय समजणे हा हेतू आहे. इथे भाषेत नवीन तांत्रिक शब्द आणता येतील का प्रश्न नको, उलट इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरावेत. माध्यम भाषा म्हणजे ते तांत्रिक शब्द नव्हेत, पण त्यांची माहिती, ते कशाप्रकारे समजावले आहेत, ती भाषा. मग मराठी भाषा डबकं असेना का, ज्यांना तीच भाषा उत्तम कळते त्यांना त्या माध्यमात हे ज्ञान मिळविण्याचा निदान पर्याय तरी उपलब्ध होईल. ज्ञान एकाच भाषेत ठेवून तुम्ही ती भाषा येत नसेल तर ज्ञान घेऊ नका - असं म्हणून आपण जुन्याच चुका पुन्हा करत आहोत. ज्ञान भाषेपासून मुक्त हवं. त्या ज्ञानाचा पुढे काय उपयोग होईल का, व्यवसायात कुणी संधी देईल का, हा प्रश्न ते ज्ञान मिळवणाऱ्या/रीचा आहे. त्यांनी त्यासाठी काय लागेल ती खटपट करावी. पण ज्ञान शक्य त्या प्रकारे उपलब्ध करून देणं हे ज्ञानदात्यांचे काम आहे.

तसं असेल तर मला वाटतं मराठी भाषा येणारे शिक्षक पहिल्यावर्षी असतील तर खूप मदत होऊ शकेल. ज्या विद्यार्थ्यांना भाषेची अडचण आहे त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षांला एक वेगळा वर्ग चालू केला तर मदत होईल. पहिल्या वर्षाचा अभ्यास सगळ्या शाखांत सारखाच असतो (आमच्या वेळी तरी असायचा) त्यामुळे लॉजिस्टिकली तसं करणं बर्‍या पैकी सोपे असावे.
भाषेची मदत लागेल त्यांना एक वर्ष थोडं बोट पकडून चालायला शिकवलं की धास्ती दूर होऊन कामचलाऊ अडचण दूर हो़ण्यास काही हरकत नसावी. ती मुलं १२ वर्षे इंग्रजी शिकलेली आहेत त्यांना इंग्रजी अजिबात येत नसेल यावर माझा विश्वास नाही. त्यात ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेचं शिक्षण त्यांनी इंग्रजीतून घेतलं आहे. पी-सी-एमला मार्क मिळवले आहेत. ११-१२ मराठी भाषेत विज्ञान शिकलं असेल तरी पी-सी-एमला ९०% मिळवू शकत आहेत तर इंग्रजीत ५० - ६० मार्क तरी मिळालेच असतील ना?
एक वर्ष सपोर्ट केला तर पुरेसं ठरेल. कायमचा सपोर्ट या कुबड्याच आहेत. १६ वर्षे शिक्षण घेऊन एक भाषा मोडकी तोडकी ही शिकता येत नसेल? स्पेलिंग मरू दे. मला वाटतं त्यांना भाषेचा नाही तर आत्मविश्वासाचा प्रॉब्लेम आहे.

आयआयटीत पहिल्यवर्षाला ज्यांना चांगले गुण मिळत नाहीत त्यांच्या साठी असा वर्ग असतो आणि त्याचा डॉप आऊट्स टाळण्यासाठी खूप फायदा होतो. आरक्षणातून आलेले विद्यार्थी विनाआरक्षणापेक्षा टक्केवारीत थोडेच कमी असले तरी आत्मविश्वासात, परिस्थितीत अनेकदा तफावत असल्याने मागे पडू नये म्हणून त्याचा खूप उपयोग होतो. आरक्षणावर चर्चा नको. ते कुणालाही लागू पडू शकते.

उपयुक्त सूचना आहे. फक्त आपल्याकडची शिक्षकांची अवस्था बघता हे प्रकार सर्व ठिकाणी अमलात आणणे अवघड वाटते. काही कॉलेजात होऊ शकेल. पुस्तक सार्वत्रिक उपलब्ध असते आणि कुणालाही विकत घेता येते.

शिवाय पुस्तक मराठीत आहे म्हणजे पूर्ण अभियांत्रिकी शिक्षण मराठीत असायला हवे असे नाहीच आहे. म्हणून मी माझ्या पहिल्या प्रतिसादात ह्याला केवळ पूरक म्हणून बघायला आवडेल असे म्हटले आहे. मूळ अभ्यासक्रमाला धक्का न लावता, ज्यांना स्वतःच्या भाषेत तो अभ्यास समजावून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी पूरक साधन हे होऊ शकेल.

