अमेरिकेत यायच्या आधी तिकडच्या गन violence च्या बातम्या क्वचित कधी कानावर यायच्या , पण ते शिकागो, टेक्सास किंवा आणि एखाद स्टेट मध्ये. मग इकडे आल्यावर खूप जवळून अशा घटना, त्यांचे पडसाद , हतबलता, निष्क्रियता बघायला मिळाली . तरी एक आत कुठेतरी असतंचना, तिकडे (दूर कुठेतरी) असं सगळं होतंय आपण तरी एकदम सुरक्षित, चांगल्या वस्तीत रहातोय.
ती रोजचीच दुपार होती. मुलं शाळेतून आली. खरं तर त्यांना कराटे क्लासला घेऊन जायच, पण त्या दिवशी सकाळी मी कोविडचा डोस घेतल्यामुळे मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मी गोळी घेतलेली, त्यामुळे त्यांना ड्राईव्ह करत नेणे शक्य नव्हत, मग त्या दिवशी क्लासचा बेत रद्द केला. मुलं त्यांच्या त्यांच्या कामाला लागली. मी पण थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बाहेरच्या खोलीत सोफ्यावरच कलंडले, पण झोप येत नव्हती म्हणून मग मोबईल वर काहीतरी टाईप करत होते.
अचानक माझ्या आणि मोबाइललाच्या मध्ये काहीतरी आलं. चमकून बघितलं तर गन.. चक्क बंदूक. मी चमकून वर बघितलं तर एक काळ्या रंगाची हुडी घातलेला, काळा मास्क घातलेला एक माणूस माझ्या छातीवर बंदूक रोखून उभा होता .
त्या क्षणी डोक्यात असंख्य विचारांची मालिकाच तयार झाली, "आपण स्वप्नात तर नाहीयो?, नवरा किंवा मुलंच काही मस्करी तर नाही ना करत आहेत ? अरे पण आपल्याकडे तर गन च नाहीये, अगदी खेळातलीसुद्धा बंदूक नाहीये, ओह म्हणजे हे कोणीतरी दुसरंच आहे, अरे बापरे! म्हणजे घरात चोर शिरलाय कि काय, आणि त्याने खरी खुरी बंदूक आपल्यावर रोखलीये, ओह My God !!! "
ह्या सगळ्या विचारांच्या साखळीत सुरवातीला उडालेला गोंधळ मग वाटलेली भीती ह्यांची जागा रागाने, संतापाने , वैतागाने कधी घेतली माझं मलाही नाही कळलं.
मी दोन्ही हातांनी बंदुकीची नोझल पकडली, आणि बेंबीच्या देठापासून ओरडायला लागले, त्या क्षणी मला त्याच्या डोळ्यात किंचितशी हलचल दिसली. क्षणात दोन्ही हातात बंदूक पकडून झटदिशी वेगाने उठले, त्याच वेळी जोराने त्याला ढकलले आणि तोही गर्रकन फिरला गेला, ज्या क्षणी माझ्याकडे पाठ झाली , तो मुख्य दरवाजातून सरळ बाहेर निघून गेला. एखाद सेकंदात मला तो गेल्याच जाणवलं आणि मी जोरजोराने ओरडत passage मधून आतल्या खोलिकडे पळत सुटले. ह्या सगळया आवाजाने मुलं पण पळत पळत बाहेर आली . ह्या सगळ्या गडबडीत मला नवरा कुठंच दिसेना. मी अजूनच गोंधळले.
तेवढ्यात मला मुख्य दरवाजातून नवरा आत येताना दिसला.
" अरे तू कुठे होतास ?, एक माणूस बंदूक घेऊन घरात घुसलेला .... "
"हो माहित्ये .." त्याचं शांत आवाजातलं उत्तर. "म्हणजे ते वाईट स्वप्न नव्हतं तर ... " माझं स्वगत.
मग त्याने सविस्तर त्याचा भाग सांगितला. माझा आवाज ऐकून तो बाहेर आला तर त्याला एक माणूस घरच्या दिशेने येताना दिसला. कोणीतरी अनोळखी माणूस चुकुन इकडे आला असं वाटून त्याला विचारायला तो पुढे सरला . तसा तो माणूस पळायला लागला. मग माझा नवराही त्याच्या मागे पळाला. तो थोडा पुढे जातोय तोच आमच्या घरातून एक माणूस निघाला आणि त्याला overtake करून दोघंही पळत घरासमोरच गाडी पार्क केलेली होती त्यात जाऊन बसले आणि पळाले. आम्ही लगेच पोलिसांना फोन केला, ते आले वगैरे वगैरे ..
