- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं
25 वर्षं?मोठा काळ आहे.इतका मोठा काळ सर्व बदल झेलत टिकून राहणं, स्वतःची इंकॉर्पोरेटेड कंपनी रजिस्टर करणं, चित्रपट प्रायोजित करणं म्हणजे मोठं काम.त्यासाठी प्रशासकाना झुकून सलाम.
मायबोली आधीपासूनच माहीत होतं.मध्ये मध्ये मराठी ग्रीटिंग कार्ड वगैरे सर्च करताना समोर यायचं.पण तेव्हा लोक मिंगलीश लिहायचे.किंवा मग तो एक विचित्र फॉन्ट होता ज्यात स्क्रोल करताना एकाची काना मात्रा वेलांटी दुसऱ्याच्या डोक्यावर दिसायची.मग जरा पब्लिक मराठी लिहायला लागलं, लिहिणं सोपं झालं तेव्हा घाबरत इथे डोकावायचे.कोणत्या तरी धाग्यावर एकता कपूर च्या मालिकेसारखं विडंबन चालायचं तिथे लिहायचे.कथांमध्ये फक्त हॉरर कथा शोधून वाचायचे.त्या मराठी महिन्याच्या नावाच्या फॉरमॅट मुळे वात यायचा पण सापडल्या की खजिना मिळायचा.अजूनही 'एन आर आय लोकांची साईट, इथे आपल्याला खेळायला घेणार नैत' असे काहीतरी ग्रह डोक्यात होते.पण हळूहळू इथे वाचायला लागले, लिहायला लागले.इथले स्वभाव कळले.सर्व प्रकारचे, प्रेमळ, मिश्किल, रागीट,कडक,शिष्ट,मायाळू असे सर्व प्रकारचे लोक असलेलं हे एक मोठं संयुक्त कुटुंब.माझे वेगवेगळ्या बाबतीत डोळे उघडण्याचं काम मायबोली रोजच करत असते.ही एक कन्टीन्यूअस प्रोसेस आहे.त्यामुळे भूतकाळात 'काय दिलं' असं सांगता येणार नाही.
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
बदल म्हणजे, मराठी टायपिंग चे इंटिग्रेशन सुधारत गेले.द्रुपल वर मायबोली स्थलांतरित झाल्यापासून एकदम सोपे झाले.इमेज अपलोड ची सुविधा खूप जास्त युजर क्लिक वाली वाटते, पण आता सवय झाली.
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
मला ग्रुपवरील नवीन, माझ्यासाठी नवीन या सुविधा आवडतात.द्रुपल कृपेने मिळालेली आयडी ला इमेल वर व्यक्तिगत निरोप येतो, आपल्याला स्वतःचा इमेल आयडी न देता व्यक्तिगत निरोप लिहिता येतो हे खूप आवडतं.पाककृती ऍप आवडतं.
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
हॅ हॅ, जी कित्येक दिवस माहिती नव्हती इतके दिवस ती माझ्या एकंदर आळशीपणामुळे अजूनही माहिती नसेलच.त्यामुळे याबाबत लिहिता येणार नाही.
- तुम्ही मायबोलीला काय दिलं
विनोद म्हणून म्हणायचं तर त्यांनी दिलेला अनेक जीबी चा सर्व्हर स्पेस काहींबाही खरडून त्यांना खर्च करून दिला.
सिरियसली म्हणायचं तर इथे मराठीत लिखाण करणारा प्रत्येक सदस्य मायबोलीला स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व,त्याच्या अनेक कंगोऱ्यापैकी एक कंगोरा देत असतो.अश्याच अनेक कंगोऱ्यापैकी मी एक.
- तुमचं कुठलं लेखन गाजलं
प्रतिसाद मोजायचे म्हटले तर: हे.
https://www.maayboli.com/node/64886
https://www.maayboli.com/node/64788
- कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
दृश्यावरून गाणे ओळखा या धाग्यावर मी फार धुडगूस घातला.लोकांना हिरोची वंशावळ, हिरॉईनचे काके मामे चुलते जावा जावेच्या नणंदेच्या बहिणीचा पुतण्या वगैरे नाती सांगून गांजले.
मध्यंतरी मला गझला चढल्या होत्या.तेव्हा बाल वॉशिंग्टन प्रमाणे मी आपली गझलरुपी कुऱ्हाड कुठेही चालवायचे.त्याने बरेच लोक गांजले गेले असावे असा अंदाज आहे.(मला एका ज्येष्ठ गझलकाराने 'बाई प्लिज आता थांबव गझल लिहिणे' असं सांगितलं होतं. इथले कोणीही प्रसिद्ध नव्हेत.)
https://www.maayboli.com/node/50760
https://www.maayboli.com/node/63844
आयटी वाले लेख काही जणांना आवडत असले तरी इतर बऱ्याच जणांना मनातून गांजत असावे अशी शंका आहे.पण लोक सहिष्णू आहेत.
