ऋन्मेषच्या धाग्यावर मुलांना मारावं की नाही, यावर खूप किस पडलाय. मारू की मारू नाही, हा प्रश्नच चुकीचा आहे. त्यामुळे चर्चापण वाहवत गेलीये. तुम्ही अमेरिकेत मुलांना दिवसभर डेकेयर मध्ये ठेवता, रात्री दुसऱ्या खोलीत झोपवता, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे असा सूर निघाला. आम्ही एखादी चापटच तर मारतोय, कुठे रोज रोज बुकलून काढतोय, मारलं नाही तर धाक नाही राहत, कधी कधी तर मारावंच लागतं, हा युक्तिवाद बरेच लोक करतात. त्यावर मी प्रतिसाद लिहला पण तो फारच मोठा झाला. म्हणून हा नवीन धागा. यावर न मारता काय करता येईल, यावर चर्चा अपेक्षित आहे. मारावं की नाही, हा प्रश्नच नाहीये.
आता मी मुलांना मारू नये, या मताची आहे. मी qualified आहे का हे म्हणायला, हे खालचं वाचून तुम्हीच ठरवा:
मी आधीच सांगितलंय की माझी मुलगी एक्दम खतरों के खिलाडी होती, अजूनही आहे. पण ती रांगायला लागली तेव्हा आम्ही पूर्ण घराचं babyproofing केलं. यात काय काय येतं? किचन आणि जिन्याला सेफ्टी गेट्स, सगळ्या सॉकेट्सला कव्हर्स, प्रत्येक कपाटाला आणि फ्रिजला चाईल्ड लॉक. गॅसच्या नॉब्सला चाईल्ड locks. देवघर , टीव्ही, स्पीकर्स वर टांगलं. चपला- जोडे, कचरा सगळ्यांना चाईल्ड लॉक. चाकू, सूरी किंवा काहीही dangerous वस्तू (लायटर, हातोडी, cleaning supplies, detergents, औषधं इ) कधीच तिच्या हाताला लागणार नाही असं ठेवलेलं. बाहेर जाताना नेहमी तिचं बोट धरून ठेवलं. एक क्षण जरी हात सुटला तर ती पार्किंग लॉट मध्ये, रस्त्यावर सुसाट धावायची. कुठेही उंच ठिकाणी(बालकनी, terrace, हिल) तिला कायम कडेवर घेऊन असायचे. ते पण कडेपासून लांब, कारण ती कधी एक्दम झेप घेईल काही भरवसा नव्ह्ता. मॉल किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये, गर्दीच्या ठिकाणी शक्य होईल तितकं स्ट्रॉलरमध्ये ठेवायचो.
ती ८-९ महिन्यांची असेपर्यंत आई-बाबा किंवा सासू-सासरे होते. पण तिला पाय फुटले तेव्हापासून मी, नवरा आणि पिल्लूच होतो. नवरा सकाळी ८ ला जायचा ते संध्याकाळी ६;३० ला यायचा. मी वर्क फ्रॉम होम करायचे. nanny ठेवून पहिली, पण काही जमलं नाही. मग मी आणि माझी पोरगी. मी माझा लॅपटॉप उंच टेबलवर ठेऊन दिवसभर उभ्याने काम करायचे. मध्ये मध्ये तिच्याशी खेळायचे. तिला पुस्तकं, चित्र काढायला द्यायचे. तिचं जेवण, दूध असं सगळं करायचे. तीचं जेवण झालं की मग १ नंतर मी फ्री व्हायचे. ती जेऊन मस्त ३ तास झोपायची. मग माझ्या पायांना जरा आराम मिळायचा. ती सव्वा वर्षाची झाल्यावर तिला जवळच्या एका daycare मध्ये आठवड्यातून २ दिवस पाठवायचो ३-४ तास. तिला खेळता यावं म्हणून. बाकी दिवसभर ती आणि मी. नवरा आल्यावर तिच्याशी खेळायचा, तिला बघायचा तेव्हड्या वेळात मी माझी अंघोळ, रात्रीचं जेवण असं सगळं करायचे. नंतर काही महिन्यांनी एक हेल्प मिळाली म्हणून माझं स्वयंपाक आणि घरातलं काम कमी झालं.
ती तीनची झाल्यावर डे केयर मध्ये ९-३ जायला लागली. २ वर्षं गेली आणि कोविडकाळ सुरु झाला. मग परत वर्षंभर घरी. आता तर ९-३ शाळेतच जाते.
माझी मुलगी (८ वर्ष) आजपण खूप मस्ती करते, रोज काही ना काही तोडफोड, सांड-लवंड करतच असते. आजपण आमच्याच जवळ झोपते. त्यामुळे झोपेत लाथा मारते. खूप प्रश्न विचारते. भंडावून सोडते. तरीही मुलीला मी मारत नाही.
time-out हा प्रकार काही आम्हाला जमला नाहीये. ती लहान असताना तिला एकदा time-out दिलं. भिंतीकडे तोंड करून बसून रहा, असं सांगितलं. तिला वाटलं हा काही नवीन खेळच आहे. ती खुदुखुदू हसायची. मग स्वतःच time-out करायची नाहीतर आम्हाला करायला लावायची. त्यामुळे हा शिक्षेचा प्रकार काही आम्हाला झेपला नाही.
बाकी मुलांना कोंडून ठेवणे, त्यांच्याशी खूप काळ अबोला धरणे हे मलाच अमानुष वाटत. असं कधी माझ्या आई बाबांनी पण नाही केलं.
ग्राउंड करीन तुला म्हणजे screen time बंद करीन अशी धमकी देऊन पहिली इतक्यातच तिला. त्याची जर्रा भीती आहे. कारण त्यात iPad, स्क्रीन time नाही मिळणार, हे जास्त क्लेशकारक आहे तिच्यासाठी.
बाकी कुठलीही गोष्ट लपून करायची नाही, हे तिच्यावर बिंबवलंय. मुळात कुठली गोष्ट का नाही करायची, हे मुलांना न समजावता नुसतं मारून काही उपयोग नाही. तू हे कर/नको करू नाहीतर मी मारीन, हे चुकीचं आहे.
कधी कधी खूप सांगून, समजावून पण नाही कळत आहे, असं वाटलं तर फारशी रिस्क नसेल तर तिला म्हणतो 'जा कर'. उदा. खूप चॉकलेट्स खाणं. खूप चोकोलेट्स, बिस्कीट खायचे असायचे तिला लहानपणी. ३ वर्षांची असताना. एकदा नवरा म्हणाला खा तुला पाहिजे तितके. ७-८ चोकोलेट्स खाल्ले तिनी. मग उलट्या झाल्या. तेव्हापासून तो हट्ट सोडून दिला तिनी. आजपण तिला १० चॉकलेट्स दिले कोणी तरीही ती १-२ च खाते. कुठलीच वस्तू कितीही आवडीची असली तरीही प्रमाणातच खाते. मी आता तिला सांगितलंय की काय किती खायचं, हे तू ठरव, तू मोठी झालीयेस.
