₿₿₿
रागिणी तिच्या नेहमीच्या बाल्कनीमध्ये बसली होती. समोरून समुद्राचा खारा वारा येत होता. समोरचं माडांचं लहानसं बन त्या वाऱ्यासोबत लयीत डोलत होतं. ती दूरवर समुद्राकडे नजर लावून बसली होती. त्या वाऱ्यावर तिचे केस भुरूभुरू उडत होते. तिच्या कानांना समुद्राच्या लाटांचा आणि माडांच्या बनांतून सुरसुरत येणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता. ती डोळे मिटून तो आवाज ऐकू लागली. कसलीच हालचाल तिच्याकडून होत नव्हती. लांबून पाहताना वाटलं असतं कि एखादा पुतळाच ठेवला आहे , इतकी ती शांतपणे बसली होती. मागे घडलेल्या घटना एकेक करून तिच्या नजरेसमोरून जात होत्या . आता तर कुठे नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे . पुढे काय आणखी काय काय वाढून ठेवलंय हे तिलाही माहीत नव्हतं. बाजूलाच ठेवलेला तिचा मोबाईल वाजला. बराच वेळ तो वाजत राहिला. तिने त्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काही करायची तिची ईच्छाच नव्हती. पूर्ण रिंग झाल्यानंतर फोन वाजायचा थांबला. लगेच थोड्या वेळात पुन्हा मोबाईलची रिंगटोन वाजली. ह्यावेळी तिने डोळे उघडले आणि मोबाईल बघितला. अननोन नंबर होता. तिने मोबाईल घेतला.
" हॅलो …. " ती म्हणाली . पण पलीकडून कोणीच बोललं नाही . तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं . " हॅलो …? " पुन्हा तिने विचारलं. त्यावेळीही पलीकडून कोणी बोललं नाही . तिने फोन कट केला आणि ठेऊन दिला. ती पुन्हा समोर समुद्राकडे बघत राहिली . सूर्य समुद्राच्या पाण्यावर तरंगत असल्यासारखं वाटंत होतं , आजूबाजूच्या आकाशात लाल केशरी रंगांच्या छटा पसरलेल्या होत्या. आज तिला फार एकटं एकटं वाटत होतं . तिच्या मनात त्याचा विचार आला. आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी पसरली. हे जे सुरू झालं आहे , त्याचा शेवट कसा होईल याची चिंता तिला आता वाटू लागली. घडलेलं बिघडायला वेळ लागणार नाही . घटना कसल्याही प्रकारे घडू शकतात . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात घट्ट विश्वास होता , त्याच्याबद्दल ! आपण बिनधास्त डोळे बंद करून त्याच्या मागे चालायचं ठरवलं होतं . जे होईल ते सगळं सहन करायचं मनाशी ठरवलं होतं. पण आता ह्या घडीला तो आपल्या जवळ असायला हवा होता असा एक विचार तिच्या मनात येऊन गेला. आणि त्याच वेळी दारावरची बेल वाजली. आता ह्या वेळेला कोण आलं असेल ? थोड्या वेळाने पुन्हा बेलचा आवाज आला. मग तिच्या लक्षात आलं की घरात कोणीच नाही , घरातला म्हातारा नोकर मगाशीच काहीतरी आणायला बाहेर गेला होता. ती जागेवरून उठली . दरवाज्याच्या पिन होल मधून तिने पलीकडे कोण आहे ते पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला . पलीकडे तो उभा होता . तिने क्षणाचाही विलंब न करता दरवाजा उघडला. समोर वकील मेघनाद निशाणदार उभा होता, तिच्याकडे प्रसन्न चेहऱ्याने पहात . ती आवेगाने पुढे झाली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण तोही तिच्या मिठीत विसावला , परंतु लगेच त्याच्या मनाने त्याला सावरलं. ते दोघे बाहेर उभे होते.
