हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा, भारीच आहे ही फॅमिली

जुम्मा और जुम्मन का वादा है, ये लो नया क़िस्सा:

जुम्मन आज बढ़िया होटल में गया खाने कू

वेटर कू बोला : मेरे वास्ते मुर्ग़े की बोटी ला, हौर इदर जो लोगां बैठे उन कू गोश्त की बिरयानी खिला. अकेले खाना पसंद नै मेरे कू, मैं चाहता की जब मै खातुं तब सबी ने खाना !

वेटर वैसेच किया.

फिर जुम्मन ज़ोर से बोला : मेरे कू बढ़िया व्हिस्की पिला और ये लोगां जो बैठे उन कू ठंडी बियर पिला. अकेले पीना पसंद नै मेरेकू. मैं चाहता की जब मै पीतुं तब सबी ने पीना !

वेटर वैसेच किया.

सब लोगां जुम्मन मियां की तारीफ़ां करे, क्या दिलदार इन्सान है बोल के.

फिर जुम्मन ज़ोर से चिल्लाया : इधर मेरे कू मेरा बिल दे और बाक़ी बैठे सब कू उन का बिल दे. अकेले बिल देना पसंद नै मेरे कू. मैं चाहता जब मैं बिल चुकातुं तब सबी ने बिल चुकाना Lol Lol Lol

जुम्मन का जनाजा कल सुबु टोलीगंज क़ब्रिस्तान को ले जारै देखो Proud

आज जुम्मा नै लेकिन पीर कू आ गए इधर शब्बो हौर जुम्मन. ये बातां सुनो :

- तुम कू फ़क़त तुम्हारेच रिश्तेदारां की फिकर रैती शब्बो, तुम मेरे फ़ैमिली कू ज़रा ध्यान नै देते. ग़लत हैना ?

- हाय हाय कैसी हौली बातां कर रै जुम्मन ! अभी परसूंच अपनी सास कू छोड़ के मैं तुम्हारी सास कू शॉपिंग ले गई ना ? मेरे ससुर कू नै दिया लेकिन तुम्हारे ससुर कू नया मोबाइल दिलाई… मेरी नवी घड़ी तुम्हारे साली कू दे डाली ना.

और तुम्हारा साला १० हजार मांगा, मै २० हजार दी उस कू. तुमीच देखो कितनी ख़दर करती मैं तुम्हारे रिश्ते वालों की !!

Lol

.... शब्बो भोत ही हिकमती निकली...

हौर देखो कैसी कैसी हिमाकत कर रई Lol

तुमच्या मेसेजमुळे जुम्म्याच्या आधीच आले आज हे दोघे Happy

अनिंद्य.. Lol
मागच्या जुम्म्याला आले नव्हते ना..म्हणून विचारले!

दम के रोट !!

मुहर्रमच्या महिन्यात सुप्पर फेमस हैदराबादी खाणे म्हणजे “दम के रोट” !! हे खास या दिवसात करतात, लहान मोठ्या बेकरीज् विकतात आणि जुन्या शहरात काही जागी तुम्ही स्वत:चे साहित्य नेऊन दिले तर ते रोट भाजून पण देतात !

बादाम-जाफरान डली हुई super rich big sized cookies समझो. नामपल्ली एरिया के सुभान बेकरी का भौत फेमस रैता, हौर भी लोगां बनाते-बेचते !

ऐसे दिखता देखो

IMG_6865.jpeg

Pages