काही गोष्टी आम्ही सोडून दिल्या. उदा. अगदी लहान असताना भिंतीवर रंगवायची. सोफा, टेबलवर खूप उड्या मारायची. आमच्या dining chairs अगदी खिळखिळ्या करून टाकल्या होत्या तिने. उड्या मारून मारून. घरभर पसारा असायचा तिच्या खेळण्यांचा. पण ते ३-४ वर्षंच होतं. ५ वर्षांची झाली आणि असं करणं बंद केलं तिने आपणहूनच. आम्ही पण सगळं furniture नवं घेतलं. पण त्या काळात आमच्या घरी येणाऱ्याला वाटत असेलच की काय घर आहे हे, कसं तुटकं सामान आहे यांचं. पण ठीके.
इतकं सगळं सांगण्याचा हेतू हा आहे की मारणं हा पर्यायच नाहीये, असं जर ठरवलं तर अमलात आणणं कठीण नाहीये. आम्ही काहीही हेल्प (स्वयंपाक, घरकामाची बाई, आया, घरातले मोठे इ) नसताना दोघंही full-time जॉब करत असताना न मारता एका चुलबूल पांडेला वाढवलंय तर ते अशक्य नाहीच्चे.
तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं
तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक आहे. खूप विचार करून योग्य ती पावले उचलली आहेत.
पण इथे हे ही नमूद करू इच्छितो की प्रत्येक घर वेगळं असतं, त्यातली मुलं आणि पालक वेगळे, त्यांची आर्थिक परिस्थिती वेगळी. उदा. प्रत्येकांना बेबी प्रुफिंग शक्य नाही. छोटी घरं, भरपूर सामान, घरात अनेक माणसं आणि त्यांच्या अनेक वस्तू ही भारतातल्या अनेक घरांची वस्तुस्थिती आहे. सगळ्याच गोष्टी वरती ठेवणं, त्यांना आवरण करणं इतकी जागाच नसते. त्या कारणामुळे मारावं असं मी म्हणत नाहीये. पण त्यावर उपाय म्हणून तुम्ही बेबी प्रूफिंग सांगत आहात, तर तो उपाय सर्वांनाच शक्य नाही हा मुद्दा आहे.
आता इच्छा तेथे मार्ग, तुम्हाला मारायचं नसेल तर तुम्ही त्यासाठी योग्य ते मार्ग शोधालच... वगैरे वगैरे मान्य आहे. पण मारणं हे चूकच आहे हे पटल्याशिवाय ते होणार नाही. आणि त्यात मारणं हे चूक आणि ओरडणं चूक नाही, टाईम आउट चूक नाही - ते का? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कधीतरी द्याव्या लागणाऱ्या माराचं समर्थन करणारे अबोला धरणे वगैरे गोष्टी जास्त क्रूर आहेत असं म्हणतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांची संगोपनाची पद्धत क्रूर नाही.
छान झाले वेगळा सर्वसमावेशक
छान झाले वेगळा सर्वसमावेशक संगोपनाचा धागा काढला.
हपा म्हणतात तसे तुमच्या प्रयत्नांचे कौतुक आहे.
ते चूक की बरोबर, योग्य की अयोग्य वा किती परीणामकारक ही नंतरची गोष्ट, मुळात पालक म्हणून आपण जागरूक असणे गरजेचे. तसेच विचारांनीही फ्लेक्सिबल राहणे महत्वाचे.
मात्र न मारता संगोपन हे शीर्षक काही पटले नाही. यात मारण्याला उगाचच एक निगेटीव्ह शेड आली आहे.
त्या धाग्यावर मारण्याला पर्याय म्हणून टाईम आऊट असाही एक प्रकार लोकांनी सुचवला होता. मला तो मारण्यापेक्षा मनावर जास्त आघात करणारा वाटला. आणि येस, गूगल केले तर तसे रिसर्चही सापडले. तर मग टाईम आऊट न करता संगोपन असे शीर्षक देऊन आणखी एक स्वतंत्र धागा काढावा का?
सांगायचा मुद्दा हा की लहान मुलांचे संगोपन करायची प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते. याची त्याला सूट होईलच असे नाही. किंवा याची चूक त्याची बरोबर असेही काही नसते. यात मुलांचा कमीत कमी मानसिक वा शारीरीक छळ होत, वा मुले कमीत कमी बिघडता प्रत्येक जण आपल्या परीने काय करतो हे जाणून घ्यायला आवडेल.
कोणाचीही मेथड जज न करता प्रत्येकाने आपल्याला काय रुचते वा आपण काय युक्ती केली ते सांगावे.
उदाहरणार्थ, जसे धाग्यात तुम्ही एक युक्ती सांगितली. खा तुला हवी तितकी चॉकलेट. मग उलटी झाली. हौस फिटली. पण नसती झाली तर प्लान बी वापरावा लागला असता. आणि उलटी झाली यात मुलाला शारीरीक त्रास होऊ दिलात तुम्ही. म्हणजे हे मारासारखेच झाले. बरे हा ऊपाय चॉकलेट खाण्याला वापरू शकतो, पण मुलगा लिफ्टकडे पळत असेल, हात सोडून रस्त्यावर पळत असेल, तर तिथे नाही म्हणू शकत की जा धडक गाडीला वा अडक एकदा लिफ्टमध्ये. म्हणजे फिटेल तुझी हौस.
किंवा सोफ्यावर मुले उड्या मारतात म्हणून त्यांना ओरडण्यापेक्षा ते अलाऊडच करावे. तुटू दे जरा फर्निचर काय हरकत आहे. स्तुत्य विचार आहे. पण असा विचार करतानाच मुलांना मग वस्तूची किंमत राहणार नाही ही भिती असतेच. मग हा साईड ईफेक्ट कसा टाळावा याचाही विचार करणे भाग आहे. (बाई दवे, याला सेम पिंच. गेल्या आठवड्यात आमचाही सोफा तुटला, परवाच रिपेअर केला)
पण थोडक्यात सांगायचा मुद्दा काय, तर कुठलाही उपाय फुलप्रूफ शक्य नाही. तो शोधत राहणे हेच पालक म्हणून आपले कर्तव्य आहे. किंबहुना प्रत्येक उपायासोबत जे साईडईफेक्ट येतात ते जाणून घेऊन, मान्य करून, त्यावर मग काय करता येईल याची चर्चा व्हावी.
त्या धाग्यावर मी तेच म्हटले, की माराचे साईड ईफेक्ट वा त्यातले धोके ते पालक समजून असतील, ते मान्यही करत असतील. आणि त्यावर ऊपाययोजनाही करत असतील. जसे की मार नेमका कधी व कुठे द्यावा, वा नुसतीच माराची भितीच दाखवावी, तसेच मारल्यावर लगेच जवळ घेऊन मुलाला आधार द्यावा.. वगैरे वगैरे...
पण माराला पर्याय म्हणून जे ईतर उपाय आपण बघतो त्यातले साईड ईफेक्ट लोकं मान्य करणे अवघड आहे. कारण ते स्मार्ट उपाय आहेत हे आपण ठरवूनच टाकलेय. हे मला जास्त धोकादायक वाटते. अश्याने सर्वांगीण चर्चा अवघड आहे.
आणि हो. मुळात मारणे हा काही सोपा उपाय नसतो. किंवा ईतर ऊपाय शोधायचा कंटाळा म्हणून वापरलेला उपाय नसतो. तर हा देखील हुशारीने वापरलेला टेस्टेड ऊपाय असू शकतो .. कसा ते सविस्तर उद्या परवा.. तुर्तास ईथे पहाट होत आल्याने शुभरात्री
मारणे हा क दा पि उपाय असू शकत
मारणे हा क दा पि उपाय असू शकत नाही. पिरियड. त्यात चर्चा करण्यासारखं काही नाही. म्हणजे मला ते १०० टक्के जमतं का? तर नाही, पण कधी जमलं नाही तर आयेम नॉट प्राउड.
