Submitted by webmaster on 26 May, 2009 - 21:25
प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज
प्रभादेवी,
प्रभादेवी, दादरला- अस्सल मराठमोळ्या जेवणासाठी आस्वाद, जिप्सी.
चायनीजसाठी- प्रभादेवीला चायना व्हॅली
बांद्रयाला- मालवणी नॉन-वेज जेवणासाठी सदिच्छा, राजयोग, सिंधुदुर्ग.
पु.ल.देशपां
पु.ल.देशपांडे अकादमीमध्ये असलेलं "उत्सव" चायनीज फूडसाठी मस्त आहे. तिथे लस्सी, डोसा, उत्तपम वगैरे पण मस्त मिळतात. फक्त हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे. एकदा जाऊन नक्कि पहा. विकेन्ड्ला जाम गर्दी असते मात्र.
प्रभादेवी
प्रभादेवी अगदी बांद्रापर्यंत जाउन पोचलय..:)
बांद्र्याला ते राजयोग वगैरे लिहलय त्याच रस्त्यावर पुढे हायवे गोमांतक आहे ( कोकण्याची खानावळ कि असचं काही दुसरं नाव आहे याचं) , दुपारी जेवणासाठी वेटींग असतं यावरुन चवीचा अंदाज येईलच :).
त्याच्या पुढे राईस बोट नावाचे केरळी स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे .अवियल खायची किंवा केरळा स्टाईल फिश आणि जाडा राइस खायची इच्छा असेल तर जरुर जा.
पुढे माहिमला एल जे रोड वरुन नॅशनल हॉस्पिटल कडे जाणार्या रस्त्याच्या कोपर्यावर ( भंडार गल्ली च्या विरुद्ध दिशेला) फ्रेश कॅच नावाचे कारवारी सी फुड रेस्टॉरंट आहे , मला मुंबईतले सगळ्यात आवडणारे सी फुड रेस्टॉरंट . जागा छोटि आहे पण चव झकास, त्याच्या पुढच्या गल्लीत मला न आवडणारं गोवा पोर्तुगिजा पण आहे
आणि पुढे गेलात तर परळ बस डेपो जवळ जय हिंद हे जगप्रसिद्ध ( आम्हा म्त्स्याहार्यांच जग केवढं छोटं) रेस्टॉरंट आणि वरळि नाक्यावरच भारत फिश ( भारत लंच होम) आहेच. याच भागात आणि तीन् चार छोटि सी फुड रेस्टॉर्ंट्स आहेत
हाय स्ट्रीट फिनिक्स मधे गजाली ही चालु झालेय
दादर चे सचिन, सिंधुदुर्ग, गोमांतक हि मंडळी सगळ्यांच्याच ओळखिची.
फिनिक्समध
फिनिक्समधे नूडल बार मधला चायनीज बफे ट्राय केला मागच्या विकेन्डला. अपेटायझर्स मस्तच होते, मेन कोर्समधल्या चिकनच्या डिशेस चांगल्या होत्या पण फिशची डिश चांगली नव्हती. हनी नूडल्स व्हॅनिला आईसक्रीम सोबत आणि चॉकेलेट मूज मस्तच्.....विकडेजला ३१५ आणि विकेन्ड्ला ३५०...पैसा वसूल
एस के बोले रोडवर आगर बझार
एस के बोले रोडवर आगर बझार मार्केटसमोर आधी जिथे जय महाराष्ट्र दुग्धालय होतं तिथे आता "पुरेपुर कोल्हापूर" म्हणून व्हेज-नॉनव्हेज हॉटेल आलंय. येता जाता तिथे बरीच गर्दी दिसते त्यावरून चांगलं असावंसं वाटतंय. कधी गेले तर इथे पोस्टेन.
स्वप्ना, ह्या पूरेपूर
स्वप्ना, ह्या पूरेपूर कोल्हापूरची ब्रँच विलेपार्ले पूर्वेला पण आहे. छान आहे चव. मस्त ठेचा, भाकरी, सोलकढी, चिकन, मटणाचा पांढरा रस्सा वगैरे मेनूमध्ये आहे.
हो मी पण पाहीलं शनिवारी
हो मी पण पाहीलं शनिवारी 'पुरेपुर कोल्हापुर'. टिपीकल कोल्हापुरी असावं असं वाटलं बाहेरुन तरी.
अरे व्वा छान मेजवानी सुरू
अरे व्वा छान मेजवानी सुरू आहे...
सेनाभवन मागिल सिंधुदुर्गमधे चुकनही जाऊ नका...
