Submitted by यक्ष on 29 January, 2022 - 01:18
मे २०२२ मध्ये खालील कार्ये नियोजित आहेत.
१) मातोश्रींचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
२) वास्तु
प्रश्न असे आहेत...
१) असे ऐकण्यात आहे की होम हवनादी कार्यक्रम त्या दिवशी करणे फलदायी आहे ज्यादिवशी 'अग्नितत्व' हे भूतलावर वास करणारे असेल. वरील दोन्ही कार्यात होम अपेक्षित आहे (कार्ये वेगवेगळ्या दिवशी). मला १६ मे २०२२ ही तरिख वास्तुसाठी वाचनात आली (Drikpanchang) पण त्यादिवशी अग्नितत्व' हे भूतलावर वास करणारे नाही. तर हे शक्य आहे कां?
२)वास्तु व सहस्त्रचंद्रदर्शन गुढीपाड्व्यानंतर २ दिवसांच्या फरकाने लागोपाठ केल्यास चालते कां?
३) सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात (वडिल हयात नाहीत) काय काय करणे योग्य?
दोन्ही सोहळे आनंदासाठीच करावयाचे आहेत पण रितीरिवाजानुसार झाल्यास मनःशान्ती लाभेल. जाणकारांची मते अपेक्षित व त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मते वास्तुशांत हा
माझ्या मते वास्तुशांत हा आनंदासाठी नसतो, आपण घर बांधल्याने तिथले झाडे , प्राणी नष्ट होतात , या पापाचे परिमार्जन म्हणून व त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वास्तुशांत विधी असतो.
त्यामुळे हे दोन्ही प्रकार वेगळ्या दिवशी घडावेत, पण आजकालच्या वेगवान जगात तुमचे गुरुजी मार्ग काढतील तो स्वीकारा
दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी
दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी करता येईल, माझ्या आजेसासूबाई च सहस्रचंद्रदर्शन आणि चुलत सासर्यांच्या घराची वास्तूशांत एका दिवशी केली होती.
मी जाणकार नाही .
मी जाणकार नाही .
एक दोन वास्तुशांतिला गेल्यावर समजले की दुपार दोनपर्यंत होमहवन मंत्रपठण वगैरे झाले. मग जेवणं.
संध्याकाळी आणखी चंद्रदर्शनासाठी वेळ लागेल.
सहस्त्रचंद्रदर्शनसाठी 'सवाष्ण
सहस्त्रचंद्रदर्शनसाठी 'सवाष्ण' असणे जरूरी नाही. जशी श्रद्धा असेल तसे होम इ सांगतात. पण नसेल श्रद्धा किंवा तितका वेळ तरी सामान्यपणे पतवंडांना बोलावले जाते. पणजीच्या मांडीवर बसून चांदीच्या वाटीत साखर/ बत्तासा खाणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम असतो. पतवंड नसेल तर नातवंडातील कुणी बोलवावे. लांबचं पतवंडही चालतं. ८१ नोटांची/सुक्या मेव्याची माळ, ८१ दिव्यांनी औक्षण, ८१ पुस्तके दान असे जे जमेल ते करावे. (या निमित्ते ८१ ग्रॅम सोने विकत घेणारी मंडळी ही ऐकीवात आहेत.) स्थळ्/काळ/आवड नुसार बदल करावे.
सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे
सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे किती वर्षे??
८० पूर्ण झाल्यावर करतात
८० पूर्ण झाल्यावर करतात बहुतेक
८१ पूर्ण लागतं. ८१ वर्ष नि १
८१ पूर्ण लागतं. ८१ वर्ष नि १ महिना म्हणजे १००० पौर्णिमा होतात. हल्ली ८१ पूर्ण नंतर कधीही जमेल तसं करतात.
