गझल

Submitted by JPrathamesh on 30 January, 2022 - 16:16

शोधतो मी ज्या सुखाला ते मिळाले आजला
भोवती अंधार होता तोच आता संपला

पावसाळी या नभाच्या ओथंबल्या भावना
चातकाला या मनाच्या तो सुगावा लागला

दूर होती ती तरी प्रेमात नाही अंतरे
माळलेल्या त्या फुलाला गंध त्याचा भोवला

मोरपंखी केश होते गोड होता चेहरा
लाजताना त्या कळीने डाव थोडा साधला

..... प्रथमेश प्र. जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह!!! सुपर्ब. शेवटचे कडवे (२ ओळी) आवडलेच.
>>>पावसाळी या नभाच्या ओथंबल्या भावना
चातकाला या मनाच्या तो सुगावा लागला
या ओळीही मस्त.