Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आलाच नाही म्हणजे, शुक्रवार
आलाच नाही म्हणजे, शुक्रवार का वार झाला नाही? मग आता उद्या आहे का तो सगळा ड्रामा?!
उद्या आहे... शुक्रवार का वार
उद्या आहे... शुक्रवार का वार आणि प्रोमो दाखवून trp घयायचा प्रयत्न होता...
पाहिला एपिसोड. आता उद्या
पाहिला एपिसोड. आता उद्या सलमान काय उलट्या पालट्या उड्या मारत लॉजिक लावतोय बघायला मजा येईल. एक अर्चनाला परत आणण्याचा निर्णय त्यांना कित्येक सीजन भोगावा लागणार. शालीनला सॉलिड भडकावून, जेव्हा तो खरंच जाणार म्हंटल्यावर बहु बेट्याने पलटी मारली.बाकी मंडळी सुमडीत गपगुमान झोपी गेली.सगळी मजामजा.
बिग बॉसला प्रियांका अंकित
बिग बॉसला प्रियांका अंकित बिलकूल आवडत नाहीत हे काल स्पष्ट झाले. काल त्यांना अग्रेसिव्ह म्हणत होते. अर्चनाच्या वेळी निम्रत, टीना, शालीन हे शिवला भडकावत होते, जोरजोरात ओरडत होते. त्यावेळी त्यांना काही खटकले नाही. प्रियंकाने त्यांच्या लाडक्या साजिदला मिळणाऱ्या उघड उघड फेवर विरुद्ध बोलल्यावर तर आता तिला बीबी बहुतेक काढेल असे मला वाटते. पुढच्या आठवड्यात अंकीतला, मग १/२ आठवड्यात प्रियंकाला. मग साजिद, शिव, निम्रतपैकी कोणी तरी विनर. कदाचित अब्दुही.
परवाच्या टास्क मध्ये ही इम्पॉसिबल गोष्टी दिलेल्या जसे की ३० मिनिटात निम्रतने दोनदा कपडे बदलणे, शिवने दोनदा माइक काढणे,हे एकेकदा शक्य झाले असते, पण दोनदा कसे होईल ? स्टॅन जो पैसे दिल्याशिवाय कधीच रॅप करत नाही असे टास्क... हे कोणाला शक्य होणार होते ? काहीतरी फेअर खेळा राव ! टीना सुम्बलला गद्दारी करण्याचीही जरुरी नव्हती. बिग बॉसने हा टास्क बुली टीमच जिंकणार याची खात्री केली होती. म्हणजे साजिदची कॅप्टनसी तशीच राहील. हा सगळा बनाव साजिदला वाचवण्यासाठी होता.
उद्याही शालिनला ओरडा, प्रियांका अंकिताला ओरडणार आहेत. वोटिंग मध्ये हे जाणार नाहीत म्हणून सतत काहीतरी बोलत राहून नेगेटिव्ह इमेजे करायची.
'
स्टॅन ला काय प्रेमाने दाटले की बाळा पुन्हा असं करू नको हा ! शिवची तर काही चूकच नाही म्हणे ! वाह बिग बॉस.
अगदी मनातलं बोललात !हेच
अगदी मनातलं बोललात !हेच बोलायला येणार होतो .आणि या सगळ्यांमध्ये कधी नव्हे तो शालीन सेन्सिबल वाटायला लागला !शिव ला विनर करणाऱ्या जनतेला लाज वाटावी असा खेळ चालू आहे त्याचा . साजिदच्या मागेपुढे गोंडा घोळणे आणि महिला कॉन्टेस्टन्ट च्या पर्सनल स्पेस मध्ये घुसणे आणि पातळी सोडून बोलणे हेच चालू आहे.
मी गेल्या आठवड्यत अगदी पाचेक
मी गेल्या आठवड्यत अगदी पाचेक मिनिटे पाहिलं असेल तेव्हाही बिग बॉस अंकितला टार्गेट करत होते, तो स्टँड घेत नाही ; सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायला बघतो. त्याच्या शेजारी बसलेलीने त्याची बाजू घेतली तेव्हा तिचं म्हणणं टो मणा मारून उडवून लावलं. बिग बॉस का आणि कधी बदलले? कंटेस्टंट्स मसाला देत नाहीत, म्हणून हेच सारखा तडका देतात का?
