काळे घेवडे
फोडणीचं साहित्य, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण
माझ्या पणजेसासूबाई वाई, महाबळेश्वर भागातल्या.
त्या काळे पोलीस करायच्या. तिथं काळ्या घेवड्याला पोलीस म्हणतात. म्हणजे आज काय केलंय?
तर बाबा "पोलीस केलेत"...
विचित्र वाटतं ना?
मला नाही वाटत..... सवयीमुळे.
तर...ही उसळ त्यांनी फोडणीस घातली की असा सुगंध दरवळायचा की क्या कहने....पदार्थाला चव आणण्यासाठी आलं लसूण पेस्ट, धने जिरे आमचूर पावडर, कांदा टाॅमॅटो चं वाटण लागतंच ही अंधश्रद्धा आहे हे एक चमचाभर उसळ खाल्ली की लक्षात येई.
तर...
काळे घेवडे रात्री गार पाण्यात भिजवायचे.
सकाळी कुकरला अगदी मऊ मेणासारखे शिजवायचे. पालथ्या डावानं जरा चेचायचे आणि मग घोटायचे. थोडे आख्खे, थोडे ठेचलेले म्हणजे उसळ मिळून येते. झालं...मोठ्ठं काम झालं.
कढीपत्त्याची पानं हातावर चुरून घ्यायची.
फोडणी - लोखंडाच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात
गोडं तेल...तापलं की मोहोरी, तडतडली की जरा जास्त हिंग, हळद, कढीपत्ता,
बास्स.....
मग काळे पोलीस फोडणीस घालायचे (इथूनच तो सुगंध दरवळायला लागायचा...)
गूळ (उसळीला गोडसर चव यायला हवी इतपत) .+ मीठ, सुकं खोबरं किसून मग भाजलेलं, हातावर चुरून घालायचं. कोथिंबीर
आणि मग लोखंडी पळीत अजून एक फोडणी करायची. त्यात ठेचलेला लसूण घालून तपकिरी रंगावर कुरकुरीत करायचा. मग गॅस बंद आणि त्या गरम तेलात लाल तिखट आणि घरचा गोडा मसाला घालून ही फोडणी उसळीवर घालायची. मग झाकण ठेऊन द्यायचं आणि बारीक गॅसवर उकळायची.
आत्ता लिहीतानाही ती चव आठवतीये आणि जाणवते आहे मला. भाताशी किंवा ज्वारीच्या भाकरीशी किंवा वाटीत घेऊन चमच्यानं खाणं म्हणजे स्वर्गसुखच.
पोलीस हे राजम्याचं मराठी भावंडं. तशीच छान क्रीमी क्रीमी चव लागते ह्याची. पण जरा जास्त ठसकेबाज चवीचं.
मात्र नीट शिजली नाही तर वाईट लागते ही उसळ. दाणे लाकडासारखे लागतात मग. पहिल्याच फटक्यात भरपूर शिजवायचे. परत नंतर शिजवायचं म्हटलं की दडदडीत होतात.
तयार उसळीची चव घेतली ना चमच्यातून कि पहिल्यांदा पुढे येते ती गोड चव. अरेच्चा, हे प्रकरण गोड का लागतंय? असा मनात विचार येतोय तोच चव जाणवते ती खोबरं, गोडा मसाला, कढीपत्ता आणि लसणीच्या फोडणीची चव घेऊन आलेल्या काळ्या घेवड्याच्या स्मूथ रसदार ग्रेव्हीची. आणि मग नुसती खाऊन पण संपू शकते बरं.....त्या अंदाजानंच करा.
बघा करून, खाऊन.
दुवा द्याल.
अ फ ला तू न !!!!
अ फ ला तू न !!!!
फक्त ते पोलीस ठाण्यात्/मुंबईत मिळाले नाहीत मला. देहरादूनला 'भट्' या नावाने मिळाले.
सुरेखच पाककृती!
सुरेखच पाककृती!
काळे पोलीस सहज मिळतात आता.
अरे वा! आजच सकाळी केले होते
अरे वा! आजच सकाळी केले होते काळे पोलीस
काळे पोलीस सहज मिळतात आता. >>
काळे पोलीस सहज मिळतात आता. >>> काय नावाने मिळतात. इथे 'पोलीस' म्हटल्यावर वाणी हसायलाच लागला होता.
>>> काय नावाने मिळतात.
>>> काय नावाने मिळतात.
काळा घेवडा, काळे पोलीस.
मॉलमध्ये हमखास मिळतात
गुगल करून पाहिलं. थोडं
गुगल करून पाहिलं. थोडं बुटक्या बोन्साय राजमा सारखं दिसतंय. मला हे नाव घ्यायला फार रेसिस्ट वाटतं.घेवडा म्हणेन.
अजून खाल्ले नाहीत आणि पाहिले नाही, करून बघेन.
माधव यांनी सांगितलेल्या
माधव यांनी सांगितलेल्या नावाप्रमाणे सर्च केले तर अमेझॉनवर 'भट्ट कि दाल' म्हणून दिसताहेत. अमेझॉनवाले यांना ब्लॅक सोयाबीन पण म्हणताहेत.
हेच काळे पोलीस असतील तर घ्यावे म्हणतेय.
माझेमन, हेच ते पोलीस. चला
माझेमन, हेच ते पोलीस. चला पुढच्या वेळेस मलाही अमेझॉनवर घेता येतील.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=J9UnZRRTxRM
आम्ही लहान असताना पोलीसच म्हणायचो.
Pages