पण ज्ञान शक्य त्या प्रकारे उपलब्ध करून देणं हे ज्ञानदात्यांचे काम आहे.>>>
हेच वाक्य इंग्रजी भाषेेच्या अभ्यासाला हि लागू पडेल नाही का ?
खरा प्रश्न इथेच आहे. मुंबईच्या एका सेवाभावी संस्थेने केलेल्या पाहणीत अस आढळून आले आहे कि चौथीत शिकणारया विद्यार्थ्यांना दोन आकडी बेरीज वजाबाकी -हातचा घेऊन- येत नव्हती. शहराच्या सीमेवर नवीन लोकवस्त्या होत आहेत. शहर सूज आल्यासारखी फुगताहेत. पण आजूबाजूला एक नाव घेण्याजोगी प्राथमिक शाळा नाही. मग मुलांना टेम्पोमध्ये कोंबून मैल न मैल दूर शाळेत जावे लागते.
सरकार तर काय आरोग्य सेवा आणि शिक्षण ह्यांना वाऱ्यावर सोडून GST कुठे लावता येईल ह्या विचारात दंग आहे. वर मुलांच्या विश्वाचा मोबाईल, क्रिकेट, सिरिअल्स इत्यादींनी कब्जा घेतला आहे. मी अस ऐकले आहे कि पूर्वी काम वाल्या बाया आपल्या मुलांना थोडीशी अफू देऊन झोपवत असत. आताच्या आय मुलाच्या हातात मोबाईल देऊन OTT वरच्या नव्या सिरिअल्स बघण्यात मश्गुल आहेत.
हा काळाचा महिमा आहे.
तेव्हा मातृभाषेेतून शिक्षण घेणे हा मुलांचा हक्क आहे. मातृभाषेतून शिकवल्यास चांगले समजते आदी भंकस बंद करा. जी पाहणी मी वर उद्धृत केली आहे त्या शाळा मुलांना मातृभाषेतच शिकवत होत्या. मराठी भाषेत शिकवणाऱ्या शाळा गल्लोगल्ली विखुरल्या आहेत .
आज गरज आहे क़्वलिटी एजुकेशानची ना की मराठी माध्यमाची.
मास्तर ला मास्तरड्या संबोधणारी आपली संस्कृती आहे ती बदला आधी.

त्या ज्ञानाचा पुढे काय उपयोग होईल का, व्यवसायात कुणी संधी देईल का, हा प्रश्न ते ज्ञान मिळवणाऱ्या/रीचा आहे. त्यांनी त्यासाठी काय लागेल ती खटपट करावी.>>>
ह्यालाच विश्वामित्री पवित्रा म्हणतात. मध्ये घुसून काडी करायची आणि नंतर हात वर करायचे.

केशवकुल, प्रथम ही संस्था दरवर्षी अशी पाहणी करते.
मी काही वर्षे अंडरप्रिव्हिलेज्ड मुलांना शिकवले आहे. नववीतली मुलं वजाबाकी करताना हातचा घ्यायची वेळ आली की तिथे वरचा खालचा आकडा न बघता मोठ्या आकड्यातून लहान आकडा वजा करीत. शाळा इंग्रजी माध्यमाची. पण सहावी सातवीतल्या मुलांना मराठी वाचता येत नाही. नववीतल्या मुलांना धड मराठी लिहिता येत नाही, ही स्थिती होती. मराठी मुलं इंग्रजीला घाबरतात , तशी तिथली अमराठी /कोळी मुलं मराठीला घाबरायची. इंग्रजी मराठीपेक्षा थोडं बरं, एवढंच.
नववीत trigonometry होतं. काही मुलांना adjacent या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता.
बहुतेक मुलं वर्ड प्रॉब्लेम सोडवू शकत नसत.
हे प्रकार आठवीपर्यंत नापास करायचं नाही, या धोरणानंतर जास्त दिसले. (नियम त्या मुलांना त्या त्या वर्गात एप्रिलनंतर अधिक वर्ग घेऊन अपेक्षित पातळीपर्यंत आणणं असा आहे). नंतर त्रयस्थ संस्थेकरवी भाषा आणि गणिताच्या चाचणी परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या, तेव्हा शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना कॉपी करू दिली.
यातली बहुतेक मुलं नववीत नापास झाल्यावर शाळा सोडतात आणि प्रायव्हेट एसेसी देतात. म्हणजे खासगी क्लासेसची धन करतात. तिथेही काय काय प्रकार करून एसेसी पास झाल्याचं सर्टिफिकेट पदरात पाडून घेत असतील.

