अमरीश पुरीला आपण "बावजी" च्या रूपात अनेकदा पाहिले आहे. तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा व अमेरिकेत अमेरिकनांसारखा असतो पण त्याचा भूगोल व दिशाज्ञान तसे कच्चेच. साधे लंडन मधे आपल्या घरून आपल्याच दुकानात जायला तो पुण्यातील रिक्षावाल्याने नवख्या व्यक्तीस फिरवून न्यावे तसा कोठून कोठून फिरून जातो. अमेरिकेत त्याच्या हॉलीवूड मधल्या म्हणजे समुद्रकिनार्यावरून बरेच मैल आत असलेल्या शहरातील घराखालीच समुद्रकिनारा व मरीना असतो, व त्या शहरातील "सबसे बडा पेपर" हा न्यू यॉर्क टाइम्स असतो. त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. व तो फावल्या वेळात भारतात आल्यावर ताजमहाल चा गाइड बनतो. तो जर भारतात राहात असला तर अमेरिकेहून शिकून भारतात आलेल्या मुलाकडे तो यायच्या दिवशीही ढुंकूनही न पाहता पेपर वाचत बसतो. तरीही तो एक यशस्वी दुकानदार्/उद्योजक गणला गेला. त्यामुळे ते आपण सोडून देऊ.
पण जेव्हा तो मोगँबो, जनरल डाँग, ठकराल, भुजंग ई. बनला तेव्हा असे यश तेथे मिळवू शकला नाही. माबोवर असल्या गोष्टींचा अभ्यास असलेल्या अनेक लोकांना वेळीच कन्सल्ट न केल्याने त्याचे नुकसान झालेच पण अनेकदा फालतू हीरो लोक जिंकून बॉलीवूडचे ही झाले. यातील अर्ध्याएक केसेस मधे तरी पब्लिक अमरीश पुरीच्या बाजूने असे पण कधी त्याचे टॅक्टिक्स, कधी चोरी/अन्याय कसा करावा याबद्दल असलेली मर्यादित समज, तर कधी त्याचा अस्थानी मेकअप्/कॉस्च्युम यामुळे तो प्रत्येक वेळेस हरला. त्या चुकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. भावी चित्रपटांतील व्हिलन्सना यापासून बोध घेता यावा म्हणून इथे एक प्रबंधवजा बाफ उघडलेला आहे. तो पूर्ण करण्यास माबोवरील एक्स्पर्ट्सनी हातभार लावावा ही नम्र विनंती.
सुरूवात मीच करतो. बरेच खडक,
सुरूवात मीच करतो. बरेच खडक, कडेकपारी असलेल्या ठिकाणी तुमचे राज्य/अड्डा आहे. तेथे हीरो लोक ऑलरेडी घुसलेत. आता तेथून पळून जायचे आहे. अशा वेळी त्या खडकाबिडकांमधून लपतछपत पळून जाण्याऐवजी आपला राजदंड (पायस - थँक्स) झिप लाइन सारखा वापरून सर्वांसमोर तेथून त्यावरून घसरून जायचा केलेला प्रयत्न. त्यात ते झाड त्यावर फारतर खार चढू शकेल इतके नाजूक. केवळ हीरोंवर गोळ्या मारताना व्हिलन्सचे नेम नेहमी चुकताच तसे धरमपाजींचे झाल्याने वाचला.
हे काय फा
हे काय फा
, धमाल लिहिलेय.
प्रबंधाचं काही माहिती नाही , पण सगळ्या माबोकरांना हे असं बाहेर काढताय तुम्ही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/SharpInfamousHoneycreeper-max-1mb.gif)
जय भैरोनाथ !
माझ्यादृष्टीने यशस्वीच आहे. आवाजातली ती जरब व तो दरारा कुणाकडेच नाही. बाकी उर्वरीत फजिती ही त्या काळातल्या बहुतेक खलनायकांची व्हायची !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धमाल धागा.
>> तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा
>> तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा >> छे, छे. लंडनम्ध्येही तो पंजाबातून आलेलाच दिसतो. अ आणि अ पिक्चरमध्ये दिलवाले यायलाच हवा.
लिंकमधलं रत्नं पाहिलं नव्हतं
लिंकमधलं रत्नं पाहिलं नव्हतं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळी चूक स्पीलबर्गची आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भारी!
भारी!
पण फा, तुझ्याकडून अजून जरा मोठ्या लेखाची अपेक्षा होती. पहिला परिच्छेद इतका उदाहरण-भरीव (सध्या मराठीत 'डेन्स' म्हणतात त्या अर्थाने) झालाय की मला एकेका वाक्याला थांबून तो तो चित्रपट सेव्हन्टी एमेम मनःपटलावर फास्ट फॉरवर्डमध्ये बघावा लागला. आम्हा पामरांसाठी जरा सोपं करून लिहिलं असतं तर कसं जांभूळ टपकावं थोंडात तसं वाटलं असतं एकेक उदाहरण.
पण मग खाली पहिल्याच प्रतिसादात कांती शाहच्या चित्रपटाने नांदी झालेली बघून मग जिवात जीव आला. म्हणजे, वरचा लेख हा मंथनासाठी वापरलेला मंदार पर्वत असून खाली प्रतिसादात निरनिराळी रत्नं बाहेर पडणार आहेत तर. तो लोहाचा सीन खतरनाक आहे. किंबहुना आख्खा सिनेमाच. तो पुढील पिढ्यांनी बघावा यासाठी जाहिरात कांती शाहने गुंडात केली आहे. 'आपने कांती शाह की फिल्म लोहा नही देखी' एवढं म्हणून न थांबता त्यातले संवाद रिपीट होतात त्यात. असो. विषय अमरीश पुरीचा आहे आणि मी वाहवत गेलो. आठवेल तसे टाकेन, पण यावर तुझीच खास टिप्पणी वाचायला मजा येईल.
हपा अरे तो कांती शाह वाला
हपा
अरे तो कांती शाह वाला लोहा नव्हे. धरमपाजी दोन्हीकडे असल्याने मिक्स झाले काय? ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राज एन सिप्पी वाला लोहा
कांती शाह वाला लोहा
अर्रे हो की! त्यात अमरीश पुरी
अर्रे हो की! त्यात अमरीश पुरी नव्हता. माती खाणे म्हणतात ते हेच.
वरचा लेख हा मंथनासाठी
वरचा लेख हा मंथनासाठी वापरलेला मंदार पर्वत असून खाली प्रतिसादात निरनिराळी रत्नं बाहेर पडणार आहेत तर.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>>हे जबरदस्त आहे.
शोम शोम शामो शाशाय..... आता
शोम शोम शामो शाशा..... आता आठवले तरी हसू येते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Loha (transl. Iron) is a 1987
Loha (transl. Iron) is a 1987 Hindi action thriller film directed by Raj N. Sippy. It was released in India on 23 January 1987.[1] It stars Dharmendra, Shatrughan Sinha, Karan Kapoor, Madhavi, Mandakini and Amrish Puri.[2][3] The film was one of that year's highest-grossing films. It became Dharmendra's first hit of the year 1987, where he went on to deliver 7 more outright hits and hence, represented one of his best career years as well as an all-time record year for any Hindi film star.
>>> ऎतेन
लोहा आमच्याकडे वीसीआर आणि
लोहा आमच्याकडे वीसीआर आणि कॅसेट आणून बघितल्याचे आठवतेय. त्यामुळे पारायणे झालेली. अर्थात तेव्ह बरेच लहान असल्याने आता पिक्चर आठवत काहीच नाही. त्यातले धर्मेंद्र शत्रुघ्न आणि मंदाकिनी तेवढी लक्षात आहे. अमरीशपुरी नाही लक्षात. तर त्याला अयशस्वी म्हणू शकतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमरीशपुरीचा चड्डा मात्र कायम
अमरीशपुरीचा चड्डा मात्र कायम लक्षात राहील. दामिनीमध्ये सनीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला अणि रिशी कपूरला खाऊन टाकले. चड्डासाहब मात्र तोडीस तोड निघाले.
