Submitted by webmaster on 26 May, 2009 - 21:25
प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज
हो स्वप्ना. मला वाटतं या
हो स्वप्ना. मला वाटतं या दिवसात तिथे एक्-दोन जणं हुरडा विकतात. घेतलाय मी मागे एक्-दोनदा.
हाय स्ट्रीट फिनिक्स मधल्या स्मोक हाऊस डेली मध्ये दोनेक आठवड्यांपूर्वी गेलो होतो. कायच्याकाय महाग आहे आणि त्या मानानं पोर्शन्स फारच लहान. डेकोर मात्र अप्रतिम आहे. सगळा ब्लॅक अॅन्ड व्हाईट.फोन, डबेडुबे असे पांढर्या रंगात रंगवून मग त्यांना काळी आऊटलाईन काढली आहे. पांढर्या भिंतीवरही मस्त काळी स्केचेस आहेत. येणारं पब्लीक लै ढंगच्याक असतं. आम्ही काही स्मोहाडे ला जायचय या विचाराने गेलो नसल्याने 'अवतारात' होतो. जेवणाला काही फारशी चव नव्हती.
एवढे पैसे द्यायचे असतील तर याऐवजी इंडिगो डेलीत जावं. तिथे चविष्ट आणि भरभरून देतात. (पैसे वट्टं मोजून घेतात मात्र. म्हणजे रू. ४०० ला फिश सँडविच वगैरे).
महेश लंच होम अंगणात कधी येईल याची वाट पहात आहे.
बित्तु, तू सांगितल्यापासून मॉडर्न फॅमिली रेस्टॉरंटला कधी उदार आश्रय देता येईल याची वाट बघतीये.
मामी
मामी
फुडीच्या एपिसोडमध्ये कुणाल
फुडीच्या एपिसोडमध्ये कुणाल विजयकर मुंबईत ३ ठिकाणी गेला. सगळ्यात आधी भायखळा (पू) मधलं 'पर्शियन दरबार' - तिथे Raan च्या वेगवेगळ्या डिशेस मिळतात - ग्रेव्ही आणि बिर्याणी वगैरे. एक फ्राईड राईस बिर्याणी होती ज्यात बिर्यानीवर चक्क न्युडल्स घातल्या होत्या. नंतर फोर्ट मधल्या एका हॉटेलात (नाव आठवत नाही) गेला तिथे पराठ्याचे वेगवेगळे प्रकार होते - नेहमीच्या आलू पराठ्यापासून ते वडापाव-पराठा, पावभाजी पराठा, पिझ्झा पराठा, पास्ता पराठा, चॉकलेट पराठा पर्यंत. शेवटचं ठिकाण सीपी Tank मधलं खिचडी सम्राट - खिचडीचे वेगवेगळे प्रकार - वृंदावन खिचडी, हरियाली खिचडी, ड्राय फ्रूट खिचडी, मकाई पनीर खिचडी......
>>स्वरा, तिथेच सकाळी सहा
>>स्वरा, तिथेच सकाळी सहा वाजता एक उपमावाला असतो. अफलातून उपमा!
बाप रे! सकाळी ६ ला तिथे पोचायचं? आपल्याला ह्या जन्मात शक्य नाही.
स्वप्ना तो हुर्डावाला किती
स्वप्ना तो हुर्डावाला किती वाजता असतो तिथे? आज नवर्याला धाडलं होतं ८वाजता सकाळी पण नव्हता तो तिथे
फक्त रविवारीच असतो की इतर वारी पण असतो?
आम्ही मागच्या रविवारी साधारण
आम्ही मागच्या रविवारी साधारण दुपारी १२ च्या सुमारास तिथे गेलो होतो तेव्हा तो होता तिथे. बाकीच्या दिवशी असतो की नाही माहित नाही. खादाडीच्या बीबीवर ह्याबद्दल लिहावं असं तेव्हा डोक्यात आलं नव्हतं नाहीतर त्याला विचारून घेतलं असतं
सगळ्यात आधी भायखळा (पू) मधलं
सगळ्यात आधी भायखळा (पू) मधलं 'पर्शियन दरबार' >>> हो, हे खूप छान हॉटेल आहे. बाहेरून एकदम साधंसुधं दिसतं, पण तसं नाहीये. इथून आम्ही एकदा ऑफिसात कॅरेमल कस्टर्ड मागवलं होतं. एकदमच भारी होतं. आणि किंमतही तशी रीझनेबल होती. त्यावेळी (सुमारे चार वर्षांपुर्वी) १२५ रुपये का काहीतरी होती, आणि आम्ही तिघांत मिळून एक खाऊ शकलो होतो.