तेव्हा मुलं इंग्रजी माध्यमातून शिकोत वा मातृभाषेतून, बट्ट्याबोळ व्हायचा तो होणारच.
आमच्या वेळी पाचवीपासून इंग्रजी होतं. आता पहिली की तिसरी पासून असतं. कॉलेजात गेल्यावर इंग्रजी माध्यम आलं की थोडं भांबावायला होतं. ज्यु. कॉलेजमध्ये आमच्या एका लेक्चररनी तुम्ही आता इंग्रजीतूनच विचार करा, मग इंग्रजीतून लिहायला काही अडचण येणार नाही, असा मंत्र दिला.
इंग्रजी आणि गणिताची भीती घालवणं गरजेचं आहे.

सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. इथे दिल्लीत इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये मुलांना हिंदीत पेपर सोडवायची परवानगी आहे/ होती. बहूतेक बिहार आणि उत्तर प्रदेशात पण आहे.
मी चार पाच वर्षे दिल्लीत एका डिप्लोमा कॉलेजात शिकवायचे. हे कॉलेज शहराच्या सीमेवरच्या खेड्यासारख्या भागात होते. आमच्याकडचे बहुतांशी जाट मुले असायची. काही बिहार/ युपी मधली आणि थोडी दिल्लीतली शहरी. मी इंग्रजीतच शिकवायचे. पण मग मला काही जणांनी सांगितले की त्यांना हिंदीत अर्थ समजावून सांगा. मग टेक्निकल शब्द इंग्रजी पण बोलायची भाषा हिंदी आणि इंग्रजी अशा प्रकारे शिकवून बघितलं. ते समजायचे मुलांना. गम्मत चाचणी पेपर च्या वेळी झाली. एका मुलाने काही उत्तरे इंग्रजीत आणि काही उत्तरे हिंदीत लिहिली होती. म्हणजे वाक्य हिंदी आणि त्यात इंग्रजी टेक्निकल शब्द. मध्येच पूर्ण इंग्रजी वाक्ये. काही छोट्या एका वाक्यात प्रकारच्या प्रश्नांची पूर्ण इंग्रजीत उत्तरे असे. माझ्यासाठी तो नवीनच प्रकार होता. पण चौकशी केल्यावर कळले की असा पेपर चालतो बोर्डात. ( डिप्लोमा चे जे technical bord असते तिथे). बोर्डाचे पेपर बघितले आधीचे तर त्यात प्रत्येक प्रश्नाचा हिंदी अनुवाद पण होता. हे २०११ - २०१५ या काळातले आहे.
सध्या नवरा युपीमध्ये बुलंदशहर जवळ इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकवतो. आजूबाजूच्या खेड्यामधले विद्यार्थी येतात त्याच्या कॉलेजात. ईंग्रजी खूपच कमी जणांना कळते. टेक्निकल knowledge असते या मुलांना व्यवस्थित पण इंग्रजीत बोलता, लिहिता येत नाही. बोललेलं कळत नाही. यांना हिंदीतच शिकवावे लागते मधून मधून इंग्रजी वाक्ये पेरत . किमान पहिली १-२ वर्षे तरी. नंतर बहूतेक जमत असेल. विचारावे लागेल नवऱ्याला नक्की काय परिस्थिती असते इंग्रजीची या मुलांची. पण फारशी चांगली नसेल. सगळया शिक्षकांना धड इंग्रजी बोलता येत असेल याची सुद्धा मला फारशी खात्री नाही.

ज्या भाषा आधुनिक ज्ञान भाषा झालेल्या आहेत त्या भाषेत आधुनिक ज्ञान द्यायला काहीच हरकत नाही.
ज्या भाषा परंपरागत ज्ञान शाखांनी समृद्ध आहेत पण आधुनिक ज्ञानाचा अभाव आहे त्यातून भाषिक अस्मितेपोटी आधुनिक शाखांचे शिक्षण घेणे हे अडचणींना निमंत्रण देणारे आहे.