त्याला १८ मुले व १७ मुली
त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. <<<<<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
https://youtu.be/gOLTqmDxK4E
आज बचना है मुश्किल तेरा... - हातीम ताई.
सोनू वालिया आणि संगीता बिजलानी दोघीच कशा नाचणार, मग आपण वर्ल्ड बेस्ट जादूगार असल्याचा उपयोग तरी काय म्हणून तो जादूने डान्सर्स आणतो (गाणं संपल्यावर त्यांना गायब करायला विसरत नाही. नीटनेटकेपणाची आवड.) शिवाय गाण्याची सुरुवात पण करून देतो. (बऱ्याच गाण्यांमध्ये त्याने हौसेने सुरुवात केलेली आहे गाण्याची.) मग नंतरचे चित्ताकर्षक क्लोजप्सदेखील पाहून घ्या...
धमाल लिहिलेय.
धमाल लिहिलेय.
>>गाण्याची सुरुवात पण करून
>>गाण्याची सुरुवात पण करून देतो
नुसता गातोच नाही तर तो वेळप्रसंगी वाजवतो देखील :हहपुवा:
https://youtu.be/Ie_kxJODrGA
हो, तहलकाचं लिहिणारच होते.
हो, तहलकाचं लिहिणारच होते.
डोंगरिलामध्ये मल्टिप्लेक्स, प्रेक्षणीय साईटसीइंग स्थळे असे काही नसावे. हास्यविनोद वगैरे गोष्टी डाँगच्या भीतीमुळे वर्ज्य. (जनरल डाँग, तुम्ही वेणी इकडेतिकडे उडवत फिरता ते पाहून शेपटीने माश्या वारत हिंडणाऱ्या गाईची आठवण येते.. हाहाहा! - हे कसे सांगणार डाँगला?) त्यामुळे मनोरंजनाचे एकमेव माध्यम म्हणजे हे असे गाणेबजावणे.. आता डाँग तल्लीन होऊन सतार वाजवत आहे, बाई तल्लीन होऊन नाचत आहे पण कुठे थांबायचे हे कळणे फारफार महत्त्वाचे. शेवटी तो तलवारीने तिला कायमचीच थांबवतो.
अमरीश पुरी व्हिलन कसा का
अमरीश पुरी व्हिलन कसा का असेना डान्स फार छान करतो -
जुगनी-जुगनी गाण्यातला डान्स - राणी मुखर्जीला वरताण एक्सप्रेशन देतो तो, खास करून नीना कुलकर्णीला बघितल्यावर
छत पे सोया था बेहनोई - ममता कुलकर्णीला तिच्या डान्स स्टेप्स विसरायला लावेल असे अमरीषचे नृत्य
अदृश्य हात गुदगुल्या करीत असल्याचा पूरक अभिनय.
डिट्टो छम्मा छम्मा मधल्या उंफी उर्मिलेसोबत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हहपुवा लेख आणि प्रतिक्रिया.
हहपुवा लेख आणि प्रतिक्रिया. अजुन येउंद्यात!
पण जेव्हा तो मोगँबो, जनरल
पण जेव्हा तो मोगँबो, जनरल डाँग, ठकराल, भुजंग ई. बनला तेव्हा असे यश तेथे मिळवू शकला नाही. >>>> णिषेध .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोगॅम्बो ईतका यशस्वी दूसरा खलनायक नाही
कसम पैदा करने वाले की
कसम पैदा करने वाले की
प्लॉट आर्मर ही संकल्पना बव्हंशी वेळा हिरो लोक मूर्खपणा करूनही नामानिराळे कसे राहतात याकरता वापरली जाते. व्हिलन अमरीश पुरीच्या बाबतीत मात्र अनेकदा प्लॉट आर्मर आडवे येते आणि त्याचे फसलेले प्लॅन्स सफल करते. कसम पैदा करने वाले की चे उदाहरण घेऊ.
