Visceral फॅट कसे कमी करावे?

Submitted by आस्वाद on 9 May, 2022 - 13:38

अनेक वर्षांपासून साठलेल्या visceral फॅटला (पोटावरची चरबी) कमी कसे करावे? रोजच्या जेवणात फारसे बदल न करता (तळण/पिझ्झा/गोडावर नियंत्रण ठेऊन) केवळ व्यायामाने कमी करायचं असल्यास कसा व्यायाम करावा? ऑनलाईन खूपच कॉन्ट्रॅडिक्टरी माहिती मिळतेय. कोणी म्हणतं १०००० स्टेप्स रोज चाला तर कोणी जिमला गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणतं. मला साधारण ५ किलो वजन कमी करायचंय. आठवड्यातून ५ दिवस तरी व्यायाम करू शकते, नव्हे करतेच आहे. आठवड्यातून ५ तास व्यायाम (चालणं किंवा घरी स्टेशनरी बाईक चालवणं) करणं पुरेसं नाहीये का? क्रॅश डाएट अनेकदा करून झालाय पण परिणाम शून्यच असतो. म्हणून आता अजिबात 'डाएट' करायचा नाही असं ठरवलंय. ज्यांनी स्वतः घरच्या घरी कायमस्वरूपी वेटलॉस केलाय, विशेषतः visceral फॅट कमी केलाय, त्यांनी कृपया आपले अनुभव, टिप्स/ट्रिक सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो काही व्यायाम कराल तो core muscles टाईट करून करा.. लवकर मसल्स डेव्हलप होतात.. चालतानाही core muscles टाईट ठेऊनच चालायचं.. सुरूवातीला कठीण वाटतं पण हळूहळू सवय होते.. अधिक माहीती युट्यूबवर मिळेलच

सायकलिंग आणि स्टेशनरी बाईक यामध्ये काही फरक असतो का? मी स्टेशनरी बाईक चालवते बाहेर जाण्यासारखं नसेल तर. ७-८ miles पाऊण तास. पण मला तरी फारसा काही फायदा झाल्याचं वाटलं नाही.

नुसत्या व्यायामाने होईल का माहित नाही.. पण डायट ने नक्की होते... ओव्हर कॉम्प्लिकेटेड करायचे नाही...
मला वजन कमी करायचे असेल तर मी फक्त एक सर्विंग भात कमी करतो...

वर पब्लिकनी लिहिलय तसं सोप्या ठेवायच्या गोष्टी. म्हणजे दररोज कॅलरी डेफिसिट ठेवायचा अगदी नियमीतपणे. व्यायाम पण सोपा ठेवावा कारण विगरस व्यायाम आणि तोही बराच वेळ केला की भूक पण खुप लागते. ८०% डायट आणि २०% व्यायाम ह्या बेसिस वर ४००-५०० कॅलरीचा डेफिसिट ठेवला की पुढे काही करायचं असेल तर फक्त पेशन्स ठेवणे. होतं कमी ते.

पोटा वरची चरबी कमी करण्या साठी प्लॅंक्स, कपालभारती, सर्व प्रकार चे क्रंचेस, बायसिकल, रशियन ट्विस्ट, लेग इन & आउट, आणि जमिनी वर उताणे झोपुन दोन्ही पाय काटकोनात वर आणणे आणि सावकाश खाली नेणे हे व्यायाम उत्तम आहेत. वर्क्ड फोर मी. जितके जमतात तेवढी आवर्तनं करायची, हळू हलू वाढवायची.

धन्यवाद सगळ्यांना.
मोटिवेशन साठी कोणते सपोर्ट ग्रुप्स माहिती आहेत का?

