भ्रम...

Submitted by मुग्धमानसी on 10 November, 2021 - 18:58

कसे कोठच्या दिशेला
चित्त माझे थरथरे
अवकाळी निरभ्राचे
भ्रम वागवती झरे...

झऱ्यातून वाहतात
वाट हरवले डोळे
ज्यात रंगले कितेक
पोहोचल्याचे सोहळे!

मला वाहता येईना...
सारी तुंबलेली स्वप्ने...
लिंपलेल्या भेगांतून
थोडा ओलावा जपणे!

एवढेच मी करणे...
बाकी काही हाती नाही!
स्वप्न भंगल्याचे भय
रात जागल्यास नाही!!!

रात जागते जागते
स्वप्न दारी खोळंबते
उशापाशी रोज कोण
चिंब भिजुनिया येते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अष्टाक्षरी कविता चांगली जमली आहे. कविता खूपच छान आहे, आवडली. कवितेच्या खालील ओळी विशेष आवडल्या.

स्वप्न भंगल्याचे भय
रात जागल्यास नाही!!!

अष्टाक्षरी कविता चांगली जमली आहे. कविता खूपच छान आहे, आवडली. कवितेच्या खालील ओळी विशेष आवडल्या.

स्वप्न भंगल्याचे भय
रात जागल्यास नाही!!!