ब्लॅक विडो: मुलीमुलींची धमाल आणि कमाल!

Submitted by अश्विनीमामी on 5 September, 2021 - 21:53

तसे एका मुलीला, बाईला आयु ष्यात काय पर्याय उपलब्ध असतात ?! चांगली मुलगी बहीण बायको आई बन णे ह्यात जीवन निघून जाते. किती जणी जीवनात उपलब्ध असलेले इतर पर्याय शोधून बघतात? त्यांना माहीती तरी अस्तात का हे इतर पर्याय? आणि विचार करून त्यातला एखादा पाठ पुरावा करून आपलासा करण्याचे स्वातंत्र्य किती जणींना अस्ते? समाजातील प्रचलित पूर्वग्रह, समज गैर समज, घट्ट शतकानुश तके महान शक्तिशाली बनलेली पितृसत्ताक जीवन पद्धती मग ते टेक्सस मधील गर्भपात विरोधी नियम असोत, अफ गाणिस्तानातील शरिया कायद्या नुसार स्त्रियांचे दमन करणारी विचार पद्धती असो मुलींचे जीवन नियंत्रित करू पाहणा री व एखादी ने ते तोडून पाडण्याची हिंमत दाखवलीच तर कॄर पणे तिला दाबून टाकणारी शक्ती कायमच कार्यान्वित असते.

जग भरात टाकलेल्या, नको श्या असलेल्या कुरूप व्यंग असलेल्या किंवा प्रस्थापित चौकटीत फिट न होणार्‍या मुली बायका असतातच. अश्यांची नाजूक अवस्था हेरून त्यांना वाममार्गाला लावणा रे तरस वृत्तीचे लोक समाजात नेहमीच व सर्वत्र असतात. ब्लॅक विडो हा ब्लॅक विडो कॉ मिक्स वर आधारित मार्व्हेल डिस्ने ने काढलेला चित्रपट हा नताशा रोमानोफ व तिची बहीण येलेना ह्या अशाच दोन मुलींचा प्रातिनिधिक प्रवास दाखवतो व मनोरंजनात शर्करावगुंठित करून विषारी पित्रु सत्तेला झुगारून द्या आपले निर्णय आपण घ्या हा महत्वाचा संदेश देतो. संदेश जरी घेतला नाही तरी मोठ्या स्क्रीन वरील मोठ्या स्टुडिओचा मनोरंजक टीपी सिनेमा म्हणून ब्लॅक विडो बघायला मजा येते.

मार्वेल युनिवर्स मध्ये नताशा रोमा नोव ही ब्लॅक विडो ह्या नावाने एक महत्वाची अ‍ॅव्हेंजर आहे. व हा चित्रपट तिची पूर्व कथा वैचारिक बैठक
उल गडून सांगतो. चित्रपटा त स्ट्रेंजर थिंगज मधील इलेव्हन व तिचे " पप्पा" स्टार वॉर्स मधील क्लोन वॉर्स करणारे अर्ध मनुष्य क्लोन, डेथ स्टारला कंट्रोल करायची शिप ह्या पॉप्युलर कल्चर मधील घटकांची आठवण येते.

सुरुवातीला ओहायो मधील एका सबर्ब मध्ये खेळणारी सायकल चालवणा री मुले , पार्कात मुलांना खेळवून डिनर टाइम ला मुलींना घरी आण् णारी मुलींना काजवे समजावून सांगणारी सबर्बन आई , संध्याकाळी कामावरून घरी आलेले मध्यमव यीन बाबा असा साधा सीन आहे. पण
लगेचच ह्या नॉर्मल सीन चा पडदा फाट्तो व रोमांच क अ‍ॅक्षन सीन मध्ये सर्व फॅमिली तिथून पळून जाते.

क्युबात पोहोचून फॅमिली विभक्त होते व मुलींना ब्लॅक विडो ट्रेनिन्ग मध्ये घालून टाकले जाते जगभरातील अनेक कोवळ्या वयातील मुली तिथे आहेत. व्हिलन मुलींचा ब्रेन वॉश करून त्यांना ट्रेनिग्न देतो व त्यांचे गर्भाशय ओव्हरीज वगैरे सर्व काढून टाकून एक सैनीक म्हणून त्यांना तयार करतो. त्याचा नेहमी प्रमाणे काहीतरी इव्हिल प्लॅन असतो. महिला क्लोन वॉर्स चे पद सैनिक!!! २१ वर्शा नंतर मुली विभक्त झालेल्या एकत्र येतात व हे ब्रेनवॉश चे बंधन झुगारून देतात इथे पण एक मेजर अ‍ॅक्षन सीन आहे. ह्या सिक्वेन्स मध्ये जेम्स बाँड पटांची आठव्ण येते.
एका बाँड पटात - गोल्डन आय - रणगाड्यातून केलेला पाठलाग आहे त्याची आठवण येते. पण हे सीन्स कॉपी नाहीत. एक ट्रिब्युट म्हणता येइल बरोबरीने बहिण - मैत्री घट्ट होते. जुने बंध अधोरेखित होतात