हपा, बेबी प्रुफिंग प्रत्येकाला शक्य नाही हे समजू शकतो. पण आधीच्या चर्चेत सुरी घेतली म्हणून कोणीतरी infant ला मारलं आणि ते किती बरोबर होतं यावर लोकांचं एकमत झालं तो मुद्दा खोडायला वर ते आलं असावं असं मला वाटलं.
रुंमेश एकेक मुद्दा वेगळा करून त्याचा चोथा आणि चर्चेचा विचका करणार हे वरती दिसल्याने त्याच्या तोंडाला लागणार नाही.
जामोप्या यांच्याबद्दल
जामोप्या यांच्याबद्दल दु:खद बातमी समजल्याने चक्कर मारली. या विषयावर आधी काय झाले आहे माहिती नाही. पण खूप आधीही टोकाची मतं येत राहिली आहेत. काही विषय, चर्चा या अनिर्णित सामन्यासारख्या असतात. वाचावे, आपल्याला त्यातले पटेल ते घ्यावे, अंमलात आणावे आणि बाकीचे सोडून द्यावे.
धागा थोडासा आत्मकेंद्री वाटला
धागा थोडासा आत्मकेंद्री वाटला. मी केलय तर तुम्हाला काय जड होणारेय असा..
गै.न. लिहिलेय खरच चांगले, तुम्ही सुंदर मॅनेज केलेयत त्याचेही खूप कौतूक!
सर्व च आयांना वर्क फ्रॉम होम मिळत नसते, सर्वांनाच फर्निचर पुन्हा बनऊन घेणे जमेल च असे नाही. एखाद वेळेस प्रूफींग नाही जमले तर त्याचा आयुष्यभर पस्तावा राहिल असा पर्याय निवडण्या पेक्षा मी १ धपाटा "च" घालणे प्रीफर करेन. सॉरी.
प्रतिसाद अगदीच पटलेत. हपा, ॠ +१
अमित, मारणे हा उपाय का असू
अमित, मारणे हा उपाय का असू शकत नाही ते नाही कळलं. मार दिल्यामुळे मूल काहीतरी धोकादायक वागण्यापासून मागे सरलं ... तेव्हा जरी भीतीपोटी ते मागे सरलं, तरी थोड्या वयात आल्यावर ति/त्याला तो मार का होता हे कळलं. त्या वयानंतर मार देणं उचित नाही हे ही बहुमान्यच आहे. मग धोकादायक वागण्यापासून वाचवणे हा उद्देश तर सफल झालाच ना? मग तो ही एक उपाय आहे. समजावून सांगणे हा दुसरा उपाय आहेच, पण प्रत्येकी/काची कन्व्हिन्सिंग पावर कशी आहे आप्ल्याला काय माहीत? जि/ज्याला जो उपाय जास्त इफेक्टीव वाटतो तो ती/ते वापरण्यात काय प्राब्लेम आहे? फक्त त्यामागे एम काय आहे ह्याची क्लॅरिटी हवी. एमापेक्षा (वॉटसन बाई नाही, एम - त्यापेक्षा) उपाय भयंकर असं व्हायला नको एवढं पाळलंनीत म्हणजे झालं.
यात उल्लेखलेला धागा वाचला
यात उल्लेखलेला धागा वाचला नाही, वाचणारही नाही. अंदाज आहे काय मखलाशी करून स्वत:ला सिद्ध केलं असेल. असो.
हा धागा वाचला, प्रथम खूप कौतुक. कोणतही मूल वाढवताना प्रचंड पेशन्स लागतो. एक गोष्ट शिकवायला दहावेळा सांगावं लागतं अन तरीही दर वेळी मूल नीट वागेल याची खात्री नसते. मोठी माणसं तरी कुठे धड वागतात ; ) समजून उमजून चुका करतातच की
मीही न मारता, न रागावता, न टाईमआऊट देता मुलांना वाढवावं या विचारांची. बऱ्याचदा जमलं, कधीकधी पेशन्स संपला तेव्हा रागावणं अन स्वत: काही काळ परिस्थितीतून बाजुला होणं केलं. त्यातून काही क्षणांपुरतं मुलाला टाईमआऊट सारखं दु:ख झालं असू शकतं. पण मी आई असले तरी माणूसच आहे सो तितका (1-2मिनिटांचा) टाईमआऊटचा त्रास लेकाला होऊ दिला. अर्थातच लगेच जवळ घेऊन समजावणंही केलच. ते त्याला त्या त्या वयात किती कळलं माहित नाही पण स्पर्शातून आई आपली अन आपण आईचे हे नक्की पोहोचलं.
अगदी क्वचित, मला आठवतय त्यानुसार दोनदा फटकाही दिला गेला. पण यात माझा पेशन्स कमी पडला अन आजुबाजूची व्यवधानं हीच कारणं.
बाकी कॅडबरीचा आमचाही एक किस्सा. ऑफिसमधून आल्यावर रोज चक्कर मारायची. माझी भाजी-सामान आणणं होई, लेकासोबत गप्पा होत. अन तिथे तेव्हा 5रुपयाची एक छोटी कॅडबरी मिळे ती घेऊन घरी. रोज एक छोटी कॅडबरी ही प्रथा जवळ जवळ 3-4 महिने चालू होती. अर्थातच कॅडबरी संपली की ब्रश मस्ट हा नियम होता.
हळूहळू त्याची कॅडबरीची क्रेज संपली. पण आवड राहिली.
सो पटत असेल अन थोडा प्रयत्न करायची तयारी असेल तर माराशिवाय, टाईमआऊट शिवाय मुलांना वाढवणं शक्य असतं. अर्थातच प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक पालक वेगळा अन प्रत्येक परिस्थिती वेगळी. सो आय अॅग्री टू डिसअॅग्री हे आहेच.
मूल वाढवताना आपल्या इतर जबाबदाऱ्या, इतर फ्रस्ट्रेशन, इतर रागलोभ हे मात्र जरूर बाजूला ठेवायला हवेतच. मग तुमचं तत्व जे असेल तसं वाढवा. फक्त मुलाची कृती अन त्यावर तुमची प्रतिक्रिया यात समन्वय असावा, म्हणजे मुलांचा मानसिक गोंधळ होत नाही. एखादी गोष्ट केलेली आईबाबाला आवडते की नाही आवडत याचे स्पष्ट उत्तर मुलाला माहिती व्हायला हवे. कितीही लहान मूल असले तरी भाषा कळो न कळो सूर अन आपले हावभाव यातून जरूर तो संदेश मुलापर्यंत पोहोचतोच.
धाग्यापेक्षा मोठी पोस्ट होऊ लागली सो इथेच थांबते.
शेवटचं, कोणाचीही मूल्यात्मक तपासणी करण्याचा उद्देश्य नाही.