मंजूडी पर्शियन दरबारचं कॅरेमल
मंजूडी पर्शियन दरबारचं कॅरेमल कस्टर्ड खरच खूप मस्त असतं बरेच महिन्यात तिकडे मोर्चा वळवला नाही आहे आता तु आठवण काढुन दिलीस तर जावच लागेल लवकरच

आज सकाळीच शिवाजीपार्कच्या प्रकाश हॉटेलमध्ये नाश्ता करण्याचा योग आला, कांदेपोहे आणि साबुदाणा खिचडी अमेझिंग..... सोबत चहा अजुन काय हवे माणसाला जीवनात???
वीनार्च, सोबत चहा अजुन काय
वीनार्च, सोबत चहा अजुन काय हवे माणसाला जीवनात??? >>>>>> प्रकाशचा बटाटावडा आणि दुधीहलवा.
साबुदाणावडा...किंग!
साबुदाणावडा...किंग!
अजुन काय हवे माणसाला
अजुन काय हवे माणसाला जीवनात??? >>> अरेरे! विनार्च, आता यावर उतारा म्हणून आधी प्रकाशमध्ये जाऊन साबुदाणावडा खाऊन आणि पियुष पिऊन या. जमलंच तर बटाटा पुरी, मिसळ, नारळीपाक आणि दुधीची वडी पार्सल घेऊन या आणि पुढचे चार दिवस जीवाचं प्रकाश करा.
प्रकाशमध्ये भरली वांगी पार्सल
प्रकाशमध्ये भरली वांगी पार्सल मस्त मिळतं!
प्रकाशमध्ये मिळणारे जवळ जवळ
प्रकाशमध्ये मिळणारे जवळ जवळ सगळेच पदार्थ ऑथंटिक व चवीष्ट आहेत. तिथले डिंकाचे लाडूपण मस्तच
प्रकाशमध्ये भरली वांगी पार्सल
प्रकाशमध्ये भरली वांगी पार्सल मस्त मिळतं!>>
कुठे आहे प्रकाश?
दादरला शिवसेनाभवनवरून
दादरला शिवसेनाभवनवरून पोर्तूगीज चर्चकडे जायच्या रस्त्यावर...
आज परत हुरडा घेताना त्या
आज परत हुरडा घेताना त्या माणसाला विचारलं मी - तो रोज दुपारी १२:३० ते रात्री ९ पर्यंत तिथे असतो म्हणे.
रच्याकने, कॅडल रोडवर लॅक्मे ब्यूटी सलोनच्या जवळ क्रीम सेन्टरचं 'आईसक्रीम वर्क्स' म्हणून आउटलेट आलंय. कोणी ट्राय केलं का?
मला जयहिंद जरा जास्तच
मला जयहिंद जरा जास्तच मसालेदार वाटलं... सिंधुदुर्गचा दर्जा बकवास.
चांगल्या पद्धतीचं थाय आणि चायनीज खायचं असेल तर सेंच्युरी आणि बेंगॉल केमिकल्सच्या समोरच्या फुटपाथवर एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. त्याचं नाव लक्षात नाही पण जेमतेम दहा बारा टेबल्स असतील. उत्तम मिळतं. अ स्मॉल प्लेस विथ अ बिग हार्ट असंच त्यांच ब्रीदवाक्य आहे..
शिवाय नेहरू प्लॅनिटोरियमच्या रोडवर )अॅनी बेझंट रोड) ब्रिज वरळीच्या साईडला संपतो तिथेच एक छोटंसं मालवणी हॉटेल आहे. मालवण किनारा असं नाव असावं. मालवणी अॅम्बियन्स आणि जेवण... जिभल्या चाटत बाहेर येतो माणूस. आत सुंदर मालवणी पेंटिंग्स, छान झोपडीवजा रंग वगैरे आणि कोकणातल्या आगरी, आदिवासींची आठवण करून देणारं साहित्य... जी खुश हो जाता है
बेंगॉल केमिकल्सचा जो वन वे आहे तिथेच ऑन द गो नावाचं एक छोटं कॉन्टिनेन्टल रेस्टॉरंट आहे. तेही छान आहे. फ्लोराचं चायनीज ही छान.
ठमादेवी.. जयहिंद म्हणजे
ठमादेवी.. जयहिंद म्हणजे फिनिक्स समोरचे ना? तिथे पात्रानी मच्छी फारच छान असते. ती त्यांची खासियत आहे असे म्हणता येईल.
