Submitted by मेधावि on 1 November, 2021 - 22:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
डाळीचं पिठ दोन वाट्या ( नेहमीचंच घातलं)
साखर सव्वा वाटी
वेलदोडा, जायफळ, काजूबेदाणे
तळणीसाठी ऑप्टीमम साजूक तूप. (मला दोन घसघशीत चमचे भरून लागलं) शेवटचा चवंग्याचं तर तळणं न होता परतणं झालं.
क्रमवार पाककृती:
छान होतात हे लाडू. मोतीचुरासारखे लागतात.
डाळीचं पिठ किंचीत मीठ घालून दुधात भिजवून सा. तुपात मध्यम जाळीतून शेव पाडून तांबडी (ब्राऊन नाही) आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची.
गार झाली की मिक्सरमधून भरड काढायची.
साखरेचा एकतारी पाक करून त्यात ओतायचा आणि मिश्रण आळलं की लाडू वळायचे.
भारी लागतात हे लाडू.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगली वाटतेय कृती.
चांगली वाटतेय कृती.
मी शेवेचा लाडू खाल्ला होता, त्यातली शेव पिवळसर होती.त्यावेळी तो कच्चेपणामुळे नव्हता आवडला.इथे "तांबडी आणि कुरकुरीत" शेव तळायची सांगितले आहे.मग खमंग लागेल .
लाडू मस्त दिसत आहेत.
लाडू मस्त दिसत आहेत.
माझी आई शेव मिक्सर मधे न वाटता बारिक चूरा करते. मग पाकात घालून त्याचे लाडू वळते. साखरेच्या पाकात वेलची पूडही घालते. त्याला आम्ही कळ्यांचे लाडू म्हणतो. मस्त लागतात.
मस्त वाटतेय कृती.
मस्त वाटतेय कृती.
पहिल्यांदा ऐकलं शेवेचे लाडू.
पहिल्यांदा ऐकलं शेवेचे लाडू. छान दिसताहेत.
छान दिसतायत लाडू. अगदी
छान दिसतायत लाडू. अगदी बुंदीच्या लाडवांसारखे लागतात चवीला.
माझी आजी पण शेवे चे लाडू
माझी आजी पण शेवे चे लाडू करायची.
पण ती शेव हाताने च बारीक करुन पाकात घालुन करायची लाडू.
हे ही खुप छान वाटत आहेत पण असे करुन बघेन.
आमच्याकडे कळीचे लाडू करतात ते
आमच्याकडे कळीचे लाडू करतात ते असेच असतात. लहापणी आम्हाला कळ्या (शेव) चुरायला बसवायचे. मला ते गरम तेलकट कळ्या हाताने चुरायाला नको नको वाटायचे परंतु सुटका नसायची.
नवीनच रेसिपी कळली.. मला वाटलं
नवीनच रेसिपी कळली.. मला वाटलं शेव बिघडली म्हणून त्याचे लाडू केले की काय
शेवलाडू छान पाकृ.
शेवलाडू छान पाकृ.
छान वाटतंय, गावाकडे गुळाच्या
छान वाटतंय, गावाकडे गुळाच्या पाकातले कडक शेव लाडू मिळतात , त्यापेक्षा वेगळे आहेत
फार भारी लागतात आज जवळजवळ 25
फार भारी लागतात आज जवळजवळ 25 वर्ष तरी माझी मम्मी हे लाडू बनवतेय......
दर वर्षी हेच लाडू... साधे बेसन चे बनवत नाही
छान पाकृ!
छान पाकृ!
बेसनात मोहन नाही घालायचं का
बेसनात मोहन नाही घालायचं का
मंजूताई, खरं तर मुटका वळेल
मंजूताई, खरं तर मुटका वळेल इतकं मोहन घालतात पण ह्यावेळी नाही घातलं. चवीत फरक वाटला नाही.
तसं दुधातसुद्धा निरशा दुधात भिजवतात पण आता कुठं मिळणार निरसं दूध? मग आहे त्या दुधात,भिजवलं पिठ. चव मस्त आली आहे दुधामुळे.
