कथाशंभरी - बदल - मामी

Submitted by मामी on 3 September, 2022 - 14:56

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

*************************************************

त्या बाकावरची नजर न हलवता तिने दुसरीला इशारा केला. दोघेजण तिथे बसले होते. आजूबाजूच्या जगाला विसरून. एकमेकांच्या नजरेत नजर, हातात हात आणि ओठही जुळलेले.

कधी काळी त्या दोघीदेखिल जगापासून लपून छपून त्याच बाकावर बसून त्यांच्यातल्या नात्याची ओळख करून घेत होत्या. समाजाला मान्य नसलेलं नातं होतं त्यांचं. त्या ते पुढे नाही नेऊ शकल्या. मनावर दगड ठेऊन दोघी दोन वेगळ्या वाटांनी गेल्या.

हाच तो बाक, हीच नदी, हाच परिसर .....

.... बाकावरचे दोघे उठले. देखणे रुबाबदार तरूण. छानपैकी हातात हात घालून गप्पा मारत शहराच्या दिशेनं निघाले. त्यांना आता तितकीशी फिकीर नव्हती समाजाची .... त्यांना एकत्र भविष्याची स्वप्न बघायची मुभा होती.

दोघीही एकमेकींकडे बघून समाधानानं हसल्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Neat!

Pages