व्हाट्सएप ट्रॅप
रविवारची मस्त सकाळ. आजचा दिवस आरामात घालवायचा, असा विचार करून दामिनी कॉफीचा मग हातात घेऊन न्यूज पेपर वाचत बसली होती. अचानक तिची नजर एका बातमीवर स्थिरावली.
"द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ला अटक"
लक्षपूर्वक तिने ती बातमी वाचली. ज्या ग्रुप ॲडमीन ला पोलिसांनी काही व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या तक्रारीवरून अटक केली होती, त्याचं नाव वाचून ती चक्रावली. आयुष अजय सिंघवी ???
आयुष, तिची मैत्रिण अश्विनीचा बावीस वर्षांचा तरुण मुलगा. दामिनी आयुषला लहानपणापासून अगदी जवळून ओळखत होती. अत्यंत साधा, सरळ, अभ्यासात हुशार असलेला आयुष असं काहीही करणार नाही, त्याला नक्कीच कोणीतरी यात अडकवलं असणार, याची तिला खात्री होती. दामिनीने अश्विनीला कॉल केला.
"हॅलो ! दामिनी, अगं, आयु ला काल काहीही कारण नसताना पोलीस घेऊन गेले..."
"अश्विनी ! मला एक फोन तर करायचास..."
"मला काही सुचतच नाहीये ग..."
" बरं...तू कोणा वकिलाचा सल्ला घेतलास का ?"
"हो...ॲड सचिन देशमुख त्याला जमीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण नेमकी आज सुट्टी आहे कोर्टाला... बिचारा माझा आयुष... त्याला पोलिसांनी मारलं वगैरे तर नसेल ना ग??"
एव्हढं बोलून अश्विनी रडायला लागली.
"शांत हो आशू... मी सचिनशी बोलते... आयुषला काहीही होणार नाही."
अश्विनी ची समजूत काढून दामिनीने फोन बंद केला आणि लगेच ॲड सचिन ला कॉल लावला.
"सचिन ! मला आयुषच्या केसचे डिटेल्स सांगशील का ?"
"हो...काही लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन, पोलिसांनी आयुषला माहिती तंत्रज्ञान कायद्या च्या 67 कलमाखाली अटक केली आहे. तक्रारदारांनुसार आयुष ज्या व्हाट्सअप ग्रुपचा ऍडमिन आहे, त्या ग्रुप वरून द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट गेल्या तीन-चार दिवसांपासून व्हायरल झाली आहे."
"ओह !! आयुष चा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असणार. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येतोस का ?त्याच्या फोनचं अँनालिसिस करायला मिळालं तर यातून काही तरी मार्ग निघेल."
"हो... लगेच नाही, पण दोन अडीच तासात पोलीस स्टेशनला ये... मी तिथे पोहोचतो..."
"ठीक आहे..."
दामिनी ने फोन बंद केला. दोन तासांत पोलीस स्टेशनला पोहोचायचं होतं. तिच्या हातात तासाभराचा वेळ होता. तेवढ्या वेळात तिने आयुषचे सोशल मीडिया हँडल्स अनालाइज करायचे ठरवले. लॅपटॉप उघडून तिने आयुष सिंघवी चे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचे सोशल मीडिया अनालीटीक टूल द्वारे परीक्षण केले. या प्रकारच्या अँनालिसिस मुळे त्या व्यक्तीची मानसिक अवस्था बऱ्याच प्रमाणात जाणून घेता येते. जसं की ती व्यक्ती उदासीन, अस्वस्थ, रागीट आहे की संतुलित स्वभावाची आहे? त्या व्यक्तीच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक धारणा, मतं काय आहेत ?? वगैरे...
सोशल मीडिया अँनालिसिस वरून तरी आयुष एक संतुलित व्यक्तित्वाचा तरुण आहे, यावर शिक्कामोर्तब झालं.