आम्ही एकमेकांशी बोलल्यावर कळले, एक नाही तर दोन माणसं होती. एक आत घुसलेला (मला माहित पडलेला). दुसरा घरात घुसत असलेला ज्याला नवऱ्याने हटकले.
हि सगळी घटना कदाचित दोन पाच मिनिटांचीच असेल, पण नंतर कितीतरी दिवस आमच्या डोक्यातून काही तो विषय जात नव्हता. "जर .. तर .." ची मालिका डोक्यात अखंड चालूच राहिली . "जर तो गडबडला नसता आणि त्याने खट्टा ओढला असता तर? त्याचा साथीदार पण आत आला असता तर? मी प्रतिकार करण्या ऐवजी लागेश त्याला शरण गेले असते तर ? मुलं थोडी आधीच बाहेर अली असती तर?".... एक ना दोन हजारो शक्यता आणि त्यांचे तेवढेच भयंकर होऊ शकत असलेले परिणाम . डोकं पार चक्रावुन गेलं.
मी शक्तीने कमी, निःशस्त्र असूनही त्याला कसं घालवू शकले , ह्याचा परत परत विचार केल्यावर एक जाणवलं की एकाच शक्यता उरते. जेव्हा तो शास्त्र घेऊन घरात शिरला त्यावेळी त्याला कुठलाही प्रतिकार होईल हे अपेक्षित नव्हते, तर (कोणी असलंच तर ) घरातल्याना बंदुकीचा धाक दाखवून,जे मिळेल ते घ्यायचे आणि पसार व्हायचं असा बहुदा हेतू असावा. म्हणून तो मानसिक दृष्ट्या तयार नव्हता. माझी प्रतिक्षिप्त क्रिया जर भीती असती तर मीही प्रतिकार करू शकले नसते . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दैवाची साथ होती, म्हणूनच वर सांगितलेल्या शक्यतां पैकी काहीच विपरीत घडले नाही आणि सगळं थोडक्यात निभावलं.
त्या गणरायाचंच लक्ष होत म्हणायचं . गणपती बाप्पा मोरया
यू आर ब्रेव्ह...
यू आर ब्रेव्ह...
जाको राखे साइयां, मार सके न कोय
कोणीतरी अनोळखी माणूस चुकुन इकडे आला असं वाटून त्याला विचारायला तो पुढे सरला . तसा तो माणूस पळायला लागला. मग माझा नवराही त्याच्या मागे पळाला.
>>> बादवे - हे नवऱ्याने सांगितले का? आय थिंक हि इज शोइंग ऑफ.. असे कोणी पळत नाही कोणाच्या मागे..
. " अरे तू कुठे होतास ?, एक माणूस बंदूक घेऊन घरात घुसलेला .... "
"हो माहित्ये .." त्याचं शांत आवाजातलं उत्तर. "
>> सोर्री... काल्पनिक आहे का प्रसंग???
भयंकर अनुभव!
भयंकर अनुभव!
तुमच्या धाडसाचे कौतुक.
बापरे! वरच्या पोस्टला मम!
बापरे! वरच्या पोस्टला मम!
पुढे काय झाले? पोलिसांनी
पुढे काय झाले? पोलिसांनी पकडले का त्यांना?
बाप रे !!!
बाप रे !!!
तुमच्या हिमतीला सलाम प्रेरणा ताई, घरापासून हजारो मैल दूर नवं घर वसवून परक्या देशात तिथल्या वातावरणापासून ते संस्कृती अन् माणसांना आपलेसे करून राहणेच मुळात चेष्टा नाही, त्यात असला अनुभव म्हणजे झालेच कल्याण. पण तुम्ही दाखवलेल्या हिमतीचे खास कौतुक पुन्हा करावे वाटते. Legal असेल तर आपणही एखाद रेंज वर तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन एखाद पर्सनल आर्म कॅरी करा म्हणण्याचा मोह होतोय, पण तिथल्या लोकल परिस्थिती आपणाला व्यवस्थित माहिती असल्यामुळे ते आपणच बेटर ठरवावे. ओपन गन पॉलिसी असणाऱ्या देशात मी तरी बिना व्हेपन कधीच राहणार नाही, परमिशन दिली तर घरात प्रॉपर Assault रायफलच ठेवेन बाबा मी तर....