चवीत नाही फरक पडणार पण कडक
चवीत नाही फरक पडणार पण कडक होतील की काय असं वाटलं.. पाक मी दूधातच करते तसे करून पाहीन.....
(No subject)
आम्ही बनवलेले शेवचे लाडू
आम्ही बनवलेले शेवचे लाडू
छान रेसिपी आणि फोटोही सुरेख.
छान रेसिपी आणि फोटोही सुरेख.
परीस मस्तच.
पाक दुधाचा नसला तरी मऊ होतात
परीस, लाडू मस्त दिसत आहेत.
पाक दुधाचा नसला तरी मऊ होतात हे लाडू, बुंदीच्या लाडूसारखे.
मस्त
मस्त
(No subject)
आज केले. बेसनात थोडं मोहन घातलंच पाकही दूधातच केला . छान नरम झाला लाडू !
दोन वाट्याचाच केला. खूप गोड नाही झाला पण साखर एक वाटी चालली असती. मधूर साखर वापरली. पंधरा लाडू झाले.
क्लास झालेत.
क्लास झालेत.
<<<<आज केले. बेसनात थोडं मोहन
<<<<आज केले. बेसनात थोडं मोहन घातलंच Happy पाकही दूधातच केला . छान नरम झाला लाडू !>>>>
झकास दिसत आहेत लाडू.
दुधात पाक करण्याची कृती सांगा ना. मी कधी केला नाही.
अग पाण्याचा ऐवजी दूध.. लाडू
अग पाण्याचा ऐवजी दूध.. लाडू कडक होत नाही अन खव्याची चव येते.
मस्तच दिसतायत लाडू मंजू.
मस्तच दिसतायत लाडू मंजू.
शेव तुपात तळली की तेलात ? आणि ती शेव मग मिकसर मध्ये फिरवून अगदी बारीक म्हणजे जवळ जवळ पीठ केलं का तिचं ?
खरंतर जरा खडबडीत वाटलं तर
खरंतर जरा खडबडीत वाटलं तर मोतीचुराची चव येते. एकदम पिठ केल्यास ते जरा वेगळं लागेल. लेकीच्या आग्रहास्तव तिरुपतीच्या प्रसादाची चव आणण्याकरिता पुढच्या वेळेस थोडी कुटलेली खडीसाखर, जरास्सा कापूर आणि लवंग घालणार आहे लाडू वळताना. देवळातल्या
तीर्थाच्या चवीचं पाणी पण बनवलं होतं एकदा तांब्याच्या भांड्यात अगदीच इवलास्सा कापूर घालून.
हेमा,तुपात तळली पण कोरड्या
हेमा,तुपात तळली पण कोरड्या बेसनाच्या लाडवाला तूप खूप लागतं तसं ह्याला लागलं नाही अजिबात तूपकट लागत नाही. करून पहा. अनारसे तेलात तळते एक चमचा तूप घालते. हीच ट्रीक चिरोटे,शंकरपाळे, मालपुवासाठी वापरते. ह्या लाडूसाठी करून पहायला हरकत नाही.
मेधावि, शेव जरा बारीक वाटल्या गेली जरा रवाळ जास्त चांगली लागेल.
नक्की करून पहाते. तुझे लाडू
नक्की करून पहाते. तुझे लाडू मस्तच दिसतायत.
सुरेख फोटो व रेसिपी !
सुरेख फोटो व रेसिपी !
मंजूताईंचे पण मस्तच दिसताहेत.
तिरुपतीच्या प्रसादाची चव आणण्याकरिता पुढच्या वेळेस थोडी कुटलेली खडीसाखर, जरास्सा कापूर आणि लवंग घालणार आहे लाडू वळताना.
>>>>या टीप साठी अनेक आभार, या तिरुपतीच्या लाडूंसाठी तर मी मेलेली असले तरी उठून बसेन... नक्की करून बघणार.
मंजुताई मस्तच झालेत लाडू.
मंजुताई मस्तच झालेत लाडू.
Pages