शिव आवडत नाही.. पण पर्सनल तो
शिव आवडत नाही.. पण पर्सनल तो प्रियांका ला बोलला.. आणि ती खरंच महा चिपकू महा आगाऊ आहे.. अर्चना च्या वेळी जोपर्यंत तो शिवाचा डाव होता हे तिला क्लिअर झाला नव्हतं , तोपर्यंत तरी तिने अर्चनाला थोडा तर विरोध करायचा.. पण नाहीच .. अर्चना कडून चूक झाली तेव्हा अगदी गोड छान लहान बाळासारख तिला सांगत होती आणि काल तिचा काही संबंध नासताना , शिव ला शिक्षा मिळावी या हेतूने किती किती दंगा घातला तिने बाप रे बाप.. अंकित कितीही हुशार बिशार असला तरी कणाहीन वाटतो .. प्रियांका च्या मागे मागे मागे मागे ..
प्रियांका जाम चीप वाटली काल ..
विनर मटेरियल तास कोणीच नाहीये. आता एवढ्या गोंधळा नंतर बिग बॉस राहिलेल्या दिवासात एका कुणाची इमेज उजळावेळ आणि मग ती विनर ...
आज पुन्हा शालीनने अख्खा
आज पुन्हा शालीनने अख्खा एपिसोड खाल्ला….. देवदासचा शारुख झाला पार त्याचा, पण काय डॉयलॉगबाझी करत होता, फुल्ल ऑडिशन मोड ऑन.. बाहेर आल्यावर टि.व्ही रोल्स पक्के त्याचे !
तरीही बिबॉपुढे त्याने स्वतःचे मुद्दे करेक्ट मांडले, व्हॉलेंटरी एग्झिटचे कलम नं सुद्धा लक्षात होते त्याला !
काही संबंध नसलेली प्रियंका फुटेजकी भूखी ! ओव्हर अॅक्टिंग कि दुकान, अचानक व्हॉयलेन्स झाला म्हणून आरडा ओरडा, हस्यास्पद
टिना सॉलिड प्लेयर !
अर्चनाला माफ केलं आता फसले बिगबॉस !
सुंबुलला लवकरात लवकर बाहेर
सुंबुलला लवकरात लवकर बाहेर काढले पाहिजे.
मला शिव ची काही चूक दिसली
मला शिव ची काही चूक दिसली नाही अॅक्चुअली. एकदा तो शालीन आणि स्टॅन च्या भांडणात पडला. ते दिसले , नंतर नाही दिसले काही. प्रियांका मात्र अटेन्शन सीकिंग डेस्परेट बाई. उगीच ओरडत होती काहीही. गुंडे असल्यामुळे हिला सेफ वाटत नाही वगैरे. सिरियसली? त्या अंकित ला तर गौतम च्या आधी घालवायला पाहिजे होते. युसलेस माणूस.
शालिन हुषार आहे. व्यवस्थित मुद्दे मांडत होता. मलाही आश्चर्य वाटलं क्लॉज नं वगैरे सांगितले तेव्हा. अर्चना प्रकरणात शिव ला फैसला घ्यायला सांगितले इथे मला का नाही, टीना चा संबंध काय हे बरोबर होते त्याचे. बिबॉ ने कै च्या कै अर्ग्युमेन्ट करत अर्चना के टाइम अॅक्शन कम्प्लीट हुई थी यहाँ वो नही हुई वगैरे म्हणाले ते लेम वाटले.
महिला कॉन्टेस्टन्ट च्या
महिला कॉन्टेस्टन्ट च्या पर्सनल स्पेस मध्ये घुसणे आणि पातळी सोडून बोलणे हेच चालू आहे. > अगदी अगदी. शिव आणि स्टॅन ने अब्दूला 'लौणडा जवान हो गया' असे म्हणायला शिकवले आहे. especially प्रियांका समोरून जाताना. मी ही क्लिप पाहिली. हे अतिशय छपरी, चीप आणि disgusting आहे. अर्थात शिवच्या फॅन्सना त्यात काही चुकीचे वाटणार नाही म्हणा. कारण समोर प्रियांका आहे ना. पण हे रस्त्यावरच्या मवाली लोकांसारखे आहे
हे रस्त्यावरच्या मवाली
हे रस्त्यावरच्या मवाली लोकांसारखे आहे >> असे केले असेल तर वाईटच आहे, पण तसे असते किंवा पर्सनल स्पेस मध्ये घुसणे इ. स्त्रियांशी असभ्य वर्तनाची अगदी शंका जरी असती तरी एक तर बिबॉ ने ते चालू दिले नसते आणि त्याच्याही आधी प्रियांका, अर्चना ने मोठ्ठा बवाल केला नसता का? त्या काही अबला नारी नाहीयेत.
