बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शालीनने ओपन अँड शट केसचं विश्लेषण पण योग्य केलं, विकेंड वार मधे. जे त्या एल एल बी निम्रतला करता आलं नाही. मग सलमानने तिला शालजोडीतले दिले. त्यावरुन शालीन आवडत नसला तरी कधी कधी उठून दिसत असावा असं वाटलं तेव्हा.

येस्स आधी सारखं चिकन चिकन मुळे शालीन आवडत नव्हता पण हल्ली त्याची स्माईल आवडू लागली आहे.
मला वाटलेलं प्रियांकाचे फॅन अंकितला वोट करत असतील. जर ते दोघे एकत्र नॉमिनेशन मध्ये आले तर अंकितचे वोट कमी होऊन टीनाला फायदा झाला असता. पण जर त्याचा स्वतःचा फॅनबेस असेल तर शालीनने योग्य केले.

शालीन टिना एकेकटे चांगले वाटतात. ड्रामा मोड भयंकर आहे त्यांचा. टिना पण ऐकून नाही घेत कोणाचं. जिथल्या तिथे सुनावते. पण काही ठिकाणी attitude नाही आवडत तिचा. बाकी कुठे एक tweet वाचलं, प्रियांका आता अर्चना होऊ बघतेय, कारण अर्चना खूप भारी म्हणुन तिला परत आणलय असा तिचा समज झालाय. आणि सौंदर्या आता प्रियांका झालीये. कान आपलेच किटनार.

ट्युलिप,
हे ऑब्झर्वेशन काल शालिनने सांगितलं, त्याच्या गृप समोर , बरोब्बर आहे !

निम्रत आणि साजिद ला कधीपर्यंत वाचवतो बिग बॉस बघू...

काल अर्चना - ये कैसा राजा है जिसके खुदके खाने के लाले पडे है.. फुटलो मी तेंव्हा....

पण त्या अर्चना ने साजिद च्या हार्ट मध्ये पेन क्रिएट केलं काल. मुद्दा समजून पण वायफळ बडबड करण्यात तिचा हातखंडा आहे. कोणी तिला समजवू शकत नाही.... आता प्रियांका पण थाली का बेंगन झालीय.
पार्टी बदलली.... कारण वोह हमेशा सच के साथ खडी होती है।
अंकित ला ऑप्शन असतोच कुठे? कुठे राहायचं हे ठरवायला.. त्याला स्वतः निर्णय घ्यायची पण पावर नाहीय घरात...
अब्दु काल उगाच मध्ये काहीतरी बोलून गेला इतकंच...
गौतम आणि सौंदर्या मला सुरुवातीपासून आवडत च नाहीयेत.... बकवास....
टिना ला कोणीतरी बरा स्टायलिस्ट देण्याची गरज आहे..
निमरीत ला तर मी कुठे पाहिलं ही नाहीय आधी. त्या दिवशी या पोरी बोलत होत्या की सगळ्यात जास्त अनहायजीनिक निमरीत आहे...
साजिद काल अर्चना ला सांगतो," कूच भी करना लाईफ मे, बस मेरा डीसरीस्पेक्ट नही "
पागल मनुष्य..

कालचा एपिसोड म्हणजे सबकुछ अर्चना एपिसोड होता आणि तिने साजिदची काय वाजवली आहे. लव्ह हर, हेट हर बट यू कान्ट इग्नोर हर ! एकटी अर्चना आहे जी साजिदच्या विरुद्ध बोलू शकते. ज्याप्रकारे साजिद तिला धमक्या देत होता "तुझे शो में रहना हैं या नहीं. मुझसे पंगा मत ले' ते बघून वाटते की बाकी सारे कॉन्टेस्टंट्स त्याला चांगलेच घाबरून आहेत. साजिद नक्की एरवीही त्याची काय पॉवर आहे हे सांगत असणार, तो स्वतः कुठलेही नियम पाळत नाही.बिग बॉस स्वतः ही त्याला काही बोलत नाही. त्याला किरकोळ दाटतो त्यावरून घरातल्यानाही कळले आहे की ह्याचा वरपर्यंत वशिला आहे. लाईव्ह फीड मध्ये साजिद घरात नसतोच म्हणे. त्यामुळे काही जणांना वाटते की तो कुठे दुसऱ्या रूम्स मध्ये जाऊन राहत असावा. त्याने चिट्ठी लिहून नियम तोडले तरी शिक्षा सुमबुलला. ह्याला काहीच नाही आणि अर्थातच निम्रतलाही काही शिक्षा नाही तिलाही नियम माहित होता. पण तिचेही हे आजोळ आहे. तिच्याबद्दल एकही नेगेटिव्ह गोष्ट दाखवत नाहीत.

