नमस्कार माबोकरांनो....
आम्ही कुटुंबीय , फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्रिवेंद्रम - कन्याकुमारी - रामेश्वरम - मदुराई, अशी ट्रिप करणार आहोत. पनवेल किंवा मुंबईहून ट्रेनने निघून त्रिवेंद्रम आणि मग पुढे फिरत फिरत प्रवास. मदुराईहून परतीचा प्रवास.
सध्या एक- दोन ट्रॅव्हल एजंटकडून प्लॅन मिळाले आहेत. ते फायनल करण्यापूर्वी आपणच हॉटेल बुकिंग करावी, असाही विचार चालू आहे. आम्ही एकूण १६ प्रौढ आणि १२ वर्षाखालील ५ मुले, असे २१ जण आहोत.
तिथे फिरण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर बुक करावी लागेल. त्याचे एकूण भाडे ४२,०००/- सांगितले आहे.
जर कुणी यापूर्वी ह्या ठिकाणी ट्रिप केली असेल, तर चांगले हॉटेल, रिसॉर्ट याबद्दल माहिती सांगा. तसेच, आवर्जून भेट देण्यासारखी पर्यटन स्थळे, रेस्टॉरंट, खरेदी इत्यादी टिप्ससुध्दा द्या. कुणाचे लोकल काही कॉन्टॅक्टस असतील तर तेही सांगा.
६ फेब्रुवारीला, सासू-सासऱ्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यादिवशी विशेष सेलिब्रेशनसाठी काही आयडिया सुचवल्यात, तर उत्तम. त्यादिवशी कन्याकुमारीला असू.
१) दादर पूर्व, स्वामिनारायण
१) दादर पूर्व, स्वामिनारायण मंदिराच्या मागच्या बाजू स तमिळनाड पर्यटन केंद्र आहे तिथे विचारणा केली का?
२) आइआरसिटिसीची भारतदर्शन यात्रा रेल्वे पुन्हा सुरू झाली आहे . छ शिवाजी म टर्मिनस येथे फलाट सातला बाहेर पडतो तिथे पत्रकं मिळतात. साधे स्वस्त पर्यटन.
३) त्रिवेंद्रम - कन्याकुमारी पासून मदुराई रामेश्वर तीनशे +दोनशे किमी दूर आहे.
४) सर्व धार्मिक पर्यटन आहे.
धन्यवाद Srd माहीती बद्दल.मला
धन्यवाद Srd माहीती बद्दल.मला पण हे माहीत नव्हते.मागे केरळ ला गेलो तेव्हाही तुमच्या मायबोली वरील माहीतीचा खुप ऊपयोग झाला
@ मेघ धन्यवाद.
@ मेघ धन्यवाद.
-----------------------------
@ माऊमैया ,
IRCTC TOUR रामेश्वर व दक्षिण भारत सहल.
तुमच्या सहल तारखेला आता नाही परंतू बरीच अपेक्षित ठिकाणं दाखवणारी आहे.
तुमचा विविध वयोगटातील मोठा ग्रुप पाहता ही आयोजित सहल ठीक वाटते.
हीच सहल ट्रेन अजून एकदा फेब्रुवारी/मार्चमध्ये नंतर निघेल.
तमिळनाड भागात पावसाळा ओक्टोबर ते डिसेंबर असतो त्यामुळे नंतरच्या तारखेस येणारी टुअर पाहावी. योगायोगाने फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यात आली तर उत्तमच.
(( रिफंड पॉलिसी नियम जाणून घ्यावेत. ठराविक दिवसांनंतर cancellation केल्यास IRCTCtourism पैसे परत देत नाहीत. तसं पाहिल्यास हा धोकाइतर टुअरवाल्यांकडेही असतोच.
तुमच्या गटातील कुटंबाप्रमाणे चार वेगळी बुकिंगज करावी म्हणजे cancellation पूर्ण गटाचे करावे लागणार नाही. ))
धन्यवाद srd
धन्यवाद srd
मी देखील या आय आर सी टी सी
मी देखील या आय आर सी टी सी च्या सहलिबद्दल माहिती घेण्यासाठी https://www.maayboli.com/node/80307 हा धागा काढला होता. कुणाला काही माहिती असल्यास तिथे चर्चा झाली तर माझ्या सहित इतरांनाही फायदा होईल
@ DJ....... , पाहिला नव्हता.
@ DJ....... , पाहिला नव्हता.
इथे आइआरसिटीसी भारत दर्शन
इथे आइआरसिटीसी भारत दर्शन सहली पाहा.
गडबडीत इथे लिहायचे राहिले
गडबडीत इथे लिहायचे राहिले होते.
srd, तुम्ही सुचवलेल्या irctc सहलीच्या तारखा आमच्या ठरलेल्या तारखांशी जुळत नव्हत्या. तसेच ट्रेन रिझर्वेशन संपत होतं, त्यामुळे येण्याजाण्याची तिकीटं बुक करून घेतली. आधी आम्हीच पोस्टात जाऊन तिकीटं काढली, पण ती दोन वेगवेगळ्या बोगींमध्ये मिळाली.
