क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

KL राहुलच्या संथ खेळाचा भारताला चांगलाच फटका बसणार आहे. राहुल बेंच वरच चांगला शोभून दिसतो.

KL राहुलच्या संथ खेळाचा भारताला चांगलाच फटका बसणार आहे. राहुल बेंच वरच चांगला शोभून दिसतो.

कोहलीने आज अखेरपर्यंत खेळायला हवे होते या पिचवर

आता सुर्यावर मदार आहे. त्याचे एक बरे आहे तो मारतच राहणार. जेवढा टिकणार तेवढा सन्मानजनक स्कोअर होणार.

पण हूडा असा बाद झाला जसे भारतातच खेळत होता. सिडनीला हे चालून गेले असते. पर्थला नाही. त्याऐवजी पंत हवा होता. या बाऊन्सी पिचवर किपींगलाही कामात आला असता.

सुर्या लौकिकाला जागतोय
३० चेंडूत अर्धशतक !!!!

फिनिशर कार्तिकला मात्र नवव्या ओवरलाच यावे लागले. तिथून तो १५ ओवर शांतपणे १५ बॉल ६ वगैरे खेळला. आणि सोळावी ओवर सुरू होताच मोठा शॉट खेळण्यात बाद झाला.

अक्षरला बसवले हे योग्य होते. ईथे स्पिनरला मदत नाही. त्यांचे डिकॉक, रोसो, मिलर वगैरे धाकड लेफ्टी असताना अक्षरला गोलंदाजी दिलीही नसती शर्माने. त्याऐवजी प्रॉपर फलंदाज वाढवला. पण तो हूडा ऐवजी पंतलाच चेक करायला हवे होते असे वाटते. पुढे मागे कार्तिकच्या जागीही पंतला खेळवायची वेळ येऊ शकते. कार्तिकही ऑफ कलरच वाटत आहे.

असो, सुर्या धमाल करतोय. १८ ओवर १२४-६
१४० फायटींग स्कोअर आहे. नवीन बॉलवर आपणही नाचवू त्यांना..

अक्सरला बदलणं ही चांगली मूव्ह होती (लेफ्ट हँडेड बॅट्समेन खूप आहेत अफ्रिकेकडे). हूडा चा टी-२० परफॉर्मन्स आणि ऑफस्पिन बॉलिंग बघता त्याला घेणंही चूक नव्हतं. पण एक खरं म्हणजे अफ्रिकेनी आज अप्रतिम फास्ट बॉलिंग केलीय. खूप दिवसांनी अशी भेदक फास्ट बॉलिंग पाहिली.

अर्शदीप स्वतः मिसिंग लेग मिसिंग लेग म्हणत असूनही शर्माने रिव्यू घेतला....
ब्रिलिअंट कॉल !! बिग विकेट..

१४०??? >>>> १८ ओवरनंतर असेच अंदाजे आकडा घेतलेला. शेवटच्या दोन ओवर वाईट गेल्या. सुर्याही गेला आणि त्यांनीही चांगली बॉलिंग टाकली त्या दोन ओव्हर.

अक्सरला बदलणं ही चांगली मूव्ह होती (लेफ्ट हँडेड बॅट्समेन खूप आहेत अफ्रिकेकडे). हूडा चा टी-२० परफॉर्मन्स आणि ऑफस्पिन बॉलिंग बघता त्याला घेणंही चूक नव्हतं. >> +१ हूडा बाद झाल्यावर कार्थिक ऐवजी अश्विन ला पाठवून कार्तिकला शेवटच्या तीन ओव्हर्स साठी ठेवायला हवे होते असे वाटले. सतराच्या आधी आला कि त्याला नक्की काय होते देव जाणे ! तो इतक्या ओव्हर्स टिकला हेच खूप झाले नाहीतर सूर्या लटकला असता.

राहुल ने त्याची इतरांवर प्रेशर आणून त्यांचा खेळ उंचावण्याचा प्रयत्न करण्याची कामगिरी चोख बजावली असे म्हणून शकतो Wink

आपली पाचवी- सहावी ओव्हर्स शमी-पांड्या टा़अणार हे थोडे प्रेडिक्टेबल होतेय असे वाटते का ? विकेटमधाल पेस नि बाउन्स बघता आज शमीला आधीपासून वापरायला हवे होते का ? भुवीने अर्श्दीप्च्या डोक्यावर हात ठेवल्यासारखा तो पहिल्या दोन ओव्हर्स टाकतोय हल्ली. भुवीला तेंव्हा विकेट्स मिळत नाहीत हे कमाल आहे.