दामिनी आणि सचिनच्या विनंतीवरून पोलिसांनी आयुषच्या मोबाईल फोनची क्लोन्ड (cloned) कॉपी त्यांना तिथं बसून चेक करण्याची परवानगी दिली.
सायबर गुन्हा घडल्यानंतर, डिजिटल फॉरेन्सिक्स करताना ओरिजनल डिव्हाईस (या केसमध्ये मोबाईल फोन) जसाच्या तसा preserve करून त्याची क्लोन कॉपी तयार केली जाते. आणि संपूर्ण इन्वेस्टीगेशन त्या कॉपी वरच केलं जातं. ओरिजिनल डिव्हाईस मधील डेटा राखून ठेवला जाऊन त्याची एक हॅश की तयार केली जाते. हॅश की म्हणजे एखाद्या मेमरीचे युनिक सिग्नेचर असतं. त्यामुळे कोर्टात ते डिव्हाईस पक्का पुरावा म्हणून सादर करता येतं.
दामिनी ने आयुष च्या मोबाईलची क्लोन कॉपी तपासायला सुरुवात केली. बरेच व्हाट्सअप ग्रुप्स दिसत होते. तिचे लक्ष एका व्हाट्सअप ग्रुप ने वेधून घेतले. "अमेझिंग वर्ल्ड" असे त्या ग्रुपचे नाव होते. त्या ग्रुपमधील बरेच नंबर्स पाकिस्तानी आणि बांगलादेशातील होते. त्या ग्रुपमध्ये बर्याच लिंक्स पोस्ट केलेल्या दिसत होत्या. पण आश्चर्य म्हणजे त्या लिंक्सवर आता कुठलेही कन्टेन्ट दिसत नव्हते.
सुदैवाने इतर कुठल्याही ग्रुप मध्ये कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट नव्हती. अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधील मेम्बर्स चे नंबर्स नोट करून घेऊन दामिनी ने सचिन सोबत आयुष ला भेटायचं ठरवलं.
"तुझ्या अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधल्या बऱ्याच मेम्बर्स चे नंबर पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत. तू या सगळ्यांना ओळखतोस का?"
तिने आयुषला विचारले.
"नाही, मी कोणालाच ओळखत नाही."
"मग तू त्यांना ग्रुप मध्ये का ॲड केलं ?"
"मी नाही कोणाला ऍड केलं. कोणीतरी मला या ग्रुप ची इन्व्हाईट लिंक पाठवली. नावावरून ग्रुप इंटरेस्टिंग वाटला. म्हणून त्या लिंक वरून मी ऍड झालो. त्यात झूलॉजी आणि जिओलॉजी विषयांवरील व्हिडीओज च्या लिंक्स पोस्ट व्हायच्या. त्या मी बऱ्याच वेळेस फॉरवर्ड केल्या आहेत."
"अरे, पण तू तर त्या ग्रुपचा ऍडमिन आहेस ना ?"
"त्या ग्रुपमध्ये मी एकटाच ॲडमिन नाहीये मावशी, बाकी अजून दोन-तीन ॲडमिन आहेत."
दामिनी ने त्या ग्रुप मधील विदेशी नंबर्स चं बऱ्याच वेळेस, व्यवस्थित अनालिसिस केल्यावर, तिच्या लक्षात आलं, आयुष क्रॉस बॉर्डर सोशल इन्फ्ल्यून्सर ग्रुपमध्ये ट्रॅप झाला आहे.
आपल्या शेजारील देशातील काही समाजकंटक हे टेक्निक वापरून आपल्या देशातील काही लोकांमध्ये प्रभाव किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर योजनापूर्वक केला जातो. सोशल मीडियावर आधी एक ग्रुप तयार करून त्यात काही भारतीयांना इन्व्हाईट लिंक द्वारे ऍड केलं जातं. सुरुवातीला मनोरंजक लिंक्स, व्हिडिओज आणि मेसेजेस द्वारे ऍड झालेल्या मेंबर्सना ग्रुपमध्ये राहण्यास भाग पाडलं जातं. ॲड झालेल्या मेंबर्सना पाठवलेल्या व्हिडिओ लिंक्स मध्ये ग्रुप ची इन्व्हाईट लिंक एम्बेड केली (लपवली) जाते. त्या मेंबरने ती लिंक फॉरवर्ड केल्यास इतर लोकही इन्व्हाईट लिंक द्वारे अशा ग्रुपमध्ये येतात. काहीजण quit होतात. काहीजण फारसा विचार न करता ग्रुपचे मेम्बर बनून राहतात.