मुलींचे वडील एका तुरुन्गात बद्ध असतात कँप्टन अमेरिका मध्ये जो बकी आहे विंटर सोल्जर त्याच्या आधीची व्हर्जन म्हणजे हे बाबा. रेड काहीतरी असे त्यांचे नाव आहे. बघून सांगते. मुली डेअरिन्ग बाज पद्धतीने सुटका करतात. वडिलांना घेउन आई जिथे लपून राहिली आहे तिथे
सर्वांची भेट होते. काही गुपिते फुटतात. पण व्हिलन चा सर्व नाश करायचा आहे ह्या मुद्द्यावर सर्व विचित्र कुटुंब एकत्र येउन लढा देते
अशी कथा आहे. चिक्कार मारामारी दन्ना दन्नी ढिशाव ढिशाव स्लीक पद्धतीने चित्रित केले आहे. कधीही मदतीला आपला आयर्न मॅन येइल असे उगी चच वाटत असते. मार्व्हेल युनि वर्सची सवय दुसरे काय!

शेवट चित्र पटाला साजे साच आहे. संगीत व स्टंट सीन्स खरे तर बिग स्क्रीन वर बघायच्या लेव्हलचेच आहेत. पण आता तो सुवर्ण क्षण येइस्तो
घरीच एसी लावुन अंधार करून, कुकर मध्ये पॉपकॉर्न बनवून होम थिए टर असेल तर अधिकच गोड. अश्या सेटिन्ग मध्ये जरूर बघा. काही क्षण करोना मुक्त करमणुकीची आपल्याला गरज आहे व ती हा चित्रपट पूर्ण करतो.

कथे त रूढ अर्थाने हिरो नाही. म्हणजे नाहीच्चे कोनी सिक्स पॅक राज राहुल रोहन टाइप व्यक्तिमत्व. इट इज गर्ल्स शो ऑल द वे.
येलेनाच्या रोलमधील अ‍ॅक्ट्रेस ने नव्या लिटिल विमेन मध्ये अ‍ॅमी चा रोल केला आहे. ही एक ताज्या दमाची उभरती कलाकार आपल्याला मिळाली आहे. चेहरा गोड व एक्स्प्रेसिव्ह आहे. मुलींच्या बाबाचा रोल स्ट्रेंजर थिंगज मधील पोलिस ऑफिसर. ह्याच्यात व इलेव्हन मध्ये बाप मुलीचा बाँड तयार होतो तो आहे.

नताशाला वेळो वेळी लागेल ते साहित्य विमाने हत्यारे पुरविणारा नुसता च मित्र हा द हँडमेड्स टेल मधील जून चा नवरा ह्याचा रोल केलेला कलाकार आहे. ह्याला बघूनच असे लोक सुद्धा असतात असे गोड व वॉर्म वाटते ती व्हाइब तो जनरेट करतो. ( हे मराठीत कसे लिहावे!!)

शेवटाला टॉक्सिक पॅट्रार्की चा विनाश करून बंधने तोडून मुलींनी आपापले निर्णय स्वतः घ्यावेत अश्या अर्थाचे संवाद आहेत. ते जरूर ऐका व ऐकवा. द पुरण पोळी क्लब नीड्स टु हिअर धिस.

एंड क्रेडिट सीन मध्ये एक फटाका सोडलेला आहे. सिक्वेल ची सोय.
एकाच वीकेंड ला स्वातंत्र्यवादी जीवन जगू बघणार्‍या सिंड्रेलाची कथा व कटु परिस्थिती चे हलाहल पिउनही समर्थ पणे जगणा र्‍या ब्लॅक विडोज ची कथा रिलीज होणे हा एक मणिकांचन योग आहे. आता हे बघून घरी हरितालिका पूजेला बसून उपास करणार्‍या व्यक्तींना थोडीशी टोचणी तरी जा ण वावी( अशी अपेक्षा मुळीच नाही. )

नताशाच्या ग्रेव्ह मध्ये तिची बॉडी नाही व शेजारी तिच्या आईची ग्रेव्ह आहे पण तिचे नाव नाही स्टोन वर अश्या ह्या एकांड्या स्त्रियांच्या जीवनरेखा.

अपूर्ण तरीही अर्थपूर्ण.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वांडा व्हिजन चांगले आहे असा रिपोर्ट आहे
>>> भारीय , नक्की पहा. सुरूवातीला सिटकाॅमसारखी वाटणारी सिरीज नंतर अगदी गुंतवून ठेवते