Submitted by याकीसोबा on 25 August, 2022 - 02:33
हाऊस ऑफ द ड्रॅगन
"गेम ऑफ थ्रोन्स" या मालिकेचे किंवा "अ सॉंग ऑफ आईस अँड फायर" या पुस्तकमालिकेचे फॅन्स असणाऱ्या सर्वांनाच नवीन आलेल्या "हाऊस ऑफ द ड्रॅगन" विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा...
होऊ द्या चर्चा...
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिला भाग पाहीला.. सुरूवात
पहिला भाग पाहीला.. सुरूवात संथ वाटली मला... बघू पुढे कशी रंगत येते
आत्ताच पहिला भाग पहिला थोडा
आत्ताच पहिला भाग पहिला थोडा संथ थोडा इंटरेस्टिंग वाटला. पाहू आता पुढे कसे सरकतोय
काल सकाळी HOD (हाऊस ऑफ ड्रॅगन
काल सकाळी HOD (हाऊस ऑफ ड्रॅगन) चा दुसरा भाग The Rogue Prince (धटिंग राजकुमार) पाहिला. राजा व्हिसेरसने परंपरांना न जुमानता आपल्या मुलीला ऱ्हिनेयराला सिंहासनाचा वारस जाहीर केलाय, चिडलेला डेमॉन टारगेरिअयन (राजाचा भाऊ) ड्रॅगनस्टोनला राहायला गेला आणि आता त्याने ड्रॅगनच्या अंड्याची चोरी केली. ड्रॅगनच अंडं परत आणायला राजाच्या सल्लागार समितीतील (Small Council) ओट्टो हायटॉवर जातो आणि पाठोपाठ ऱ्हिनेयरा पण जाते आणि आपल्या चातुर्याने ड्रॅगनच अंडं परत मिळवते. विधुर राजावर सल्लागार समिती नवीन राणी निवडीसाठी दबाव आणत असते आणि लॉर्ड कोरलिस व्हेलारियॉन (सर्वाधिक श्रीमंत घराणे) आपल्या १२ वर्षाच्या मुलीचं लग्न व्हिसेरससोबत लावण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु राजा ओट्टो हायटॉवरची मुलगी ऍलीसेंट हायटॉवरची निवड करतो. आणि आता सुरु होतो खरा खेळ. लॉर्ड कोरलिस व्हेलारियॉन आणि डेमॉन टारगेरिअयन यांची युती होतांना दाखवली आहे.
आता पुढील घटना कशाप्रकारे घडत जातील आणि कोण कधी कोण्याच्या बरोबर आणि कधी कोण्याच्या विरुद्ध होतील, दोन्हीकडून आपला स्वार्थ साधणारे त्यात विनाकारण भरडले जाणारे, हा सगळा खेळ येणाऱ्या भागात हळूहळू स्पष्ट होत जाईल.
दुसरा भाग पण एकदम संथ...
दुसरा भाग पण एकदम संथ... उत्कठावर्धक अस काहीच नाही
डायलॉग तरी स्मार्ट आहेत का?
डायलॉग तरी स्मार्ट आहेत का? टिरियन सारखे.
दोन्हि एपिसोड्स एकदम कडक आहेत
दोन्हि एपिसोड्स एकदम कडक आहेत, जीओटिच्या परंपरेला साजेसे. र्हनेराचा मॅनरिझम डॅनीची आठवण देत राहतो. दुसर्या एपिसोडमधली तिची ड्रॅगन्स्टोनची एंट्री जीओटीतल्या रेस्क्यु सीन्सच्या तोडिस तोड आहे...
वर धाग्याच्या शीर्षकात इथे स्पॉयलर असतील अशी वॉर्नींग देउन ठेवा...
डायलॉग तरी स्मार्ट आहेत का?
डायलॉग तरी स्मार्ट आहेत का? टिरियन सारखे.
>>>> नोप
आज सकाळी HOD चा तिसरा भाग
आज सकाळी HOD चा तिसरा भाग Second of his name प्रसारित झाला. या भागाची सूरूवात होते ती, सागरी लुटेरा क्रॅबफीडर (क्रॅगहास ड्रॅहार), लॉर्ड कोरलिसच्या जहाजांना लुटून त्यांच्या लोकांना ठार करतो, डेमॉन टारगेरिअयन ड्रॅगनवर बसून सागरी लुटेरा क्रॅगहास ड्रॅहारच्या सेनेवर हल्ला करतो परंतु त्याला माघार घ्यावी लागते.
इकडे जवळपास ३ वर्षांचा कालावधी लोटला आहे. व्हिसेरस आणि ऍलीसेंट यांचा मुलगा अगॉन २ वर्षांचा झाला आहे आणि ऍलीसेंट परत गरोदर आहे. ऱ्हिनेयराला यामुळे डावलले गेल्याची भावना आहे, त्यातच व्हिसेरस ऱ्हिनेयराला लग्नासाठी दबाव आणत आहे. इकडे डेमॉन आणि कोरलिस लढाईत कमजोर झाले आहे, परंतु राजा मदतीसाठी नाखूष आहे. लॅनिस्टर हाऊसचा जेसन लॅनिस्टर ऱ्हिनेयरासोबत लग्नासाठी उत्सुक आहे, परंतु ऱ्हिनेयराला दबाव मान्य नाही. सल्लागार समितीतील एक सदस्यतर ऱ्हिनेयराच लग्न २ वर्षांचा अगॉनशी करण्याचा प्रस्ताव देतो. ओट्टो हायटॉवर ऍलीसेंटला, अगॉन आपला उत्तराधिकारी अगॉनला जाहीर करावा असं सांगतो.
लॉर्ड कोरलिस, त्याचा भाऊ वेमोंड, व्हेलारियॉन सैनिक आणि डेमॉन, हरणारी लढाई लढत असतात. लेनॉर व्हेलारियॉन त्याच्या सीस्मोक ड्रॅगनवर बसून क्रॅबफीडरची सेना ध्वस्त करतो आणि डेमॉन क्रॅबफीडरची लपणारी गुहा शोधून त्याला गुहेत जाऊन ठार करतो.