हे समाजकंटक मालवेअर लिंक्स पाठवून मोबाईल देखील हॅक करतात. त्याद्वारे ब्लॅकमेल करतात. सुरुवातीला मनोरंजक पोस्ट ग्रुप वर येतात. नंतर त्यातच छुप्या लिंक्स एम्बेड करून धार्मिक तेढ वाढवणारा, आक्षेपार्ह कंटेंट शेअर केला जातो आणि ह्या ग्रुप द्वारे व्हायरल केला जातो.
या क्रॉस बॉर्डर ग्रुपच्या कोणा समाजकंटक मेंबरने, जाणीवपूर्वक, आक्षेपार्ह कंटेंट एम्बेड करून, कुठलीतरी, वरकरणी माहितीपूर्ण वाटणारी पोस्ट टाकली होती. पोस्ट टाकून हा समाजकंटक संगनमताने इतर मेंबर्स सोबत ग्रुप मधून बाहेर पडला होता. बाहेर पडणाऱ्यां मध्ये इतर ॲडमिन देखील होते. त्यामुळे आयुष एकटाच ग्रुपचा ऍडमिन म्हणून ट्रॅप झाला होता.
आयुष ने मनोरंजक व्हिडिओ समजून ती पोस्ट इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली होती. त्या पोस्टमध्ये लपलेली, धार्मिक तेढ निर्माण करणारी, आक्षेपार्ह कंटेंट ची लिंक एक्सेस झाल्याने, त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.
दामिनी ने या सगळ्या अनालिसिस चा एक रिपोर्ट तयार करुन, जरुरी ते स्क्रीनशॉट्स त्याला जोडले आणि तो रिपोर्ट ॲड सचिन देशमुख च्या हवाली केला. त्या अनालिसिस/ रिपोर्ट च्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे आयुष ची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली.
वरील सत्यघटनेवर आधारित कथेवरून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरी आहे. अनोळखी लिंक्स क्लिक करणे टाळावे.
अनोळखी ग्रुप मध्ये सामील होऊ नये.
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तीं शिवाय कोणीही आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही अशी सेटिंग करावी.
चुकून जरी अशा एखाद्या अनोळखी ग्रुप मध्ये ऍड झाल्यास लगेच बाहेर पडावे.
सजग आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...
©कविता दातार
(सत्यघटनेवर आधारित ही कथा वाचकांना जागृत करण्यासाठी लिहली आहे. कथेच्या अनुषंगाने त्यात आणि माझ्या इतरही कथांमध्ये काही घटना काल्पनिक असू शकतात. माफ करा पण मायबोलीवर काही थोडे वाचक माझ्या सायबर गुन्हे कथा, त्यात काही त्रुटी कशा काढून दाखवता येतील या उद्देशानेच वाचतात. त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि वाचकांची जागृती हा माझा उद्देश लक्षात घ्यावा ही विनंती)
नेहमी प्रमाणेच अति उत्तम
नेहमी प्रमाणेच अति उत्तम माहितीपूर्ण लेख.अनोळखी ग्रुप्स मधून लगेच बाहेर पडावे.
या चुका व्हॉट्सप नवे नवे वापरायला चालू केलेल्या लोकांकडून किंवा ज्येष्ठ नागरिकांकडून पण होतात.बरेचदा अतिशय भडक प्रक्षोभक काही पुढे ढकललेलं असतं.चौकशी केल्यावर 'अगं हल्ली मराठी वाचणंच दुर्मिळ झालंय.मी 1-2 ओळी वाचून चांगलं वाटेल म्हणून फॉरवर्ड केलं' अशी चक्रम उत्तरं मिळतात.
