अमेरिकेत यायच्या आधी तिकडच्या गन violence च्या बातम्या क्वचित कधी कानावर यायच्या , पण ते शिकागो, टेक्सास किंवा आणि एखाद स्टेट मध्ये. मग इकडे आल्यावर खूप जवळून अशा घटना, त्यांचे पडसाद , हतबलता, निष्क्रियता बघायला मिळाली . तरी एक आत कुठेतरी असतंचना, तिकडे (दूर कुठेतरी) असं सगळं होतंय आपण तरी एकदम सुरक्षित, चांगल्या वस्तीत रहातोय.
ती रोजचीच दुपार होती. मुलं शाळेतून आली. खरं तर त्यांना कराटे क्लासला घेऊन जायच, पण त्या दिवशी सकाळी मी कोविडचा डोस घेतल्यामुळे मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मी गोळी घेतलेली, त्यामुळे त्यांना ड्राईव्ह करत नेणे शक्य नव्हत, मग त्या दिवशी क्लासचा बेत रद्द केला. मुलं त्यांच्या त्यांच्या कामाला लागली. मी पण थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बाहेरच्या खोलीत सोफ्यावरच कलंडले, पण झोप येत नव्हती म्हणून मग मोबईल वर काहीतरी टाईप करत होते.
अचानक माझ्या आणि मोबाइललाच्या मध्ये काहीतरी आलं. चमकून बघितलं तर गन.. चक्क बंदूक. मी चमकून वर बघितलं तर एक काळ्या रंगाची हुडी घातलेला, काळा मास्क घातलेला एक माणूस माझ्या छातीवर बंदूक रोखून उभा होता .
त्या क्षणी डोक्यात असंख्य विचारांची मालिकाच तयार झाली, "आपण स्वप्नात तर नाहीयो?, नवरा किंवा मुलंच काही मस्करी तर नाही ना करत आहेत ? अरे पण आपल्याकडे तर गन च नाहीये, अगदी खेळातलीसुद्धा बंदूक नाहीये, ओह म्हणजे हे कोणीतरी दुसरंच आहे, अरे बापरे! म्हणजे घरात चोर शिरलाय कि काय, आणि त्याने खरी खुरी बंदूक आपल्यावर रोखलीये, ओह My God !!! "
ह्या सगळ्या विचारांच्या साखळीत सुरवातीला उडालेला गोंधळ मग वाटलेली भीती ह्यांची जागा रागाने, संतापाने , वैतागाने कधी घेतली माझं मलाही नाही कळलं.
मी दोन्ही हातांनी बंदुकीची नोझल पकडली, आणि बेंबीच्या देठापासून ओरडायला लागले, त्या क्षणी मला त्याच्या डोळ्यात किंचितशी हलचल दिसली. क्षणात दोन्ही हातात बंदूक पकडून झटदिशी वेगाने उठले, त्याच वेळी जोराने त्याला ढकलले आणि तोही गर्रकन फिरला गेला, ज्या क्षणी माझ्याकडे पाठ झाली , तो मुख्य दरवाजातून सरळ बाहेर निघून गेला. एखाद सेकंदात मला तो गेल्याच जाणवलं आणि मी जोरजोराने ओरडत passage मधून आतल्या खोलिकडे पळत सुटले. ह्या सगळया आवाजाने मुलं पण पळत पळत बाहेर आली . ह्या सगळ्या गडबडीत मला नवरा कुठंच दिसेना. मी अजूनच गोंधळले.
तेवढ्यात मला मुख्य दरवाजातून नवरा आत येताना दिसला.
" अरे तू कुठे होतास ?, एक माणूस बंदूक घेऊन घरात घुसलेला .... "
"हो माहित्ये .." त्याचं शांत आवाजातलं उत्तर. "म्हणजे ते वाईट स्वप्न नव्हतं तर ... " माझं स्वगत.
मग त्याने सविस्तर त्याचा भाग सांगितला. माझा आवाज ऐकून तो बाहेर आला तर त्याला एक माणूस घरच्या दिशेने येताना दिसला. कोणीतरी अनोळखी माणूस चुकुन इकडे आला असं वाटून त्याला विचारायला तो पुढे सरला . तसा तो माणूस पळायला लागला. मग माझा नवराही त्याच्या मागे पळाला. तो थोडा पुढे जातोय तोच आमच्या घरातून एक माणूस निघाला आणि त्याला overtake करून दोघंही पळत घरासमोरच गाडी पार्क केलेली होती त्यात जाऊन बसले आणि पळाले. आम्ही लगेच पोलिसांना फोन केला, ते आले वगैरे वगैरे ..
आम्ही एकमेकांशी बोलल्यावर कळले, एक नाही तर दोन माणसं होती. एक आत घुसलेला (मला माहित पडलेला). दुसरा घरात घुसत असलेला ज्याला नवऱ्याने हटकले.
हि सगळी घटना कदाचित दोन पाच मिनिटांचीच असेल, पण नंतर कितीतरी दिवस आमच्या डोक्यातून काही तो विषय जात नव्हता. "जर .. तर .." ची मालिका डोक्यात अखंड चालूच राहिली . "जर तो गडबडला नसता आणि त्याने खट्टा ओढला असता तर? त्याचा साथीदार पण आत आला असता तर? मी प्रतिकार करण्या ऐवजी लागेश त्याला शरण गेले असते तर ? मुलं थोडी आधीच बाहेर अली असती तर?".... एक ना दोन हजारो शक्यता आणि त्यांचे तेवढेच भयंकर होऊ शकत असलेले परिणाम . डोकं पार चक्रावुन गेलं.