81 x 12 = 972
81 x 12 = 972
81 वर्षात 27 अधिक मास 27
999
1 राहिला की काय
----/-//-------
की 81 वर्षात 20 अधिक मास
992
अधिक गर्भावस्थेतील 8
मिळून 1000
------
इथे आहे
सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात किती पैर्णिमा पाहिल्या आहेत, म्हणजे किती पौर्णिमा होऊन गेल्या आहेत.
तसा हिशोब करता ८०वर्षात दरसाल १२ प्रमाणे होतात ९६०, अधिक महिने येतात २७ म्हणजे त्या झाल्या २७ एकंदर झाल्या ९८७ तर १०००ला कमी पडत्तात
१३. म्हणून ८१ वर्षे १ महिन्यानंतर सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करावा.
http://2g3svp.blogspot.com/2020/06/blog-post_7.html?m=1
ब्लॅककॅट, गर्भावस्था नाही
ब्लॅककॅट,
गर्भावस्था नाही धरत. १००० व्या चंद्रदर्शनाला करतात. म्हणजे ८१ पूर्ण हवे. त्याचे बरोबर ९९९ मोजलेत आणि नंतर येणारी पहिली पौर्णिमा - तो १००० वा चंद्र.
चांद्रमास २९.५ दिवसांचा असतो.
चांद्रमास २९.५ दिवसांचा असतो. वर्षांत १२ सूर्यमास येतात पण त्यापेक्षा अधिक चांद्रमास येतात. म्हणून आपण अधिक महिना धरतो. रमदान पुढे सरकर रहातो इ. २९.५ * १००० /३६५ = ८०.९
33 इंग्रजी महिन्यांत 34
33 इंग्रजी महिन्यांत 34 पोर्णिमा येतात.
९५७ महिने = ९८६ पोर्णिम
८० वर्षे(९६० महिने) ११महिने. = १०००पोर्णिमा
http://youtu.be/RfDZ39Pjy5M
http://youtu.be/RfDZ39Pjy5M
सगळ्यांच्या मतांसाठी धन्यवाद!
सगळ्यांच्या मतांसाठी धन्यवाद!
सीमंतिनी आपल्या सूचना आवडल्या...
मी पाहिलेल्या लिंक्स...
https://mooncounter.com/index.html
https://www.drikpanchang.com/jyotisha/kundali/utilities/sahasra-purna-ch...
२ वर्षे २७० दिवसांनी सहस्त्र
२ वर्षे २७० दिवसांनी सहस्त्र सूर्यदर्शन हा सोहळा पण केला पाहिजे खरं तर. सोहळ्यात लोकांना भोजन मिळाले की उत्तम.
२ वर्षे २७० दिवसांनी सहस्त्र
Duplicate
सहस्त्रचंद्रदर्शनाबद्द्ल एवढ
सहस्त्रचंद्रदर्शनाबद्द्ल एवढ सविस्तर पहिल्यांदाच वाचल. गणित आवडलं.
पण त्यादिवशी अग्नितत्व' हे
पण त्यादिवशी अग्नितत्व' हे भूतलावर वास करणारे नाही. तर हे शक्य आहे कां?>> नाही सर्व तत्वे कायम ह्या ग्रहावरच असतात की नाहीतर प्रचंड उलथापालथ घडून येइल.
एक प्रश्न होता, वेगळा धागा
एक प्रश्न होता, वेगळा धागा काढत नाही इथेच विचारतो :-
घरातील दोन जेष्ठांचे सहस्त्रचंद्रदर्शन ड्यू होईल थोड्याच दिवसात.
दोघे भाऊ विधुर आहेत - एक प्रचंड धार्मिक आणि दुसरे दुसऱ्या टोकाला आहेत (त्यांना केक-शॅम्पेन थीम पुरेल)
कोणते धार्मिक विधी करतात या कार्यक्रमामध्ये ?
आणखी काय काय करता येईल ?
कोणते धार्मिक विधी करतात या
कोणते धार्मिक विधी करतात या कार्यक्रमामध्ये ?
आणखी काय काय करता येईल ?
Any leads ?