काही तरुण मंडळी इतकी घाईत असतात की त्यांना 'मी सगळ्यांशी संबंध टिकवून आहे' दाखवायला आठवड्यात एक दिवस 10-12 मराठी पोस्ट ग्रुपवर एकदम ढकलून मग परत गायब व्हायचं असतं.या पोस्ट मध्ये उझबेकीस्तानातील भुईमूग लागवड' पासून 'मुसोलिनी कसे बनावे' पासून काहीही असू शकतं.बरेचदा त्याच ग्रुपवर 5 मिनिटापूर्वी आलेला मजकूर चुकून परत त्याच ग्रुपवर ढकलतात.अनोळखी ग्रुप ला ऍड करणारे शत्रू परवडले पण असे मित्र नको.
यासाठी हल्ली बऱ्याच ग्रुपवर काही राजकारण प्रक्षोभक घटना जगात घडली असल्यास काही दिवस ग्रुप 'अडमीन पोस्ट ओन्ली' करतात, किंवा सर्वाना अडमीन बनवतात.
एखाद्या ग्रुपवर कोणी स्वतःला कल्पनाही नसताना न वाचता काही भडक मजकूर पाठवत असेल तर त्यांना लगेच त्याच ग्रुपवर जाणीव करून द्यावी.कोणतेही संशय असलेले मटेरियल स्वतः पुढे ढकलू नये.
बापरे, अशी दामिनी पाठीशी नसेल
बापरे, अशी दामिनी पाठीशी नसेल तर कठीणच आहे. चांगलं लिहीता. सोशल मिडीयावर काय काळजी घ्यायला हवी याची जनजागृती होणे खूप गरजेचे आहे.
हे असे होते का? बाप रे!!! खूप
हे असे होते का? बाप रे!!! खूप चांगल्या विषयावरचा धागा आहे.
अजून एक माहितीपूर्ण कथा. हे
अजून एक माहितीपूर्ण कथा. हे विषय तुम्ही कथा रूपात मांडता त्यामुळे जास्त चांगल्या उमजतात.
लिहीत रहा.
सीमंतिनी +1
छान लिहिले आहे .
छान लिहिले आहे .
अजून एक माहितीपूर्ण कथा. हे
अजून एक माहितीपूर्ण कथा. हे विषय तुम्ही कथा रूपात मांडता त्यामुळे जास्त चांगल्या उमजतात.
लिहीत रहा.>>>>> + 100000
छान लिहिताय.
छान लिहिताय.
छान. या ट्रॅप बद्दल माहित
छान. या ट्रॅप बद्दल माहित नव्हतं.
बापरे, अशी दामिनी पाठीशी नसेल
बापरे, अशी दामिनी पाठीशी नसेल तर कठीणच आहे. चांगलं लिहीता. सोशल मिडीयावर काय काळजी घ्यायला हवी याची जनजागृती होणे खूप गरजेचे आहे.>>+१
माझ्या सासूबाईंनी नवीन मोबाइल
माझ्या सासूबाईंनी नवीन मोबाइल घेतला तेव्हा अनेक ग्रुप मध्ये जॉइन झाल्या. आधी सुरुवातीला देवाची भजने ,सुविचार वैगेरे फॉरवर्डस् येत. नंतर काही दिवसांनी पॉर्न फोटो येऊ लागले. मग त्या घाबरल्या आम्हाला मोबाइल दाखवला . त्याना विचारुन फक्त प्रत्यक्ष ओळखितील लोकांचे ग्रुप ठेवून बाकी सगळे एक्झिट केले आणि सेटिंग पण चेंज केले. त्यानंतर त्यांनी कधीही अनोळखी ग्रुप जॉईन केले नाहित.
नवीनच मोबाइल वापरणार्याला माहिती नसते त्यामुळे सावध रहावे लागते.