तुम्ही स्पेसिफिकली "व्हिसेरल फॅट" शब्द वापरला आहे म्हणून लिहितोय,

पोटावरची चरबी 2 प्रकारची असते
1) सबक्युटेनस फॅट - जी त्वचा आणि पोटाचे मसल यांच्या मध्ये असते. ही चरबी कमी झाली ( आणि abdm चे स्नायू बळकट केले) की 6 पॅकस दिसू लागतात

2) व्हिसेरल फॅट - abdmn स्नायूंच्या खाली, उदरपोकळी अवयवांभोवती साठेलेलं फॅट. हे कमी करणे जास्त कष्टाचे काम असते

स्पॉट रिडक्शन शक्य नाही, हे आता जवळपास सगळ्यांना मान्य आहे,
cal डेफिसित, व्यायाम यांनी ओव्हर ऑल फॅट लॉस होतो,
अमुक एका भागावरील फॅट कमी करणे (ते सुद्धा deep seated- hidden fat) शक्य नाही

पोटा वरची चरबी कमी करण्या साठी प्लॅंक्स, कपालभारती, सर्व प्रकार चे क्रंचेस, बायसिकल, रशियन ट्विस्ट, लेग इन & आउट, आणि जमिनी वर उताणे झोपुन दोन्ही पाय काटकोनात वर आणणे आणि सावकाश खाली नेणे हे व्यायाम उत्तम आहेत.
>>> मिसइंफॉर्मेशन... असे स्पॉट रिडक्शन होत नाही...

आयडी बदलून उपाशी अशी घ्या. तात्पर्य अन्न खाणे फूडी चव ढव ह्यावरील फोकस काढा. व आरोग्यावर ठेवा.

आयडी बदलून उपाशी अशी घ्या. >> Lol
कार्ब्ज कमी करून पोटाच्या घेराचा बऱ्यापैकी इंच लॉस केला आहे जवळच्या व्यक्तीने. सकाळी कडधान्ये, अंडी फक्त, दुपारी सॅलड आणि ताक , फुटाणे. रात्री 2 पोळ्या, भात अस नॉर्मल जेवण. पण हे करताना सुरवातीला 15 दिवस भूक फार सहन करावी लागते. शिवाय व्यायाम रोजच जॉगिंग , जीम एक दिवसाआड.
मी 2 दिवस ट्राय केलं. भूक सहन होत नाही. पोळी भाकरी खालल्याशिवाय पोट भरल्याचे समाधान होत नाही. कामात नीट लक्ष लागत नाही. रात्री डबल जेवलं जातं. त्यामुळं बंद केलं. बघू पुढं म्हणून. तुम्ही काही सुरू केलं आणि सातत्य राहीलं तर इथे नक्की लिहा. गायब होऊ नका. शुभेच्छा .

वर्णिता,
डाएट एकाला लागू पडले म्हणजे तसेच्या तसे दुसऱ्याला लागू पडेल असे नाही. पहिल्या व्यक्तीची cal requirement कदाचित कमीच असू शकेल, आणि तुमची जास्त, त्यामुळे तुम्हाला त्याच quantity मध्ये खाऊन भूक भूक होणे साहजिक आहे.

दुसरी गोष्ट सवय नसताना धाडकन आहार कमी करणे, आणि व्यायाम वाढवणे यामुळे शरीर डिस्टरब होण्याची शक्यता जास्त असते

सिम्बा , हो बरोबर आहे तुमचे. खरं इथं त्या व्यक्तीचा आहार माझ्याहून जास्त होता. असंही रोजच्या सवयीत बदल केला की थोडा त्रास होणारच. पेशन्स हवेत थोडे दिवस.

माझा अनुभव सांगतो. वजन ८५च्य घरात होतं. तशी उंची ६ फुट असल्याने जाड वगेरे दिसत नव्हतो, तरी पोट फार सुटलं होतं. शिवाय शरिराला जास्तं व्याप नसल्याने, थोडं फार चललं तरी दम लागत होता. पोट कमी करण्यासाठी काहीतरी डायट करावं असं मनात होतं. मी इंटरमिटंट फास्टींग करायचं ठरवलं. ह्यात दिवसातल्या २४ तासांपैकी आपली खाण्याची विंडो ८ तासाची आणि उपास १६ तास असा सधारण प्रकार आहे (नेटवर खुप माहिती आहे, नक्की बघा). ठरवलेल्या ८ तासात खाण्यावर अशी काही बंधणं नाहीत, पण काहिही आणि कितिही खाऊ नये. मी सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करुन डायरेक्ट १२.३० - १ वाजता जेवण घ्यायचं ठरवलं. तसही ऑफिसात कामामुळे भुकेकडे लक्ष नसतं. १६ तसाच्या उपासात तुम्ही झिरो कॅलरी ड्रिंक्स घेउ शकता. तर माझा दिनक्रम असा…

