शेवेचे लाडू

Submitted by मेधावि on 1 November, 2021 - 22:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

डाळीचं पिठ दोन वाट्या ( नेहमीचंच घातलं)
साखर सव्वा वाटी
वेलदोडा, जायफळ, काजूबेदाणे
तळणीसाठी ऑप्टीमम साजूक तूप. (मला दोन घसघशीत चमचे भरून लागलं) शेवटचा चवंग्याचं तर तळणं न होता परतणं झालं.

क्रमवार पाककृती: 

छान होतात हे लाडू. मोतीचुरासारखे लागतात.

डाळीचं पिठ किंचीत मीठ घालून दुधात भिजवून सा. तुपात मध्यम जाळीतून शेव पाडून तांबडी (ब्राऊन नाही) आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची.

गार झाली की मिक्सरमधून भरड काढायची.
साखरेचा एकतारी पाक करून त्यात ओतायचा आणि मिश्रण आळलं की लाडू वळायचे.
भारी लागतात हे लाडू.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली वाटतेय कृती.
मी शेवेचा लाडू खाल्ला होता, त्यातली शेव पिवळसर होती.त्यावेळी तो कच्चेपणामुळे नव्हता आवडला.इथे "तांबडी आणि कुरकुरीत" शेव तळायची सांगितले आहे.मग खमंग लागेल .

लाडू मस्त दिसत आहेत.
माझी आई शेव मिक्सर मधे न वाटता बारिक चूरा करते. मग पाकात घालून त्याचे लाडू वळते. साखरेच्या पाकात वेलची पूडही घालते. त्याला आम्ही कळ्यांचे लाडू म्हणतो. मस्त लागतात.

माझी आजी पण शेवे चे लाडू करायची.
पण ती शेव हाताने च बारीक करुन पाकात घालुन करायची लाडू.
हे ही खुप छान वाटत आहेत पण असे करुन बघेन.

आमच्याकडे कळीचे लाडू करतात ते असेच असतात. लहापणी आम्हाला कळ्या (शेव) चुरायला बसवायचे. मला ते गरम तेलकट कळ्या हाताने चुरायाला नको नको वाटायचे परंतु सुटका नसायची.

फार भारी लागतात आज जवळजवळ 25 वर्ष तरी माझी मम्मी हे लाडू बनवतेय......
दर वर्षी हेच लाडू... साधे बेसन चे बनवत नाही

मंजूताई, खरं तर मुटका वळेल इतकं मोहन घालतात पण ह्यावेळी नाही घातलं. चवीत फरक वाटला नाही.

तसं दुधातसुद्धा निरशा दुधात भिजवतात पण आता कुठं मिळणार निरसं दूध? मग आहे त्या दुधात,भिजवलं पिठ. चव मस्त आली आहे दुधामुळे.

20211105_102116.jpg
आज केले. बेसनात थोडं मोहन घातलंच Happy पाकही दूधातच केला . छान नरम झाला लाडू !
दोन वाट्याचाच केला. खूप गोड नाही झाला पण साखर एक वाटी चालली असती. मधूर साखर वापरली. पंधरा लाडू झाले.

<<<<आज केले. बेसनात थोडं मोहन घातलंच Happy पाकही दूधातच केला . छान नरम झाला लाडू !>>>>
झकास दिसत आहेत लाडू.
दुधात पाक करण्याची कृती सांगा ना. मी कधी केला नाही.

मस्तच दिसतायत लाडू मंजू.
शेव तुपात तळली की तेलात ? आणि ती शेव मग मिकसर मध्ये फिरवून अगदी बारीक म्हणजे जवळ जवळ पीठ केलं का तिचं ?

खरंतर जरा खडबडीत वाटलं तर मोतीचुराची चव येते. एकदम पिठ केल्यास ते जरा वेगळं लागेल. लेकीच्या आग्रहास्तव तिरुपतीच्या प्रसादाची चव आणण्याकरिता पुढच्या वेळेस थोडी कुटलेली खडीसाखर, जरास्सा कापूर आणि लवंग घालणार आहे लाडू वळताना. देवळातल्या
तीर्थाच्या चवीचं पाणी पण बनवलं होतं एकदा तांब्याच्या भांड्यात अगदीच इवलास्सा कापूर घालून.

हेमा,तुपात तळली पण कोरड्या बेसनाच्या लाडवाला तूप खूप लागतं तसं ह्याला लागलं नाही अजिबात तूपकट लागत नाही. करून पहा. अनारसे तेलात तळते एक चमचा तूप घालते. हीच ट्रीक चिरोटे,शंकरपाळे, मालपुवासाठी वापरते. ह्या लाडूसाठी करून पहायला हरकत नाही.
मेधावि, शेव जरा बारीक वाटल्या गेली जरा रवाळ जास्त चांगली लागेल.

सुरेख फोटो व रेसिपी !
मंजूताईंचे पण मस्तच दिसताहेत.
तिरुपतीच्या प्रसादाची चव आणण्याकरिता पुढच्या वेळेस थोडी कुटलेली खडीसाखर, जरास्सा कापूर आणि लवंग घालणार आहे लाडू वळताना.
>>>>या टीप साठी अनेक आभार, या तिरुपतीच्या लाडूंसाठी तर मी मेलेली असले तरी उठून बसेन... नक्की करून बघणार. Happy

Pages