त्याने गोरीलाही असेच intimidate केले होते. पण ती किरकोळ प्लेअर असल्याने गेली. अर्चनात दम आहे की तिने त्याला सरळ विचारले की आपकी उपरतक पहोंच है क्या. साजिद ह्या शोमध्ये आला हे फार चांगले झाले. त्ज्या स्त्रियांनी त्याच्यावर आरोप केले ते किती सत्य होते हे कळून चुकले. आणि हा खरा काय आहे हेही जगासमोर आले.
बाकी टास्कमध्ये त्याने शिव अब्दू ला सरळ सरळ जास्त वेळ दिला. ते दोनदा सामान भरून जाऊ शकले. रूम ६ ला केवळ १२ सेकंड. ठीक आहे. टास्क मध्ये काय करायचे ही त्याची मर्जी. आणि ते बरोबरही आहे मग मी फेअर आहे फेअर आहे करत फिरू नको ना. अर्चनाने हेच विचारले तर भडकला. बीपी हाय झाले त्याचे.

वीकेंडला अर्चनालाच झापणार कारण साजिद राजा आहे शोचा. त्याच्याविरुद्ध कोणीच आवाज उठुवायचा नाही, बोलायचे नाही. शिव तर त्याचा इतका चमचा झाला आहे की कपडे वगैरे फेकून आपण चुकीचे वागतोय हेही त्याला काळत नाहीये. किंवा हे करून आपल्याला सर्व लाभ आहेत हे त्याला कळले . शिव ची कॅप्टन्सी अर्चना ऐकत नाही म्हणून काढली पण साजिदची नाही. ह्यावर शिवची हिम्मत झाली नाही की माझ्यावर अन्याय झाला. प्रियंकाला असे फेवर केले असते तर अनफेअर म्हणत तांडव केले असते

शिव इंडिव्हीज्यूअल का खेळत नाहीये, तो खेळू शकतो. त्याला बाहेर खूप सपोर्ट आहे हे त्यालाही माहिती असणारच की. फिजिकल टास्कस का देत नाहीत त्यात शिव जास्त उठून दिसेल.

आरती यांच्या पोस्टवरुन अर्चना बेस्ट खेळतेय असं दिसतंय.

बिग बॉसची लाडकी फॅमिली तुटणार वाटतं. स्टॅनने शालिनला मारल्याचा प्रोमो आला आहे.

अंजू.. अर्चना बेस्ट खेळते असे नाही इरिटेट करते. मूद्दे फालतू असतात. तिचा कुठलाही भरवसा नाही. पण साजिदला ती घाबरत नाही आणि एकटी खेळते.हा तिचा गुण मला आवडतो. हा साजिद आहे कोण की त्याच्याविरुद्ध बिग बॉसही काही बोलू शकत नाही. घरचेही दबून आहेत. जोपर्यंत साजिद आहे तोपर्यंत शिव त्याच्याभोवतीच फिरणार.

अर्चनाने धमाल आणली खरच , अख्या घराला सळो कि पळो Biggrin
साजिद अ‍ॅज ऑल्वेज माज करत म्हणे कि शो मे रहना है तो मेरा डिसरिस्पेक्ट मत कर, उलट उत्तर द्यायची हिंमत फक्त तिच्यात आहे, “क्यूं, आपकी पहुंच क्या उपर तक है?“ कैसा लिच्चड आदमी है ये साजिद Proud

अच्छा ओके असं आहे का अर्चनाचं.

स्टॅनने मारलं का शालीनला छान, बाहेरचे मुद्दे नसतील तर त्याला काढतील. त्याचे फॅन्स बाहेर खूप आहेत मात्र.

Sumbul is sick actually...
Real life n acting madhali line wisarun geliye..
Fake n bad acting

इथे बिचुकले येणार आहेत का.

कशाला सारखा त्यांना भाव देतायेत, चांगला चाललाय ना हिंदी सिझन.

एक प्रोमो बघितला सलमान फैलावर घेत होता तेव्हा शालीन घरी जायला तयार आहे, सुंबुल तयार आहे. पाठवून द्या त्यांना. स्टॅनने माफी मागितली. खरं काय ते उद्या समजेल.

हो ना फारच हिस्टेरिक बिहेव करते ती, किती विचित्र वाटते तिचे सारखे शालीन ला चिकटणे, पझेसिव होणे. स्टेबल वाटत नाही ती. सलमान ने प्रोमो मधे वापरला तसा "ऑब्सेस्ड" हा शब्द बरोबर वाटतो. तिला घरी पाठवावे हे उत्तम. शालीन, टिना, सगळेच प्लेयर आहेत एक नंबरचे . सुंबुल इज टू यंग फॉर ऑल धिस. साजिद म्हणतो तसे तिने तिच्या वयाच्या लोकांबरोबर टाइम घालवणे गरजेचे आहे.

