फौजदारी डाळ ही शक्यतो हिवाळ्यात केली जाते, सहसा ओसरत्या हिवाळ्यात संक्रातीच्या अगोदर हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ - दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात... सोबतीला शेतातच उगवलेला ताजा भाजीपाला सलाद म्हणून घेतला का काम सेट.
साहित्य
3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ
1 टेबलस्पून तुरीची डाळ
1 टेबलस्पून मुगाची डाळ
1 टेबलस्पून चणे डाळ
1 टेबलस्पून मसूर डाळ
1 टेबलस्पून चवळी
2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ काप
1/2 कप कांदा (साधारणतः एक मोठा) उभा चिरून
7 मोठ्या किंवा १२-१३ बारक्या लसूण पाकळ्या
बोटाच्या अर्ध्या पेरा इतके आले
1 टी-स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
फोडणीसाठी
1 टी स्पून मोहरी
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
3-4 गोडलिंबाची पाने
3 टेबलस्पून तेल.
कृती :-
प्रथम सर्व डाळी तीन वेळा नीट धुवून अर्धा तास भिजत घालाव्यात, नंतर कुकरमध्ये ४ शिट्या करून शिजवून घ्याव्यात.
कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा
कांदा नीट परतला की त्यात खोबरे घालुन परत खोबरे लालसर होईस्तोवर परतून घ्यावे
आता ह्याच्यात बारीक चिरलेले आले लसूण घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतावे
आले लसूण परतून झाले का त्यातच एक चमचा लाल तिखट घालून चांगले परतून घ्यावे (पुन्हा एकदा जर ह्या स्टेपला घरच्यांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही जिंकलेले आहात)
आता हा पूर्ण सौदा कढई उतरवून गार करून घ्यावा, नंतर त्यात अर्ध्या चमचा हळद आणि एक चमचा असल्यास खान्देशी काळा मसाला नसल्यास किचन किंग मसाला एक चमचा घालावा, आणि गार झालेल्या ह्या मसाल्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
आता कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करावे त्यात मोहरी जिरे हिंग आणि गोडलिंबाची फोडणी करावी, आता ह्या फोडणीत आपण बारीक केलेले वरील वाटण घालावे अन चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,
वाटणाला तेल सुटले की त्यात शिजवलेली डाळ घालून एकजीव मिक्स करावी, चवीनुसार मीठ घालावे आणि, ह्यात एक ग्लास गरम पाणी घालावे (एकच ग्लास कारण फौजदारी डाळ थोडी घट्टसरच असते)
पाणी घातल्यावर परत डाळ एकजीव करून तिला झाकून उकळी फुटू द्यावी, उकळी फुटली का गॅस बंद करून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी डाळ दहा मिनिटे झाकून ठेवावी.
तयार आहे फौजदारी डाळ, सोबत काकडी टोमॅटो दाण्याचा कूट घालून केलेली कोशिंबीर आणि उडदाचेच कळणे घातलेली भाकरी अन गरम वाफाळता भात.
आता काय ? ओरपा पोट भरस्तोवर, आजचा पाऊस गारवा, रजा हे मौके अन दस्तुर यशस्वी भजी अन वडे तळण्यापेक्षा इकडे लावले अन जेवणच सार्थक झाले.
नाही
झकास.
झकास.
करून बघणेत येईल !
ता.क. - “सौदा” कढई उतरवून गार करून घ्यावा….. पंजाबी संगत का असर
पंजाब्यात पण असेच म्हणतात काय
पंजाब्यात पण असेच म्हणतात काय ? आमची आत्या आहे एक कोल्हापूरला ती पण थेट असेच म्हणायची, कित्येकदा आठवडी बाजारात पण ऐकलं आहे म्हसवड दहिवडीच्या, सौदा कितीला घेतला काय घेतला असं. नवीनच माहिती कळली
पाककृती आवडली. पुष्प १ ची
पाककृती आवडली. पुष्प १ ची लिंक द्या न
मस्त पाककृती
मस्त पाककृती
सातारा भागात, पूर्ण वर्षाचा जो कांदा लसूण मसाला करताना त्यात जो अख्खा गरम मसाला घातला जातो (हळकुंड मिरच्यासहीत) त्यालाही सौदा असे म्हणतात.
रेसिपी मस्त.
रेसिपी मस्त.
