Submitted by पन्तश्री on 29 October, 2022 - 07:23
मनीमोहोर ह्यांचा कोकणी वड्यांवरचा लेख वाचून एकदम तोंडाला पाणी सुटले. बाकी सर्व खवय्यांच्या प्रतिक्रियाहि वाचल्या. कुठेतरी प्रतिक्रियांमध्ये ह्याची रेसिपी मिळेल म्हणून शोधही घेतला पण सापडली नाही. लहानपणी पासून माझी आज्जी एकदम खमंग कोंबडी वडे बनवायची. मग शहरात राहायला आल्यावर तसे वडे नंतर मिळालेच नाहीत. आता ती आजीही राहिली नाही नि तिची रेसिपीही. बऱ्याच रेसिपी पायावरून बघितल्यात. बहुतेक सगळ्या तांदळाच्या पिठाच्या होत्या. पण तो खमंगपणा तिखटपणा आणि तो मंद सुंदर वाड्याचा वास काही सापडला नाही. कृपया कोणा खवय्याकडे कोंबडी वड्याची रेसिपी असेलतर कृपया द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक किलो साधे तांदूळ ( धुवून
एक किलो साधे तांदूळ ( धुवून सावलीत वाळवून ) , पाव किलो उडीद डाळ, वाटीभर गहू, छोटा चमचा मेथी दाणे , दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरं सगळं एकत्र करून थोडं भरडसर ( खूप भरड नाही ) दळून आणणे.
हे जिन्नस न भाजता दळायचे आहेत.
वरील प्रमाण मनीमोहोर काकुंचे आहे.
वड्याची कृती तशी सोपीच आहे.
वड्याची कृती तशी सोपीच आहे. करायचं काय तर पिठात मीठ, अगदी थोडं तिखट, किंचित हळद आणि तेल घालून सगळं सारखं करून घ्यायचं . नंतर त्यात गरम पाणी घालून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं. थोडं मुरलं की थंड पाणी आणि तेलाचा हात लावून ते पोळ्यांच्या कणके इतपत सैल मळून घ्यायचं. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर लिपुन म्हणजेच थापून त्याची पुरी करायची आणि गरम तेलात सोडून खरपूस तळून काढायचे. ~~~
मनीमोहोर काकुंचीच रेसिपी.
देशपांडे (टॅस्ट फॉर लाइफ)
देशपांडे (टॅस्ट फॉर लाइफ) यांनी या वड्याचं पीठही आणलं आहे.
धन्यवाद अनामाईक ताई. लगेच हि
धन्यवाद अनामिका .
लगेच हि रेसिपी तरी करीन बघतो.
मी एक खवय्या सीकेपी आहे. नॉनव्हेज एकदम भरपूर होते घरात. मटण, मासे आणि कोंबडी वडे म्हणजे स्वर्गसुख.
आभारी आहे आपला.
@भरत नको नको. आपली घरची टेस्ट
@भरत नको नको. आपली घरची टेस्ट ह्यात नाही. पॅक फूड ते पॅक फूड. भाजणीच्या थालीपीठाचेही असेच बरेच पॅक तरी केले पण काही मजा नाही आली. शेवटी २-४ रेसिपी जोडून दुकानवाल्याला विचारून आलीच एक नवीन बनवली आहे रेसिपी. आम्हीही देशपांडेच बरं का.
आमच्या कडे आमचे छोटे पंत आलेत. त्यांना चिप्स आणि पॅक फूड साठी असे काहीतरी खमंग चविष्ट च्या शोधात आहोत.
धन्यवाद अनामिका.
धन्यवाद अनामिका.
ही रेसिपी करून बघण्यात येईल. वडे माहिती आहे. पण आता प्रमाण विसरले होते.
सीकेपी पद्धतीचे कोंबडीवडे पीठ
सीकेपी पद्धतीचे कोंबडीवडे पीठ
साहित्य( कंसात प्रमाण)
तांदुळ (6), उडिद डाळ(2), धणे(1), चणा डाळ(0.5), जिरे(0.25), मिरे(0.10)
तांदूळ धुवून सुकवून घेणे.
नंतर सगळं सुटं सुटं मंद गॅसवर गुलाबी भाजून घेणे.
आणि मग दळणे.
मटण, चिकन, मसूर आमटी वगैरे सोबत खायचे असतील तर, मीठ, हळद, पाणी घालून थालिपीठा इतकं घट्ट भिजवून झाकून ठेवणे. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून पुरीसारखे थापून तळणे. टम्म फुगतात.
नुसते खायचे असतील तर जास्तीचे तिखट, कोथिंबीर ( आवडत असेल तर लसूण ठेचून) घालायचे. अन थापताना मेदुवड्या सारखे मधे भोक पाडून मग तळायचे. हेही रिंगसारखे फुगतात.
जागू ताईंच्या रेसीपी लिस्टीत
जागू ताईंच्या रेसीपी लिस्टीत पण सापडेल मला वाट्ते त्यांनी व्हिडीओ सकट लिंका दिलेल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी एका
दोन वर्षांपूर्वी एका ओळखीच्यांकडे खमंग वडे खाल्ले होते. त्यांनी खालील प्रमाण दिले होते. मी करून पाहिले नाही पण तुमचा धागा पाहून आठवण आली.
साहित्य :
अर्धा कि. पटणी किंवा जाड तांदूळ
अर्धा वाटी उडीद डाळ
अर्धा वाटी चणा डाळ
अर्धा वाटी गहू
एक वाटी धणे
एक वाटी जिरे
पाव वाटी बडीशोप
दोन चमचे मेथ्या
मूठभर काळेमीरे
कृती :
धणे जिरे बडीशोप व मेथी तव्यावर गरम करणे. सर्व जिन्नस एकत्र करून जाडसर पीठ दळून आणणे.
वडे सकाळी करायचे असतील तर रात्री उकळते पाणी पिठावर ओतून त्यात हळद व मीठ घालून मळून ठेवणे व सकाळी वडे करणे.
माहेरी मला हे वडे माहिती
माहेरी मला हे वडे माहिती नव्हते, फक्त भाजणीचे माहिती होते. सासरी समजले (सासर शाकाहारीच आहे पण त्या भागात हे वडे करतात ).
सासूबाई पीठ करायच्या ते हेमाताई म्हणजे मनीमोहर यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त वजा गहू आणि उडीदडाळ थोडी अजून जास्त म्हणजे एक किलोला पाव किलोपेक्षा अजून थोडी जास्त पण अर्धा किलो वगैरे नाही. ह्याचं पीठ आमच्याकडे भाजत नाहीत.
भाजणी करतो तेव्हा आम्ही धान्य भाजतो.
मी रेडिमेड पीठ आणते, घरी करत नाही.