श्री. ना. पेंडसे यांच्या ऑक्टोपस कादंबरीचे नाव तेच का आहे ?

Submitted by शुभम् on 16 December, 2021 - 13:32

माझी नुकतीच ऑक्टोपस ही कादंबरी वाचून पूर्ण झाली . कादंबरीच्या सुरुवातीला त्यांनी

ऑक्टोपस हे एका जलचर प्राण्याचं नाव आहे . त्याला आठ नांग्या असतात . या नांग्यांनी तो आपलं भक्ष्य पकडीत असतो . या प्राण्याला मराठीत नाव नाही .

एवढाच काय तो खुलासा केला आहे . तसे क्वचितच कादंबरीकार कादंबरीच्या नावाविषयी सांगतात . वाचकांनीच काय तो अर्थ काढावा असंच असतं ना ? .

बर्‍याचदा पुस्तक संपल्यानंतर शेवटी ते नाव का दिलं हे समजतं . ही कादंबरी संपल्यानंतर मात्र मला ते स्पष्टपणे कळालं नाही .

कादंबरी संपल्यानंतर ऑक्टोपस या प्राण्याविषयी मी इंटरनेटवर थोडीफार शोधाशोध केली .

त्याला तीन हृदयं असतात , रक्त निळ्या रंगाचं असतं आणि शरिरात एकही हाड नसतं , त्यामुळे तो कुठेही सहजपणे घुसू शकतो .

लालजी , मंजु व मिनी या तिघांच्या नात्यात असलेला तिढा सोडवण्यासाठी नंदा हा लालजीचा भाऊ सुरुवात करतो .

तीन हृदयाचा काही संबंध ? एवढा शब्दशः किंवा सरळ सरळ अर्थ असणार नाही किंवा असेलही .

एक मात्र खरं की नंदा हा जसा जसा यांच्या नात्यातील तिढा सोडवत जातो तसतसं त्याचं आयुष्य मात्र अधिक गुंतागुंतीचं होत जातं . सुरवातीला सुखी समाधानी असणारा नंदा शेवटी मात्र बऱ्याच अडचणीत सापडतो .

ऑक्टोपस ही उपमा नक्की कशाला दिली आहे ? व कोणत्या अर्थाने दिली आहे ?

इंटरनेटवरती शोधाशोध करताना कुठेतरी वाचलं की नात्याचा ऑक्टोपस .

ऑक्टोपसला आठ नांग्या असतात म्हणून त्याच्या तावडीतून सुटणे अवघड असते अशा अर्थाने हा शब्द वापरला आहे का ?

कारण नंदाचे तसेच झालेले आहे . मोठ्या भावाच्या जवळपास तुटलेल्या घराला जोडण्यासाठी नंदा प्रयत्न करतो . भावाचं आयुष्य काही प्रमाणात सुधारतं पण त्याचं आयुष्य मात्र जास्त किचकट बनत जातं .

मी काही विचार केला , मला तरी काही जास्त कळेना म्हणून विचारतोय , तुम्हाला काय वाटतं ?

ऋषिकेश गुप्तेंची चौरंग ही कादंबरी त्या पूर्वी वाचली होती .
त्यात राधा , राजा , सदानंद व राजाचा वडील या चौघांच्या नात्यांचा चौरंग म्हणून चौरंग नाव दिले असावे असा समज करुन घेतला होता .
तो कितपत पटतो ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users