Submitted by गजानन on 21 November, 2021 - 07:07
नमस्कार,
3D painting साठी तुम्ही कोणती सॉफ्टवेअर्स वापरता? ती फोन/संगणकावर वापरताना आणखी काही हार्डवेअर (डिजीटल पेन/पॅड इ.) लागते का? मी मायक्रोसॉफ्ट paint 3D थोडेफार वापरले आहे पण त्यात खूपच मर्यादा येतात असे वाटले.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला नक्की काय करायचं आहे
तुम्हाला नक्की काय करायचं आहे ३ डी मध्ये?
अॅनिमेशन्स हवी आहेत की कसं?
ब्लेंडर आणि स्केचप दोन्ही फुकट ऑप्शन्स आहेत, अन या दोघांसाठी चांगल्यापैकी डीटेल ट्युटेरियल्स यूट्यूबवर आहेत. बेसिक विंडोज १० चालेल अशा ४-६ जीबी रॅम अन कोअर आय३ च्या पुढे वाला प्रोसेसर असेलेल्या ककॉम्प्युटरवर व्यवस्थित चालतात.
इंटेरियर डिझायनिंगसाठी एक स्वीटहोम ३ डी नावाचं फ्री सॉफ्टवेअर आहे. माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार मी त्यात नॉन-आर्किटेक्चर रिलेटेड चित्रं बनवत असतो. नेहेमीची सवय म्हणजे ज्या कामाचे सॉफ्टवेअर आहे ते वेगळ्या कामासाठी वापरणे. उदा. पॉवरपॉइंट वापरून चित्रं काढणे, छोटे अॅनिमेटेड सिनेमे बनवणे असे उद्योग असतात.
आ.रा.रा. धन्यवाद. तुम्ही
आ.रा.रा. धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बघतो.
अॅनिमेशन नसले तरी चालेल, सध्या तशी गरज नाही. एखाद्या वस्तूचे (उदा. एखादी वैशिष्ट्यपूर्ण लाकडी खुर्ची) मॉडेल बनवून तिचे टॉप, फ्रंट, साईड इ. व्ह्यूज 'सेव्ह अॅज इमेज' करता आले, तरी माझी गरज भागण्यासारखे आहे. MS paint 3D मध्ये हे करता येते पण तेथे जे 3D ऑब्जेक्ट्स उपलब्ध आहेत ते फारच मर्यादीत आहेत. पोकळ अर्धगोल (म्हणजे जो वाटीप्रमाणे आतून खोलगट आहे. भरीव नाही.) काढणे मला MS paint 3D मध्ये करता आले नाही. (मला https://www.maayboli.com/node/80411 या धाग्यातील पोस्टींमध्ये जशी चित्रे आहेत, तशी चित्रे काढायची आहेत.)
इन दॅट केस, स्केचप
इन दॅट केस, स्केचप तुमच्यासाठी आहे.
http://www.sweethome3d.com/ हे देखिल तुमच्या खूपच कामाचे आहे.
आ.रा.रा. धन्यवाद.
आ.रा.रा. धन्यवाद.