ईंटरेस्टींग आहे हे !
ईंटरेस्टींग आहे हे !
व्हॉटसप जिथे आपला थेट फोननंबर कनेक्ट असतो तिथे अनोळखी लोकांच्या ग्रूपमध्ये फक्त काहीतरी छान मनोरंजक फॉर्वर्डस, वा अभ्यासू राजकीय पोस्टस वा गेला बाजार पॉर्न विडिओज बघायला मिळतात म्हणून मेंबर होणाऱ्या लोकांचे मला नेहमीच कौतुक वाटते.
मलाही बरेचदा अश्या ग्रूपमध्ये मित्रांनी ॲड केले आहे जिथे त्यांचे मित्र. त्यांच्या मित्रांचे मित्र वा त्यांचेही मित्र वगैरे होते. कोणाचा कोणाला पत्ता नसतो. मी दोनेक दिवस काही न पोस्टता अलगद बाहेर पडतो.
<< अनोळखी लोकांच्या
<< अनोळखी लोकांच्या ग्रूपमध्ये .... म्हणून मेंबर होणाऱ्या लोकांचे मला नेहमीच कौतुक वाटते. >>
मलातर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप वापरणाऱ्याचेच आश्चर्य वाटते.
उपाशी बोका, खरे आहे. सेफ
उपाशी बोका, खरे आहे. सेफ काहीच नाही. अगदी मायबोलीसारख्या संकेतस्थळावर देखील शक्य झाल्यास खरी ओळख खरे नाव बदलून वावरावे. लोकांनी डुआयडी म्हणून ओरडा केला तर करू द्यावे. आपली प्रायव्हसी जपणे आपला हक्क # व्हॉटसपवर जिथे तुमचा फोन नंबरही एक्स्पोज होतो जो आपण उगाच कोणालाही देणे टाळतो तिथे अनोळखी ग्रूपला ॲड होऊ नये.
छान कथा . मी आवडीने वाचते
छान कथा . मी आवडीने वाचते तुमच्या सायबर कथा. सिनीअर एज गृप मधले लोक जास्त शिकार होतात. कारण ते जास्त विश्वास टाकतात. गुन्हेगार त्यांचा फायदा घेतात. बँक फ्रोड ऑनलाइन परचेस फ्रॉड वर पण लिहा रोज पेपर मध्ये बातम्या येत असतात फसवल्याच्या.
री ओळख खरे नाव बदलून वावरावे. >> पण मग तात्या नंतर इतका स्पेसिफिक वै यक्तिक डाटा शेअर केला आहे की कुठे राहतात घरी कोन दाढीत किती केस काय रोग केस किती दात दुखतात का शाकाहा री का रुमाल की फडके नाक पुसायला वाप रावे. घरी काय केव्हा घ्यावे प्लस भरपूर फोटो हे ही शेअर केले आहे. डा टा पॉइन्ट एक एक करून जोडत गेले तर सर्वात जास्त ठळक व्यक्तिरेखा तयार होते. जस्ट स्पीकिन्ग फ्रॉम डा टा पर्स्पेक्टिव्ह.
छान लिहिले आहे .
छान लिहिले आहे .
छान...
छान...
काही महिन्यांपूर्वी मला एका
काही महिन्यांपूर्वी मला एका WhatsApp ग्रुप मध्ये add करण्यात आलं होत... त्या ग्रुपमध्ये माझ्या कॉन्टॅक्ट नंबर पासून सुरू होणाऱ्या नंबर्सना add करण्यात आलं होत... म्हणजे शेवटचे २-३ नंबर फक्त बदलून सर्वांना add केलं गेलं होत... मी लगेचच बाहेर पडलो... तुमची कथा वाचल्यानंतर कळलं की अशा ग्रुप मध्ये राहण्याने किती गंभीर परिणाम होऊ शकतात...
कथा खूप छान लिहली आहे...
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तीं
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तीं शिवाय कोणीही आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही अशी सेटिंग करावी.