खरं तर इथे भारतातच खाकी घातलेल्या पोलिसांच्या कंबरेला लटकणारे पिस्तूल पाहूनच अस्वस्थ व्हायला होते, अगदी ते फायर करणार नाहीत वगैरे नीट माहिती असूनही. तुमची काय अवस्था झाली असेल ते इमेजिन करूनच हातपाय गळायला होतात !
छान आहे कथा. कुठल्याही बिकट
छान आहे कथा. कुठल्याही बिकट प्रसंगात स्वतःचे मानसिक धैर्य टिकवुन आलेल्या संकटाचा सर्व प्रकारे सामना करणे खरंच कौतुकास्पद कामगिरी असते, मग तो पुरुष असो की स्त्री.
सदर कथेत दरवाजा उघडा राहिलेला की तो चोर त्याची खास स्किल्स वापरून उघडून आत आला होता का ?
बिल्डिंग /सोसायटी सिक्युरिटी गार्ड्स आणि घरातील सिरी अलेक्सा किंवा इतर AIचा अनोळखी व्यक्ति आत शिरत असताना ह्यात काहीच कसा उपयोग नाही झाला ?
नाही हि सत्यघटना आहे.
नाही हि सत्यघटना आहे.
तिकडे जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी एक online नेटवर्किंग पोर्टल आहे ('nextdoor') , तर आजूबाजूच्यांना सावध करण्यासाठी म्हणून write उप तयार केला. शिवाय एकदा सगळं लिहून काढल्यावर मनातले विचार थोडे कंट्रोल मध्ये आले. हि घटना काही महिन्यांपूर्वी घडली. मी जवळचे मित्र मैत्रिणी सोडले\तर जास्त कोणाला सांगितले नव्हते.
आताच मायबोलीवर एक पोस्ट वाचली कोणी बंदूक रोखली तर काय होत असेल? एरवी आपण सगळं ठरवतो, बोलतो, पण खरंच जर कोणी बंदूक रोखली , अटॅक केला तर सगळं विसरायला होतं, त्यावेळी तुमचं uncontious मन च ताबा घेतो , किंवा ज्याला रेफ्लेक्स action म्हणता येईल तेच आपल्या कडून घडते. हा अर्थात माझा अनुभव आहे.
ओघात लिहिलं, तेव्हा लक्षात नाही आलं कि घराचे डिटेल्स पण द्यावेत ,
छोटी छोटी घरं असतात, पुढे मागे थोडं अंगण असतं , घराला कंपाउंड, गेट काही नसतं. मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत safe neighborhood (?)मानलं जातं.
मुलं घरी आल्यावर दार बंद केलं, पण लगेच कलासला जायचं म्हणून लॅच लावायचं राहील असावं.
Bhakt be like: इसका WhatsApp
Bhakt be like: इसका WhatsApp forward बनाते है। मोदीजी की वैक्सीन ने किया कमाल. निहत्ते औरत ने भगाया गनमैन को।
ग्रेट! थरारक अनुभव आहे!
ग्रेट! थरारक अनुभव आहे!
तुमची रिॲक्शन खरेच ग्रेट होती. चोरही बहुधा कच्चे खिलाडी असावेत. ते समोरून प्रतिकार येताच लगेच गांगरून गेले. पण मुले तिथे आली नाही त्या वेळेत हे छानच झाले. त्यांच्यासमोर पुन्हा तुमची रिॲक्शन वेगळी असती. कदाचित त्यांच्या काळजीने बॅकफूटवर गेला असता किंवा आणखी उसळूनही ऊठला असता. त्या त्या वेळी रिॲक्शन काय असेल हे खरेच आपले आपल्यालाही सांगता येत नाही.
माझे एक निरीक्षण आहे की आपल्याला जेव्हा अश्या प्रकारची स्वप्ने पडतात तेव्हा त्यात जी आपली रिॲक्शन असते ती आपल्याबद्दल खरे सांगून जाते.
