- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं
25 वर्षं?मोठा काळ आहे.इतका मोठा काळ सर्व बदल झेलत टिकून राहणं, स्वतःची इंकॉर्पोरेटेड कंपनी रजिस्टर करणं, चित्रपट प्रायोजित करणं म्हणजे मोठं काम.त्यासाठी प्रशासकाना झुकून सलाम.
मायबोली आधीपासूनच माहीत होतं.मध्ये मध्ये मराठी ग्रीटिंग कार्ड वगैरे सर्च करताना समोर यायचं.पण तेव्हा लोक मिंगलीश लिहायचे.किंवा मग तो एक विचित्र फॉन्ट होता ज्यात स्क्रोल करताना एकाची काना मात्रा वेलांटी दुसऱ्याच्या डोक्यावर दिसायची.मग जरा पब्लिक मराठी लिहायला लागलं, लिहिणं सोपं झालं तेव्हा घाबरत इथे डोकावायचे.कोणत्या तरी धाग्यावर एकता कपूर च्या मालिकेसारखं विडंबन चालायचं तिथे लिहायचे.कथांमध्ये फक्त हॉरर कथा शोधून वाचायचे.त्या मराठी महिन्याच्या नावाच्या फॉरमॅट मुळे वात यायचा पण सापडल्या की खजिना मिळायचा.अजूनही 'एन आर आय लोकांची साईट, इथे आपल्याला खेळायला घेणार नैत' असे काहीतरी ग्रह डोक्यात होते.पण हळूहळू इथे वाचायला लागले, लिहायला लागले.इथले स्वभाव कळले.सर्व प्रकारचे, प्रेमळ, मिश्किल, रागीट,कडक,शिष्ट,मायाळू असे सर्व प्रकारचे लोक असलेलं हे एक मोठं संयुक्त कुटुंब.माझे वेगवेगळ्या बाबतीत डोळे उघडण्याचं काम मायबोली रोजच करत असते.ही एक कन्टीन्यूअस प्रोसेस आहे.त्यामुळे भूतकाळात 'काय दिलं' असं सांगता येणार नाही.
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
बदल म्हणजे, मराठी टायपिंग चे इंटिग्रेशन सुधारत गेले.द्रुपल वर मायबोली स्थलांतरित झाल्यापासून एकदम सोपे झाले.इमेज अपलोड ची सुविधा खूप जास्त युजर क्लिक वाली वाटते, पण आता सवय झाली.
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
मला ग्रुपवरील नवीन, माझ्यासाठी नवीन या सुविधा आवडतात.द्रुपल कृपेने मिळालेली आयडी ला इमेल वर व्यक्तिगत निरोप येतो, आपल्याला स्वतःचा इमेल आयडी न देता व्यक्तिगत निरोप लिहिता येतो हे खूप आवडतं.पाककृती ऍप आवडतं.
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
हॅ हॅ, जी कित्येक दिवस माहिती नव्हती इतके दिवस ती माझ्या एकंदर आळशीपणामुळे अजूनही माहिती नसेलच.त्यामुळे याबाबत लिहिता येणार नाही.
- तुम्ही मायबोलीला काय दिलं
विनोद म्हणून म्हणायचं तर त्यांनी दिलेला अनेक जीबी चा सर्व्हर स्पेस काहींबाही खरडून त्यांना खर्च करून दिला.
सिरियसली म्हणायचं तर इथे मराठीत लिखाण करणारा प्रत्येक सदस्य मायबोलीला स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व,त्याच्या अनेक कंगोऱ्यापैकी एक कंगोरा देत असतो.अश्याच अनेक कंगोऱ्यापैकी मी एक.
- तुमचं कुठलं लेखन गाजलं
प्रतिसाद मोजायचे म्हटले तर: हे.
https://www.maayboli.com/node/64886
https://www.maayboli.com/node/64788
- कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
दृश्यावरून गाणे ओळखा या धाग्यावर मी फार धुडगूस घातला.लोकांना हिरोची वंशावळ, हिरॉईनचे काके मामे चुलते जावा जावेच्या नणंदेच्या बहिणीचा पुतण्या वगैरे नाती सांगून गांजले.
मध्यंतरी मला गझला चढल्या होत्या.तेव्हा बाल वॉशिंग्टन प्रमाणे मी आपली गझलरुपी कुऱ्हाड कुठेही चालवायचे.त्याने बरेच लोक गांजले गेले असावे असा अंदाज आहे.(मला एका ज्येष्ठ गझलकाराने 'बाई प्लिज आता थांबव गझल लिहिणे' असं सांगितलं होतं. इथले कोणीही प्रसिद्ध नव्हेत.)
https://www.maayboli.com/node/50760
https://www.maayboli.com/node/63844
आयटी वाले लेख काही जणांना आवडत असले तरी इतर बऱ्याच जणांना मनातून गांजत असावे अशी शंका आहे.पण लोक सहिष्णू आहेत.
