कचऱ्याची कमाल यंदाच्या मायबोली गणेशोत्सवात आणेल धमाल
मायबोली कुटुंबातील छोट्या दोस्तांनो तुमच्यातील कलाकारी दाखवायला यावर्षीही उत्सुक आहात ना?
मग चला, या उपक्रमा अंतर्गत सुचवलेल्या साहित्याचा वापर करून, अनोखे विषय,कलाकृती बनवायला घ्या
आम्ही सारे तुमचं कौतुक करायला आतुर आहोत
साहित्य :
फक्त पेन्सिल शार्पनर कचरा
(मणी, मोती वगैरेंचा वापर थोड्या प्रमाणात चालेल शोभेसाठी.)
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) मायबोली गणेशोत्सव २०२२ या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून , प्रवेशिकेला "हस्तकला उपक्रम - १ :* विषय : पेन्सिल शार्पनर कचऱ्यापासून कलाकृती ." - मायबोली आयडी - छोट्या दोस्तांचे नाव. अशा प्रकारे शीर्षक द्यावे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५) हस्तकला प्रतिकृतीचे फोटो गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी
All the best छोटे दोस्तों..
All the best छोटे दोस्तों..

आम्ही मागल्या वर्षीच हे उद्योग केलेत.. ग्रीटिंग कार्ड स्पर्धेसाठी
हे माझे परवाचे व्हॉटसप स्टेटस
हे माझे परवाचे व्हॉटसप स्टेटस..
लेकीचे फावल्या वेळेतील उद्योग..
लीडचा काळा चुराही चिकटवून टाकलाय एका कागदावर..
फक्त आता याचीच डिजाईन करतेस का विचारायला हवे तिला.. फक्त पेन्सिलींची वाट नको लावायला यात