आज बराच वेळ पाहिलं. मला
आज बराच वेळ पाहिलं. मला शालीनबद्दल चक्क सहानुभूती वाटली.
त्याचं इंग्रजी आणि हिंदी दोन्ही छान आहे.
मी बघते तेव्हा फिल्म प्रमोशनच
मी बघते तेव्हा फिल्म प्रमोशनच सुरू असतं आणि फालतू टास्कस.
शालीन आणि टीना परत एकत्र !
शालीन आणि टीना परत एकत्र ! टीना ने दोन मिनिटात गोड बोलून शालिनला मनवले. फेस पाल्म !
काय सॉलिड ऍक्टरस आहेत दोघेही
शिव काय किंवा इतर कोणी , इथे
शिव काय किंवा इतर कोणी , इथे १०० टक्के सज्जन , कायम पॉलिटिकली करेक्ट वागणारं कोणीच नसतं !
शिवने रिमर्क पास केले असतील तर त्याचे समर्थन नाहीच पण ओव्हरॉल घरातला वावर , विनिंग स्पिरीट , टास्क्स आणि बोलण्यात दोन्हीकडे पुढे असल्यमुळे शिव आवडतो.
स्त्रियांची पर्सनल स्पेस वगैरे बद्दल : हा बिगबॉस शो आहे, जेंडर न्युट्रल असणे अपेक्षित आहे, कपल्स नसलेले स्त्री पुरुष एका बेडवर कॅज्युअली कोहाउसमेन्ट्स म्हणून झोपतात त्यामुळे ब्लॅंकेट काढणे प्रकाराचा कोणी इश्यु करत नसावे !
जी अर्चना शिवला आणि इतरांना पोक करायला वाट्टेल त्या लेव्हलला जाते , ती केवळ एक स्त्री आहे म्हणून तिला बेनिफिट ऑफ डाउट का द्यावा ?
बॅड टच/ वाइट नजर/ अंगावर हात टाकणे याबद्दल मुली स्वतः जागरुक असतात आणि बिगबॉसमधे तर नक्की स्टँड घेतला असता यातले काही शिवने किंवा इतर मेल कॉन्टेस्ट्स्न्टने केले असते तर !
रिपीट बघतेय, सलमान रॉक्स.
रिपीट बघतेय, सलमान रॉक्स. काय कुल झापतो, भारी.
शालीन मुद्दे सोडत नाही, खरे असोत वा खोटे (मी बघितलं नाही). हेच मुद्देसुद शिव बोलू शकला नाही मागच्यावेळी, चेहेरा पाडून गप्प बसून राहिला.
ती सुंबुल एवढी लहान वाटत नाही, असली तरी. तिला पाठवा घरी, रडका चेहेरा घेऊन फिरत असते.
शिव आणि अक्खी बुली गॅंग चीप
शिव आणि अक्खी बुली गॅंग चीप आहे... बिग लुझर्स...
काय धमाकेदार एपिसोड होता, मजा
काय धमाकेदार एपिसोड होता, मजा आली !
सलमान खान अमेझिंग, माइंडब्लोईंग !
शालीन खूप भारी उत्तरं देत होता पण शेवटी लाइनवर आला!
येस, जबरदस्त होता वीकेन्ड का
येस, जबरदस्त होता वीकेन्ड का वार. सलमान काय चीज आहे ते दिसले!! पैसावसूल एपिसोड.
हो हो. सलमानसाठीच मी विकेंड
हो हो. सलमानसाठीच मी विकेंड वार रिपिट रात्री असतं तेव्हा बघते हल्ली. आधी मराठी बघते ना, ते संपल्यावर तिथे हिंदी कलर्सवर पहीलं संपुन रिपिट लागतं.
