Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23
काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढचा T20 वर्ल्ड कप विंडीज
पुढचा T20 वर्ल्ड कप विंडीज मध्ये आहे तिथे स्पिनर्स हे फारच महत्वाचे ठरणार आहेत. >> भारतीय खेळाडूंना सीपीएल मधे जाउ द्यावे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ? वर्क लोड हा भाग वगळता नाही म्हणायला पैसा हा एममेव कारण आहे.
त्याने फॉर्म आणी फिटनेस टिकवून पुनरागमन केलं तर ते आयडियल ठरेल. त्याच्या बरोबर गिल / जैस्वाल ही जोडी परिणामकारक ठरू शकेल. >> +१ गिल मला मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून अधिक चमकेल असे वाटते.
“गिल मला मिडल ऑर्डर बॅट्समन
“गिल मला मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून अधिक चमकेल असे वाटते” - मलाही तो कोहलीचा सक्सेसर वाटतो.
“भारतीय खेळाडूंना सीपीएल मधे जाउ द्यावे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?” - शक्य तेव्हढं व्हरायटी क्रिकेट खेळावं. मंधाना, हरमन, दीप्ती शर्माला बिग बॅशचा केव्हढा तरी फायदा झालाय. पुजाराला कौंटी क्रिकेटमुळे फॉर्म परत गवसला. इंडियासाठी खेळण्याला प्राधान्य ठेवून इतरत्र खेळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं माझं मत आहे.
तरी अजून दोन वर्षानी होणार्या
तरी अजून दोन वर्षानी होणार्या वर्ल्डकपसाठी बिश्णोई, सुंदर, साई किशोर सारख्यांना ग्रूम करावं असं मला वाटतं. >>>
बिश्णोई - 100% सहमत. फिल्डर हि खूप चांगला आहे.
सुंदर - सहमत. फक्त त्याचा इंज्युरी रेकॉर्ड सुधारायची खूप गरज आहे. सध्या तो माशी शिंकली तरी दुखापत ग्रस्त होतो.
साई किशोर - प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या मते तो फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पेक्षा काही वेगळं ऑफर करत नाही. अक्षर फार बेटर बॅट्समन आहे त्याच्या तुलनेत.
अ नि ब संघांमधून निवडल्या
अ नि ब संघांमधून निवडल्या जाणार्या खेळाडूंना थोडी तरी बॉलिंग येणे जरुरी आहे ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. थोडी काम चलाऊ बॉलिंग येणारे खेळाडूही नवीन पर्याय देऊ शकतात.
नव्या फळीतले जयस्वाल आणि तिलक
नव्या फळीतले जयस्वाल आणि तिलक वर्मा ठीक ठाक काम चलावू स्पिन टाकतात.
बाकी सगळे बॅटिंग एके बॅटिंग टाईप आहेत.
एक इंटरेस्टींग चेंज म्हणजे ऋतुराज आणि सर्फराज दोघांनीही पार्ट टाइम विकेट कीपिंग सुरु केली आहे.
T20 टीमचा कॅप्टन हार्दिक
T20 टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याला करा म्हणतायत लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
*निवडल्या जाणार्या खेळाडूंना
*निवडल्या जाणार्या खेळाडूंना थोडी तरी बॉलिंग येणे जरुरी आहे *- and vice versa ! वेळ पडल्यास, गोलन्दाजानी देखील फलंदाजीमधे आपला हातभार लावण्याची जय्यत तयारी केली पाहिजे! शेवटच्या षटकांत पडलेली धांवांची भर निर्णायक ठरूं शकते !
>>गोलन्दाजानी देखील
>>गोलन्दाजानी देखील फलंदाजीमधे आपला हातभार लावण्याची जय्यत तयारी केली पाहिजे!
भुवनेश्वर, बुमराह, शमी, अर्शदीप.... कोणी म्हणजे कोणीच बॅटींग करत नाहीत म्हणून मग अश्विन आणि अक्षरला बॅटींगसाठी कुशन म्हणून प्रेफरन्स मिळतो!!
“गोलन्दाजानी देखील फलंदाजीमधे
“गोलन्दाजानी देखील फलंदाजीमधे आपला हातभार लावण्याची जय्यत तयारी केली पाहिजे” - आशिष नेहरानेसुद्धा २००३ च्या सुमारास क्रीझवर उभं रहायची तयारी दाखवायला सुरूवात केली होती. एका इंटरव्ह्यूमधे ह्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता कि, ‘बॅटिंग नहीं की, तो कोच डंडा लेके मारेगा‘. असा टारगेटेड अॅप्रोच हवा.
क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० -
क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२.
