Submitted by पार्वती on 18 November, 2021 - 04:26
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/11/18/IMG_0389.jpeg)
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी लाल चवळी
२०० ग्रॅ लाल भोपळा लहान तुकडे केलेला
अर्धा नारळ खवलेला (दोन भाग करा)
१/२ चमचा जिरं
१ लसणाची कळी
मीठ
फोडणीसाठी :
नारळाचं तेल
मोहरी
सुक्या लाल मिरच्या
कढीपत्त्याची पानं
क्रमवार पाककृती:
चवळी ८-१० तास भिजवून ठेवा.
कुकरमध्ये पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
कुकर थंड झाला की त्यातच लाल भोपळा घालून कुकरची आणखी एक शिटी काढून घ्या.
तोपर्यंत खवलेल्या नारळाचा अर्धा भाग, जिरं आणि लसणाची पाकळी वाटून घ्या.
कुकर थंड झाला की त्यात हे वाटण घालून १० मिनिटं उकळून घ्या.
नारळाचं तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी करून ती उसळीवर घाला.
त्याच कढईत उरलेला नारळ छान तांबूस होईस्तोवर भाजा आणि खमंग भाजलेल्या नारळाचा चव उसळीवर घालून ढवळून घ्या.
एरिशेरी तय्यार, गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर गट्टम करा.. (हे सांगायची गरज नोहे).
वाढणी/प्रमाण:
३-४लोकांसाठी
माहितीचा स्रोत:
केरळी मैत्रिणीची आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त!
मस्त!
अगदीच लगदा होईल ना? काय चव
अगदीच लगदा होईल ना? काय चव लागत असेल..... शंकाच वाटते..
हे कुट्टु टाईप वाटतंय.
हे कुट्टु टाईप वाटतंय.
भाताबरोबर मस्तच लागत असेल.
बिलकूल लगदा होत नाही. चवळीची
बिलकूल लगदा होत नाही. चवळीची चव छानच लागते. लाल भोपळ्यामुळे रस्सा दाट होतो. भोपळा आहे हे कळतसुद्धा नाही. विशेष म्हणजे मसाले काहीच नाहीयेत ह्यात.
हो ना..लगदा होणार नाही का?
हो ना..लगदा होणार नाही का?
thnx रेसिपी share केल्याबद्दल...करून बघेन.
हो ना..लगदा होणार नाही का?
हो ना..लगदा होणार नाही का?
thnx रेसिपी share केल्याबद्दल...करून बघेन.
छान पाककृती. करून बघेन
छान पाककृती. करून बघेन (म्हणजे खाईन).
लगदा होईल असे वाटत असेल तर कुकरमधे चवळी शिजवण्या ऐवजी पातेल्यात शिजवता येईल. चवळी शिजत आली कि त्यात भोपळा घालून अजून शिजवायचे.
लाल चवळी खूप आवडते. पण
लाल चवळी खूप आवडते. पण दुकानात गेलं आणली अस होत नाही. बरेचदा स्टॉक नसतो दुकानात. पण मिळेल तेव्हा आणतेच आणते.
आम्ही लहानपणी अलिबाग ला असताना आमची दूधवाली आजी तिच्या शेतातील चवळी देत असे आम्हाला , अर्थात आई विकत च घेत असे. तिच्या गोडसर चवीचा नॉस्टॅल्जिया आहे. लाल भोपळा आणि ही चवळी कधी केली नाहीये पण मस्त लागेल.
त्यामुळे आता शोधाशोध करून चवळी मिळवणार आणि ही भाजी करून बघणार.
छान रेसिपी, घरात साहित्यही
छान रेसिपी, घरात साहित्यही आहे , करून बघेन.
आमच्या पण काही भाज्या
आमच्या पण काही भाज्या खोबऱ्याच्या वाटणातील असतात. तरीही 1 वाटी चवळीसाठी अर्धा नारळ भरपूर वाटतोय.
बाकी रेसिपी चांगली आहे .
मी आजच केली आणि लगदा अगदी
मी आजच केली आणि लगदा अगदी नाही झाला. त्यामुळे चिंता नसावी. पण तसं वाटत असल्यास सोनालीनं सांगितल्याप्रमाणे भांड्यात शिजवायलाही हरकत नसावी.
केया, मृणाली, मनीमोहोर, अस्मिता, नक्की करून पाहा.
देवकी अर्धा नारळ लागतो कारण वाटणासाठी त्यातला अर्धा (पाव नारळ) आणि वरून तांबूस भाजून टाकायला अर्धा (पाव नारळ) असं प्रमाण आहे ना. गार्निश के लिए भी नारळच वापरे उन लोगोंने! इसी लिए....