बायस्ड एपिसोड... मूळ मुद्दा
बायस्ड एपिसोड... मूळ मुद्दा काय होता आणि काय डिस्कस केले...
सुमबुल ला स्केपगोट बनवला.. इझी टार्गेट...19 वय ...
शालीन च्या प्रश्नांची उत्तरे नव्हती सलमान कडे....
अर्चना शिव चे एक्साम्पल देऊन टीना होती कौन है जज करणेवाली वर तर फ्लॅट फेस झाला होता सलमान... काहीही मुद्दे भटकवत होता...
आणि ज्याची चूक आहे त्या mc ला फक्त- अम्मी को भेजे क्या क्लिप म्हणे...
सलमान mc निम्रत याना काही बोलला होता का अर्चना मॅटर वेळी.. त्यांना का नाही डायनिंग टेबल वर बसवला...
बुली गॅंग ला फुल सपोर्ट आहे
बुली गॅंग ला फुल सपोर्ट आहे बिग बॉस चा...
बुली गँग म्हणजे कोण कोण.
बुली गँग म्हणजे कोण कोण. साजिद, स्टॅन, शिव का.
सुंबुल ला एलिमिनेट करायला हवे
सुंबुल ला एलिमिनेट करायला हवे खर तर. तिला काही अक्कल नाही ती १९ आहे फक्त. ऑब्सेस्ड झाली आहे असे दिसतेच आहे, ती मानसिकदृष्ट्या स्टेबल वाटत नाही. कधीच वयानुसार नॉर्मल वागताना दिसत नाही मला तर. अन बिबॉ ने त्यावर टीआरपी घेणे इज नॉट लुकिंग गुड फॉर बिबॉ रेप्युटेशन इदर. या गेम ची वयाची लिमिट १८ न ठेवता २० असायला हवी किमान!
बुली गँग म्हणजे कोण कोण.
बुली गँग म्हणजे कोण कोण. साजिद, स्टॅन, शिव का.
>>> प्लस अब्दू आणि निम्मो
बिग बॉसला स्टॅन, शिव आणि
बिग बॉसला स्टॅन, शिव आणि शालीन सर्वच हवे आहेत कारण साजिदला पुढे न्यायचे आहे मग चेले चपाटे पाहिजेत ना. मग अर्चना च्या वेळी वापरलेल्या लॉजिक वर त्यांनी पार १८० डीग्री कल्टी मारली. त्यावेळी निम्रत, टीना आणि शालीन स्वतः ओरडाआरडा करून बहती गंगामध्ये हात धुऊन घेत होत्या त्यांना एका शब्दाने काही बोलणार नाही कारण परत साजिदच्या चमच्यांना कोणी बोलायचे नाही. प्रियंकाने बिग बॉसवर प्रश्न केले ते त्यांना आवडले नाही म्हणून आज त्यांना झापणार. मेसेज क्लिअर आहे. बुल्ली गॅंग विरुद्ध specially साजिद विरुद्ध काही बोलायचे नाही ! आणि बीबी ला उघड उघड अनफेअर म्हणायचे नाही तरच तुम्हाला ठेवणार. पुढच्या काही आठवड्यात अंकित, सौन्दर्या आणि मग प्रियंकाला काढतील मग खरा खेळ सुरु होईल. अंकित बोलला तर तू का मध्ये पडतोस म्हणून झापायचे आणि नाही बोलला तर काही करत नाही म्हणूनही ओरडायचे. आणि हा शो बोलण्यासाठी, प्रोव्होक करण्यासाठी आहे ना मग काहींना सूट आणि काहींना ओरडायचे हे डबल स्टँडर्ड्स नाहीत का ?
अर्चना साजिदला प्रश्न विचारते म्हणून तिलाही लवकरच काढतील.
पण अशा गेम मध्ये मजाच नाही. आज निम्रतला पूर्ण सहानुभूती देणार . तिला फिनालेत आणणारच. मग तिने काहीही नाही केले, कितीही निर्बुद्धता दाखवली तरी .
आणि सलमान कैच्या काय बोलत होता. आधी बोललेल्या वाक्याचा पुढच्या वाक्याशी संबंधच नव्हता. परत एकदा एपिसोड बघा किती contradict करत होता. काहीतरी करून सुमबुल वर बोलायचे मग स्टॅन शिव विषय मागे पडेल आणि त्यांच्या चुकाही दाखवायची गरज नाही हेच नॅरेटिव्ह होते.