आऊटडोअर्स, हे नव्हतं मला
आऊटडोअर्स, हे नव्हतं मला माहित. आता एकदा इथे जाऊन बघते.
इंद्रधनुष्य, अनुमोदन, एकदा पोळले आहे.
सिंधुदुर्गमधे चुकनही जाऊ
सिंधुदुर्गमधे चुकनही जाऊ नका>> अगदी... वैताग आला होता.गोमांतक वगैरे सोडुन तिकडे गेलो होतो.
हे पाहिलंत का :
हे पाहिलंत का : http://travel.nytimes.com/2010/03/21/travel/21bites1.html?hpw
पुरेपुर कोल्हापुर मधून घरी
पुरेपुर कोल्हापुर मधून घरी जेवण मागवलं होतं. किमतीच्या मानाने Quantity आणि Quality दोन्हीच्या बाबतीत वाईट निराशा झाली. चिकन मसाला २ फुल मागवले होते तरी ४ लोकांना कमी पडलं. इतर हॉटेलात २ जणांना म्हणून येतं ते जेवण आमच्या घरी ३ लोकांना पुरतं. चिकनला अजिबात चव नव्हती आणि तिखटाचा पूर्ण डबा ओतला होता. आमच्या घरी तिखट खातात पण ह्या चिकनला अजिबात स्वाद नव्हता.
तीच गोष्ट पुलावची. २ प्लेट मागवला. आम्ही खरं तर खूप कमी भात खातो - इतर हॉटेलात मागवलेला एक प्लेट राईस आम्हा ४ लोकांना पुरतो. पण इथे Quantity खूप कमी होती. आणि वाईट बेचव.
कदाचित थाळी खाणार्यांना वेगळा अनुभव येईल. पण हेच पदार्थ थाळीच्या मेनूवरही आहेत. आम्ही तरी पुन्हा खाणार नाही
ह्यापेक्षा सायबिणी गोमांतक १०० पट छान आहे.
सायबिणी गोमांतक आवडलं नाही.
सायबिणी गोमांतक आवडलं नाही.
सिंधुदुर्ग - टाळलेले बरे.
सिंधुदुर्ग - टाळलेले बरे. ओव्हरहाईप्ड. अवाच्यासवा किंमत आणि चव एकदम सो सो.
फ्रेश कॅच - अतिउत्कृष्ट. तिथले बिबिन्का खायला मिळाले तर सोडू नका. केवळ स्वर्गीय.
काकोरी बिर्याणी हाऊस - कोणी फुकट खायला घातले तरी जाऊ नका. टाईम्स ऑफ इंडियात वाचले म्हणून तातडीने जाऊन भरपूर ऑर्डर देऊन जेवण घरी आणले आणि कोणीही संपवू शकले नाही. अजिबात चव नाही.
सायबिणी गोमांतक - काही ठराविक प्रकार छान. व्हॅल्यू फॉर मनी. खिमा, तिसर्या सुकं वगैरे छान.
जय हिंद (लो. परेल) - हे परळ बस डेपोच्या जयहिंद पेक्षा स्वच्छ आणि चांगले आहे. प्रॉन्स अदजानिया मस्तच. खूपच छोटं आहे पण हे.
नुडल्स बार - बुफे स्प्रेड खरचं चांगला असतो. स्वप्ना_राज म्हणालीये तसं खरच पैसे वसूल.
चायना व्हॅली - यांची व्हेज रेड थाय करी केवळ मारडाला.
पुरेपूर कोल्हापूर - इथे जाऊन पुरेपूर पस्तवाल.
महेश लंच होम ची शाखा या भागात केव्हा निघेल याची वाट बघतेय. त्याच बरोबर भारत एक्सलन्सी वाल्याने जरा मनावर घेऊन इथेपण दुकान खोलले ना, तर मग काय मज्जाच मज्जा!
'पुरेपूर कोल्हापूर'ला काय
'पुरेपूर कोल्हापूर'ला काय झालंय काळात नाही....
धनगर चिकन मस्त मिळते खरेतर तिकडे.. पण सर्विस बकवास... ठाण्याला तोच प्रकार..
पुरेपूर कोल्हापूर - इथे जाऊन
पुरेपूर कोल्हापूर - इथे जाऊन पुरेपूर पस्तवाल. >>> :d
परळला आचार्य दोंदे मार्गावार वाडिया हॉस्पिटलच्या समोर 'रुची' पालट करायला हरकत नाही... तसेच राजा सातवे एडवर्ड स्मारक (KEM) समोरील 'आदिती', 'ग्रिष्मा' आणि शेजारीच नविन 'वेज ऑलवेज'
अरे, ह्या बीबीवरच्या आधीच्या
अरे, ह्या बीबीवरच्या आधीच्या पोस्टस कुठे वाहून गेल्या?