एकंदर, मायबोलीने खुप काही शिकवले.सोशल मीडियावर मुद्दे कसे भरकटतात, अर्थ जसे वेगळे वाचले जातात, कंपू करायचे नाहीत म्हटलं तरी सम विचारांमुळे आपोआप मध्ये उभे असलेले आपण एका बाजूला कसे वळत जातो,तावातावाने एखादी गोष्ट वाचून काहीतरी उत्तर टाईप करायला जाण्यापूर्वी परत एकदा वाचावे, त्यामागचा खरा हेतू, अर्थ समजून घ्यावा याचा प्रत्यय आला.आपले पारंपरिक विचार तपासता आले.त्यापेक्षा वेगळे, आपल्याला येडे किंवा दुष्ट वाटणारे विचारही असू शकतात, त्यांनाही तात्विक बैठक असू शकते हे स्वीकारण्याची क्षमता वाढत गेली.वर्षा विहार किंवा खूप संख्या असलेल्या मैफिलींची भीती वाटते, पण छोटे ग्रुप ओळखीचे झाले.आपले वाटायला लागले.
25 झाला, तसेच 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मायबोलीला शुभेच्छा!!!
खूप छान लिहिले आहे . मनोगत
खूप छान लिहिले आहे . मनोगत आवडले .
विषयाला अनुसरून लिहीले आहे.
विषयाला अनुसरून लिहीले आहे. मायबोलीच्या आठवणीतला/ली मी असे होऊ दिलेले नाही. प्रश्न त्याच पद्धतीचे आहेत. पण तुम्ही उत्तरे देताना योग्य मार्गावर राहिला आहात.
ताक : तुम्ही तुम्हाला दाखवून दिलेल्या चुका मनापासून खेळीमेळीने घेता हे तुमचे वैशिष्ट्य जाणवले. गझलेवरचा तो प्रतिसाद पण तुम्ही विनोदाने घेतलेला आहे हे दिसतेच आहे. तुमच्या मुळे अनेक धाग्यांवर खुसखुशीत वातावरण निर्माण होते. बरेचदा प्रतिसाद लिहायचा कंटाळा करत असल्याने ही संधी साधून नमूद करत आहे.
प्रत्यक्ष आयुष्यात मी माझ्या
प्रत्यक्ष आयुष्यात मी माझ्या बोलण्याने,वागण्याने भरपूर शत्रू कमावते.सोशल वावर साधारण चौघीजणी मधल्या ज्यो सारखा असतो.चुकीच्या माणसांसमोर मनमोकळे बोलणे, योग्य (म्हणजे पुढेमागे यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल अश्या) माणसांसमोर उगीच वाद घालून त्यांच्या 'नो' लिस्टित जाणे वगैरे.>>>>
मी म्हणजे तू च कि काय
सेम ग सेम!
तुमचे मांजारावरचे लेख मस्त
तुमचे मांजारावरचे लेख मस्त असतात. waterfall and agile मधला फरक नव्या लोकांना समजावून सांगताना मी नेहेमीच तुमचे उदाहरण वापरतो.
प्रत्यक्ष आयुष्यात मी माझ्या
प्रत्यक्ष आयुष्यात मी माझ्या बोलण्याने,वागण्याने भरपूर शत्रू कमावते.सोशल वावर साधारण चौघीजणी मधल्या ज्यो सारखा असतो.चुकीच्या माणसांसमोर मनमोकळे बोलणे, योग्य (म्हणजे पुढेमागे यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल अश्या) माणसांसमोर उगीच वाद घालून त्यांच्या 'नो' लिस्टित जाणे वगैरे.>>>>
भारीच आहेस
मस्त लेख अनु.
मस्त लेख अनु.
भन्नाट लिहीलं आहेस. तुझे लेख,
भन्नाट लिहीलं आहेस. तुझे लेख, लिहीण्याची पद्धत खूप आवडते मला. कुत्री असलेली मांजर, चावडीमधलं मांजर ही सगळी मांजरं प्रचंड हसवतात. तुझ्या दृगाओ क्लूजसाठी _/\_
असंच मस्त लिहीत रहा.
कुत्री असलेली मांजर,
कुत्री असलेली मांजर, चावडीमधलं मांजर ही सगळी मांजरं प्रचंड हसवतात. >>> टोटली! र्म्द च्या पोस्ट वरून आठवले. मांजर व एकूणच जे कंपन्यांमधल्या लोकांकरता मेटॅफोर्स वापरलेले आहेत त्या सर्वांकरता एक स्पेशल लोल
मायबोलीला काय दिले मधे तेही एक महत्त्वाचे आहे 
छान लेख...!
छान लेख...!
नेहमीप्रमाणे छान लिहिलंय...
तुमचे प्रतिसाद नेहमीच सकारात्मक आणि वाचनीय असतात...
मी_अनु, मस्त मनोगत! तुझे
मी_अनु, मस्त मनोगत! तुझे मांजरांवरचे लेख तर प्रिय आहेतच पण अनेक धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तू जी सविस्तर माहिती देतेस तेही फार छान वाटतं. (हा प्रतिसाद लिहिताना हे असे प्रतिसाद वाचून एखाद्या अमायबोलीकराला तुझ्याकडे तू डझनभर मांजरे पाळली आहेस असे वाटू शकते या विचाराने हसू फुटले!)
मी-अनु, मस्त लिहिलेस.
मी-अनु, मस्त लिहिलेस.
सर्व म्हणतात तशीच तु आहेस, तु लिहिलेस तशी नाहीस.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
तुमचा मायबोली वावर प्रसन्न असतो.. +1
Pages