कथाशंभरी २ - भित्रा रघु - च्रप्स

Submitted by च्रप्स on 11 September, 2022 - 12:23

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो दचकला.
शेजारच्या घराबाहेर गर्दी, पोलिसांची गाडी आणि रुग्णवाहिका दिसत होती. ओसीडी असणाऱ्या रघुला हे असे गर्दी वगैरे दिसले कि धडकीच भरत असे, जितके लोक तितके श्वास-उच्छवास आणि किती जिवाणू विषाणू.
त्याच्या कानावर शब्द पडले 'नशिबाने वाचली हो पोर- तिच्या म्हणे एकविसाव्या वाढदिवसाच्या पार्टीतून घरी येताना तिला उचलली- सहा महिने या बंद घरात डांबून ठेवली'. रघूला ऐकून कसेसेच झाले- त्याने निर्धार केला लगेच या क्षणाला हे घर सोडायचे. प्रायव्हेट कॅब करू, मास्क घालून बसू पण लगेच निघायला हवे -एक नवीन शहर आणि एक नवीन सावज गाठायला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी अँगल आहे. फक्त रघूने ओसीडी असताना तिला (हात न लावता?) किडन्याप कसं केलं हा प्रश्न उरतो. लेकिन वो रघू हय, कुछ भी कर सकता हय - यावर आता विश्वास बसू लागला आहे.