कोलंबी भात देखील चांगला आहे. बाकी अजून काही ट्राय केलेले नाही...
फिनिक्ससमोरचं जयहिंद फारच छान
फिनिक्ससमोरचं जयहिंद फारच छान आहे. त्यांच्याकडे अदजानिया की कायशा नावाची एक अप्रतिम प्रिपरेशन मिळते. पण गोखले रोडचं जयहिंद ओके ओकेच आहे. त्यांच्याकडे जेवण जास्त तिखट असतं. शिवाय एक दादर स्टेशनच्या फुलमार्केटजवळही जयहिंद आहे. तिथे ऐकूण परिस्थिती बघून कोणी जाईलसं वाटत नाही.
ही एकाच नावाची रेस्टीरंटस कशी काय देव जाणे.
बित्तु, मॉडर्नला उआ दिला. पालक-पनीर फारच चविष्ट होते. व्हेबि जरा टिपीकलच वाटली. राजमाही जास्त मसालेदार वाटला.
सिंधुदुर्गचा दर्जा
सिंधुदुर्गचा दर्जा बकवास.
>>>> करोडो अनुमोदन
मामी, मॉडर्नचे सीफूड अधिक
मामी, मॉडर्नचे सीफूड अधिक प्रसिद्ध आहे!
मॉडर्नचे सीफूड अधिक प्रसिद्ध
मॉडर्नचे सीफूड अधिक प्रसिद्ध आहे! >>> येस्स्
सिंधुदुर्गचा दर्जा बकवास. >>> फक्त बिलाचा दर्जा अधिक आहे :p
मामी मी गोखले रोडच्या जयहिंद
मामी मी गोखले रोडच्या जयहिंद बद्दल म्हणाले. फिनिक्ससमोरचं जयहिंद कधी ट्राय केलं नाही. फिनिक्ससमोर वो-खाय नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तेही छानच आहे. ते माटुंग्याच्या डीपीज च्या मालकीचं आहे.
सर्वीकडच्या सिंधूदुर्गाला
सर्वीकडच्या सिंधूदुर्गाला बहुदा ग्रहण लागलेले आहे. ठाण्यातले सिंधुदुर्ग देखील आधी कित्ती चांगले होते.. आता बघवत नाही...
फिनिक्स मध्ये जे कॉपर चिमणी आहे. त्याच्याकडे रान कोणी खाल्लंय का? जबरी आहे एकदम..
मामी.. ते फुल मार्केटचे रामभरोसे हिंदू हॉटेल ते का? विसावाच्या बाजूला एक रसना म्हणून मस्त हॉटेल होते.. बंदच झाले अचानक.. चांगले होते ते...
कॉचि मध्ये रान नाही खाल्लं.
कॉचि मध्ये रान नाही खाल्लं.
जबरी आहे म्हणतोस? या विकेंडला जायलाच हवं म्हणजे. 

कॉचि ची सी-फूड प्लॅटरही सह्ही असते. यम्म, यम्म!!!
कॅलिफोर्निया पिझा किचन मध्ये जिंजर्-फिश खाल्लं. उत्कृष्ट! बरोबर जो सॉस देतात तो काहीसा गोड होता. मला आवडतो. आणि फिशबरोबरचं सॅलड तर सॉल्लिडच होतं.
कॉचि ची सी-फूड प्लॅटरही सह्ही
कॉचि ची सी-फूड प्लॅटरही सह्ही असते. यम्म, यम्म!!!
>>>>> यस्स..
मामी, CPK पण आलय India मध्ये?
मामी, CPK पण आलय India मध्ये? कुठे आहे हे?
CPK म्हणजे कॉपर चिमणी
CPK म्हणजे कॉपर चिमणी म्हणायचे आहे का? २ ठिकाणी आहे नक्की. एक फिनिक्स मिल, लोअर परेल, सेनापती बापट रोड वर. आणि अजून एक नेमके कुठे हे ते सांगता नाही येणार. पण सेंच्युरी बझार वरून वरळीला जाताना मध्येच कुठेतरी आहे...
CPK म्हणजे कॅलिफोर्निया पिझा
CPK म्हणजे कॅलिफोर्निया पिझा किचन.
एक खादाडी : दादर, माटुंगा
एक खादाडी : दादर, माटुंगा असाही धागा आहे. असे दोन वेगळे धागे का केलेत बरे? आपण दोन्ही धाग्यांवर बराच मोठा टापू कव्हर करतोय.
Pages