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबु पिळून पिणे.
९ - ९.३० ला ब्लॅक कॉफी (नो मिल्क - नो शुगर) - हि भुक सप्रेस करते
१ वाजता जेवन - ह्यात पहिले १ ककडी, १ टोमॅटो, १ गाजर, १ ढोबळी मिरची आणी उकडलेले अंडे किंवा पनीर क्युब्ज घालुन केलेले सॅलड (विथ ऑलिव ऑईल ॲन्ड इटालियन सिझनींग). सोबत २ चपाती भाजी - किंवा भात आणि आमटी/वरण.
४ वाजता - ब्लॅक कॉफी, ड्राय फ्रुटस मूठभर. भाजलेले शेंगदाने बऱ्याचवेळा.
५-६ वाजता १ फळ (केळ, पेरु, सफरचंद काहिही)
७.३० ला डिनर - ह्यात अख्या काकडीची किंवा गाजराची दह्यातली कोशींबिर, किंवा मोडीची उसळ, किंवा कच्या मोडीचे सॅलड, सोबत वरच्या प्रमाणे चपाती भाजी किंवा भात आमटी किंवा दोन्ही (पण प्रमाणात)

खाण्यातले बदल म्हणजे - ओटस विथ ड्राय फ्रुट्स, ब्राऊन ब्रेड सँडविच, ऑमलेट, फ्रेंच टोस्ट, थालीपीठ, डोसा / इडली, वगेरे. हवे तसे किंवा जे आवड्ते त्या प्रमाणे खाण्यात बदल करु शकता. साखर शक्यतो खाल्लीच नाही. आणि जी खाल्ली ती अगदीच कमी. जिथे गोड पाहिजे तिथे हनी वापरलं. ड्राय फ्रुट्स सोबत मनुका किंवा खजुर.

मी फळं भाज्या ह्यावर बराच भर दिला, कारण कॅलरीज कमी आणि जास्तं फिलींगही वाटतं. शिवाय मला सॅलड आवडतं पण.

दुसरं म्हणजे कॅलरी डेफिसिट क्रिएट करणे... हे नाही केलं तर चरबी अन पर्यायाने वजन कमी होणार नाही. ह्यासाठी तुम्हाला तुमच्या वय आणी वजनाप्रमाणे दिवसात सधारण किती कॅलरीज लागतात ते बघा. अन्नातुन ह्या पेक्षा किमान २०० कॅलरीज कमी करा (जास्तं जम्ल्यास उत्तम). सोबत कार्डिओ पण हवा... ज्यात दररोज सधारण ३०० ते ५०० कॅलरीज बर्न होतील असं टार्गेट ठेवा. सोबत वेट्स चा व्यायाम करता आला तर उत्तम (मला हे जरा बोरींग वाटते, अन त्यामुळे होतही नाही).

नियमीत पणे केलं तर १-२ महिण्यात नक्कीच फरक पडेल.

फेब च्या सुरवतीला माझं बजन ८५ होतं ते मार्च च्या शेवटी ७७ वर आलं. त्यनंतर फास्टींग कायम ठेवलं तरी नियम अजुन सैल केले, कर्डिओ पण कमी केला... मागच्या १ महिण्यात आहे ते वजन कायम आहे.

तर तुम्हाला जे सुट होते ते बघा आणि नियमीत पणे करा. सातत्य महत्वाचं.

मिसइंफॉर्मेशन>> योग्य इन्फो. आहे. ट्रेंड सर्टिफाईड कोच कडून मिळालेली आणि मला स्वतःला वापरून फरक दिसलेली.
बाकी डायट बद्दल माहित नाही म्हणुन मी उगाच राईस कमी करा वगैरे आगा पिछा नसलेली माहिती दिली नाही.

