Submitted by अजिंक्यराव पाटील on 5 June, 2022 - 12:34
रान बाजार सिरीज बघतोय, शेवटचे 2 एपिसोड राहिलेत बहुधा, पण चर्चा करण्यासारखी सिरीज आहे. आधी चर्चा झाली ती प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतच्या बोल्ड सिनची. मला वाटतं उगाच ते टिझर टाकले. अजून तरी ते दोन्ही सीन आले नाहीयेत. कथा इतकी ग्रिपिंग आहे की एक एपिसोड जरी फुकट दाखवला तरी लोक पटा पटा प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन घेतील. महाराष्ट्रातल्या काही घटनांचे संबंध असू शकतात. पानसेने खूप खतरनाक उडी मारलीय!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अनावश्यक शिव्या कमी करता
अनावश्यक शिव्या कमी करता आल्या असत्या. खासकरून प्रेरणा पाटील (माधुरी पवार) विनाकारण शिव्या घालते असं वाटत राहतं. बाकी पात्रे गरज असेल तिथेच शिव्या देतात, पण कुठं कुठं अतिरेक देखील आहे. पोलिस काय किंवा वेष्या काय, उठसूट शिव्या देतच बोलत नसतील.
तरीही, शिव्या इग्नोर करून बघण्याईतके जबरदस्त कथानक, सर्वांचाच दमदार आणि आजकाल न दिसणारा परफेक्ट अभिनय.. हिंदीला अस्मान दाखवेल अशी, चुकवू नये अशी सिरीज आहे ही.
हो, टीजरने उगाच दिशाभूल केली.
हो, टीजरने उगाच दिशाभूल केली. कदाचित ते लक्ष वेधायला पब्लिसिटी स्टंट असेल.
ट्रेलर मात्र जबरदस्त होता. ज्यांनी बघितली ही सिरीज त्यांचे रिव्यू वाचायला आवडतील.
शिव्या आणि १८+ द्रुश्ये असतील तर मात्र घरी बघायचे वांधे होतील.
ट्रेलर ने चुकीची दिशाभूल केली
ट्रेलर ने चुकीची दिशाभूल केली आणि व्युव्हर्स कमी केले...
चुकीची दिशाभूल केली >> हो,
चुकीची दिशाभूल केली >> हो, बरोबर दिशाभूल केली असती तर बरे झाले असते.
कोर्टात खेचता येऊ शकते..
कोर्टात खेचता येऊ शकते..
अनावश्यक शिव्या कमी करता
अनावश्यक शिव्या कमी करता आल्या असत्या.+१
आव मोठा आणला आहे पानसे ने पण माझा थोडा अपेक्शा भन्ग झाला. काहितरी खुप सन्सनाटी होणार आहे अस वाटतानाच काहिच होत नाही.
हो, मलाही तसेच वाटलं
हो, मलाही तसेच वाटलं
आणि प्रचंड क्लिशे आहेत
गलथान पोलीस, मग हुशार पण भडक डोक्याचा पोलीस ज्याला निलंबित केलं आहे, तो लगेच येऊन एकेक धागे शोधतो वगैरे
कैक इंग्रजी आणि हिंदी सिनेमात हीच थीम आलीये
मग त्या राजकीय सोयीच्या भानगडी, उद्योजकाच्या बायको चे पदासाठी अनैतिक संबंध, मनाने चांगली असलेली वेश्या वगैरे
काहीही म्हणजे काहिही नवीन नाहीये
फक्त हाताळणी वेगवान आहे हीच जमेची बाजू
हिंदी आणि इतर साउथ मुव्हिज
हिंदी आणि इतर साउथ मुव्हिज तसेच हल्लीच्या इतर वेब सीरीज मध्ये आजवर पाहिले ते प्रथमच मराठीत दिसले हाच काय तो एकमेव यू एस पी असावा. प्राजक्ता माळीने उगीच निव्वळ ह्यासाठी वजन वाढवणे सुद्धा डर्टी पिक्चर मधली विद्या बालन स्टाइल मेहनत झाली.
अस्स्खल शिव्या ह्या फक्त मालवणीतच छान एन्जॉय करता येतात हे मात्र प्रकर्षाने जाणवले. इकडे त्या खुपश्या प्रसंगी निव्वळ अनावश्यक आणि हॉलीवुड स्टाइल वाक्या गणिक फ ची बाराखडी टाइप वाटले.