सासूबाईंची रेसिपी आहे 'वाटपाची डाळ'. ज्यात असेच दोन डाळी मिक्स + कांदा खोबरे आल लसूण भाजून बारिक केलेले 'वाटप'.
कित्येकदा आठवडी बाजारात पण ऐकलं आहे म्हसवड दहिवडीच्या, सौदा कितीला घेतला काय घेतला असं.>>>
फलटण आदर्की - इकडे एकत्रित खडा गरम मसाल्याला सौदा म्हणतात. जसे की वर्षभराची चटणी (मिसळणिचा मसाला) करताना सौदा किती घेतला इ.
कंपनीमधील मित्राने बनवून
कंपनीमधील मित्राने बनवून आणलेली फौजदारी डाळ.
अप्रतिम चव होती.
फलटण आदर्की - इकडे एकत्रित खडा गरम मसाल्याला सौदा म्हणतात. जसे की वर्षभराची चटणी (मिसळणिचा मसाला) करताना सौदा किती घेतला इ.
>>>>आमच्या बारामती साईडला पण सेम
तसही बारामती फलटण अंतर-२५ किमी
झणझणीत.
झणझणीत.
सौदा आणि सौदा-सुलुफ दोन्ही मी
सौदा आणि सौदा-सुलुफ दोन्ही मी मराठीत ऐकले आहेत, विदर्भ-मराठवाड्यात तर अनेक जागी. पण ते 'बाजार आणला' याअर्थी - वाणसामान, भाजीपाला, मसाले यांचे आठवडी बाजारातून शॉपिंग.
'सौदा' हा शब्द हिंदीत साधारण रोकड देवाण-घेवाण याअर्थी वापरतात. पंजाबी (भारतीय व पाकिस्तानी, दोन्ही) त्याचा थोडा वेगळा वापर करतात. उदा. पटियाला / अमृतसर / पुरानी दिल्ली भागात हलवायांच्या दुकानातल्या पाट्या - 'यहाँ हर सौदा शुद्ध घी में बनता है'
'सौदा' चे वेगवेगळे संदर्भ वाचून मजा वाटली.
असो, खूप अवांतर झाले. lets focus on the delicious recipe
@मंजुताई, माझ्या लेखनात
@मंजुताई, माझ्या लेखनात सापडेल "घोटलेली वांग्याची भाजी" ह्या नावाने.
ऋतुराज, शीतल, आबा, एसआरडी आपले आभार
सौदा ह्या शब्दाची इतकी रेंडिशन्स असतील असे स्वप्नातही वाटले नव्हते, मी आपला ह्या शब्दाला थेट माणदेशी फिचर समजत होतो, इथं तर माणदेश अन विदर्भ, मराठवाडा, पंजाब लिंक लागली.
मजाच मजा आहे, मंडळी रेसिपी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला.
छान पाककृती.
छान पाककृती.
आभार कुमार सर
आभार कुमार सर
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
आभार स्वाती
आभार स्वाती
डाळींचं प्रमाण इतकं कमी?
डाळींचं प्रमाण इतकं कमी? पाणीदार असणं अपेक्षित आहे का?
नाही थोडी घट्टच असते, सगळ्या
नाही थोडी घट्टच असते, सगळ्या डाळी मोजल्यास पाऊण वाटीचा हिशोबा पडतो, पातळ किती करायची तो आपापला प्रश्न.
जबरदस्त.
जबरदस्त.
थँक्स
थँक्स
सोलापुर साईडला बाजारी डाळ
सोलापुर साईडला बाजारी आमटी बनते तीही साधारण अशीच कृती असते व अशीच तिखट…
रेसिपी मस्तय.
छानच रेसीपी. मी कमी
छानच रेसीपी. मी कमी मसाल्याचे बनव्ते त्यामुळे हा बडा ख्यालच आहे पण खानदेशी जावई मिळाला तर त्याला नक्की करुन घालेन. फ्लॅग्ड!!
सौदा शब्द हैद्राबाद तेलंगणा मध्ये पण एकदम ओक्केत वापरला जातो. बाहेर जाउन भाजी सामान आणून देणे ह्याला सौदा लाणे म्हणतात. द अंग्रेज सिनेमात सुरुवातीला इफलास ला त्याच्या घरातली बाई पिशवी पैसे देउन सौदा आणायला पाठि वते बघा. मला वाटते कोथिंबीर मिरची कढिलिंब पुदिना मिक्स ला पण कधी कधी सौदा म्हणतात. छान वाटले वाचून.