सिम्बा ह्यांच्या पोस्ट्स चांगल्या आहेत. अ तिरेक टाळणे आणि आपापल्या शरीर रचनेप्रमाणे व्यायाम, आहार ठेवणे हेच योग्य असते.

ashu -स्पॉट रिडक्शन होते असे म्हणणारा कोच आधी बदला ... बनवतोय नक्कीच...लोक फसतात म्हणून अशांचे फावते...

रीडक्शन सगळीकडे होते, आपले खेदयुक्त लक्ष आरश्यात आधी स्पॉट वर जात असल्याने आपण त्यालाच स्पॉट रिडक्शन गृहीत धरून खुश होतो. शिवाय चालू करणाऱ्या लोकांचा मुख्य एम स्पॉट रिडक्शन असल्याने तो डोक्यात धरून जास्त मोटिव्हेशन ने व्यायाम केला जात असेल म्हणून कोचेस असं सांगत असावे.
मी घाईत खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत, मला माफ करा Happy

युवी२०१५, माझी अगदी तशी स्टोरी आहे. मलाही खुप फरक पडला आय एफ मुळे. एकच आवर्जून सांगतो मात्र, ते ब्लॅक कॉफीच्या मुद्द्या कडे लक्ष द्यायला हवं. पोटात काहीही नसताना ब्लॅक कॉफी, त्यात अमेरिकेत असाल तर तिथे तर खुप जास्त मिळते कॉफी, ते जपून किंवा न केलेलच बरं. मी मुद्दाम ब्लॅक कॉफी प्यायला सुरवात नाही केली. आधी बरीच वर्ष घेत होतो पण तेव्हा मी ब्रेकफास्ट करायचो आणि त्याबरोबर कॉफी असायची. आय एफ मध्ये मी ब्रेफा बंद केला आणि फक्त कॉफी ठेवली. खुप खुप नडली मला ती सवय. म्हणजे लगेच काही नाही झालं पण हळू हळू अ‍ॅसिड रिफ्लक्स मुळे छाती मध्ये प्रेशर यायला सुरवात झाली. स्टमक लायनिंगला पण इजा झाल्याची शक्यता आहे माझ्या आणि आता साधारण ३ वर्षांनी गोष्टी हळू हळू नॉर्मल ल येत आहेत. कॉफी एवेजी पाणी प्या हवं तर. पण डार्क कॉफी आधी काही खालल्याशिवाय कृपया घेऊ नका कोणीच.

धन्यवाद सगळ्यांना.
मी मागच्या वर्षी ४ किलो वजन कमी केलं होत. पण महिना-दीड महिना इंडियाला गेले. तिथे रोज मेजवान्या शिवाय नुसता आराम. मग परत आल्यावर आलेल्या slump मुळे परत २ किलो वजन वाढलं. आता परत सेम डाएट करायचं नाहीये. आणि ४ किलो वजन कमी करायचंय.

मुळात माझं खाण्याच्या बाबतीत खूप कमी नखरे आहेत. मी ठरवलं तर काहीही खाऊ शकते. मी मागे मेडिकल कारणासाठी dietician नि दिलेला प्लॅन फॉलो केलाय ४ महिने. तेव्हा लक्षात आलं की मला गोड कितीही आवडत असलं तरीही मी आरामात सोडू शकते. प्रश्न डाएटचा नाहीये, माझं मेन confusion व्यायामाबद्दल आहे. काय आणि किती व्यायाम करावा, हे समजत नाहीये.
काल हा विडिओ पहिला. पटतंय हे: https://www.drnitingupte.com/science-of-exercise/

aashu29, च्रप्स, सिम्बा: स्पॉट reduction शक्य नाहीये, हे बरोबरच आहे. पण एकूणच व्यायाम केल्याने calories बर्न होणार आणि त्याने वजन कमी होणार. इव्हेन्च्युली जिथे जास्त फॅट साचलंय तिथलं कमी होणार, असं काही लॉजिक असेल.

वर्णिता: हो, म्हणूनच क्रॅश डाएट नाही करायचंय. ते हेल्थी पण नाहीये आणि मला घाई पण नाहीये.

युवी२०१५: धन्यवाद तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल. आणि अभिनंदन तुमचं. हो, IF डाएट बघितलंय. त्यात मला २:५ पॅटर्न जास्त चांगला वाटतोय. त्यात २ दिवस उपास (५०० calories) आणि बाकी ५ दिवस नॉर्मल जेवण आहे.
माझ्या lifestyle साठी हे जास्त सोप्प वाटतंय.