गणिताचा मुद्दा इथे गैरलागू आहे. सीबीएसई, आयसीएसई च्या शाळांतून एनसीईआरटी च्या नियमाप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
शिकवतात. त्यात हातचा घेण्याची पद्धत काढून टाकलेली असल्याने पालकांना ती पद्धत आत्मसात करून शिकवणे जड जाते. तसेच पालकांची हातचा घेणे ही पद्धत मुलांना गोंधळात टाकणारी ठरते. अशा पद्धतीने गणित सोडवले तर शा बाई त्यावर लाल फुली मारतात. वर्गमूळ, घनमूळ काढण्याची पद्धतही वेगळी आहे. त्याचा इंग्रजी किंवा कुठल्याही भाषेशी संबंध नाही. कुणी सर्व्हे केला असेल त्यांनी हातचा का घेता येत नाही हे पाहण्याआधी शाळेत काय पद्धतीने शिकवतात याची माहिती घेतली होती का हे इथे समजायला मार्ग नाही.

केशवकूल माझी वाक्यं उद्धृत करून दुसरेच कुठले तरी स्कोअर्स सेटल करत आहेत असं वाटतंय.>>
नाही हपा अस नाहीये. तुम्ही जे लिहिले आहे ते तुम्हीच तपासून बघा. पैसे टाका. मी शिकवले तुमचे तुम्ही बघा. प्रत्येक नागरिक हि राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांचे भले करणे हे लोकशाहीचे तत्व आहे. (हेमावैम) लोकशाहीच्या व्याख्येतच for the people असे आहे. ह्यापेक्षा ज्यास्त लिहिणे नको.
रघू आचार्य
आपण इथे मुक्काम पोस्त ढेबेवाडीच्या मुलांचा विचार करूयात. हाताचे न घेता बेरीज वजाबाकी करता येत असेल तर उत्तमच.
पोर सरळ कॅॅल्क्युलेटरच वापरतात.

रघू आचार्य
आपण इथे मुक्काम पोस्त ढेबेवाडीच्या मुलांचा विचार करूयात. हाताचे न घेता बेरीज वजाबाकी करता येत असेल तर उत्तमच.
पोर सरळ कॅॅल्क्युलेटरच वापरतात. >>> तुमचा मुद्दा नेमका काय आहे हे कळाले नाही.

हेच वाक्य इंग्रजी भाषेेच्या अभ्यासाला हि लागू पडेल नाही का ? खरा प्रश्न इथेच आहे. मुंबईच्या एका सेवाभावी संस्थेने केलेल्या पाहणीत अस आढळून आले आहे कि चौथीत शिकणारया विद्यार्थ्यांना दोन आकडी बेरीज वजाबाकी -हातचा घेऊन- येत नव्हती. >>>> याचा अर्थ उलगडून सांगावा. संस्था मुंबईची आहे. शाळा इंग्रजी आहेत असे यावरून वाटते.

त्यांचे भले करणे हे लोकशाहीचे तत्व आहे. लोकशाहीच्या व्याख्येतच for the people असे आहे. >> +१. फक्त भले कशाने होणार ह्याबाबत आपले मतभेद आहेत.

पैसे टाका. मी शिकवले तुमचे तुम्ही बघा. >> तुम्ही मला शिक्षकाच्या भूमिकेत का बघता आहात? मी विद्यार्थी आहे, मला अमुक भाषेत ज्ञान हवे आहे. ते तुम्ही उपलब्धच होऊ देत नाही आहात. मला ते मराठीत शिकून पुढे काय करायचं आहे, मला जॉब मिळेल का ह्याची काळजी तुम्हाला कशाला? मी बघून घेईन. (इथे मी सरकारला ज्ञान उपलब्ध करून देणार्‍याच्या भूमिकेत बघत आहे, शिक्षकाच्या नाही).

भाषा ती पण फक्त इंग्लिश विषयी बोलले तर ती शिकायला मोठी बुध्दीमत्ता लागते असे काही नाही.
लिहायला येत नाही पण फाडफाड इंग्लिश बोलणारे पण बघितले आहेत.
भाषा शिकण्यासाठी kg पासून घासण्याची काही गरज नाही.