ऋ च्या संपूर्ण पोस्ट ला
ऋ च्या संपूर्ण पोस्ट ला अनुमोदन.. चॉकलेट खा मग उलटी हा पर्याय वाचल्यावर मलाही exactly तेच वाटलं जे रुन्मेष ने वर लिहिलंय,
>>मी आधीच सांगितलंय की माझी
>>मी आधीच सांगितलंय की माझी मुलगी एक्दम खतरों के खिलाडी होती, अजूनही आहे. पण ती रांगायला लागली तेव्हा आम्ही पूर्ण घराचं babyproofing केलं. यात काय काय येतं? किचन आणि जिन्याला सेफ्टी गेट्स, सगळ्या सॉकेट्सला कव्हर्स, प्रत्येक कपाटाला आणि फ्रिजला चाईल्ड लॉक. गॅसच्या नॉब्सला चाईल्ड locks. देवघर , टीव्ही, स्पीकर्स वर टांगलं. चपला- जोडे, कचरा सगळ्यांना चाईल्ड लॉक. चाकू, सूरी किंवा काहीही dangerous वस्तू (लायटर, हातोडी, cleaning supplies, detergents, औषधं इ) कधीच तिच्या हाताला लागणार नाही असं ठेवलेलं. बाहेर जाताना नेहमी तिचं बोट धरून ठेवलं. एक क्षण जरी हात सुटला तर ती पार्किंग लॉट मध्ये, रस्त्यावर सुसाट धावायची. कुठेही उंच ठिकाणी(बालकनी, terrace, हिल) तिला कायम कडेवर घेऊन असायचे. ते पण कडेपासून लांब, कारण ती कधी एक्दम झेप घेईल काही भरवसा नव्ह्ता. मॉल किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये, गर्दीच्या ठिकाणी शक्य होईल तितकं स्ट्रॉलरमध्ये ठेवायचो.
ती ८-९ महिन्यांची असेपर्यंत आई-बाबा किंवा सासू-सासरे होते. पण तिला पाय फुटले तेव्हापासून मी, नवरा आणि पिल्लूच होतो. नवरा सकाळी ८ ला जायचा ते संध्याकाळी ६;३० ला यायचा. मी वर्क फ्रॉम होम करायचे. nanny ठेवून पहिली, पण काही जमलं नाही. मग मी आणि माझी पोरगी. मी माझा लॅपटॉप उंच टेबलवर ठेऊन दिवसभर उभ्याने काम करायचे. मध्ये मध्ये तिच्याशी खेळायचे. तिला पुस्तकं, चित्र काढायला द्यायचे. तिचं जेवण, दूध असं सगळं करायचे. तीचं जेवण झालं की मग १ नंतर मी फ्री व्हायचे. ती जेऊन मस्त ३ तास झोपायची. मग माझ्या पायांना जरा आराम मिळायचा. ती सव्वा वर्षाची झाल्यावर तिला जवळच्या एका daycare मध्ये आठवड्यातून २ दिवस पाठवायचो ३-४ तास. तिला खेळता यावं म्हणून. बाकी दिवसभर ती आणि मी. नवरा आल्यावर तिच्याशी खेळायचा, तिला बघायचा तेव्हड्या वेळात मी माझी अंघोळ, रात्रीचं जेवण असं सगळं करायचे. नंतर काही महिन्यांनी एक हेल्प मिळाली म्हणून माझं स्वयंपाक आणि घरातलं काम कमी झालं.>>>
यात नवेीन काहेीहेी नाही. सर्व मुले अशीच असतात फक्त अगदी ५% परक असतो.
मुलांना शक्यतो मारू नये...... शेवटी पालक देखील माणसेच आहेत..... मारणे चुकीचे आहे पण टाळता येईलच का? अनुत्तरित---- कारण स्वतः चा भावनिक अगतिक पणा
अमितव शी सहमत! मला ह्यात
अमितव शी सहमत! मला ह्यात चर्चेचा मुद्दाच दिसत नाही. कुणीही एका व्यक्तीनं, स्वतःच्या फिजिकल ताकदीच्या डिफरन्सच्या जोरावर दुसर्या व्यक्तीच्या अंगाला हात लावणं ह्याला काहीच जस्टिफिकेशन नाहीये. आणी हो, हे केवळ शारिरीक बळावरच केलं जातं. साठीतल्या बापानं तिशीतल्या मुलाला मारल्याची उदाहरणं विरळा.
@ टाईम आऊट बद्दल काही
@ टाईम आऊट बद्दल काही एक्सपर्ट ओपिनिअन दिले आणि तो आधीचा धागा थांबलाच ..
ईथेही तेच कॉपीपेस्ट केले तर हा धागाही थांबेल का?
Parenting experts have criticized the timeout technique in recent years, saying that it might neglect a child's emotional needs. Most experts agree that punishment is harmful to a child's emotional development and that isolation — the defining quality of the timeout technique — is a form of punishment.
--------
time-outs increase emotional dysregulation, fail to teach children distress tolerance skills, isolate them when they need support, and may re-traumatize children who have experienced abuse.
---
मारणे जसे शारीरीक बळावर केले जाते तसे टाईम आऊट देखील शारीरीक आणि आर्थिक बळावरच केले जाते. समोरचा मुलगा आपल्यावर अवलंबून आहे हे बेसिक यात आलेच नाही का....
यावर सविस्तरही देऊ शकतो, पण दुर्दैवाने हे लोकांना मान्यच करायचे नाहीये..
कमाल आहे. लेखाचा उद्देश व
कमाल आहे. लेखाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट आहे. तरी दुसऱ्या धाग्यावरचे मुद्देच इथे आणणाऱ्या नेहमीच्या यशस्वी सदस्यांना टाइम आउट द्यायची गरज आहे.
भरत, खासियत आहे ती याच मुळे
भरत, खासियत आहे ती याच मुळे माबोवर यावं वाटत नाही . शेवटचं वाक्य पटलच
त्या धाग्यावर शेवटचा प्रतिसाद
त्या धाग्यावर शेवटचा प्रतिसाद टाकून मी गप्प बसले कारण त्यापेक्षा जास्त बोलण्या सारखं काही नाहीच. इथे पण हा एकच प्रतिसाद देतेय.
मुळात प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची परिस्थिती (सगळ्याच प्रकारची) वेगळी असते हे कुणाला मान्यच करायचं नाहीये. सगळे आईबाप आपल्या मुलांचं चांगल संगोपन करता यावे म्हणून झटत असतात. सगळ्यांना आपल्या मुलांची काळजी असते. प्रत्येकाला जे आणि जसं जमेल ते आणि तसं मुलांसाठी ते करतात. यात माझंच बरोबर, तुमचंच चूक असं काहीच नसतं. इथं कुणीच कुणाच्या मुलांना पोसायला बसलेलं नाही त्यामुळे कुणीच कुणाला 'जज' करायची गरज नाही.
धागाकर्तीने मुलीला मनसोक्त चॉकलेटस् खायला दिले ते तिला उलटी व्हावी म्हणून नाही तर एकदाचा तिचा तिलाच उबग यावा आणि तिने चॉकलेटस् खाणं कमी करावं म्हणून. हेतू किंवा कृती चूकीची नव्हती, उलटी वॉज् अ बायप्रॉडक्ट. त्यानंतर हेतू साध्य झालाच की.
इथे मुद्दाम नाव घेऊन लिहितेय. स्वत:चा गैरसमज (??) कायम ठेवून इतरांचा गैरसमज करून देण्याच्या अमितव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आता कीव येतेय. एक आई कशी आपल्या २ वर्षांच्या "infant" ला मारहाण करते हे अधोरेखित करायचं आहे त्यांना, at any cost. करा.
