हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
काही जोक / किस्से आधी कुठेतरी ऐकलेले असतात,
पण हैदराबादी तडका मजा आणतो हेही खरे.

जुम्मा का वादा त्या बच्चन आणि किमी काटकर च्या गाण्यानंतर माबोवरच Happy

… हैदराबादी तडका मजा आणतो…

माबदौलत आता तो तड़का योग्य लावायला शिकले आहेत बहुतेक Lol

मला तर जुम्मन, शब्बो, बडी अम्मी, फजलू मित्रच वाटतात माझे, रोज भेटणारे, गप्पा मारणारे.

एक दक्कनी बाल कविता, देवनागरी आणि फारसी दोन्ही लिपीत.

IMG_6871.jpeg

हैदराबाद मधे शिक्षण झालेले सांगू शकतील कोणती इयत्ता ते.

फजलू Lol

क्या कॉन्फिडंस है मामू का !

परसुं हैदराबाद में था. वेज खाना तो सिंपल खाना. रसम, सांबर, गोंगुरा चटनी, टोमेटो दाल, दही. सबकुछ खट्टा और खूबीच तीखा. मजाईच मजा.
37b85741-a83c-40c0-b85b-943bd3c71d88.jpeg

बगारा नै था, पिलेन राईस. पत्रावळीचा प्रॉप खास आवडला Happy

आज जुम्मा है, आज के वादे के मुताबिक़ किस्सा सुनो मेरी जानिब से :

शादी के भोत साल बाद पुराने दोस्त जुम्मन और फजलू मिले. भोत बातां किए.

फजलू: और बताव शादीशुदा ज़िंदगी कैसे चलरई?

जुम्मन: सब ख़ैरियत. बेगम से भोत अच्छी अंडरसँडिंग है. सुबु को उनो जागते उस के पैलेच मैं नाश्ता-चाय रेडी करको रखता. मोहब्बत की बातां करते करते खाते और बरतनां धो लेते मिलके.प्यार से दोनों के कपड़े मैइच धो लेतुं.

फजलू: वाह, हौर?

जुम्मन: कभी बेगम की फ़रमाइश का मैं पका देतुं कभी अपनी मर्ज़ी का बेगैरत सा खाना बना लेतुं. बेगम भोतीच सफ़ाई पसंद है तो वो ज़िम्मेदारी मेरी है, घर कू साफ रखतुं.

तुम्हारी बताव फजलू, तुम्हारी मैरिज लाइफ़ कैसे कटरी?

फजलू: अब क्या बोलना? ज़लील तो रोज़ मैं भी तुम्हारे जित्ताच होरा पर इत्ती मीठी ज़ुबान मे नै बता सकता Lol Lol

अंडरसँडिंग
ज़लील तो रोज़ मैं भी तुम्हारे जित्ताच होरा पर इत्ती मीठी ज़ुबान मे नै बता सकता
>>>>>
Lol सगळ्याच नवऱ्यांनी शिकावे असे जुम्म्याचे तात्विक विवेचन..!

तुमची पत्रावळ पाहून त्या तिखटजाळ आणि आंबट हैद्राबादी खाण्याची आठवण आली. त्यामानाने चेन्नईला इतके आंबट तिखट नसते.

अंडरसँडिंग …

कुणीतरी हा शब्द नीट वाचेल अशीच अपेक्षा होती. तो अगदी तस्साच उच्चारणारे आहेत तिथे Lol

जुम्मा टेक अवे, तात्विक विवेचन Proud

… पत्रावळ पाहून त्या तिखटजाळ आणि आंबट हैद्राबादी खाण्याची आठवण …

हौ. मजा येते कधीमधी. पण आता रोज जास्त तिखट नाही खाऊ शकत.

चैन्नै सौम्य +१

अंडरसँडिंग>>>

वाचताना झाले अंडरसँडिंग…

जुम्मन खरा स्थितप्रज्ञ…

Lol जबरी आहे जुम्मन फजलू संवाद. शेवटच्या ओळीपर्यंत बिल्ड अप मस्त आहे आणि शेवटची "पे ऑफ" ओळ वाचल्यावर आपण टोटल फुटतो Happy

१५ नवीन पोस्टी पाहिल्यावरच अंदाज आला की हिट किस्सा आलाय Happy

@ फारएण्ड

थँक्यू ! हे माझे ओरिजनल कंटेंट, म्हणून तुमची कॉमेंट विशेष _/\_

अनिंद्य, तुमचा ओरिजनल कंटेंट आहे हे वाचून फार आनंद झाला! Happy
अजून येऊ द्या जुम्मन - शब्बो - फजलू - बडी अम्मी चे किस्से!
फक्त...हे टिपिकल घरची कामं नवऱ्याने करावी लागणे
यावरचे जोक्स नको वाटतात!
Happy

घरकामं नवऱ्याला करावी लागणे ….

मलाही जोक चा विषय नाही वाटत. घरी मी जुम्मनच. गृहकृत्यदक्ष Happy

जुने हैदराबाद हा सेटअप असल्याने लिहिले तसे.

Pages