नाटक , दशावतार , संगीत नाटक , तमाशा, कीर्तन इ करमणूक प्रकार अखेर चित्रपट प्रकारात विलीन झाले आणि बघता बघता त्याचे प्रस्थ वाढत जात आहे.
1. पूर्वी सिनेमा बघणे ही एक हौस होती , पडदे लावलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये 5 रुपयात सिनेमे दिसायचे , मॉलमध्येही आधी 70 रु तिकीट होते.
2. पण साधारण पणे वर्षाला 3,4 चित्रपट एखादे कुटुंब बघायचे, त्यातले एखादे वार्षिक परीक्षेनंतर , एखादे दिवाळीत , मध्ये एखाद दुसरा.
3. पण आता चित्रपट इतके धो धो येतात की हे एक्स्पोजर फार वाढले आहे. सरासरी महिना एक तरी ?
4. याशिवाय युट्युबवर फुकट बघणे उपलब्ध आहे. रोज एक तरी , अर्धा तरी होतोच
5. ओटीटीमुळे तर घरीच थिएटर पोचले आहे. वेळात वेळ काढून ऑफिस , लोकल , बस इथेही मोबाईल खिडकीत लावून लोक सिनेमे बघतात
6. बरे , हे जरी पाहिले तरी हे फार सांस्कृतिक असतात असेही नाही, खून , अपराध , फसवणूक , विवाहबाह्य संबमध इ जॉनर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
7. पूर्वी सिनेमेवाले व जाहिरातवाले वेगळे होते, आता दोन्हीकडे तेच लोक काम करतात व प्रॉडक्ट्स महाग करून ठेवतात.
8. सिनेमेवाल्यावर मायापुरी वगैरे मासिके निघायची, तीही दर्जेदार असायची. आता गुगल , फेसबुक , युट्युब, वर्तमानपत्रे ह्यात ह्यांचाच बुजबुजाट भरलेला असतो.
एकंदर वैचारिक प्रदूषण , आर्थिक हानी, साधन संपत्तीची नासाडी यापलीकडे हे काहितरी चांगले करत आहेत का ? ? चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का ?
होतं असं! एकदा केसातून हात
होतं असं! एकदा केसातून हात फिरवा >> कुणाच्या?
अय्या!
अय्या!
शा मा, पोस्ट आवडली.
शा मा, पोस्ट आवडली.
काही सिनेमात लॉजिक शोधायचं नसतं जसे अमर-अकबर, हेराफेरी, स्टुडंट ऑफ दि... आणि काही सिनेमात लॉजिक व्यवस्थित दाखवलेलं असतं जसं हजारो ख्वाईशे, बदलापूर इ. हे कुणी ठरवून करत नाही. सिनेमा बघता बघता त्याची धाटणी आपोआप लक्षात येते. बोअर होत ते धड ना इकडे धड ना तिकडे अशा त्रिशंकू सिनेमांचा (उदा: झिम्मा!!).
तंत्रज्ञानामुळे करमणुकीचा
तंत्रज्ञानामुळे करमणुकीचा दर्जा वाढलाय. करमणूक नेत्रसुखद आणि नयनरम्य झालीय. बाकी बुद्धिगम्य, मनोरंजक हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे. ज्याची त्याची पाच ज्ञानेंद्रिये जो संदेश मेंदू/ मन/ बुद्धीला पाठवतील त्या प्रमाणे त्याच्या मेंदू/ मन/ बुद्धीला ते ते आकळेल.
दोन घटका विरंगुळा म्हणून फॅन्टसीलँड मध्ये फिरून येणारेही पुष्कळ आहेत.
बोअर होत ते धड ना इकडे धड ना
बोअर होत ते धड ना इकडे धड ना तिकडे अशा त्रिशंकू सिनेमांचा (उदा: झिम्मा!!).
>>>>
अरे देवा ईथेही झिम्मा नको आता
पण मला वाटते हा कळीचा मुद्दा आहे <<<<हे कुणी ठरवून करत नाही. सिनेमा बघता बघता त्याची धाटणी आपोआप लक्षात येते >>>> सिनेमाची धाटणी कशी आहे हे प्रेक्षकच ठरवत असतील तर त्यात मतमतांतरे असणारच. जसे झिम्मा ईकडचा आहे असे काही जणांनी ठरवले, झिम्मा तिकडचा आहे असे काही जणांनी ठरवले, यावरून झिम्मा ना धड ईकडचा आहे ना तिकडचा आहे हे काही जणांनी ठरवले. मला वाटते झिम्मा हा सैराटसारखा आहे. काही गंभीर विषय हलकेफुलके करून पोहोचवले. फरक ईतकाच झिम्मामध्ये शेवट गोड केला. आशादायी केला. पण सैराटमध्ये शेवट कडू केला. तो शेवट कडू केल्याने तो वास्तववादी वगैरे पिक्चर झाला. असे मला या दोन चित्रपटांची धाटणी बघून वाटते.
सर एक्स मॅन गेला होय आयडी
सर एक्स मॅन गेला होय आयडी तुमचा ?

तेच म्हटलं जुन्या आयडींचा वापर कसा काय सुरू केला पुन्हा
चित्रपटांचा नाही पण चित्रपट
चित्रपटांचा नाही पण चित्रपट समीक्षकांचा overdose झाला आहे, प्रत्येक जण समीक्षक झाला आहे
नवे कपडे बदलून, सर आले धावून
नवे कपडे बदलून, सर आले धावून
समीक्षक गेले वाहून
दिवसेंदिवस आदर वाढतच चालला
दिवसेंदिवस आदर वाढतच चालला आहे तुमच्या बद्दल>>> हे एकदम बरोबर
Pages