सुंबुलचे ज्ञान आलिया भट्टच्या वरतांड Uhoh
न्युयॉर्क पॅरीसमे है क्या , लंडन कंट्री है क्या? ओह नही, लंडन बेल्जियममे है ना Biggrin

Btw , काय मसाला एपिसोड होता आजचा !
शालिन, स्टॅन, शिव , टिना सगळेच कॅमेरा अटेन्शन घेण्यात एक्स्पर्ट , सगळ्या शिव्या म्युट झाल्या .
सुम्बुल सिच्युएशनचा फायदा घेऊन चिकटली होती शालीनला टी सुटतच नव्ह्ती, खरच घरी पाठवा तिला !

हो कालचा एपिसोड एन्टरटेनिंग होता. सिक्रेट टास्क टीना ने फोडल्यामुळे मजा कमी झाली जरा. पण टीना प्लेयर आहे हे दिसले. शालीन पण दिसतो तसा डम्ब नाहीये. काल त्या सिक्रेट गेम मधे स्ट्रॅटेजी चांगली प्लान करत होता. बर्‍याच गोष्टी लक्षात येतात पटकन त्याच्या.
स्टॅन आणि शालीन चे भांडण सगळेच म्यूट होत होते Happy

अर्चना चा आवाज त्रासदायक आहे, ती समोरच्याला प्रोवोक करून भांडण करून कॅमेरा त यायला बघते पण दम आहे तिच्यात....
सगळे साजिद ला हाजी हाजी करतात पण ती नाही....
प्रियांका पण मस्त सर्वाना गूळ लावत स्वतःचा स्वार्थ साधून घेतेय...
सुमबुल ला खरंच जाण्याची गरज आहे... कुठे भांडायचं तेच कळेना झालं आहे बिचारीला

हा खूप इंटरेस्टिंग आणि इंटरटेनिंग टास्क असतो.. टीना आणि सुमबुल ने मजा घालवली त्या टास्क ची...

हो, शालीन डार्क हॉर्स आहे सिझनचा !
आधी फक्तं फेक लव्हस्टोरी , अ‍ॅक्टिंग आणि जोकर वाटत होता पण डोकं आहे माणसाला, परवा बरोबर त्याच्या पेक्षा वीक असणार्‍यांना नॉमिनेशन मधे आणलं आणि अ‍ॅज अ रिझल्ट गौतम बाहेर गेलाय !
सौंदर्या-अर्चना-प्रियंका सगळ्यांच्या बिहेवियरचे अ‍ॅनॅलिसिस बरोब्बर केलं , विकेंडच्या वारला नेहेमी सलमानच्या प्रश्नांना बरोबर उत्तरं देतो, अगदी पहिल्या विकेंडलाही ‘साम दाम दंड भेद‘ चा अर्थ इतर कोणाला सांगता आला नव्हता शालीन सोडून.
भले निगेटिव दिसेल पण गेम मधे स्वतःचं महत्त्व दाखवून देतोय, सेम विथ टिना, चालाख लोंबडी आहे.. डंब डॉल वाटली होती आधी पण अजिबातच नाही!

कालचा एपिसोड सीजनचा टर्निंग पॉईंट वाटला मला. टास्क, पाय मुरगळणयाचं नाटक मग मारामारी, ड्रामा, रडारड. सगळं एकाच एपिसोडमध्ये . ड्रामा मोड भयंकर होता. त्या सुंबुलला घरी जा म्हणावं, लहानच आहे ती अजून, बीबॉ तिच्यासाठी नाहीचे.

सल्लूने पचका केला आज. आलाच नाही. उगीच प्रोमो दाखवतात आणि धोका देतात.

पण आज शालीनने बिग बॉस किती biased आहे हे दाखवून दिले. सर्व नियम स्वतःला पाहिजे तसे बदलतात.

एकतर बिग बॉसच्या इतक्या सुंदर घरात खड्डे का पडले आहेत ?त्यामुळे टीनाचा पाय मुरगळला ना. बाकी ही लोमडी आधी लंगडत होती पण सुमबुलशी भांडताना लगेच नीट चालत/धावत गेली. मग हे नाटक तर नव्हते? ही चांगलीच प्लेयर आहे

सल्लूने पचका केला आज. आलाच नाही. उगीच प्रोमो दाखवतात आणि धोका देतात. >>> थॅंक यु. सलमानसाठी आज मी रिपिट बघण्यासाठी लावलं पण हे वाचून बंद केलं.

Pages