“ रागिणी … आपण बाहेर उभे आहोत. ”, तो हळुवारपणे म्हणाला. त्यासरशी ती झटका लागल्यासारखी बाजूला झाली आणि आजूबाजूला पाहू लागली. तिने त्याला आत घेतलं , दरवाजा लावला. आणि पुन्हा ती त्याच्या मिठीत विसावली. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दोघेही हरवून गेले. काही क्षण गेल्यानंतर रागिणी भानावर आली. त्याच्यापासून दूर होत ती स्वतःवर नियंत्रण ठेऊ पहात होती , परंतु तिच्याने ते शक्य झाले नाही. ती पुन्हा मेघनादच्या जवळ आली आणि त्याच्या ओठांचे एक दीर्घ चुंबन घेतले . त्या दोघांच्या अंगात आता वीज संचारली होती . दोघेही एकमेकांना मिठ्या मारत आणि आवेगाने चुंबने घेत बेडरूम मध्ये गेले . सर्व गोष्टी यांत्रिकपणे घडत होत्या , कपड्यांचे अडसर हळूहळू दूर होऊ लागले . दोघांनी आपापली शरीरे बेडवर झोकून दिली. मेघनाद तिच्या अनावृत्त शरीराची चुंबने घेऊ लागला , त्यासरशी रागिणीच्या अंगप्रत्यंगावर शहारे उमटू लागले . दोघांमध्ये प्रणयाची आग पेटली होती . रागिणीने त्याला आणखी जवळ ओढले . एखाद्या वेलीने मोठ्या डेरेदार वृक्षाला विळखा घालावा तशी ती त्याला बिलगली . दोघेही एकमेकांत मिसळून गेले. मेघनाद वारा प्यायलेला अश्वासारखा बेभान झाला होता . तो आत आत जात राहिला, रागिणीला परमसुखाची अनुभूती होत होती , एका निर्णायक क्षणी दोघेही त्या अंतिम बिंदूपाशी आले त्या अत्यानंदाच्या क्षणी रागिणीच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मेघनादचे शरीर घामाने भिजले होते. दोघेही शांत झाले. काही वेळ दोघेही ग्लानीत पडून राहिले . मेघनाद आता भानावर आला. त्याने हलकेच तिला दूर केले . रागिणीही भानावर आली . एक अनामिक भीती तिला वाटली . दोघांनीही जलद गतीने सर्व आवरले .
" मेघ , तू असा अचानक कसा आलास ? तुला कोणी पाहिलं नाही ना ? काही प्रॉब्लेम झालाय का ? " , तिने भराभर प्रश्न विचारले .
" अरे ,हो … हो … इतकी टेन्स का होतेस ? ये , इथे बस . मी तुझा वकील आहे , मी माझ्या आशिलाला भेटायला येऊ शकतो ना ? "
" पण तू असा मधेच कसा का आलास ? कोणी तुला पाहिलं तर ? " , ती आणखी गोंधळली .
" रागिणी , शांत हो , काही होत नाही . तुझा नोकर बाहेर जाताना पाहिला त्यानंतरच मी आलो . "
" हो , बरोबर आहे , म्हणूनच तर आणखी संशय येऊ शकतो . तू का आलायस ? "
" मला खूप आठवण आली तुझी , म्हणून आलो . " , तो मिश्किल चेहऱ्याने म्हणाला .
" वेडा आहेस तू … खरंच वेडा ! " , म्हणत ती पुन्हा त्याच्या मिठीत विसावली .
" मला माहित आहे . ”, तो म्हणाला आणि पाठोपाठ तिच्या हसण्याचा आवाज आला.
" मला तुझी किती आठवण येत होती म्हायतीये … आज खूप एकटं एकटं वाटत होतं. " , ती लाडात म्हणाली .
" मलाही . आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे . " तो म्हणाला .
" होईल ना सगळं व्यवस्थित ? " तिने त्याच्या डोळ्यांत बघत विचारलं . त्यावर होकारार्थी मान हलवत त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.
" तुला आपल्या प्लॅनवर काही शंका आहे का ? " , त्याने विचारलं.
" मुळीच नाही . "
“ बरं , ऐक , प्लॅन सतोशी नाकामोटो ला सुरुवात होणार आहे . तुला माहीत आहे की काय करायचं आहे . " मेघनाद असं म्हणाल्यावर रागिणी एकदम सतर्क झाली .
" ओके … प्लॅन सतोशी नाकामोटो ! मी तयार आहे ." ती ठामपणे म्हणाली .
" दॅट्स माय गर्ल ! मला तर बिचाऱ्या पोलिसांची दया यायला लागली. "
" पण तू तर म्हणाला होतास की प्लॅन सतोशी नाकामोटो वापरण्याची गरज पडणार नाही. मग अचानक असं का ? " रागिणीने विचारलं .
" मला थोडा वेळ हवा आहे . " , मेघनाद म्हणाला.
" आणखी किती वेळ लागेल ? "
" काही सांगता येत नाही . मार्केटवर अवलंबून आहे सगळं . पण माझ्या माहितीप्रमाणे जास्त वेळ लागणार नाही . " मेघनाद हे बोलत असतानाच दरवाज्याची बेल वाजली . दोघेही घाईघाईने हॉलमध्ये आले. रागिणीने दार उघडलं , पलीकडे तिचा म्हातारा नोकर भाजीपाला , आणि किराणा सामान घेऊन आला होता . त्याने पाहिलं, वकील मेघनाद निशाणदार हॉलच्या सोफ्यावर बसला होता आणि त्याच्या हातात काही कागद होते.
क्रमशः
माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे
https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx
Amazon link
https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...
Flipkart Link
https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...
मी पहिली. हाही भाग मस्तं.
मी पहिली. हाही भाग मस्तं.
भारी!
भारी!
चांगली सुरु आहे कथा..
चांगली सुरु आहे कथा..
छान. फक्त भाग थोडे मोठे टाकता
छान. फक्त भाग थोडे मोठे टाकता आले तर पाहा.
बाकी कथा उत्तमच चाललीय.