वैद्यबुवा: धन्यवाद, ब्लॅक कॉफीचं लक्षात ठेवीन. होप यु फील बेटर सून.

आय एफ चा फायदा मलाही जबरदस्त झाला आहे. पण आता परत सुरु करायचे आहे. नीट होत नाहीये.
बाकी ब्लॅक कॉफी एकदा आयुष्यात घेतलेली. नाही आवडत.
ब्लॅक टीने तर जबरदस्त अ‍ॅसिडीटी झाली होती.

वजन ड्रास्टिकली कमी करायला आय एफ चा फायदा खुप होतं. म्हणजे ते १६/८ विंडो वगैरे जमली तर. तशी जमायला पण सोपी असते ती कारण वर युवींनी लिहिलय तसं ब्रेकफास्ट स्किप करणं खुप सोपं जातं आणि कामाच्या नादात फार भुकेचा वगैरे प्रश्न नाही पडत. आपण ३ वेळा खातो (ब्रेफा, लंच, डीनर) तेव्हा नाही म्हणलं तरी आपल्या कॅलरिक रिक्वायरमेंटपेक्षा जास्त खाललं जातं. खाण्याची विंडो फक्त ८ तासच केली आणि त्यात दोन किंवा जास्तीत जास्त ३ वेळा खाललं तरी खुप कॅलरी जात नाही कारण माणूस एकाच वेळी खुप जास्त नाही खाऊ शकत. इथेही कोणी अतिश्योक्ती करू शकतं पण सहसा हा उपाय लागू पडतो.
आय एक मी साधरण १.५ वर्ष तरी केलं पण ह्या अ‍ॅसिड रिफ्लक्स च्या प्रॉबलेम मुळे मग सोडावं लागलं. आय एफ मध्ये एकंदरित कॅलरी कमी जातात आणि त्यामुळे वजन कमी होतं पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कार्ब्स. आय एफ सोडल्यावर मी निव्वळ कार्ब कंट्रोल (जमेल तसा) वर वजन आटोक्यात ठेवलय. सेलेब्रिटी लोकं करतात तसलं अगदी काटेकोर डायट तर आपण नाही फॉलो करु शकत पण जे काही खातो त्यात कार्ब्स थोडे कमी ठेवले तर खुप फरक पडतो. सध्या मी आय एफ सारखं दोनदाच जेवतो आणि त्यात सुद्धा जमेल तसे कार्ब्स कमी ठेवतो. वजन कंट्रोल मध्ये असेल आणि तुम्हाला डे टु डे लाईफ मध्ये उत्साही वाटत असेल तर तेवढं पुरेसं आहे. खुप जास्त वजन कमी आणि मग फॅट परसेंट वगैरे मॉनिटर करायला गेलं की गाडी रुळावरुन घसरायची शक्यता जास्त असते. जेवढं सिंपल आणि मॅनेजेबल ठेवता येइल तेवढं बरं. आणि हो, हे बदल कायमस्वरुपी केले पाहिजे. वजन कमी होउ पर्यंत एकदम काटेकोर अन नंतर सगळं सोडून दिलं ते नाही चालणार.

मी व्हिसेरल फॅट ७ वरून ४ वर आणले मागच्या वर्षी आणि १७ पाउन्ड्स वजन सुद्धा कमी केले. ऑनलाईन डाएट प्रोग्राम घेतला होता ९ आठवड्याचा आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आहारात विशेष बदल नव्हता, रोजचे नेहेमीचे जेवण (कन्ट्रोल मधे) आणि मध्यम अ‍ॅक्टिव लाईफ स्टाईल. W For Women Workout म्हणून अ‍ॅप आहे..त्यात छान व्यायाम आहेत, ते फॉलो करते मी.

इंटरेस्टिंग- मी रोज ब्लॅक कॉफी पितो- आता अल्मोस्ट 7 वर्ष झाली...
मला अजून तरी त्रास झाला नाही... मी मॅकडी ची घेतो...

Pages