एकंदर, मायबोलीने खुप काही शिकवले.सोशल मीडियावर मुद्दे कसे भरकटतात, अर्थ जसे वेगळे वाचले जातात, कंपू करायचे नाहीत म्हटलं तरी सम विचारांमुळे आपोआप मध्ये उभे असलेले आपण एका बाजूला कसे वळत जातो,तावातावाने एखादी गोष्ट वाचून काहीतरी उत्तर टाईप करायला जाण्यापूर्वी परत एकदा वाचावे, त्यामागचा खरा हेतू, अर्थ समजून घ्यावा याचा प्रत्यय आला.आपले पारंपरिक विचार तपासता आले.त्यापेक्षा वेगळे, आपल्याला येडे किंवा दुष्ट वाटणारे विचारही असू शकतात, त्यांनाही तात्विक बैठक असू शकते हे स्वीकारण्याची क्षमता वाढत गेली.वर्षा विहार किंवा खूप संख्या असलेल्या मैफिलींची भीती वाटते, पण छोटे ग्रुप ओळखीचे झाले.आपले वाटायला लागले.
25 झाला, तसेच 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मायबोलीला शुभेच्छा!!!
सिरियसली म्हणायचं तर इथे
सिरियसली म्हणायचं तर इथे मराठीत लिखाण करणारा प्रत्येक सदस्य मायबोलीला स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व,त्याच्या अनेक कंगोऱ्यापैकी एक कंगोरा देत असतो.अश्याच अनेक कंगोऱ्यापैकी मी एक.>> हे आवडलं
लेखही छान जमलाय
____
'लय भारी विनोदी लिखाण करणारी ती अनु' अशी ओळख डोक्यात पक्की आहे
>>>>>>>तेव्हा बाल वॉशिंग्टन
>>>>>>>तेव्हा बाल वॉशिंग्टन प्रमाणे मी आपली गझलरुपी कुऱ्हाड कुठेही चालवायचे.त्याने बरेच लोक गांजले गेले असावे असा अंदाज आहे.(मला एका ज्येष्ठ गझलकाराने 'बाई प्लिज आता थांबव गझल लिहिणे' असं सांगितलं होतं. Happy इथले कोणीही प्रसिद्ध नव्हेत.)
हाहाहा. लेख खुसखुशीत झालेला आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
विनोदी लेख तर आहेतच पण त्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्या माहितीपुर्ण आणि ऊपयुक्त प्रतिसादांसाठी ओळखतो. आजवर ते बरेचदा माझ्या कामी आलेत. मायबोलीला काय दिले तर हे एक योगदानच आहे आपले.
नाती सांगून गांजले. >>
नाती सांगून गांजले. >>
सावत्र बायको तर सगळ्यात डेंजरस होतं. गांजले, पीडले इ सर्व झाले.
मस्त लेख!!!
मस्त! तुझी अनुदिनी हे मी
मस्त! तुझी अनुदिनी हे मी मायबोलीवर सुरुवातीच्या काळात वाचलेल्या, लक्षात राहिलेल्या चांगल्या लिखाणापैकी एक आहे.
(तुझी सीआयडीवाली गझल फारच भारी होती.)
>> पुतण्या वगैरे नाती सांगून
>> पुतण्या वगैरे नाती सांगून गांजले.>> सावत्र बायको>>> त्या धाग्यावर फारच माठ फीलिंग येतं म्हणून जात नाही. इतकी मजा असेल तर मिस झाली की!
छान लिहिलं आहे.
मस्त!
मस्त!
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे. तुमचे
छान लिहिले आहे. तुमचे खुसखुशीत प्रतिसाद, लेखन आवडते.
मस्त आठवणी कथन.
मस्त आठवणी कथन.
मस्तं
मस्तं
तुझे खुसखुशीत लिखाण नेहेमीच आवडतं आणि माहिती हवी टाईप धाग्यावर तू नेहेमीच उपयुक्त माहिती देतेस तेव्हा 'कसकाय हीला सगळं माहिती' असा कौतुकमिश्रित विचार नेहेमी डोक्यात येतो.
हा लेखही मस्त.
कंगोरा आवडलं.
तुमचे खुसखुशीत प्रतिसाद, लेखन
तुमचे खुसखुशीत प्रतिसाद, लेखन आवडते. >> +१
डास, झुरळं, मुंग्या धाग्यावर मांजर नामक कुत्रीने प्रवेश केला तेव्हा धमाल आली होती.
मस्त लेख. तुझा माबो वावर
मस्त लेख. तुझा माबो वावर प्रसन्न असतो.

दृगाओ वरचे क्लूज खतरनाक असायचे
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहीलेय.
छान लिहीलेय.
हिंजवडीतील मांजर खुप आवडलेले.. बाकी लेखही आवडलेले आहेत...