>>नुडल्स बार - बुफे स्प्रेड खरचं चांगला असतो.
मामी, तिथे आधी ना ५ वेगवेगळे appetizers असायचे. आता फक्त मोमोज असतात. त्यांचं हनी-नूडल्स व्हॅनिला आईसक्रीम तर झक्कास असतं एकदम. तसंच स्ट्रॉबेरी mousse पण. Salads काही खास नसतात.
इंद्रधनुष्य, मला व्हेज ऑलवेज
इंद्रधनुष्य, मला व्हेज ऑलवेज नाही आवडलं. खूपच तेलकट वाटतात त्यांचे पदार्थ.
पूर्वी, वरळी नाक्याला 'विवा पश्चिम' होते ते बंद झाले. पहिले खूपच छान जेवण मिळायचे. नंतर नंतर अतिशयच बेकार जेवण असायचे. भानुशालींनी दर्जा सुधारण्याऐवजी बंदच केले.
Under the banyan tree - हे एक छानसे आणि छोटेसे रेस्टॉरन्ट समर पार्क च्या गल्लीत होते. (जरा किमती जास्त असल्यामुळे असेल) ते बंद झाले. इथल्या continental preperations मस्त असायच्या. माझ्या मुलीला तर इथले waffles खूपच आवडायचे.
विवा पश्चिम मध्ये आम्ही २
विवा पश्चिम मध्ये आम्ही २ वेळा फूड फेस्टिव्हलला गेलो होतो - एकदा काश्मिरी आणि एकदा मला वाटतं सिंधी. पुन्हा कधी पायरी चढलो नाही.
जय हिन्द आता दादर ला पण चालू
जय हिन्द आता दादर ला पण चालू झाले आहे
समोसा चाट, आईस पानीपुरी-
समोसा चाट, आईस पानीपुरी- प्रभादेवीला सिद्धीविनायक मंदिराच्या शेजारीच एक दुकान आहे तिथे झक्कास मिळतात हे आयटम्स.
-योडी.
सगळेजण आस्वाद, सुजाता, प्रकाश
सगळेजण आस्वाद, सुजाता, प्रकाश विसररलात वाटत.
आस्वादचे मराठी पदार्थ केवळ अप्रतिम!
प्रकाशचा पियुष, आस्वादची
प्रकाशचा पियुष, आस्वादची मिसळ, आणि गोमंतक मधलं सी-फुड............ तोंडाला पाणी सुटलं की राव....
रच्याकने किंगसर्कलच्या इडली पॅलेस ला गेलं आहे का कोणी???
इडली पॅलेस ला मी फार्फार
इडली पॅलेस ला मी फार्फार पूर्वी गेले होते. काही विशेष वाटले नाहीच पण अस्वच्छता खूपच वाटली. शिवाय जवळच मद्रास कॅफे, म्हैसूर कॅफे असे दिग्गज असताना पुन्हा इपॅत जाण्याचे झाले नाही. काही मिसलं पण नाही.
भारत बोर्डिंगचं कोणी नावही
भारत बोर्डिंगचं कोणी नावही काढेना??
भारत बोर्डींग म्हणजे आत्ताचे
भारत बोर्डींग म्हणजे आत्ताचे फिशलँड ना रे? तीथले साउथ ईंडीयन स्टाईल प्रॉन्स चीली फ्राय माझे आवडते
हे कुठे आहे? हे कुठे आहे? मला
हे कुठे आहे? हे कुठे आहे? मला कसं माहीत नाही??
सी फूड साठी मी 'होटेल फाउनटन'
सी फूड साठी मी 'होटेल फाउनटन' सुचविन फ्लोरा फाउनटन/ हुतातमा चोक जवळ. अर्थात ते प्रभादेवी हुन थोडे लाब झाले.
>>भारत बोर्डींग म्हणजे
>>भारत बोर्डींग म्हणजे आत्ताचे फिशलँड ना रे?>>
हो रे तेच ते!
>>हे कुठे आहे? हे कुठे आहे? मला कसं माहीत नाही??>>
वरळी नाक्यावरून लोअरपरेलकडे जाणार्या रस्त्यावर, अगदी सुरुवातीलाच उजव्या हाताला आहे! वरळी नाक्याला कोणीही सांगेल!
धन्स.
धन्स.
Pages