आरतीने (स्मिता पाटील) आपल्याशी पैशासाठी लग्न केले होते हे ऐकून सतीश (मिथुन) व्यथित झाला आहे. पण प्रेम असल्याने तो तिला परत घरी आणायला जातो. हीच संधी घेऊन उदयभान (अमरीश पुरी) त्याच्या नावाने सुसाईड नोट लिहून घेतो की "आरतीने दिला धोका, जिंदगीत नाही राहिला मौका". मग बॉब (बॉब क्रिस्टो, अजून कोण?) सोबत जाऊन नुकत्याच दिलजमाई झालेल्या जोडप्याला गाठतो. सतीशला पोटात चाकू खुपसून ठार करतो. प्रेग्नंट आरतीला तसेच सोडून देतो आणि बॉबला सतीशची लाश गटारात फेकायला सांगतो. मग पोलिसात जाऊन सांगतो की आरतीने धोका दिला हे ऐकून सतीशने आत्महत्या केली.
आता - १) मिथुनने आत्महत्या केली असे दाखवायचे असेल तर हुशार व्हिलन चाकू पोटात खुपसून मारेल का?, २) पोलिसांसमोर त्याची आत्महत्या सिद्ध करायची असेल तर किमान त्याचे प्रेत सापडायला हवे. मग सहज सापडेल अशा ठिकाणी लाश ठेवण्याऐवजी ती गटारात फेकण्यामागचे प्रयोजन काय?, ३) आपण गावातले सर्वात श्रीमंत व शक्तीशाली व्यक्ती असताना हा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी बॉबने सुचविल्याप्रमाणे मिथुनसोबत स्मिताला ठार करून आपले भविष्य निष्कंटक तो का बरे करत नाही?
(१) व (२) मुळे तो खरे सुरुवातीलाच पकडला जायला हवा पण प्लॉट आर्मर आडवे येते.
अमरीश पुरी हे खूप great ॲक्टर
अमरीश पुरी हे खूप great ॲक्टर होते.
ते नक्कीच स्टेज ॲक्टर असणार.
इतका उत्तम कलाकार आणि उच्च दर्जा चा अभिनय फक्त स्टेज ॲक्टर लाच शक्य आहे
ओम पुरी,नाना,परेश हे पण खूप मोठे कलाकार.
जिवंत पना यायचा त्यांच्या पात्रात
त्यांची कोणतेही ही भूमिका असू ध्या .
लाजवाब acting.
अरे पब्लिकहो अमरीश पुरीला
अरे पब्लिकहो अमरीश पुरीला डिफेण्ड करू नका. तो स्वतः अपयशी आहे असा क्लेम नाही केलेला इथे. त्याची व्हिलनरूपातली कॅरेक्टर्स अपयशी झाली - कारण पकडली किंवा मारली गेली. कारण त्यांचा बिनडोकपणा. हा पॉईंट आहे. त्यावरचा हा अभ्यास आहे.
वरती पायस आणि श्रद्धाने परफेक्ट उदाहरणे दिली आहेत.
स्वस्ति - मोगँबो हा रोल व त्यातील अमरीश पुरी प्रचंड फेमस होता. पण तो पॉईण्ट नाही. मोगँबो शेवटी हरला ना? म्हणून अपयशी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेव्हा जरा धाग्याचा टोन पकडा आणि लिहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाई तल्लीन होऊन नाचत आहे पण
बाई तल्लीन होऊन नाचत आहे पण कुठे थांबायचे हे कळणे फारफार महत्त्वाचे. शेवटी तो तलवारीने तिला कायमचीच थांबवतो. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नीटनेटकेपणाची आवड >>> हे दोन्ही जबरी
"आरतीने दिला धोका, जिंदगीत नाही राहिला मौका". >>>
हे मी टोटली त्या सैराट च्या सुरूवातीच्या सीन मधल्या कॉमेण्टरीच्या टोन मधे वाचले.