साधना जी, करेक्ट बाजार
साधना जी, करेक्ट बाजार आमटीच्या जवळपास जाणारा प्रकार म्हणता येईल, विदर्भात पण असेच मिश्र डाळींचे "मिसळीचे वरण" करतात भरपूर लसूण घालून असे एक वैदर्भीय सहकारी सांगतो.
अश्विनी मावशी,
होय, हैदराबाद मध्ये मी पण सौदा लाना ऐकले आहे, रच्याकने अंग्रेज सिनेमा लैच तुफान आहे, मला वाटते तुम्ही म्हणता त्या पात्राचे नाव जहांगीर असते, त्याची अम्मी त्याला इफलास (रिकामटेकडा) म्हणते, बाहेरची पोरे पण त्याला "अभी तू काम कर रा ना उत्ताइच भोत है" म्हणतात! तुफान विनोदी सिनेमा.
A zangir jake sauda la aur
A zangir jake sauda la aur change wapas Lana nakko bhool. Yes that scene is lovely.
Mai kya Kara bole toh labbad
Mai kya Kara bole toh labbad kichappal pahanke itta mara .... I didn't know it is Rubber ki chappal
जा रे जहांगीर सौदा ले के आ और
जा रे जहांगीर सौदा ले के आ और हरा मसाला नक्को भूलो.
परसो नबीरपुरे में क्या लढाई हुई बाप चिंध्या मारामारी, मै गया ताव मे लब्बड की चप्पल डाल के दिवार फांद के वो दिया पोरो कु, खाली घाप घिप घाप घिप घाप घिप, मै बोला भी खैजर को तू भी तू भी दे रे दो चार तो बोला मै कैसे मारू मेरे बाजू मे सर्कल खडा था !
आंग्रेझ इज प्युअर लव अँड पारायण मेमरीज फ्रॉम हॉस्टेल
खान्देशात सुकं खोबरं खातात?
खान्देशात सुकं खोबरं खातात?
सौदा म्हणजे ग्रोसरी ह्या अर्थाने एकलेय बर्याच ठिकाणी
खान्देशात सुकं खोबरं खातात?
खान्देशात सुकं खोबरं खातात?
न खायला काय हो ? कोकणात गहू खातात का ? किंवा इटली बाहेर पिझ्झा खातात का ? असा काहीसा प्रश्न वाटला हा खरंतर लॉल.
पण होय, खान्देश, मराठवाडा विदर्भ सगळीकडे सुकं खोबरं खातात, मला वाटतं नॉर्थ इंडिया सोडून नर्मदेखाली सगळीकडे खोबरे हे असतेच ओले नाहीतर सुके जेवणात, कदाचित प्राचीनकाळी घाटवाटातुन अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर जे कायम व्यापारी प्रवास होत त्यामुळे खोबरं/ नारळ वगैरे देशावर इन्ट्रोड्युस झाले असतील असे एक वाटते पण त्यालाही जवळपास झाली असतील १५००-२००० वर्षे
सौदा म्हणजे वाणसामान ऐकले
सौदा म्हणजे वाणसामान ऐकले होते पाकिस्तानी सीरिजमध्ये .त्याचे इतकेपण अर्थ वाचून मजा वाटली.
पाकृ छान आहे.कधीतरी करून बघेन.मला त्या वाटण घाटणापेक्षा बरेचदा अशा पाकृ आवडतात.
Hiiii it is Dabirpura. And
Hiiii it is Dabirpura. And circle is Circle Inspector.
Sorry for awantar dhaga kadhu.
हो सर्कल इन्स्पेक्टर माहिती
हो सर्कल इन्स्पेक्टर माहिती होतं मला, डबीरपुरा आजच कळलं.
काढा धागा हैद्राबादी मुव्ही फॅन्स आमचा नंबर वरती असणार रिप्लाय देण्यात लॉल
पाकृ छान आहे.कधीतरी करून बघेन
पाकृ छान आहे.कधीतरी करून बघेन.मला त्या वाटण घाटणापेक्षा बरेचदा अशा पाकृ आवडतात.
नक्की करून पाहा मग आवडेल तुम्हाला
मस्त आहे पाककृती!
मस्त आहे पाककृती!
Pages