घराला सिक्यु रिटी अलार्म,
घराला सिक्यु रिटी अलार्म, पॅनिक बटन नाही? डबल लॉक नाही? सिकुरि टी कॅमेरा नाही? हा प्रसंग कोणत्या राज्यात घडला? जर सबर्ब चांगली वस्ती पक्षी मध्यमवर्गीय, व्हाइट मेजॉ रिटी असेल तर हे बेअर मिनिमम सिकुरिटी आहे. तो माणूस दार उघडून सोफ्या परेन्त आला तर काही आवाज आला नाही?
तुम्ही घरी ए आर १५ ठेवा बाई. सिकुरीटी साठी पाहिजे.
सत्यघटना असेल तर फारच थरारक
सत्यघटना असेल तर फारच थरारक आणि भयंकर अनुभव आहे. तुम्ही खुप धाडसी आहात. _/\_
बापरे सॅन हुसे मधे? आमचा
बापरे सॅन हुसे मधे? आमचा दरवाजा अनलॉकच असतो दिवस भर.. आता आठवणीने लॉक करावा लागेल...
बापरे फारच धाडसी प्रसंग
बापरे
फारच धाडसी प्रसंग
बापरे!
बापरे!
सुदैवाने काही अजून गंभीर घडलं नाही. पोलिसांकडे तक्रार नोंदवलीत का? पुढे काय झालं?
ग्रेट रिॲक्शन !तुम्ही आणि
ग्रेट रिॲक्शन !तुम्ही आणि तुमच्या मुलांना काही न होता हा प्रसंग पार पडला हे विशेष.
बाप रे! भयंकर प्रसंग! नशीब
बाप रे! भयंकर प्रसंग! नशीब चांगलं होतं तुमचं, कोणाला काही इजा न होता सुखरूप वाचलात.
असे प्रकार ऐकू येत असले तरी आपल्या सुरक्षित घरापर्यन्त हे असे काही येऊन पोहोचेल असे वाटतच नाही.(कळते पण वळत नाही असे काहीतरी) गाफिल राहिले जाते. कधी अलार्म असला तरी सारखे आर्म - डिसआर्म करायला नको म्हणून डिसेबल केलेलाही असू शकतो. निदान दिवसा सगळे घरात असताना. किंवा सारखे ये-जा करताना. कॅमेरेही असतात पण त्याचा फायदा ते मॉनिटर केले तरच/ तेव्हाच ना अशी गंमत असते सगळी.
भयंकर अनुभव!
भयंकर अनुभव!
तुमच्या धाडसाचे कौतुक.+111111111
बाप रे!!!
बाप रे!!!
बापरे! थरारक अनुभव आहे
बापरे! थरारक अनुभव आहे
तुमचा धाडसाचे कौतुक
बाप रे!!
बाप रे!!
त्या आरोपीने पकडणं शक्य आहे का ? म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे च्या माध्यमातून....
बापरे, हे खरंच तुमच्याबरोबर
बापरे, हे खरंच तुमच्याबरोबर झालंय हे खूपच भितीदायक आहे. नशीब कोणाला काही झालं नाही.
>> असे प्रकार ऐकू येत असले तरी आपल्या सुरक्षित घरापर्यन्त हे असे काही येऊन पोहोचेल असे वाटतच नाही.(कळते पण वळत नाही असे काहीतरी) गाफिल राहिले जाते. >>++
तुमच्या प्रसंगावधानचे कौतुक.
तुमच्या प्रसंगावधानचे कौतुक. पुढे पोलिसांनी काही अॅक्शन वगैरे घेतली का?
आम्ही अपार्ट्मेंट मधे राहत असतांना, असाच एक वाईट अनुभव आला होता.
कोणीतरी एक मानसीक रोगी मध्यरात्री बेडरूमच्या खिडकीवर मोठा दगड भिरकाऊन पळून गेला.
सुदैवाने आम्ही दुसर्या बेडरूममधे झोपलो अस्ल्यामुळे बचावलो. तो दगड पार बेडरूमची खिडकी फोडून पॅसेज मधून किचन पर्यंत पोचला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने थरकाप उडाला होता. पोलीसांनी काही अॅक्शन तर सोडा भेट घ्यायची तसदी ही घेतली नाही.
@लल्लन्टाप बाप रे ! गुड कि
@लल्लन्टाप बाप रे ! गुड कि कोणाला काही झालं नाही.
