Visceral फॅट कसे कमी करावे?

Submitted by आस्वाद on 9 May, 2022 - 13:38

अनेक वर्षांपासून साठलेल्या visceral फॅटला (पोटावरची चरबी) कमी कसे करावे? रोजच्या जेवणात फारसे बदल न करता (तळण/पिझ्झा/गोडावर नियंत्रण ठेऊन) केवळ व्यायामाने कमी करायचं असल्यास कसा व्यायाम करावा? ऑनलाईन खूपच कॉन्ट्रॅडिक्टरी माहिती मिळतेय. कोणी म्हणतं १०००० स्टेप्स रोज चाला तर कोणी जिमला गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणतं. मला साधारण ५ किलो वजन कमी करायचंय. आठवड्यातून ५ दिवस तरी व्यायाम करू शकते, नव्हे करतेच आहे. आठवड्यातून ५ तास व्यायाम (चालणं किंवा घरी स्टेशनरी बाईक चालवणं) करणं पुरेसं नाहीये का? क्रॅश डाएट अनेकदा करून झालाय पण परिणाम शून्यच असतो. म्हणून आता अजिबात 'डाएट' करायचा नाही असं ठरवलंय. ज्यांनी स्वतः घरच्या घरी कायमस्वरूपी वेटलॉस केलाय, विशेषतः visceral फॅट कमी केलाय, त्यांनी कृपया आपले अनुभव, टिप्स/ट्रिक सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो बुवा Happy लहानपणापासून रिकाम्या पोटी सकाळी चहा प्यायच्या सवयीमुळे कदाचित ऍडॉप्ट झाले असेल...
आणि आता व्यसनच लागलेय.. सकाळी कॉफी घेतली नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटते...

मी हा youtube चॅनेल फॉलो केला होता. https://www.youtube.com/watch?v=ml6cT4AZdqI&t=410s

३० मिनिटात सगळे खाल्लेले आठवते आणि पुढच्या वेळेस खाताना HIIT workout आठवतो Happy

सहा महिन्यात १० किलो वजन कमी झाले होते. सोबत वीकली ५-१० KM रनिंग आणि फक्त घरचे जेवण.

मी पाच किमी रोज ब्रिस्क वॉकिंग आणि आयएफ करतोय खरं पण कार्ब्ज कमी करणे जमत नाहीये. तरी निदान एक पोळी कमी करणे आणि नट्स, सलाद खाणे करतोय ट्राय पण कितपत फायदा होईल् हे कळत नाहीये. वजन कमी करण्यासाठी चालणे कितपत फायदेशीर ठरते कि वेट् ट्रेनिंग करावे?

Pages