जणू काय क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२४ उद्याच सुरु होतोय.
दम धरा. कितीतरी खेळाडू नवीन येतील.
हो
हो
आणि आता जे आपण हवे म्हणतोय ते उद्या फॉर्म गंडून त्यांना हाकलायचा घोशाही सुरू होईल.
जसे आज राहुलवर लोकं नाराज आहेत तिथे शुभमन गिल काय वेगळा प्लेअर आहे.
२०-२० साठी ओपनर म्हणून मी कधीही पृथ्वी शॉला आधी घेईन. आणि. गिलचा विचार मी वन डे ला करेन. पण आपल्याकडे हेच होत नाही. गिलला अट्टाहासाने सर्व फॉर्मेट खेळवायला बघणार असे वाटते. आणि तो खेळणारही वाईट नाही त्यामुळे कोणी काही बोलूही शकणार नाही. पण या फॉर्मेटची जी गरज आहे ती तेव्हाही फुलफिल होणार नाहीच..
हे आज वाचनात आले
हे आज वाचनात आले
2007 सरासरी वय 23.6..सर्वात वयस्कर आगरकर 29
2022 सरासरी वय 30.4. सर्वात वयस्कर Dकार्तिक 37
2007 सर्वात तरुण पियूष चावला वय 18
2022 सर्वात तरुण अर्शदीप 23
..
आणि कर्णधार वय 26 आताचा 35
टी २० ला २८ चा कत ऑफ हवा
टी २० ला २८ चा कट ऑफ हवा
अगदीच extra ordinary असेल तर ३० पर्यंत संधी द्यावी
त्याहून जास्त नकोच...
या हिशोबाने ३२ वर्षांच्या
या हिशोबाने ३२ वर्षांच्या सुर्याची सुद्धा या वर्ल्डकपला जागा बनत नव्हती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टी 20 साठीच वयाचा निकष इतका
टी 20 साठीच वयाचा निकष इतका निर्णायक ठरतो, हें नाहीं पटत. टी-20साठी आवश्यक आक्रमक खेळ व खास कसब खेळाडूकडे आहे का, हाच निकष योग्य. उदा., सेहवासारखा explosive ओपनर जर खेळायला फ़ीट असेल, तर टी20 साठी त्याच्या वयाचा विचार दुय्यम ठरेल.
चेन्नईचा संघ सिनिअर सिटीजन
चेन्नईचा संघ सिनिअर सिटीजन घेउनच आयपीएल जिंकत आलाय..
एज इज जस्ट अ नंबर... तुम्ही
एज इज जस्ट अ नंबर... तुम्ही फिटनेस मेंटेन करा.. विराट सारखा...
टी 20 साठीच वयाचा निकष इतका
टी 20 साठीच वयाचा निकष इतका निर्णायक ठरतो, हें नाहीं पटत. टी-20साठी आवश्यक आक्रमक खेळ व खास कसब खेळाडूकडे आहे का, हाच निकष योग्य. >>+१ फक्त कसबामधे फिल्डींग चाही विचार व्हायला हवा. अगदीच ब्रॅडमन / अॅबे सारखा कोणी असेल तर गोष्ट वेगळी पण चांगला फिल्डर हा किमान निकष हवाच.
“गोलन्दाजानी देखील फलंदाजीमधे आपला हातभार लावण्याची जय्यत तयारी केली पाहिजे” - >> हे पटते पण आपल्या संघातब१-२ बॉलर्स तरी बॅटीम्ग करू शकतात ह्या उलट अजिबात बॉलिंग करू शकत नाही असे ५ जण असतातच. त्यातला कीपर नि दोन जण सोडून दिले तर बाकीच्या २-३ जणांना एक तरी ओव्हर टाकता आलीच पाहिजे.
ऋतुराज आणि सर्फराज दोघांनीही पार्ट टाइम विकेट कीपिंग सुरु केली आहे. >> एकाचे माहित होते. पण हा शुद्ध वेडेपणा आहे. पंत, किशन. सॅमसन, गेलाबाजार भारत नि राहुल एव्हढे जण असताना कशाला हे धेडगुजरी प्रकार ?