बाई तल्लीन होऊन नाचत आहे पण
बाई तल्लीन होऊन नाचत आहे पण कुठे थांबायचे हे कळणे फारफार महत्त्वाचे. >>
या नाण्याची दुसरी बाजू त्रिनेत्रमध्ये दिसते. तिथे व्हिलन अमरीश पुरी कलेच्या आहारी गेल्याने मरता मरता वाचतो.
सिंघानिया (अमरीश पुरी) हा सुरुवातीपासूनच कलाकार व कलेचा कद्रदान दाखवला आहे. तो इंडियन आयडॉलछाप एका स्पर्धेचा जज आहे (जी धरमपाजी जिंकतात आणि सिंघानिया त्यांना शब्दशः तुम बंबई आ रहे हो टाईप निमंत्रण देतो). आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारल्याचा आनंद तो कॅनव्हासवर चित्र काढून साजरा करतो आणि चित्र काढताना साथसंगत म्हणून मॅकमोहनचे व्हायोलिन वादन ठेवण्याचा सुसंस्कृतपणाही तो दर्शवतो. आता साईड बिजिनेस म्हणून तो कोकेन स्मगलरही आहे, पण ते काय चालायचंच.
क्लायमॅक्सच्या थोडं आधी मॅकमोहन हिरो मिथुनची हिरवीण शिल्पा शिरोडकर पकडून याच्या हवाली करतो. ती वाघासारखे पट्टे असलेले कपडे घालून आली आहे. सिंघानिया तिला सांगतो की जिवंत राहायचं असेल तर तू नाचगाण्याचा आयटम पेश कर आणि मी तुझी एक एक अदा या कॅनव्हास वर चितारेन. ती मनातल्या मनात म्हणते की हीच संधी आहे, याला नाचगाण्यात गुंतवून याचा खेळ खलास करते.
आणि मग गाणे सुरु होते - म्याव म्याव! लिंक - https://youtu.be/nyByZQPpwBo?t=8139 इथून पुढची चार-पाच मिनिटे बघणे. खासकरून अमरीश पुरीचे एक्सप्रेशन्स आणि त्याचे उचकलेले मांजर (पक्षी फेलिडे कॅटस, शिल्पा नव्हे. गाण्यातली खरी मांजर प्रचंड बोर झालेली आणि चिडलेली पण दिसते आहे rmd ची बेकरीवरील टिप्पणी).
आता लावलेल्या धारदार स्टीलच्या नख्यांनी पटकन सिंघानियाचा गळा चिरायचा सोडून शिल्पातै त्याला फिशटँकमध्ये बुडवून मारण्याचा असफल प्रयत्न करतात. अन्यथा कलेच्या आवडीपायी सिंघानियाचे प्राण गेलेच होते.
नुसतेच कलेच्या आहारी
नुसतेच कलेच्या आहारी गेल्यामुळे 'डान्स डान्स डान्स' नामक पिक्चरात अमरीश पुरीने जीव गमावून घेतला आहे. यात तो इतका आहारी गेलाय की समोरची डान्सर सरला येवलेकर आहे याचाही त्याला फरक पडत नाही
स्टेज शो करायला आलेल्या कलाकारांनी आपल्या घरी येऊन पुन्हा त्यांचं नाचगाणं सादर करावं या विचाराने पछाडलेल्या पुरीला सगळ्या डान्सर ग्रूपला किडनॅप करायची अवदसा सुचते. बरं त्यानंतर तो बाकी सगळ्या ग्रूपला मारून टाकतो पण हिला अगदी पार म्हातारी होईपर्यंत सांभाळतो. मग मधेच कधीतरी ती त्याच्या तावडीतून पळून जाते. तर म्हणे मैंने कई हसीन लम्हें इसके साथ गुजारे है तर इसे जीने दो पण हमारे इलाकेके बाहर मत जाने दो. असल्या चुका केल्यानंतर व्हायचं तेच होतं आणि येवलेकर बाई त्याच्या माणसांना त्यांच्याच बंदूकीने मारतात आणि मंदाकिनीला पुरीची शिकार होण्यापासून वाचवतात आणि त्याच्या हातून निसटून जातात.