इथले धागे हे सगळ्यांनी आपले अनुभव मांडावेत म्हणून असतात असं वाटायचं मला. न मारणार्यांनी लिहावं की इथे ते काय काय उपाय करतात ते. सगळ्यांनाच उपयोग होईल की त्याचा.
बाकी सगळं कुशल मंगल.
तो धागाही वाचत होते. सगळी
तो धागाही वाचत होते. सगळी चर्चा वाचून वाचून तळ्यात मळ्यात अशी अवस्था झाली माझी. कारण माझ्या ६ वर्षांच्या मुलीला आधी फक्त समजावून सांगणे, पण नाहीच समजलं तर आवाज वाढवणे, आणि नाही ऐकलं तर फटका देणे अशी माझी पद्धत आहे.
यात पहिल्या दोन टप्प्यात, ती माझ्यावर आवाज चढवून किंचाळणे, विषय सोडून बडबडणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे, मला बोलूनच न देणे, मलाच मारणे, लाथ मारणे हे प्रकार करते. या सगळ्यात साधारणपणे अर्धा तास जातो. शेवटचा उपाय म्हणून एक फटका दिला, की रडायला सुरुवात होते. मग लगेच जवळ घेऊन तिला समजावलं की मी मगापासून तिला काय सांगत होते, ते लगेच समजतं. तिची बाजू ती मला सांगते. नक्की कुठे चुकलं ते मी सांगते. पुढच्या वेळी काय वेगळं करता येऊ शकतं, ते समजावते तिला. मग तिला मारल्याबद्दल मी सॉरीसुद्धा म्हणते आणि आधीच ऐकलं असतंस, तर पटकन आटपलं असतं, तुझा खेळण्याचा वेळ वाचला असता, तुला त्रास झाला नसता हेही सांगते. पण पुढच्या वेळी पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी.
अर्थात, प्रत्येक वेळी माझ्याकडे एवढा निवांत वेळ नसतो. विशेषतः, सकाळी आवरून घरातून निघताना. आणि तिची उठून चिडचिड करत राहण्याची तिच वेळ असते. अशा वेळी, एक फटका देऊन दहा - पंधरा मिनिटात पुढचा कार्यक्रम उरकतो. आता अशावेळी न मारता परिस्थिती कशी हाताळावी, असा प्रश्न नेहमी पडतो. यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
फटके देण्याची वेळ येण्याची कारणे --१. एखादी वस्तू आत्ता हवी म्हणजे हवीच, मग ते त्याक्षणी खरंच शक्य नसलं तरी ते समजत नाही. २.आमच्या कामाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टी विचारता खेळायला घेणे ( पूर्वी गोष्टी उंचावर ठेवणे, लपवणे हा पर्याय होता. पण उंची वाढली, स्टूलचा वापर करायची बुद्धी आली . प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस लपवून ठेवणे शक्य नसतं, शिवाय आपणही दरवेळी निवांत नसतो. अचानक दुसरं काम आलं की वस्तू बाहेर राहू शकते. ) ३.खाऊचा हट्ट. जेवणाच्या वेळी खाऊ मागणे, आजारी असताना अपथ्यकर गोष्टी मागणे, उदाहरणार्थ सर्दी झाल्यावर दही. कारण तिला खूप आवडतं.
४. आजी आजोबांचं न ऐकणं, त्यांना ओरडणं, मारणं,.... हे खूप जास्त त्रासदायक आहे. एकतर, मी किंवा तिचे पप्पा ती समोर नसतानाही अशा प्रकारे त्यांच्याशी वागत नाही. त्यांची एखादी गोष्ट पटत नसली तरी, लेकीसमोर तशी चर्चा करत नाही. मग ही अशी वागायला लागली माझी दोन्ही बाजूंनी कोंडी होते. म्हणजे मी तिला काही शिकवते की काय, असा त्यांचा गैरसमज होत असेल, अशी भीती वाटते. आणि तिला फक्त ओरडून शांत नाही करता येत लगेच. बरं, आम्ही घरी नसलो की आजीशी अगदी गट्टी असते. त्यामुळे तिच्या वयाप्रमाणे तिला समज येत जाईल, हेही कळतं. पण त्याक्षणी तिला अडवलं नाही तर सासू- सासरे दुखावतील, असं वाटतं. शिवाय कधी इतर नातेवाईक असताना हा प्रकार झाला तर ते फार विचित्र दिसतं. याची कारणं आणि उपाय या दोन्हींच्या शोधात आहे मी.
५. काहीच विशेष कारण नसताना, रडणे किंवा चिडचिड करणे. शाळेत जायची इच्छा नसणे.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2022 - 19:23 >>>>> ऋन्मेष च्या पोस्टशी सहमत
नवीन Submitted by हरचंद पालव on 28 September, 2022 - 18:15
ह पा च्या पोस्टशी सहमत
Submitted by माऊमैया on 29
Submitted by माऊमैया on 29 September, 2022 - 03:04 >>>>समदुःखी म्हणून तुमची पोस्ट पटली आणि सहमत .
माऊमैय्या मी पण समदुःखी.
हा धागा न मारता संगोपन कसं
हा धागा न मारता संगोपन कसं करायचं यासाठी काढला गेलेला दिसतो- मुलांना फटका मारणं कसं गरजेचं किंवा योग्य आहे त्याची चर्चा इथे टाळूया का? त्यापेक्षा न मारता काय करता येईल याविषयी चर्चा झाली तर अनेकांना मदत होऊ शकेल
फटका देणे ही योग्य शिक्षा मानणारे पालक सुद्धा ती हौशीने करतात असं माझं मत नाही त्यामुळे इतर पर्याय मिळाले तर त्यांना सुद्धा आवडतीलच असं मला वाटतं- तर इथे त्या पर्यायांविषयी चर्चा करूया का?
त्यामुळे इतर पर्याय मिळाले तर
त्यामुळे इतर पर्याय मिळाले तर त्यांना सुद्धा आवडतीलच असं मला वाटतं- तर इथे त्या पर्यायांविषयी चर्चा करूया का?)))))))
माझीही तीच अपेक्षा आहे.
त्याच्या तोंडाला लागणार नाही.
त्याच्या तोंडाला लागणार नाही.>> नादाला लागणार नाही अस लिहा अमितव वाचायला बर वाटत..
>> मुळात प्रत्येक घर वेगळं
>> मुळात प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची परिस्थिती (सगळ्याच प्रकारची) वेगळी असते हे कुणाला मान्यच करायचं नाहीये. >> हे तुम्हाला स्वतःला मान्य आहे का? असेल तर पुढे
>> सगळे आईबाप आपल्या मुलांचं चांगल संगोपन करता यावे म्हणून झटत असतात. सगळ्यांना आपल्या मुलांची काळजी असते. प्रत्येकाला जे आणि जसं जमेल ते आणि तसं मुलांसाठी ते करतात. यात माझंच बरोबर, तुमचंच चूक असं काहीच नसतं. इथं कुणीच कुणाच्या मुलांना पोसायला बसलेलं नाही. >> हे कशाला लिहताय?