साधारण २०१८ साली आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला ग्रुपमध्ये add करू शकणार नाही, अशी सेटिंग उपलब्ध होती. Who can add me to groups - NOBODY. पण नंतर WhatsApp ला काय झाले माहीत नाही, त्यांनी Nobody हा पर्याय काढून टाकला. आता नवीन version मध्ये हा पर्याय मिळत नाही. मी तेव्हाच ती सेटिंग केल्यामुळे माझ्याफोन मध्ये अजूनही हीच सेटिंग आहे. कोणीही अगदी contact list मधलेही मला ग्रुपमध्ये थेट add करू शकत नाहीत. पण आता मी फोन format केला किंवा नवीन घेतला तर ही सेटिंग मिळणार नाही, म्हणून मला फोन format करताही येत नाही!!! मी अधूनमधून twitter वर WhatsApp कडे ही setting पुन्हा द्या म्हणून मागणी करत असतो, पाहू देतात का! शिवाय एखाद्या ग्रुपमध्ये add झाल्यावरदेखील आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही admin करू शकले नाही पाहिजे.
मी WhatsApp कडे अजून एका
मी WhatsApp कडे अजून एका पर्यायाची मागणी सातत्याने करत असतो. तो म्हणजे 'Receive messages from my contacts only - Yes/No'. असा पर्याय WhatsApp ने दिला आणि आपण तो सुरु केला तर आपण आपल्या मेहनतीच्या पैशाने, आपल्या वैयक्तिक वापरासाठी घेतलेल्या फोनला स्वतःच्या तीर्थरूपांची मालमत्ता समजून स्वतःच्या products, services ची जाहिरात आपल्या मालकीच्या फोनमधील WhatsApp वर telemarketing करणारे नीच, हरामी लोक आपोआप block होतील.
आत्ताच अनील थत्ते गगन भेदी
आत्ताच अनील थत्ते गगन भेदी चॅनेल चा व्हिडीओ पाहिला त्यात ते ह्या प्रकाराची मोडस ऑपरेंडी समजावुन सांगत आहेत. म्हणजे तेच असे करणार
आहेत दिवसाला २५ व्हिडीओ ब नवणार त्यात दहा राज कीय( मत बनव णारे मॅनिपुलेट कर णा रे) व गृप अॅड मिन ला पाठवणार त्यांचा एक नंबर आहे त्याला अॅड करा म्हणून बडबडत आहेत. धन्य ते अॅडमिन व ती भाबडी जनता.
चांगली माहिती देत आहात.
चांगली माहिती देत आहात.
काही महिन्यांपूर्वी माझ्या आईचा व्हॉट्सॲप नंबर कायमचा ब्लॉक झाला. असे का झाले ते शोधल्यावर लक्षात आलं की आई दोन तीन मोठ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहे ज्यात शंभराहून अधिक मेंबर आहेत. सगळे चांगले legit groups आहेत. पण आईच्या contacts मध्ये सगळे मेंबर नावाने ॲड केलेले नाहीत. झालं असं की या ना त्या निमित्ताने आईने काही जणांना reply privately हा पर्याय वापरून मेसेज केले आणि त्यामुळे तिच्या व्हॉट्सॲप मध्ये अनेक unknown numbers शी chatting होत आहे असे दिसू लागले! बहुतेक व्हॉट्सॲप च्या random check मध्ये आईचा नंबर आला आणि ही suspicious activity म्हणून record झाली असावी. परीणामी नंबर कायमचा ब्लॉक झाला. एकदा नंबर असा ब्लॉक झाला तर तो कधीच अनब्लॉक होत नाही हे कळले. तेव्हा सगळ्यांना फु. स. की जर कोणाशी personal chat करत असाल तर नंबर सेव्ह करून मगच करा.
छान आहे कथा. माहितीसाठी
छान आहे कथा. माहितीसाठी धन्यवाद.