काल बहु बेटाला वेगळं बसवलं
काल बहु बेटाला वेगळं बसवलं म्हणुन त्यांचे फॅन्स म्हणतायत बीबॉ अनफेअर आहे. मागच्या आठवड्यात यांना स्पेशल कांऊन्सलिंग दिलेली तेव्हा मात्रं तो फेअर होता. काल सुंबुलला मध्ये आणलं आणि ते जरा जास्तच ताणलं ते नाही आवडलं. पण तिला सटल हिंट्स दिलेल्या कळत नाहीत.शालीनने सगळा एपिसोड खाल्ला. तरीही तो ऑडिशन मोड मध्येच आहे अजून. मध्येच त्याचे डायलॉग सुरू होतात. टीना केव्हढी कनिंग आहे. बाकीचे अळी मिळी गुपचिळी होते. आता बीबॉ मधे इथून पुढे हर प्रकारच्या हिंसेचं समर्थन होणार.
शिव काय किंवा इतर कोणी , इथे
शिव काय किंवा इतर कोणी , इथे १०० टक्के सज्जन , कायम पॉलिटिकली करेक्ट वागणारं कोणीच नसतं !>>
शिवने रिमर्क पास केले असतील तर त्याचे समर्थन नाहीच पण ओव्हरॉल घरातला वावर , विनिंग स्पिरीट , टास्क्स आणि बोलण्यात दोन्हीकडे पुढे असल्यमुळे शिव आवडतो. >>>
शिव मराठीमध्ये चांगला मुलगा म्हणून दिसला होता. (अर्थात त्यावेळी त्याच्यासमोर अत्यंत फालतू प्रतिस्पर्धीही होते त्यामुळेही तो जिंकला ) तो रोडिझ सारखा शो करून पुढे आला आहे त्यामुळे तो भाबडा वगैरे अजिबात नाहीये. आणि ती अपेक्षाही नाही पण इथे केवळ साजिदचा चमचा म्हणून तो कुठल्याही थराला जात आहे. साजिद स्वतः काही करत नाही तो शिवला या गोष्टी करायला का लावतो ?त्याच्यात तेवढा दम नाही का ? का साजिद शीवच्या खांद्यावरून गोळ्या झाडतोय?
शिवने सज्जन राहून भजन कीर्तन करू नये पण काही गोष्टी तो करतोय त्यामुळे त्याला बरेच लोक बुली, छपरीही म्हणत आहेत हेही सत्य आहे.
पांघरून अंगावरून ओढणे मग ती व्यक्ती स्त्री असो व पुरुष, हे मला पर्सनल स्पेस इन्वेजन वाटते. हे बिगबॉस सारख्या शोसाठी सुद्धा करणे चुकीचे आहे. किंवा एखाद्याचे पर्सनल गोष्टी, कपडे भिरकावणे हेही चुकीचे आहे.. निम्रतबद्धल ही मी हेच म्हणेन की तिने हे चुकीचे केले.
शिवने निम्रतला सपोर्ट केले, तिचे डोळे पुसले अशा पॉझिटिव्ह गोष्टींनीच तो मला आवडेल
आणि शेवटी शिव जिंकला काय, किंवा साजिद स्टॅन, प्रियांका. मला काही फरक पडत नाही. मी कोणालाच कधी व्होट बिट करायच्या भानगडीत पडत नाही. कोणीही जिंकला तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही. आणि हेही लोक केवळ एक interview देऊन लोकांना थँक यु म्हणतात आणि स्वतःच्या कामात गर्क होतात. आपण केवळ टाइम पास म्हणून बघायचे की लोक एखाद्या घरात बंद असताना कसे वागतात किंवा बदलतात आणि शो मेकर्स कसे manipulate करतात हे पाहायचे
काल बहु बेटाला वेगळं बसवलं
काल बहु बेटाला वेगळं बसवलं म्हणुन त्यांचे फॅन्स म्हणतायत बीबॉ अनफेअर आहे. >> पण मग मागच्या आठवड्यात शालीन, स्टॅन, निम्रत, टीनाला का नाही बसवले. मग अनफेअर, डबल स्टँडर्ड्स का म्हणू नये?
anyway प्रियांका रॉक्स
Pages