साहित्य:
१ मध्यम आकाराचा बटाटा
मीठ
१-२ टेबलस्पून फराळी पीठ
तेल
१ काकडी
१ सफरचंद
१ हिरवी मिर्ची
दही
साखर
१ डाळींब
कोथिंबीर
पाककृती:
बटाटा किसून त्यात मीठ मिसळावे. २-४ मिनिटानंतर त्याला पाणी सुटेल तेव्हा ते मुठीत दाबून काढून टाकावे. त्यानंतर त्यात फराळी पीठ मिसळावे. मिसळताना एकावेळेस एक चमचा पीठ घ्यावे व ब.किस एकत्र मिळून येईल इतके पीठ वापरावे. (पीठ जास्त झाल्यास पूरी कुरकुरीत न होता कडक होतात.)
आप्पे पात्रात २-३ थेंब तेल घालून त्यात चमचाभर बटाट्याचा किस घालून बोटाने दाबत त्याची वाटी करावी. मग भाजून घ्यावी. (१ बटाट्यात १० पूऱ्या झाल्या)
काकडी, सफरचंद सालकाढून बारीक चिरून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ आणि अतिशय बारीक चिरून मिर्ची घालावी.
दह्यात आवडीनुसार साखर घालावी.
पुरीत आधी काकडी-सफरचंद घालून त्यावर दही घालावे. वरून कोथिंबीर आणि डाळींबाची सजावट करावी.
तळणे नाही आणि बटाट्याचे प्रमाणही कमी आहे म्हणून मला ही पाककृती आरोग्यपूर्ण वाटते.
सही दिसतय. मस्त आयडिया
सही दिसतय. मस्त आयडिया
मोठ्या मॉल मध्ये अशी
मोठ्या मॉल मध्ये अशी बटाट्याची मोठी टोकरी तळून देतात
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी. चाट असल्याने मन ओढले गेले.
ज्यांना वाटतयं आतून कच्चे राहील त्यांच्यासाठी आयडिया , छोट्या मफिन्सचा pan उपडा करून नंतर त्यावर तेल लावून या कटोऱ्या थापून अवनमधे दोन्ही बाजूंनी खरपूस करता येतील , लवकरही होतील .
तळटीप्स , हे खरंतर भाजटिप्स हवे.
१. ब्रॉईल करू नका खाक होतील.
२.मी कधीही केलेले नाही.
३.मैत्रिणीने ओल्या ब्रेडना असाच आकार देऊन/कटोरी आकारात भाजून त्यात मोड आलेली मटकी, मूग, चटणी शेव वगैरे घालून कटोरी चाट केले होते , ते मी खाल्ले होते इतकेच.
४.जरा मोठ्या होतील व पटकन पोट भरेल.
आमच्या कडे हा पदार्थ केल्यास
आमच्या कडे हा पदार्थ केल्यास बास्केट भाजून त्यात सगळं टाकेपर्यंत बास्केटस चा फन्ना उडू नये म्हणून घरातल्या लोकांना कोंडून ठेवावं लागेल.>> अनु !
यावरुन एक किस्सा आठवला, आम्च्या सोसायटीत गणपती उत्सवात पाकक्रुती स्पर्धा होत्या, ब्रेड्चे पदार्थ अस चॅलेन्ज होत, वहिनीने ब्रेड,बटाटा आणि गाजर, मटार घालुन छान कटलेट बनवले आणी डेकोरेट करुन मस्त प्लेट मधे किल्वर वैगरे आकारात मान्डुन ठेवले होते, परिक्षक यायला वेळ होता तोवर कस झालय बघु म्हणुन काही चतुर सदस्यानी एकेक कटलेट उचलायचे आणि आकार बदलवुन चौकोन केला मग अजुन एक कुणि खाल्ल तर त्याचा बदाम करा, शेवटी घाइत आधी आमची डिश जज करा म्हणून पटकन परिक्षकानाच आमच्याकडे आणले ...
