कथाशंभरी - रग -मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 12:53

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. …

तिघे-चौघे मवाली दिसणारे टगे एका सभ्य पांढरपेशी माणसाला उगाच छळत होते.

त्या दोघींचे रक्त खवळलं. एकामेकींकडे बघत त्यांनी सांकेतिक इशारा केला आणि पहिल्या मजल्यावरच्या टेरेसमधून उडी मारत त्यांनी त्या तरूणांना बुकलायला सुरूवात केली.

कॅालेजची दुसर्यांवर अन्याय होताना पाहून खवळणारी रग आणि धग अजून कमी झाली नव्हती.

तो सभ्य पांढरपेशा माणूस पॅंट झटकत तिथून शांतपणे निघून गेला.पुन्हा एकदा ते मवाली (!) तरूण त्याला दिलेल्या भरमसाठ कर्जाची वसुली करण्यात सपशेल अपयशी ठरले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!