आमच्याकडे armed robbery attempt म्हंटल्यावर पोलिसांच्या ३-४ गाड्या आल्या, बरीचौकशी केली आजूबाजूला वगैरे, cctv फुटेज चेक केला पण त्यांना कोणालाही पकडता आलं नाही . आम्हाला फोने करून काही सांगितलं पण नाही.
मी आधी म्हंटल्याप्रमाणे अतिशय शांत अँड सुरक्षित वस्ती आहे ( म्हणजे तो पर्यंत तरी सगळ्यांचा हाच समज होता/ आहे).
आणि खरं सांगायचं तर साहस म्हणण्या पेक्षा देवाकडून म्हणा किंवा unconcious मनाकडून ते घडवून घेतले .
मी आधी सांगितल्याप्रमाणे , तो टेक्सास विडिओ आणि त्यावरच्या reactions बघून, खर्च अटॅक झाला तर त्या क्षणी त्या माणसाची काय परिस्थिती असते, तो कोणत्या मनस्थितीत असतो ते सांगण्याचा एक छोटा प्रयत्न केला. कारण वाटले कि अशा वेळी कोणी जज करू नये.
फारच भीतिदायक अनुभव आहे.
फारच भीतिदायक अनुभव आहे. तुमची जी प्रतिक्षिप्त क्रिया झाली तिच्यामुळे आणि तो चोर कचखाऊ निघाल्यामुळे काही विपरीत घडलं नाही. आपण सर्वानीच काळजी घ्यायला हवी.
हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. लोकं सजग राहतील.
बचावलात! चांगली रिफ्लेक्स अ
बचावलात! चांगली रिफ्लेक्स अॅक्शन झाली. यावर उपाय असा काही नाही. इट इज व्हॉट इट इज! काळजी घ्यायची बस!
मै +१. सिक्युरिटी अलार्म शंभरदा दार उघडलं की कोण अनेबल डिसेबल करणार. त्यापेक्षा डिसेबलच ठेवून रात्री झोपताना अनेबल करणे. चावी विसरलो तर? म्हणून कुंडी खाली लपवून ठेवणे, किंवा बॅकयार्डचं दार कायम उघडं ठेवणे म्हणजे चावी घेऊन जायला नको. गराज डोअरला टायमर असला की ते १० मिनिटांनी बंद होईलच. त्यासाठी आल्याआल्या बंद करायची तसदी न घेणे. दिवसाच नाही तर रात्रीही मेन डोअर लॉक करायचं विसरणे. कार ऑटोमॅटिक लॉक होते. तर मुद्दाम लॉक कशाला करा? हे सगळे प्रकार अनेकदा अजुनही घडतात. ते टाळायचा जमेल तसा प्रयत्न करतो. पण....
बाकी असॉल्ट व्हेपन ठेवा आणि एआर १५ ठेवा असल्या नामी 'उपायांकडे' पूर्ण दुर्लक्ष मात्र नक्की करा. करालच ते अर्थात.
दिवसा अलार्म कोण लावतो.. सगळे
दिवसा अलार्म कोण लावतो.. सगळे रात्रीच आर्म रिंग होम करतात...
(No subject)
@अमित चुकुन चुका होतात
@अमित चुकुन चुका होतात हे खर
धन्य तुम्ही बचावलात! प्रतिकार
धन्य तुम्ही बचावलात! प्रतिकार केलात किंवा नसता तर काय ह्याला काही अर्थ नाही. सुरक्षित राहिलात हे महत्वाचे.
परिस्थिती दर वेळेस अशीच असेल असं काही नाही. बदलापूर चित्रपटात वरूण ध. च्या बायको मुलाला किडनॅप करून नेताना ती आणि मुलगा खूप किंचाळत असतात, त्या आरडा ओरडी ला वैतागुन तो गुंड मुलाला चालत्या गाडीतून ढकलून देतो, ते पाहून अंगा वर काटा आला होता. त्यांचा तसा हेतू ही नसतो पण घडते.
भविष्यात देसी लोकांची घरं अशा
भविष्यात देसी लोकांची घरं अशा गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त टार्गेट केली जातील. दोन कारणांसाठी..
एक म्हणजे ते बंदूक बाळगत असण्याची जवळपास शून्य शक्यता.
दुसरं म्हणजे देसी लोकांचा सोन्याचा हव्यास आणि ते घरात बाळगण्याची सवय.
Pages