तरी बर जज करायला का होइना दोन परिक्षक मिळुन ३ कटलेट तरी राहिले होते.
चौकोन, बदाम करायची आयडीया
चौकोन, बदाम करायची आयडीया मस्त आहे.
मी आणि सा.बा. नी मिळून स्टीलच्या गाळणीत खीस थापून गाळणी तळून बास्केट बनवून चाट करायचा प्रयत्न केला होता.पण केलेल्या मेहनतीचा आणि खाणाऱ्या लोकांचा रेशो अजिबातच जुळेना.फायनली 'गड्या आपली भेळ/पाणीपुरी बरी' म्हणून पुढच्या वेळी गप साधे पदार्थ केले.गाळण्याच्या मनावर कायम चे गंभीर आघात झाले ते वेगळेच.त्यावेळी आप्पे पात्रात इतके विविध पदार्थ होतात हे ज्ञान फेसबुक ने दिलं नव्हतं. आम्ही आप्पे पात्रात आप्पेच करायचो.
गाळण्याच्या मनावर कायम चे
सोनाली मस्त पदार्थ सुचवलास... करण्यात येईल. तळण नाहीये हे बेस्ट
गाळण्याच्या मनावर कायम चे गंभीर आघात झाले ते वेगळेच.त्यावेळी आप्पे पात्रात इतके विविध पदार्थ होतात हे ज्ञान फेसबुक ने दिलं नव्हतं. आम्ही आप्पे पात्रात आप्पेच करायचो.>>>>>>>>>> अनु
अनु
अनु
त्यावेळी आप्पे पात्रात इतके
त्यावेळी आप्पे पात्रात इतके विविध पदार्थ होतात हे ज्ञान फेसबुक ने दिलं नव्हतं. आम्ही आप्पे पात्रात आप्पेच करायचो. >>> अगदी बरोबर !!!
अनू हाहाहा.
अनू हाहाहा.
मोठ्या मॉल मध्ये अशी
मोठ्या मॉल मध्ये अशी बटाट्याची मोठी टोकरी तळून देतात>> हो. त्यावरूनच सुचले मला.
बटाट्याच्या किसात तांदूळाचे पीठ मिसळतात तर मी येथे उपवासाचे पीठ वापरले.
सगळं टाकेपर्यंत बास्केटस चा फन्ना उडू नये म्हणून घरातल्या लोकांना कोंडून ठेवावं लागेल.>>> दाखवाची डिश झाल्यानंतर दुसरा बटाट किसून त्याच्या बास्केट करून तेव्हढ्याच खाल्ल्या आम्ही
गाळण्याच्या मनावर कायम चे गंभीर आघात झाले ते वेगळेच.>>>
छोट्या पळीच्या मागच्या बाजूस तेल लाऊन त्यावर असे मिश्रण थापून ते गरम तेलात बुडवून तळतात असा व्हिडिओ पाहिलाय कुठेतरी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना.
>>>>>>छोट्या पळीच्या मागच्या
>>>>>>छोट्या पळीच्या मागच्या बाजूस तेल लाऊन त्यावर असे मिश्रण थापून ते गरम तेलात बुडवून तळतात असा व्हिडिओ पाहिलाय कुठेतरी.
अरे वा नॉव्हेल आयडीया आहे. सर्व सुग्रीणींना माझे नमन.
******* अभिनंदन Sonalisl
******* अभिनंदन Sonalisl *******
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
हा पदार्थ करून बघायचे डोक्यात आहे बरेच दिवस.जबरदस्त लागेल.
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
गाळण्याच्या मनावर कायम चे गंभीर आघात झाले ते वेगळेच.>>>> अनु काय लिहीशील बाई, नेम नाही.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन सोनाली
अभिनंदन सोनाली
माझे गुप्त मतदान या दहीपुरीलाच होते. कधीतरी बिनऊपवासाच्या दिवशी करून बघायचीय
Pages