कोणत्या ही वयात भाषा शिकता येते.आता तर इतक्या सुविधा आहेत की भाषा ही समस्या राहणार च नाही.
कोणत्या ही भाषेचे सहज कोणत्या ही भाषेत भाषांतर करणाऱ्या मशीन अगदी सहज उपलब्ध होतील.
पण स्वतःच्या घरात जी निवांत झोप लागते तशी हॉटेल मध्ये किंवा दुसऱ्याच्या घरी लागत नाही.भले किती ही जास्त सुविधा असू द्यात.
हा फरक आहे मातृ भाषा आणि दुसऱ्या भाषेत.

फक्त लिहता वाचता येईल इतकेच शिकवले
आणि बाकी शिक्षणावर होणारा पैसा मुलांच्या नाव नी गुंतवला तर मुल 21 वर्षाचे होईल तेव्हा करोड पती असेल..
असा पण जॉब माणूस किती वर्ष करतो.
28 वय होईपर्यंत ठीकठाक जॉब लागत नाही.
घाबरत भित वीस वर्ष फक्त जॉब करू शकतो.
आता माणसाचे वय च सरासरी 60 वर्ष आहे.

आता आम्ही खेड्यापाड्यात इंजिनेरींग ची कॉलेज काढलेत. त्यासाठी पैसे खर्च केलेत पण इंग्रजी येत नाही म्हणून मुलं येत नाही. आली तरी पास होत नाही. असा झाला तर आम्हाला फी कशी मिळणार? आमची पोटं कशी भरणार? तुमच्या सरकारी शाळा इंग्लिश शिकवत नाही. म्हणून आम्ही मराठी मध्ये शिकवणार आणि मराठी मध्ये परीक्षा घेणार. आणि बऱ्याच मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही त्यासाठी पुढची मागणी दृक्श्राव्य मराठी इंजिनीरिंग आणि मग तोंडी परीक्षा. ती पास होणे असा किती अवघड मग लगेच डिग्री. आम्हाला फी मिळाली कि मग तुम्ही काही करा. आणि इंजिनेर झाला कि शिपायापासून कुठलाही जॉब येतोच करता. वर समाजात मान. अजून काय पाहिजे तुम्हाला. उगाच विरोध करू नका.

ऋन्मेऽऽष
सर, तुम्ही लवकर बरे व्हा, सर.

इथे भाषेच्या समृद्धतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. तो धरून लिहीत आहे. एक तर प्रादेशिक अर्थवाहू शब्दांना मान्यता मिळावी. चारचौघात ते वापरण्याची लाज नसावी. सुगी, सराई असे सुंदर शब्द वापरातून बाहेर पडत आहेत.
दुसरे म्हणजे मराठी भाषिकांचा लोक व्यवहार वाढला पाहिजे. सतत काही तरी करत राहाण्याचा स्वभावच नाही आमचा, मग नवे काहीतरी करणे दूरच. नवे बदल झाले नाहीत तर ते बदल, नव्या संकल्पना ह्यासाठी शब्द निर्माण होणार नाहीत. आणि मग भाषा खुरडलेलीच राहील. नव्या संकल्पना व्यक्त करण्याइतकी समर्थ रहाणार नाही.
थोडक्यात लोकव्यवहारांत चैतन्य आले की भाषाही उन्मेषशाली होईल.

भाषा हाच विषय असेल तर.
व्याकरण शुध्द इंग्लिश भाषा जे उच्च शिक्षित आहेत ते पण बोलू शकत नाहीत.
अगदीच किरकोळ उच्च शिक्षित व्याकरण शुध्द इंग्लिश भाषा बोलतात किंवा लिहतात.
बाकी सर्व असेच .
सर्व भाषांची हीच अवस्था आहे.
बोलणे एक वेळ थोडे बर असेल पण भाषा कशी lihali जाते.विराम चिन्ह,अवतरण चिन्ह,पूर्ण विराम कुठे द्यावा हे किती लोकांना कळतं
सर्व भाषिक

इथे असे जाणवत आहे.
अभियांत्रिकी ज्ञान मिळवणे हे खूप सोप आहे.
आणि भाषा ह्या खूप अवघड आहेत.
पूर्ण चुकीचा गैर समज आहे
उद्या वैधकिय शिक्षण स्थानिक भाषेत दिले तर कोणी पण डॉक्टर होईल असे पण म्हणाल.
भाषा शिकणे हे काही अवघड नसते.
पण मातृभाषेत अभियांत्रिकी शिकणारा मुलगा आणि कोणत्या ही परकीय भाषेत अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेला मुलगा .
ह्यांचे स्किल आणि अभियांत्रिकी मधील ज्ञान
ह्यांची परीक्षा घेतली तर मातृ भाषेत अभियांत्रिकी शिकणारा मुलगा जास्त उत्तम रित्या तो विषय शिकला आहे समजला आहे हे सहज सिद्ध होईल.

