आई अमर आहे...

Submitted by अतुल. on 8 May, 2022 - 05:14

ई कधी जात नसते
नेहमी आसपास असते
देहाने जरी उरली नाही
तरी अनेक रुपात असते
आई कधी जात नसते ||१||
.
वात्सल्य अमर असते
पुन्हा पुन्हा येत असते
प्रत्येक बाळा सोबत
जन्म पुन्हा घेत असते
आई कधी जात नसते ||२||
.
जाते पण जेंव्हा ती
जग सुन्न करत असते
स्वप्नात येऊन मात्र
पाठीवर हात फिरवत असते
आई कधी जात नसते ||३||
.
'आई' या हाकेला
पुन्हा उत्तर देत नसते
परी नवीन बाळासाठी
पुन्हा ती हजर असते
आई कधी जात नसते ||४||
.
आई कधीच जात नसते
.
- अतुल
(रविवार, ८ मे २०२२)

Group content visibility: 
Public - accessible to all site users