आजच मला एका बिट कॉईन ग्रुप ला
आजच मला एका बिट कॉईन ग्रुप ला अॅड केले कोणीतरी, त्यवर फक्त अॅडमिन ओन्ली मेसेज होते.
लगेच ग्रुप रिपोर्ट केला आणि बाहेर पडले.
वि. मु.
वि. मु.
नविन व्हॉट्सऍप मध्ये, My contact except हा पर्याय निवडायचा आणि मग पुढे येणाऱ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये उजवीकडे "Select all" सिम्बॉल येतो त्यावर क्लिक करायचे, सगळे कॉन्टॅक्ट्स निवडल्या जातात. हे Nobody सारखेच होईल. पण नवीन कॉन्टॅक्ट ऍड केला की तो मात्र ग्रुप मध्ये ऍड करू शकेल. तेव्हा या सेटिंग मध्ये जाऊन परत "select all" करावे लागेल.
पण मग तात्या नंतर इतका
पण मग तात्या नंतर इतका स्पेसिफिक वै यक्तिक डाटा शेअर केला आहे की >>>> धिस ईज ओके. हे आपल्याला सेलेब्रेटींबद्दलही माहीत असतेच. पण तरी ते लोकं सेफ असतात. माहिती शेअर करणे वेगळे आणि त्याचा अॅक्सेस देणे वेगळे. ते लोकं कधी तुम्हाला असे कुठलाही ग्रूप जॉईन करताना दिसणार नाहीत. काळजी कुठे कशी घ्यावी हे समजायला हवे. लोकांना नेमके ते कळत नाही.
नविन व्हॉट्सऍप मध्ये, My
नविन व्हॉट्सऍप मध्ये, My contact except हा पर्याय निवडायचा आणि मग पुढे येणाऱ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये उजवीकडे "Select all" सिम्बॉल येतो त्यावर क्लिक करायचे, सगळे कॉन्टॅक्ट्स निवडल्या जातात. हे Nobody सारखेच होईल. पण नवीन कॉन्टॅक्ट ऍड केला की तो मात्र ग्रुप मध्ये ऍड करू शकेल. तेव्हा या सेटिंग मध्ये जाऊन परत "select all" करावे लागेल.
Submitted by मानव पृथ्वीकर on 15 November, 2021 - 22:18
हा विचार मीही केला होता, पण ते प्रत्येक वेळी नवीन कोणाचे नाव सेव्ह केले की आठवणीने जाऊन select all करणे लक्षात राहणे कठीण आहे, त्यामुळे मला Nobody हाच कायमस्वरूपी इलाज वाटतो! आणि म्हणूनच मी WhatsApp कडे तो पर्याय पुन्हा मागतो आहे!!!
आजच मला एका बिट कॉईन ग्रुप ला
आजच मला एका बिट कॉईन ग्रुप ला अॅड केले कोणीतरी, त्यवर फक्त अॅडमिन ओन्ली मेसेज होते.
>>>>> मला दोन वेळा केले होते.. मी पण लगेच बाहेर पडलो पण ग्रुप रिपोर्ट करायचं लक्षात नाही आलं
Thanks everyone for you
Thanks everyone for you comments and value adding discussion
अजून एक छान कथारूपी किस्सा.
अजून एक छान कथारूपी किस्सा. मला दोन तीन ग्रुप्स मधे अॅड केले होते. क्रिप्टो करन्सीचे ग्रुप्स होते. मी बाहेर पडलो ते बरं झालं असं वाटलं वाचताना.
मीही कोणाला आपल्याला ग्रुप
मीही कोणाला आपल्याला ग्रुप मध्ये ऍड करणार नाही परस्पर अशी सेटिंग केली आहे
मानव यांनी लिहिलं आहे तशीच
त्यामुळे मित्रही नवीन ग्रुप करताना इन्व्हाईत पाठवतात
मला इच्छा असली तरच गृप जॉईन करतो
अमा - तात्या म्हणजे तात्याच आहेत अगदी
पालथा घडा पण लाजेल त्यांच्यापुढे
Pages