'लय भारी विनोदी लिखाण करणारी ती अनु' अशी ओळख डोक्यात पक्की आहे>>>>>> +१००००००
लय भारी विनोदी लिखाण करणारी
लय भारी विनोदी लिखाण करणारी ती अनु' अशी ओळख डोक्यात पक्की आहे>>>>>> +१००००००
आयटी तले लेख प्रचंड relate होतात आणि cool वाटतात.
हम दिल दे चुके सनम चिरफड वाचून गडबडा लोळले होते.
अजूनही लो वाटलं की तुमचं लेखन काढून वाचत बसते, बरं वाटतं
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.
कुठल्याही धाग्यावर उपयुक्त माहिती , सल्ला लगेच दिला जातो हे फार आवडतं तुझं. आणि विनोदी लेख तर मस्तच .अगदी आपल्याच घरात काही काही किस्से घडलेले असतात, पण विनोदाची झालर पांघरलेली वाचायला फार मजा येते.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
माबोवरील मोजक्या 'अजातशत्रू' आयडींपैकी एक असलेला आयडी म्हणजे मी अनु अशी ओळख आहे.
विनोदी लेखन आवडतंच. प्रतिसादांतही नर्मविनोद सापडतो. फिस्सकन् हसायला येतं. सल्ले उपयुक्त असतात.
तुझे लेखन, प्रतिसाद आणि एकंदर
तुझे लेखन, प्रतिसाद आणि एकंदर वावर खूप आवडतो. अशीच लिहित रहा, हसत आणि हसवत रहा
वा मस्तच ग
वा मस्तच ग
नेहमी सारखं खुसखुशीत आणि नर्म विनोदी!
किल्ली स अनुमोदन. नेहमी छानच
किल्ली स अनुमोदन. नेहमी छानच लिखाण असतं. कंगोरा कल्पना आवडली.
तुझे लेखन, प्रतिसाद आणि एकंदर
तुझे लेखन, प्रतिसाद आणि एकंदर वावर खूप आवडतो. अशीच लिहित रहा, हसत आणि हसवत रहा+१११११११
मस्त लेख. तुझा माबो वावर
मस्त लेख. तुझा माबो वावर प्रसन्न असतो. Happy>>>>+११११
आणि वरती कोणीतरी म्हंटलय तसं अजातशत्रू आहेस.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
बाबो.मला अजातशत्रू वगैरे
बाबो.मला अजातशत्रू वगैरे म्हटलेलं बघून गहिवरून आलं आणि मी एका काल्पनिक काळ्या टीपॉय वर टपकन हात मारून टचवुड केलं.कुटुंबीयांनी ऐकल्यास तेही उलतेपालटे होतील.
मी अजातशत्रू वगैरे नाही.अनेकांच्या मी डोक्यात जाते, अनेक आयडी माझ्या डोक्यात जातात.फक्त संकेतस्थळ वावर मागची 15 वर्षं असल्याने फार जास्त मनाला न लावून घेता मख्खपणे नव्याने राज्य मांडणं जमतं
प्रत्यक्ष आयुष्यात मी माझ्या बोलण्याने,वागण्याने भरपूर शत्रू कमावते.सोशल वावर साधारण चौघीजणी मधल्या ज्यो सारखा असतो.चुकीच्या माणसांसमोर मनमोकळे बोलणे, योग्य (म्हणजे पुढेमागे यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल अश्या) माणसांसमोर उगीच वाद घालून त्यांच्या 'नो' लिस्टित जाणे वगैरे.
>>>>>>कुटुंबीयांनी ऐकल्यास
>>>>>>कुटुंबीयांनी ऐकल्यास तेही उलतेपालटे होतील.

पण माझंही हेच होतं
हाहाहा
>>>>>चुकीच्या माणसांसमोर मनमोकळे बोलणे, योग्य (म्हणजे पुढेमागे यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल अश्या) माणसांसमोर उगीच वाद घालून त्यांच्या 'नो' लिस्टित जाणे वगैरे.
कहर विनोदी आहेस
कोणालाही न दुखवता आपल्याला
कोणालाही न दुखवता आपल्याला हसवणारी ती मी अनु ...
मस्तच लिहिलं आहेस.
>>>>>चुकीच्या माणसांसमोर मनमोकळे बोलणे, योग्य (म्हणजे पुढेमागे यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल अश्या) माणसांसमोर उगीच वाद घालून त्यांच्या 'नो' लिस्टित जाणे वगैरे. >>जाम हसले मी.
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
प्रतिसाद पण मस्त.
मी अजातशत्रू वगैरे नाही
मी अजातशत्रू वगैरे नाही.अनेकांच्या मी डोक्यात जाते, अनेक आयडी माझ्या डोक्यात जातात.फक्त संकेतस्थळ वावर मागची 15 वर्षं असल्याने फार जास्त मनाला न लावून घेता मख्खपणे नव्याने राज्य मांडणं जमतं >> देअर यु गो!
खूप छान लिहिले आहे. तुमचे
खूप छान लिहिले आहे. तुमचे लेखन नेहमीच खूप आवडते.
Pages