गुरुपौर्णिमा

Submitted by Pallavi2579 on 13 July, 2022 - 05:16

“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”

गुरुपौर्णिमा माहिती

प्रस्तावना - दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते.गुरू विषयी असणारा आदर,प्रेम या भावना जपण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो.गुरू विषयी काय बोलावे?वरील ओळींमध्ये गुरुविषयीची महती सांगितली जाते.माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत कुणाचातरी गुरू,कुणाचातरी शिष्य असतो.गुरू व शिष्याचे हे नाते अनंतकाळापासून चालत आलेलं आहे.या नात्याला एक प्रेमाची,त्यागाची,किनार लाभली आहे.गुरू साठी शिष्य जीवाची बाजी लावत असतो.गुरूही आपल्या शिष्याला सर्वोतोपरी श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत असतो.असे हे गुरू शिष्याचे पवित्र असे नाते आहे.या नात्याला जगात कितीही किंमत मोजली तरी त्यापुढे ती शून्य आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users