त्या धाग्यावर Humans of Bombay च्या एक पोस्टची लिंक मी दिलीय. ती वाचली का? Quora ची एक लिंक दिलीय ती वाचली का?
Severe physical, sexual, mental abuse करणारे पालक असतात हे मान्य आहे का? पुढच्यावेळी -'सगळेच' पालक यंव अन त्यंव- लिहण्याआधी थोडा वेळ थांबा आणि या दोन्ही पोस्ट आठवा आणि मग नंतर काय लिहायचं आहे ते लिहा.
माझ्या मुलीला मी अजून एकदाही
माझ्या मुलीला मी अजून एकदाही फटका मारला नाही असं काही नाही मात्र फटका देणं ही अतिशय टोकाची गोष्ट आमच्या घरी आहे- पंधरा वर्षाच्या तिच्या आयुष्यात मी तिला मोजून तीन वेळेला फटका मारलेला आहे या तीनही वेळा तिला आणि मला चांगल्या लक्षात आहेत
अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हा फटका हा लेक ऐकत नाही म्हणून न देता दर वेळेला तिने अमुक केलं तर तिला फटका मिळणार आहे याविषयी चर्चा तिच्याशी आधीच झालेली असताना दिला गेला आहे
तिला मोठी करताना शिस्त लावण्याच्या संबंधात मला उपयोगी पडलेल्या काही गोष्टी म्हणजे
1- मुलांना त्यांचं वय अधिक एक एवढेच नकार एका वेळी लक्षात ठेवता येतात असं मला माझ्या लेकीच्या डॉक्टरने आणि एका सायकॉलॉजिस्ट मैत्रिणीने सांगितलं होतं त्यामुळे माझे नको हे तेवढ्याच मर्यादेत मी ठेवत असे- म्हणजे सुरभि दोन वर्षाची असताना आमचे नको हे ती मला न सांगता घराबाहेर पडू शकत नाही/ मला न सांगता आतून दरवाजाला कडी घालू शकत नाही / गॅस चालू करू शकत नाही एवढेच नको मी तिला ठामपणे सांगितले होते- यापैकी काही केलं तर शिक्षा होणार,
ती नक्की होणार आणि काय होणार याची चर्चा वारंवार तिच्याशी मी करत असे.
3- हे ठराविक नो सोडून तिच्या सुरक्षिततेच्या संबंधात इतर ज्या गोष्टी असत त्या शक्य तितक्या तिच्या हाताबाहेरच ठेवल्या गेल्या यासाठी स्वतःची गैरसोय झाली तरी ते मी पत्करलं - सुरभी चांगली पाच सहा वर्षाची होईपर्यंत मी देवासमोर दिवा लावत नसे. काही कारणाने औक्षण करायची वेळ आली तरी औक्षण करून झाल्यावर फुल टाकून तो दिवा लगेच शांत करत असे कोणीही काहीही म्हणाले तरी कारण दिव्यामुळे आग लागू शकते हे समजणे एवढी ती मोठी नव्हती / घरातल्या सूर्या धारदार वस्तू या मला सुद्धा स्टूलवरून काढाव्या लागतील एवढ्या उंच ठेवल्या होत्या.... मला पाण्याची अतिशय भीती वाटते सुरभि ने लहान असताना एकदा चुकून बादलीत उडी मारली होती - त्यानंतर मी घरात बादलीत पाणी भरून ठेवणं बंद केलं आणि वर सिंटेक्स ची टाकी लावली- सुरभी सात आठ वर्षाची झाल्यानंतर मगच परत बादलीत पाणी भरणे सुरू केलं
4- मुलांमध्ये वयानुसार कुतूहल असतंच आणि त्या कुतूहला पायी अनेकदा ती धोका पत्करतात - हे कुतूहल कमी व्हावं म्हणून तिच्या वयानुरूप गोष्टी मी तिला आपणहून शिकवत गेले आणि त्या केव्हा शिकवणार याचा टाईम टेबल ची चर्चा सुद्धा मी तिच्याशी ती खूप लहान असताना पासून करत असे - म्हणजे तुझी उंची इतकी झाली की मी तुला गॅस लावायला शिकवीन हे आधीच सांगितलेलं होतं/ साधारणपणे पाच वर्षाची झाल्यापासून तिला मी बोथट सुरीने तुकडे करू देत असे- सुरभीची सुरी आणि आई-बाबांची सुरी अशा वेगळ्या सुऱ्या घरात होत्या
5- इतर शिस्त लावणे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आता ती मोठी होते आहे त्याप्रमाणे तिने समंजसपणा आणि मॅच्युरिटी दाखवणे आवश्यक आहे असं तिच्याशी स्पष्टपणे बोलून वागण्याचे निकष ठरवत असे कोणत्याही गोष्टीविषयी जर तिच्याशी आधी बोलणं झालं नसेल तर पहिल्या वेळेला तिला मी शिक्षा करत नसे - शिक्षाही त्याविषयी शांतपणे बोलून झाल्यानंतर मगच पुढच्या वेळेसाठी ठरवण्यात येत असे
6- मात्र काही कारणाने तिच्या वागण्याचे परिणाम किंवा शिक्षा आधी चर्चा करून झाली असेल तर मला ते कितीही अवघड असलं तरी ती शिक्षा मी आवर्जून अमलात आणत असेच - एक उदाहरण सांगायचं तर घरातल्या काही जेना काना लिप्ताळ्यात बाजारात जाऊन आयत्यावेळी हट्ट करायची सवय लागली होती - पुन्हा असा हट्ट केलास तर तू खूप दमली आहेस आणि त्यामुळे तुझी चिडचिड होते असं माझ्या लक्षात येईल आणि मग हातातलं काम सोडून आपण घरी येऊ पण मात्र माझं काम मात्र शिल्लक राहील त्यामुळे संध्याकाळी एकत्र खेळायच्या वेळात तुला घरी ठेवून मी एकटी ते काम करून येईन मग आपल्याला गंमत करायला वेळ मिळणार नाही असं बोलणं तिच्याशी केलं होतं - एक दोनदा तिने डी मार्ट मध्ये थयथय सुरू केल्यावर भरलेली कार्ट तशीच सोडून तिला घेऊन मी घरी आले होते दोनदा असं केल्यानंतर आई सांगितल्याप्रमाणे खरंच करते हा धडा ती शिकली :)))
7- आमच्या शिक्षा यावर सांगितल्याप्रमाणे कार्यकारण भावाला धरून असत मात्र टाईम आऊट ही कल्पना मी शिक्षा म्हणून नाही तर तिला शांत होऊ देण्याचा वेळ म्हणून वापरत असे ती शिक्षा आहे असं चुकूनही तोंडात येऊ दिलं नाही, गंमत म्हणजे अशा वेळेला आम्ही क्रोधागारातला वेळ म्हणत असू .... आणि सुरभि चांगली मोठी होईपर्यंत तिला क्रोधागारात पाठवायचं झालं तर तिच्याबरोबर तिला कुशीत घेऊन मी सुद्धा काहीही न बोलता बसत असे - ही शिक्षा नव्हती हे पुन्हा एकदा नमूद करते- जात्याच सुरभि थोडी तापट आहे त्यामुळे आपला राग कसा शांत करायचा/ कितीही राग आला तरी आदळापट न करता कुणाचं नुकसान न करता त्या रागाला वाट कशी देऊ द्यायची हे मला तिला आवर्जून स्वतंत्रपणे शिकवावं लागलं - क्रोधागारात असताना तिने स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा पोचवायची नाही मात्र घरातल्या लोड आणि उषांवर ती राग काढू शकते असा आमचा तह झालेला होता - आता पंधरा वर्षाची झाल्यावर आमचा वाद झाल्यावर /माझी चिडचिड होत असेल तर कधी कधी सुरभि मला आई तुला क्रोधागारात जायची गरज आहे का ते बघ बरं असं शांतपणे सांगू शकते
8- कितीही घाई असली तरी रोजच्या दिवसात तिच्याबरोबर गप्पांचा वेळ राखीव होता हा वेळ इतर कोणत्याही अपॉइंटमेंट इतकाच कसोशीने मी पाळत असे- त्यासाठी अनेक वेळेला बऱ्याच विषयात ऍडजेस्टमेंट केलेल्या आहेत पण आमच्या दोघींच्याच असलेल्या या वेळात मला अनेक विषयांवर तिच्याशी शांतपणे बोलता येत होतं.