मी शक्तीने कमी, निःशस्त्र असूनही त्याला कसं घालवू शकले , ह्याचा परत परत विचार केल्यावर एक जाणवलं की एकाच शक्यता उरते. जेव्हा तो शास्त्र घेऊन घरात शिरला त्यावेळी त्याला कुठलाही प्रतिकार होईल हे अपेक्षित नव्हते, तर (कोणी असलंच तर ) घरातल्याना बंदुकीचा धाक दाखवून,जे मिळेल ते घ्यायचे आणि पसार व्हायचं असा बहुदा हेतू असावा. म्हणून तो मानसिक दृष्ट्या तयार नव्हता. माझी प्रतिक्षिप्त क्रिया जर भीती असती तर मीही प्रतिकार करू शकले नसते . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दैवाची साथ होती, म्हणूनच वर सांगितलेल्या शक्यतां पैकी काहीच विपरीत घडले नाही आणि सगळं थोडक्यात निभावलं.
त्या गणरायाचंच लक्ष होत म्हणायचं . गणपती बाप्पा मोरया
पण ते पळाले का?
पण ते पळाले का?
बंदूक हातात असून पळाले!
म्हणजे खूप च कच्चे असणार. आणि भित्रे पण असणार.
बंदूक धारी व्यक्ती इतक्या जवळ आल्यावर त्या ल प्रतिकार करणारी ही दुसरी घटना म्हणता येईल
१) कसाब ल पकडणारे ओळंबे sir.
आणि दुसऱ्या तुम्ही.
जस्ट घाबरवून लुबाडणूक
जस्ट घाबरवून लुबाडणूक करण्यासाठी वापरतात तसे कदाचित ते पिस्टल नकली असावे. अन्यथा चोर घाबरला नसता ही सुद्धा एक शक्यता आहे जी सद्य परिस्थितीत आपल्या पथ्यावरच पडली म्हणायची.
खूप मोठे dairing लेखिकिने
खूप मोठे dairing लेखिकिने दाखवले आहे.
हे dairing दुर्मिळ मधील दुर्मिळ असे आहे.
निठर गुन्हेगार,कसलेला सैनिक,अगदी ब्लॅक कॅट cammondo पण असे dairing करणार नाही
बंदुकीची नळी छाती वर लावल्या वर जीवन आणि मृत्यू ह्या मध्ये फक्त काही सेकंद चे अंतर असते
खूप दुर्मिळ घटना आहे ही.
आणि लेखिके पेक्षा त्यांच्या
आणि लेखिके पेक्षा त्यांच्या नवऱ्याचे वर्तन दुर्मिळ मधील अती दुर्मिळ असे आहे.
त्यांना प्रसंगाचे काहीच गांभीर्य वाटले नाही.
नुसत्या कार्डनेही दार उघडता
नुसत्या कार्डनेही दार उघडता येते. .. https://www.wikihow.com/Open-a-Door-with-a-Credit-Card
त्यामुळे डबल लॅाक करणे गरजेचे आहे.
बेघर माणसे मोठ्या घरात घुसून ॲटिक किंवा बेसमेंट मधे राहतात आणि कित्येक दिवस घरमालकाला माहित नसल्याच्याही घटना घडल्या आहेत.
बेघर माणसे मोठ्या घरात घुसून
बेघर माणसे मोठ्या घरात घुसून ॲटिक किंवा बेसमेंट मधे राहतात आणि कित्येक दिवस घरमालकाला माहित नसल्याच्याही घटना घडल्या आहेत.
>>> इंटरेस्टिंग... एखादी लिंक आहे का??
The Woman in the House Across
The Woman in the House Across the Street from the Girl in the Window
https://www.mamamia.com.au
https://www.mamamia.com.au/criminal-story-man-attic/
बेघर माणसे मोठ्या घरात घुसून
बेघर माणसे मोठ्या घरात घुसून ॲटिक किंवा बेसमेंट मधे राहतात आणि कित्येक दिवस घरमालकाला माहित नसल्याच्याही घटना घडल्या आहेत.
>>> इंटरेस्टिंग... एखादी लिंक आहे का??
>>>>
हि एक ईँटरेस्टींग लिंक सापडली
https://youtu.be/Gx0Vl-QDdho
नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी
नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी अमेरिकेची अवस्था आहे.
भारतात असे दुसऱ्याच्या घरात बेघर जावून राहतं नाहीत.
ऋन्मेष- लोल
ऋन्मेष- लोल
अहो हेमंत- ती भारतातीलच लिंक दिलीय ऋन्मेष ने...
एखादी लिंक आहे का??>>https:/
एखादी लिंक आहे का??>>
https://listverse.com/2018/11/01/10-people-who-secretly-lived-in-other-p...
@CIA @FBI
@CIA @FBI
अशा लोकांना सिक्रेट सर्व्हिस मध्ये भर्ती करून घ्यावे.
बापरे!
बापरे!
https://youtu.be/5xH0HfJHsaY
https://youtu.be/5xH0HfJHsaY
ट्रेलर लिंक आहे, चित्रपट दुसऱ्याच्या घरात न सांगता बेसमेंटमधे रहात असतात
निलुदा.. वाटलेलेच कोणी त्या
निलुदा.. वाटलेलेच कोणी त्या पॅरासाईटची लिंक देईल.
फार आचरट घटना घडताना दाखवल्यात त्यात क्लायमॅक्सला. डोक्याला दणादण शॉट बसतात. त्या क्षणीच मी ठरवले आयुष्यात असे चुकूनही कोणाच्या घरी न सांगता राहायचे नाही.
सत्य हे कल्पनेपेक्षाही अदभूत
सत्य हे कल्पनेपेक्षाही अदभूत असते असे म्हणतात त्याची प्रचिती देणारा लेख.
Pages