छान..
छान..
करणार, खाऊ घालणार आणि खाणार!
करणार, खाऊ घालणार आणि खाणार!
मस्त वाटतेय...
मस्त वाटतेय रेसिपी!
मस्त वाटतेय रेसिपी! यानिमित्ताने लाल चवळी खाण्यात येईल.
वेगळी पद्धत. ओके
वेगळी पद्धत. ओके
लाल चवळी म्हणजे कुठली डाळ?
लाल चवळी म्हणजे कुठली डाळ? कोणी फोटो टाकेल का?
ओ ताई, पांढरी चवळी असते
ओ ताई, पांढरी चवळी असते तिच्या निम्म्याने लहान ही चवळी असते.रंग लालसर ब्राऊन असतो.डाळ नव्हे.
हिच ना?? #आंतरजालावरून
हिच ना??तमिळ मधे कारामणी.
![IMG_20211120_204519.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/IMG_20211120_204519.JPG)
#आंतरजालावरून
पार्वती, मी केले मतंग्या
पार्वती, मी केले 'मतंग्या एरिशेरी' , हे मी गंमत म्हणून सतत म्हणत होते. लक्ष्मी पूजनाचा उरलेला नारळ होता. ओलं खोबरं जरा कमी टाकलं, लसूण जरा जास्त टाकला, Halloween ला पम्पकीन पायसाठी आणलेला लाल भोपळा होताच , एकत्रच उकडले, मस्तच झाले आहे.
![Screenshot_20211120-114041_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20211120-114041_Gallery.jpg)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्यू गं, काही तरी नवीन शिकायला मिळाले.
तोंपासू दिसतेय मतंग्या
तोंपासू दिसतेय मतंग्या एरीशेरी, अस्मिता.
Thanks Mrunali!
Thanks Mrunali!
मस्तच.
मस्तच.
वेगळीच रेसिपी, म्हणजे
वेगळीच रेसिपी, म्हणजे कॉम्बिनेशन वेगळंच आहे. करून बघायला हवी. नाव भारीच आहे. पार्वती थॅंक्यू रेसिपी शेअर केल्याबद्दल
अस्मे तुला पैकी च्या पैकी मार्कस्
लाल चवळी लाल भोपळा मसाले
लाल चवळी लाल भोपळा मसाले विरहित भाजी पाकृ बद्दल धन्यवाद.
लाल चवळी म्हणजे अळसांदे का ?
लाल चवळी म्हणजे अळसांदे का ?
बाकी रेसिपी. इंटरेस्टींग आहे
हा धागा वर आला कि माटुंगा -
हा धागा वर आला कि माटुंगा - वडगाव शेरी फ्लाईट चालू झाली कि काय असे वाटतंय सारखे.
लाल चवळीचा जो फोटो दिलाय
लाल चवळीचा जो फोटो दिलाय त्याला इकडे पाद्रा पावटा म्हणतात. याने वात होतो.
अस्मे तुला पैकी च्या पैकी
अस्मे तुला पैकी च्या पैकी मार्कस्>>>>>>+१.
लाल चवळी म्हणजे अळसांदे का ?>>>>> नाही. हळसांडे वेगळे असतात.जरा जाडुलेसर असतात.गोव्याला मिळतात.बाकी ही सगळी चुलतभावंडे आहेत.
अस्मे तुला पैकी च्या पैकी
अस्मे तुला पैकी च्या पैकी मार्कस्>>>>>>+१.
लाल चवळी म्हणजे अळसांदे का ?>>>>> नाही. हळसांडे वेगळे असतात.जरा जाडुलेसर असतात.गोव्याला मिळतात.बाकी ही सगळी चुलतभावंडे आहेत.
अरे सॉरी.. गेल्या आठवड्यात
अरे सॉरी.. गेल्या आठवड्यात इकडे यायला अगदी वेळ झाला नाही. वा अस्मिता! मस्त दिसतेय एरिशेरी. क्या बात है! बाकी सर्वांनाच थँक्यू! किशोर, धनुडी.. करून पहा. अगदी सोपी आणि छान पाकृ. शांत माणूस – मी माझ्या मैत्रिणीला व्हॉइस मेसेजवर मतंग्या एरिशेरीचा उच्चार मागितला. आणि त्यातल्या त्यात जसं जमलं तसं देवनागरीत लिहिलं. ते तंतोतंत जमलं असं काही अजूनही वाटत नाहीये. पण माटुंगा-वडगाव शेरीची फ्लाइट लवकरच सुरु होईलसं वाटतंय!
Pages