9-ती मुल आहे हे लक्षात ठेवून अपेक्षा मर्यादित होत्या घरात केलेला पसारा कचरा याविषयी कधीच तिला ओरडलं गेलं नाही, अभ्यास स्पर्धा परीक्षा या गोष्टी चं ओझं होऊ न देता हळूहळू तिच्या कलाने ती मोठी होईल तसं वयानुसार तिला कष्ट करण्याची सवय लागेल इतकच पाहिलं अमुक मार्क मिळाले पाहिजेत प्रमुख बक्षीस मिळाले पाहिजे असा दबाव कधीच आणला नाही - मात्र तिचं काम मी स्वतः कधी करणार नाही हे सुद्धा कटाक्षाने पाहिलं - तिचा होमवर्क तिचे प्रोजेक्ट तिने संपवले नाहीत तर शाळेत टीचर समोर तिचीच लाज निघेल हे पहिल्यापासून स्पष्ट करत राहिले आयत्या वेळेला होमवर्क विसरल्यावर काळजावर दगड ठेवून "तू वेळेत होमवर्क केला नाहीस आता मी नोट देणार नाही" असं स्पष्ट सांगितलं
10 - मी स्वतः इतकी वर्ष टीसीएस मध्ये नोकरी करत होते त्यामुळे पूर्णवेळ भरपूर ताण असलेला जॉब सर्वसाधारण घरात असतात तसेच ज्ये ना ) कांना / मोलकरणी यांमधले ताण तणाव माझ्याही घरी साग्रसंगीत होते आणि आहेत - त्यामधूनही मला हव्या त्या गोष्टी हव्या त्याप्रमाणे करता याव्यात आणि सुरभी साठी योग्य तो वेळ देता यावा यासाठी बऱ्याच बाबतीत भरपूर ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या - माझं घर मला हवं तसंच लागेल/ आमच्या घरी स्वयंपाक मीच केलेला लागतो असे मोह सोडून काही गोष्टी बाई वर सोडाव्या लागल्या / काही गोष्टींमध्ये घरातल्या ज्येष्ठ लोकांबरोबर वाईटपणा घेऊन सुद्धा आपल्या मतावर ठाम राहिले... काही बाबतीत ऍडजस्टमेंट केली / आपल्या मतावर ठाम राहण्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी आपल्याला त्यांचा सपोर्ट कमी मिळेल आणि केवळ स्वतःच्याच ताकदीवर गोष्टी अड्जस्ट कराव्या लागतील याची तयारी ठेवली...मात्र माझ्या प्रायोरिटीज काय आहे हे स्वतःच परत परत स्वतःशी तपासत राहिले
स्नेहमयी पोस्ट आवडली.
स्नेहमयी पोस्ट आवडली.
४,८, ९ नंबरचे मुद्दे मीही अवलंबलेत, आधीपासूनच. पसाऱ्याच्या मुद्दयावर सासूबाईंसोबत मतभेद होतात. पण प्रत्येक वेळेस मी ठाम राहू शकते, एवढा कणखरपणा अजून आला नाही.
शेवटचा मुद्दा पटलाय, पण तो अमलात आणण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे.
धाग्याचा उदेश चांगला आहे पण
धाग्याचा उदेश चांगला आहे पण मुलांचे संगोपन हा विषय असला तरी काही लोक "सॉरी, मला मारायला आवडते " " या धाग्यात मारण्याला निगेटिव म्हटलेय " अशासारखे प्रतिसाद देताहेत! धन्य !
सर्वप्रथम एक गोष्ट कायम ध्यानात ठेवणे - आपला मुख्य उद्देश काय आहे? मुलाला शिक्षा करणे हे अल्टिमेट एम आहे का? पालकांना राग काढता येणे हे महत्त्वाचे आहे का? मुलाला थोडा वेळ तरी वाईट वाटणे हा उद्देश आहे का? पालकाचे फ्रस्ट्रेशन कमी होणे हे महत्त्वाचे आहे का? पालकांचा मायबोलीवर वादात मीच जिंकलो हा आनंद महत्त्वाचा आहे का?
उद्देश हा असायला हवा की नेहमी त्या त्या वेळची जी सिचुएशन आहे त्यात चुकिचा आणि बरोबर यापैकी योग्य त्या वागण्याची निवड मुलाने केली पाहिजे आणि त्यातून धडा घेउन पुढच्या वेळी योग्य वागले पाहिजे.
सुरी घेतली , चॉकोलेट चा हट्ट या फारच बेसिक सेफ्टी रिलेटेड गोष्टी आहेत. आणि त्या पालकांना सहज कन्ट्रोल करता येतात. त्या त्या वस्तू हाताला न लागू देणे इतके सोल्यूशन पुरते. मारायचे कशाला? काही मारण्याची अतोनात आवड असलेले लोक टाइम आउट हा एक मुद्दा घेऊन धोपटत सुटलेत ( पन इन्टेन्डेड!) . पण मारायचे नाही याचा अर्थ टाइम आउटच द्यायचाच असे अजिबात नसते!
को ण ती ही सिचुएशन असो न मारता सोडवता ये ते च! मारणे हे पालकांच्या मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे.
माऊमय्या ने लिहिलेली उदाहरणे बघू : ( तुम्ही पर्सनली घेऊ नका प्लीज)
>>>एखादी वस्तू आत्ता हवी म्हणजे हवीच, मग ते त्याक्षणी खरंच शक्य नसलं तरी ते समजत नाही. >>>>>>> वस्तू नाही दिली की झाले! ( तोच उद्देश आहे ना ?) मग शांतपणे तसे सांगायचे, का देत नाहीये तेही सांगायचे . मारायचे कशासाठी ? मारण्याने काय साध्य होते?
>>>खाऊचा हट्ट. जेवणाच्या वेळी खाऊ मागणे, आजारी असताना अपथ्यकर गोष्टी मागणे, >>>>>>>>> उद्देश काय आहे? अयोग्य वस्तू खायला न देणे . तो न त्या वस्तू दिल्यास साध्य होतो. का देत नाही तेही शांतपणे सांगता येते. इथेही मारण्याने काय साध्य होईल ?