मग बऱ्याच ठिकाणी चौकशी करून शेवटी एजंटला पुन्हा तिकीटं काढायला सांगितली. त्याने अर्ध्या तासात, येण्याजाण्याची तिकीटं एका बोगींमध्ये मिळवून दिली.
त्यासाठी माणशी ३००/- कमिशन घेतले.
आधी काढलेली तिकीटं रद्द करण्याचे पैसे गेले ते वेगळे.
आता जानेवारीमध्ये, आम्हीच हॉटेल बुकिंग करु असं ठरलंय.
बाकी प्लॅनिंग चालू आहे.
@ माऊमैया,
@ माऊमैया,
तिकिटांचे बुकिंग करणे आणि एजंटने देणे नवीनच आहे. सध्या ( अधिकृत)एजंटकमी करण्यात आले आहेत आणि जे आहेत त्यांची नावं रेल्वेच्या टाइमटेबलमध्ये मागे दिलेली आहेत.
भारतदर्शन सहलीच्या तारखा जुळत नाहीत आणि सहा फेब्रुवारीलाच कन्याकुमारी हवे आहे. त्यामुळे खासगी स्वतंत्रपणे जाणे आले.
ट्रिप मनाप्रमाणे होवो.
धन्यवाद srd
धन्यवाद srd
त्रिवेंद्रमचं पद्मनाभस्वामी
त्रिवेंद्रमचं पद्मनाभस्वामी मंदिर आहे, त्याच्या उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा माहिती करून घ्या. माझ्या आठवणीनुसार तीनचार वेळा ते उघडतात आणि बंद करतात. तसंच, पुरुषांना लुंगी आणि स्त्रियांना साडी असा वेश असल्याशिवाय आत प्रवेश नव्हता. आता बदललं असल्यास माहिती नाही. मंदिर आणि मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. त्यामुळे अशा इतर कारणांमुळे ते पाहणं चुकायला नको
पुरुषांना लुंगी पांढरी!
पुरुषांना लुंगी पांढरी! चौकडीची नाही.
पुरुषांना लुंगी आणि
पुरुषांना लुंगी आणि स्त्रियांना साडी असा वेश असल्याशिवाय आत प्रवेश नव्हता. >>> आताही नाही. आणि तिथे पुरुषांना लुंगी भाड्याने मिळते, कपडे बदलण्याच्या खोल्या पण आहेत. पुरुषांना लुंगी आणि वर उपरणे एवढेच चालते, शर्ट बनियन काढावा लागतो.
स्त्रियांसाठी साड्याही भाड्याने मिळतात का माहीत नाही.
ह्या माहितीसाठी धन्यवाद.
ह्या माहितीसाठी धन्यवाद.
आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या महिलांकडे, त्या गोल्डन बॉर्डरवाल्या पांढऱ्या केरळी साड्या आहेत. त्याच नेसायचं ठरवलंय. लुंगी भाड्याने मिळते, हे बरंय.
नऊवारी साडी चालते ना?
तिथले भाव
तिथले भाव
शर्ट ,पँट ५/-(१०)
पट्टा ५
चपला २ बूट ५
स्याक १५,पाकिट १५,मोबाईल१५ तिन्ही वेगळे ठेवायचे असतात. - ४५रु
----------
करोना काळात भाड्याने लुंगी न घेणे, इथूनच खरेदी करून न्या. एवीतेवी कपडे भिवंडी / सुरतवरूनच जातात तिकडे.
----------
मी रुमवरच सर्व ठेवले, लुंगी लावली, कडोसरीला पैसे लावले आणि तिथे देवळाबाहेर शर्ट +चप्पलचे सात रु भरले.
गोपूरावर जायची वेळ संध्याकाळी ५:३०, पाच रुपये.
संध्याकाळी स्पेशल दर्शन चारला सुरू होते रु १००/-
पाच वाजता फुकट सर्वांसाठी.
---------------------
त्रिवेंद्रम - कन्या कुमारी मुख्य रस्त्यावर 'तकलाई 'गाव आहे तिथे आतमध्ये २ किमी पद्मनाभपुरम राजवाडा आहे. तो न चुकवणे. ९:०० ते१:०० २ते ४:३० . बसवाले तो हमखास गाळतात. टुअरवालेही गाळतात. तिथली फरशी एकमेव आहे जगात. बाकी वाडा आहेच भव्य, त्यापैकी २५% टक्केच दाखवतात एवढा प्रचंड आहे.
करोना काळात भाड्याने लुंगी न
करोना काळात भाड्याने लुंगी न घेणे, >>> हेही खरंय.