इथे पुन्हा पुन्हा डान्सर्सना पळवण्याच्या पॅटर्नमधे अडकल्यामुळे शेवटी पुरीची म्युझिकल मौत होते.
सरला येवलेकर कोण आहे...
सरला येवलेकर कोण आहे...
नुसता गातोच नाही तर तो
नुसता गातोच नाही तर तो वेळप्रसंगी वाजवतो देखील :हहपुवा:
https://youtu.be/Ie_kxJODrGA
>>> स्वरूप.. फुटलो मी...
नुसता गातोच नाही तर तो
नुसता गातोच नाही तर तो वेळप्रसंगी वाजवतो देखील >>>
आत्ता पाहिले ते शोम शोम परत.
खतरनाक किस्से येत आहेत...
चित्र काढताना साथसंगत म्हणून मॅकमोहनचे व्हायोलिन वादन <<<<
त्याने सांबा संगीत वाजवायला हवे खरेतर.
एकूणच खतरनाक किस्से येत आहेत...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हा विश्वात्माचा प्रसंग. https://m.youtube.com/watch?v=chjbXQdxZS0?t=8400
यानंतर नसिरुद्दीन शाह चिडून डायरेक्ट जुर्राटच्या अड्ड्यात घुसतो. दरवाजापाशी दोन सशस्त्र रक्षक उभे आहेत, नुसते उभेच आहेत. गाडी विनापरवानगी वेगाने, चेकपोस्टचे फाटक तोडून आत आली आहे, आपण सज्ज राहिले पाहिजे वगैरे विचार नाहीत. सूर्यप्रताप त्यांच्याजवळच गाडी नीट थांबवतो, गॉगल काढतो, उतरतो, मग त्या दोघांना बुकलायला सुरुवात करतो. बंदुका शोभेसाठी दिल्या आहेत का?
मग मुख्य खलनायक व त्यांचे उजवेडावे हात वगैरे मंडळी येतात, रझा मुराद कसा अजगर जुर्राटला सामील आहे, वगैरे होते. तिथे अजगर म्हणतो.. 'ले जाओ इस शूरवीर को बाइज्जत और..' माझ्या डोक्यात लगेच '... bury कर दो' असा डायलॉग आला, पण अजगराला पन्स चे वावडे असावे.
आता अजगराच्या प्लॅननुसार त्याने प्रभात आणि आकाशला संपवले आहे, रझा मुरादचीही भारतात परतीची फ्लाईट थोड्याच वेळात आहे, हे सर्व पाहता नासिर, सोनम, दिव्या, नासिरची मुलगी या लोकांना जिवंत आणि कैदेत ठेवण्याचे तसे काहीच प्रयोजन उरलेले नाही. पण त्या सर्वांना फक्त कैदेत ठेवायचे ठरते. कारण अजून अजगराची नृत्यगायनाची हौस भागलेली नाही. जे नाचतील त्यांना साखळदंडातून सूट मिळणार, असे काहीसे ठरते. मग सोनम, दिव्या आणि अजगराची मुलगी सुद्धा '... उसे तूफान केहते है' वर नाचतात. गाण्याची सुरुवात अजगरच करतो प्रथेनुसार. मग मध्येच 'मी मी मी...काहीतरी' म्हणतो. याच मी मी करण्याच्या वृत्तीमुळे राज्ये नष्ट झाली, पण अजगराला त्याचे काय? त्याने लगेच नाचायलाही सुरुवात केली आहे.
याच मी मी करण्याच्या
याच मी मी करण्याच्या वृत्तीमुळे राज्ये नष्ट झाली, पण अजगराला त्याचे काय? त्याने लगेच नाचायलाही सुरुवात केली आहे>>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Pages