इथे असे जाणवत आहे.
अभियांत्रिकी ज्ञान मिळवणे हे खूप सोप आहे.
आणि भाषा ह्या खूप अवघड आहेत.
पूर्ण चुकीचा गैर समज आहे
उद्या वैधकिय शिक्षण स्थानिक भाषेत दिले तर कोणी पण डॉक्टर होईल असे पण म्हणाल.
भाषा शिकणे हे काही अवघड नसते.
पण मातृभाषेत अभियांत्रिकी शिकणारा मुलगा आणि कोणत्या ही परकीय भाषेत अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेला मुलगा .
ह्यांचे स्किल आणि अभियांत्रिकी मधील ज्ञान
ह्यांची परीक्षा घेतली तर मातृ भाषेत अभियांत्रिकी शिकणारा मुलगा जास्त उत्तम रित्या तो विषय शिकला आहे समजला आहे हे सहज सिद्ध होईल.

मातृभाषेत विज्ञान ,तंत्र ज्ञान, वैद्यकीय शिक्षण दिले तरी ते स्किल किंवा ज्ञान मुल उत्तम रित्या आत्मसात करतील.
ह्या वर कोणी शंका घेण्याचे कारण नाही कारण हे युनिव्हर्सल truth आहे.
पण संवाद साधण्यात ह्या मुलांना अडचण येईल हे पण युनिव्हर्सल truth आहे.

Fad म्हणू किंवा गरज म्हणू किंवा राजसत्तेचा वर्चस्व पना म्हणू इंग्लिश हीच ज्ञान भाषा आहे मानणे ही अपरिहार्यता आहे स्थिती तशीच निर्माण करून ठेवली आहे त्या मुळे हे अयोग्य आहे जे कळतं असून पण ते स्वीकारता येत नाही

शाहरूख खान कोणत्या माध्यमातून शिकला ? दिल्लीच्या फर्डा इंग्लीष कॉन्वेन्ट मधून शिकलाय. मग आपण मातृभाषेतल्या शिक्षणाला समर्थन कसे देऊ शकतो.
Submitted by रघू आचार्य
------------------------------------

शिक्षण भले त्याने ईंग्लिश माध्यमातून घेतले असावे. पण काम मात्र हिंदी चित्रपटातच करत आहे. हॉलीवूडमध्ये करीअर करायला नाही गेला. आपल्या राष्ट्रीय भाषेलाच प्राधान्य दिले. उत्तम उदाहरण आणि आदर्श.

ईंजिनीअरींगचे शिक्षण जरूर ईंग्ग्रजीमधूनच घ्यावे. पण कामावर कुलीगशी बोलताना हटकून मातृभाषेतच संवाद साधावा.

ईथे किती ईंजिनीअर आहेत (अमेरीकेतले सोडून) जे कामाच्या ठिकाणी फाडफाड ईंग्लिशच बोलतात?
एखादा ईंजिनीअर साईटवर कामाला आहे आणि हाताखालच्या मजूर लोकांशी आवर्जून ईंग्लिश बोलतोय असे एकदा ईमॅजिन करून पहा बरे Wink

आपल्या शाहरूखच्याच चक दे मध्ये एक डायलॉग होता - ऊसे बस हॉकी सीख के आना था, और वो हॉकी सीख के आयी है.

ज्ञान मिळवण्यासाठी एखादी नवीन भाषा शिकण्याऐवजी जी भाषा आधीपासूनच अवगत आहे त्यात ज्ञान मिळणे केव्हाही चांगलेच नाही का..

स्किल उत्तम प्राप्त होण्यासाठी किंवा विषय उत्तम रीत्या आत्मसात करण्यासाठी कोणतेही
शिक्षण मातृ भाषेत मिळाले तर उत्तम च पण .

पण व्यवहारिक दृष्ट्या ते अयोग्य .

संवाद साधणे , जगात नवीन काय घडत आहे त्याची माहिती मिळवणे, ह्या साठी एक कॉमन भाषा म्हणून इंग्लिश चे ज्ञान हवं.

Pages