आज सूर्या वगळता बॅटींग ढेपाळली, फिल्डींग गचाळ झाली, पाचातल्या दोघा बॉलर्सना हवा तितका प्रभावी मारा करता आला नाही. पण ह्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अफ्रिकेची फास्ट बॉलिंग जबरदस्त झाली आणी मिलर-मार्करम जोडी कमाल खेळली.

“ सतराच्या आधी आला कि त्याला नक्की काय होते देव जाणे” - इंडियाच्या टी-२० मध्ये जरी कार्थिक फिनिशरचा रोल करत असला तरिही इतरत्र तो प्रॉपर बॅट्समन म्हणून टॉप/मिडल ऑर्डरमधे खेळलेला आहे. दुसरं म्हणजे फिनिशर म्हणजे दरवेळी शेवटच्या १०-१२ बॉल्समधे बॅट फिरवणं इतकंच नाहीये. वर पडझड झाली तर इनिंग शेवटपर्यंत नेऊन मग शेवटी मोठे शॉट्स खेळणं हा सुद्धा फिनिशरच्या रोलचाच एक भाग आहे/असायला हवा (उदा. युवराज, धोनी, परवाच्या मॅचमधे स्टॉयनिस ई.) त्यामुळे कार्थिकच्या जॉब डिस्क्रिप्शनमधे अँड/ऑर एक्झिक्युशनमधे काहीतरी चुकतंय.

राहुल समोरच्या संघाला चांगली सुरुवात करून देतो. त्याच्यामुळे रोहित आणि विराट नको ते फटके मारायला जातात आणि आऊट होतात. त्याच्या जागी हुड्डा ला ट्राय करायला हरकत नाही. सहावा बॉलेर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक बॉलेराचा एक वाईट दिवस असतो, तो कधीपण येऊ शकतो.

किवीज टी २० सामन्यांसाठीचा संघ बघून पुढचि टीम बिल्ड व्हायला सुरूवात केल्यासारखी वाटते. एकूनच बांग्लादेश नि किवीज दौर्‍यामधे नवीन बॉलर्स इंडक्ट केले आहेत . भरवशाचा राहुलही आहेच .

“भरवशाचा राहुलही आहेच” - Lol

कार्थिकला सुद्धा ‘सो लाँग चॅप‘ केलंय बहुदा. जर इन्ज्युरीमुळे पुढच्या मॅचेस खेळला नाही तर कालची पर्थची इनिंग शेवटची ठरेल. Sad

३.२ ओवर ११-१
आजही दोघे ओपनर घाबरत सुरुवात..
राहुल फ्री हिटला सुद्धा डॉट
रोहीत बाद..
अरे कुठे नेऊन ठेवला माझा न्यू ॲप्रोच!

184 - इतका कांही वाईट स्कोअर नाहीं पण आतां गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांत जराही ढिलाई मात्र घातक ठरेल. कोहली, राहुल व अश्विन ह्यात मानकरी. राहुलला आत्तांच लय गवसणं संघासाठी खुपच आश्वासक.
*आजही दोघे ओपनर घाबरत सुरुवात..* - चेंडू सुरवातीला जरा लहरीपणा दाखवतच होता असं जाणवलं. हें कारण असावं.

रोहित आणि राहुल फक्त स्वार्थी खेळ खलून स्वतची जागा वाचवायचा प्रयत्न करत आहेत. भारताला त्यांचा हा ॲप्रोच सेमीफायनल मध्ये पोहचले तर भारी पडणार आहे. बांगलादेश ओपनर बघा कसे खेळत आहेत.

६ ओवर ६०-०
काय मारताहेत हे
हरतात का आज?

कार्तिकची फलंदाजीही कामाला येत नाहीये.
आणि किपिंग महागात पडतेय
पंत हवा होता त्यासाठी तरी.. लिट्टन कदाचित आत असता आता

Pages