आहे त्याच टीम मधे पंत रोहित बरोबर ओपन करून गेला तर पंत, रोहित, कोहली, सूर्या, पांड्या हा कोअर चांगला आहे. रोहित बाद झाला तर कोहलि अँकर म्हणून यावा + दहाव्या षटाकानंतर कोहली ला यावे लागत असेल तर त्याला अजून खाली ढकलत जावे. ह्या कॉम्बो मधे राहुल ही हीटर म्हणून सहावा येऊ शकतो (राहुल ने वन डे मधे त्याचे फिनिशर टाईप कसब दाखवले आहे नि त्याच्या टेलंट चा योग्य उपयोगही होउ शकतो. ) किंवा हूडा सारखा आक्रमक ऑल राऊंडर येउ शकतो, सॅमसन ला ही इथे वापरता येईल. खास स्पिनर विरुद्ध मधल्या ओव्हर्स मधे मोर्चा उघडायचा असेल तर अय्यर सुद्धा आणता येईल. सलामीसाठी पंत ला फ्री तो हीट लायसन्स दिल्याने तो एक्स फॅक्टर ठरू शकतो नि रोहितलाहि सेट व्हायला वेळ मिळेल. जोवर शॉ बद्द्द्लचे पंतु किंतू दूर होत नाहित तोवर हि कामचलाऊ कल्पना कशी वाटते.
>>सॅमसन ला ही इथे वापरता येईल
>>सॅमसन ला ही इथे वापरता येईल.
सॅमसन सेट व्हायला वेळ घेतो..... तीन चारवर वगैरे ठीक आहे..... सहाव्या नंबरवर तो कितपत प्रभावी खेळू शकेल याबाबत शंका आहे!!
स्विंगसमोर पंतही ओपनिंगला काय उजेड पाडेल सांगता येत नाही.
दीपक चहर, शार्दूल ठाकूर वगैरे लोकांना व्यवस्थित ग्रूम केले पाहिजेल ऑलराउंडर म्हणून..... आठव्या नवव्या नंबरवर असे लोक असतील तर पुढचे लोक पण जरा अधिक धाडसाने खेळू शकतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पावसाच्ं सावट असलं तरीही
पावसाच्ं सावट असलं तरीही फायनल सुरूं होतेय हें चांगलं ! इंग्लंड नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण . सामना रंगतदार होवो ! दोन्ही संघांना शुभेच्छा.
पाक 137 ! इंग्लंडची अप्रतीम
पाक 137 ! इंग्लंडची अप्रतीम गोलंदाजी , क्षेत्ररक्षण व क्षेत्ररचना !!!
गोलंदाज सामना जिंकून देतील पाकला ? कठीण दिसतंय. बघूं . पावसाने इतकी मेहरबानी केलीय तर सामना चुरशीचा तरी व्हावा !
विकेट काढा रे..
विकेट काढा रे..
एवढ्या धमाल वर्ल्डकपनंतर सेमी आणि फायनल एकतर्फीत मजा नाही
संपली मॅच. इंग्लंड विजयी.
संपली मॅच. इंग्लंड विजयी.
137 इतका कमी स्कोअर असुनही
137 इतका कमी स्कोअर असुनही पाकने इंग्लंडला झुंजवलं , हें खरं. अभिनंदन इंग्लंड !!!
इंग्लंडचे अभिनंदन.
इंग्लंडचे अभिनंदन.
मला तर बॅालिंग पिच प्लस पाकिस्तानी बॅालर्स त्यामुळे १३८ स्कोअरही चॅलेंजिंग वाटत होता. पाकिस्तानी बॅालर्स मस्त खेळले. प्रत्येक बॅाल बघण्यासारखा होता.
शेवटच्या तीन ओव्हर्स महाग
शेवटच्या तीन ओव्हर्स महाग पडल्या... पाकिस्तान ने 150 मारला हवा होता...
शाहीन आफ्रिदी जखमी होऊन आत
शाहीन आफ्रिदी जखमी होऊन आत गेला तिथे सामन्यावरची पकड गेली. नाहीतर प्रेशरगेम होता. पाकिस्तानला बरेपैकी चान्स होता. त्यानंतर त्या जागी बॉलिंगला आलेल्या ईफ्तिकारला फोर सिक्स येताच प्रेशरच गेले. एकदा प्रेशर गेले की सामन्यात काही उरले नव्हते. मग पुढच्या ओवरलाही पहिल्या दोन बॉलला दोन फोर आले. तेच प्रेशर कायम असते तर ईतके सहज आले नसते. थोडेसे बॅडलकच पाकिस्तानचे.
शाहीन आफ्रिदी लाच वेड ने
शाहीन आफ्रिदी लाच वेड ने शेवटच्या दोन ओव्हर्स मधे गेल्या वर्षीच्या फायनल मधे फोडले होते ? त्याचा ओपनिंग स्पेल्ल नि डेथ स्पेल्ल ह्यामधे फरक असतो असे आठवतेय.
थोडेसे बॅडलकच पाकिस्तानचे. >>
थोडेसे बॅडलकच पाकिस्तानचे. >> चूक.
Pages