आजी आजोबांचं न ऐकणं, त्यांना ओरडणं, मारणं,..इतर नातेवाईक असताना हा प्रकार झाला तर ते फार विचित्र दिसतं. याची कारणं आणि उपाय या दोन्हींच्या शोधात आहे मी. >>>>>>> बिंगो!! हा खरंच हा सूर्य हा जयद्रथ मोमेन्ट!! आपल्याला हवे ते घडले नाही तर दुसर्याला मारणे हाच उपाय आहे हा संदेश मुलाला मिळातोय ! तसा संदेश न जाणे हाच यावर उपाय! आता मुलाने दुसर्यांना मारले तर तुम्ही त्याला नाही दोष देऊ शकत!!
काहीच विशेष कारण नसताना, रडणे किंवा चिडचिड करणे. >>>>पुन्हा एकदा - उद्देश काय आहे? तो मारण्याने कसा साध्य होईल? मुले अटेन्शन सीकिंग किंवा इतर टँट्रम करत असतील तर सरळ दुर्लक्ष हा उपाय असू शकतो.
जनरली- मारणे किंवा शिक्षा
जनरली- मारणे किंवा शिक्षा करणे ही निगेटिव गोष्ट आहे आणि त्याने मुलांचे वागणे सुधारण्याला खरोखर मदत होत नाही. चांगल्या पालकाने पॉझिटिव रिएन्फोर्समेन्ट चे उपाय शोधायला पाहिजेत. म्हणजे असे की चांगल्या कामाचे चांगले परिणाम होतात हे समजणे. ( वाईट गोष्टींचे वाईट परिणाम नव्हे !) वाईट गोष्टी केल्यास चांगल्या गोष्टी मिळत नाहेत पण योग्य वागल्यासच त्या मिळतात हे मुलांना समजणे. उदा. ३ तास अभ्यास/होमवर्क केल्यास १ तास स्क्रीन टाइम मिळेल. (याचा अर्थ तो नाही केल्यास हे रिवार्ड नाही मिळणार.) अशा बर्याच आयडिया असू शकतात. अनेक जणांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मूल वेगळे असते आणि ही रिवार्ड सिस्टीम ही पालकांनी आपल्या मुलाचा कल बघून ठरवायची. पण रिवार्ड फार अवघड असू नये , अचीवेबल पाहिजे नाहीतर ते फ्रस्ट्रेटिंग होते. ( सॉरी खूप इन्ग्रजी शब्द झाले पण भराभर सुचले तसे लिहितेय)
मुले लहान असली तरी त्यांना फेअर / नॉट फेअर हे नीटच समजते ( इथेच कितीतरी लोकांना अनुभव असेल मुले बरोब्बर अवघड प्रश्न विचारून अडचणीत टाकतात ते जसे "आई तू मला खोटे बोलायचे नाही असे म्हणलीस पण आता तू कसे खोटे बोललीस? इ. ) आणि ती फेअर ट्रीटमेन्ट ला नेहमी चांगली रिस्पाँड करतात. आपला मेंदू पॅटर्न ओळखतो . अमूक केले असता अमूक रिवार्ड मिळते हे सर्वात इफेक्टिव बिहेव्यर मॉडीफिकेशन आहे.
इथे अजून एक डिस्क्लेमर - मी स्वतः लहानपणी मार खाल्ला आहे, आणि आम्ही पालक म्हणून लहान असताना धपाटे घातलेत सुरुवातीला, पण नंतर पॉझिटिव डीसिप्लीन या पुस्तकाशी ओळख झाली , मग मुलाच्या शाळेत वॉलन्टियर म्हणून काम करताना याबद्दल वाचले, पाहिले, ऐकले. कोणतीही एक्सपर्ट वगैरे असण्याचा क्लेम नाही. ओपन माइंड ठेवून ऐकले वाचले, आणि तेच अमलात आणले, आणण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल कारण माझी मुले सर्वार्थाने आदर्श आहेत असे काही नाही. असे प्रसंग येतातच की काहीही केले तरी वागणे सुधारत नाही एखाद्या बाबतीत. काय करावे सुचत नाही , पण यावर उपाय मारणे/ हिंसा हा नाही. प्रयत्न सुरु ठेवणे हाच एक उपाय, हे डोक्यात पक्के असते. .
अस अमुक एक करून परेण्टीग लै
अस अमुक एक करून परेण्टीग लै भारी वगैरे नसते.
काही पोरांना बदडून काढावे लागते..
८० च्या दशकात जन्मलेल्या लोकांना अनुभव असेल..
आणि एखदा फटका म्हण्जे फार मोठी शिक्षा नसते.
जसा गुन्हा मोठा तशी शिक्षा मोठी हवी
हपा, धोकादायक गोष्ट
हपा, धोकादायक गोष्ट टाळण्यासाठी मार आहे का? म्हणजे 'जीवावर बेतलं आहे आणि त्याक्षणी मार दिल्याने जीव वाचणार आहे म्हणून हात उगारला आहे'. अशी परिस्थिती असेल तर त्यात काहीही दुमत नाही. जीव सगळ्यात महत्त्वाचा. पण एकदा जीव वाचला की त्या परिस्थितीचं, मुलाच्या कृतीचं, आपल्या कृतीचं अवलोकन करुन मूल्यमापन करुन पुढच्यावेळी ती वेळ येऊच नये म्हणून उपाय करणे आणि आलीच तर त्यातून कसे बाहेर पडायचे हे स्वतःच्या आणि अपत्यांच्या मनावर सतत बिंबवत रहाणे हाच फक्त उपाय पाहिजे. ना की मी मारलं म्हणून जीव वाचला याची शेखी मिरवणे.
माझा सगळ्यात मोठा आक्षेप माराला नसून त्या माराचं अनअपोलोजेटिक समर्थन करण्याला आहे.
आणखी एक, वरचं वाचुन केवळ धोकादायक गोष्टी टाळायला मार दिला जात नसावा तर क्रोधनियंत्रण (आपलं, मुलांचं नाही ) म्हणून दिला जात असावा अशी दाट शंका आहे.
मुल ओरडलं, किंचाळलं किंवा ते जे काय टँट्रम करत असेल ते केले तर function at() { [native code] }यंत (हम तुम्हारे साथ है हपा! ) शांत आवाजात त्यांना आपल्याला जे करातचं आहे ते स्पष्ट सांगत राहिलं की परिस्थिती निवळते हा अनुभवाचा धडा आहे. त्यांच्या टँट्रम्सच्या आगीत आपण पण टँट्र्म्स करुन तूप टाकलं की आपला आणि त्यांचा भडकाच उडतो. आगीवर आपल्या शांत आवाजाचं, किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याकडे त्याक्षणी दुर्लक्ष (अगेन काय चुक आहे आणि दुर्लक्ष म्हणजे मुभा नाही होणार हे जाणवणं शक्य असेल तर ) करणे याचं पाणी टाकलं तर आग लवकर विझते. आणि रिएनफोर्स होत रहातं की टँट्रम्स वर्क होत नाहीत.
बाकी टाईम आउट म्हणजे काय ते
बाकी टाईम आउट म्हणजे काय ते अनेकांना समजलेलं नाही असं वाटलं. पण तो बॉल परत परत टाकुनही सध्यातरी तो खेळणार नाही कारण त्यावर काय फाटे फुटतील याची कल्पना आहे.
शेवटी काय ठरलंय
शेवटी काय ठरलंय
मारायचं मुलांना का नाही?
Pages